मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology: 4, 13, 22, 31 या जन्मतारखेच्या लोकांनी आज टाळा मांसाहार; अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

Numerology: 4, 13, 22, 31 या जन्मतारखेच्या लोकांनी आज टाळा मांसाहार; अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

14 ऑगस्ट 2022 रोजीचं अंकशास्त्र

14 ऑगस्ट 2022 रोजीचं अंकशास्त्र

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 14 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 14 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सूर्यदेवाच्या आशीर्वादामुळे आज तुमच्यात भरपूर ऊर्जा असणार आहे. तुमच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे तुम्ही एक चांगले लीडर होऊ शकता. लोक तुमच्यावर पटकन विश्वास ठेवतात. नवीन बिझनेस उभा करण्याचा किंवा ऑफिसमध्ये मोठं पद सांभाळण्याचा आत्मविश्वास तुमच्यात आहे. वैयक्तिक आयुष्यात भावनिक स्तरावर भाग्यशाली राहाल. आज भरपूर सत्कार, प्रपोझल, बक्षीस आणि जवळच्या व्यक्तींचा आधार मिळेल. सोलर बिझनेस, इलेक्ट्रॉनिक्स, मेटल, धान्य, कॉस्मेटिक्स, कापड या व्यवसायातल्या व्यक्तींना आणि इंजिनीअर, तसंच ज्वेलर असणाऱ्या व्यक्तींना भरपूर फायदा होईल. शुभ रंग : Green and Yellow शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 आणि 5 दान : कृपया मंदिरात सूर्यफुलाच्या बिया दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) प्रेमसंबंधांमध्ये तुमचं भाग्य म्हणावं असं चमकणार नाही. त्यामुळे शांत राहा आणि संवाद टाळा. लहान मुलांना भरपूर आत्मविश्वास असेल; मात्र त्याचे परिणाम दिसण्यासाठी वेळ लागेल. पालकांनी आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी गुंतवणूक करावी. जोडप्यांसाठी रोमँटिक दिवस आहे. नातेसंबंध बळकट होतील. महत्त्वाच्या बैठकीला वा मुलाखतीला जाताना Sea Green रंगाचे कपडे घालणं फायद्याचे ठरेल. जुन्या मित्रांसोबत काही वेळ व्यतीत करा. याचा भविष्यात फायदा होईल. वकील आणि अभिनेते यांना भरपूर यश मिळेल. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 आणि 6 दान : कृपया गरिबांना मीठ दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज दिवसाची सुरुवात गूळ खाऊन करा. कामाच्या ठिकाणी तुमची नवीन ओळख तयार होत आहे. प्रमोशनची चर्चादेखील सकारात्मक होते आहे. नातेसंबंध सुधारण्यासाठी आज संवाद साधणं गरजेचं आहे. त्यामुळे शांत बसू नका. क्रिएटिव्ह व्यक्तींनी केलेली गुंतवणूक चांगला परतावा देईल. एखादी नवीन गोष्ट सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आज त्यात यश मिळेल. शिक्षणतज्ज्ञ, हॉटेल व्यावसायिक, संगीतकार आणि राजकीय व्यक्तींना प्रसिद्धी आणि प्रमोशन मिळेल. बिझनेसमन्सनी क्लायंटला दुपारच्या जेवणानंतर भेटणं उत्तम. शुभ रंग : Brown शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया आश्रमात पिवळा भात दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही तुमचा स्वभाव बदलून मनातल्या भावना व्यक्त करण्यावर लक्ष दिलं पाहिजे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक आणि दूरगामी हालचाली घडतील. मार्केटिंग स्ट्रॅटेडीला नशिबाची साथ मिळेल. आजचा दिवस अगदीच गोंधळाचा वाटेल; मात्र सायंकाळपर्यंत सर्व गोष्टी तुमच्या फायद्याच्या होतील. तरुणांनी मनातली प्रेमभावना व्यक्त करावी आणि नात्यांचा वा मैत्रीचा गैरफायदा घेणं टाळावं. कृपया मांसाहार आणि मद्यपान टाळा. शुभ रंग : Teal शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया एखाद्या भिक्षेकऱ्याला लिंबूवर्गीय, शाकाहारी अन्न दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) ऑफिसमधल्या टेबलवर एक क्रिस्टल लोटस ठेवा. तुमचं नशीब आता हळूहळू चमकत आहे. आज करिअरमध्ये अचानक चांगली प्रगती संभवते. रिलेशनशिप, शॉपिंग, रिस्क घेणं, शेअर्स खरेदी, मॅच खेळणं, स्पर्धेत सहभागी होणं या सर्व गोष्टींसाठी उत्तम दिवस. एखादा आरामादायी प्रवास घडेल. एखाद्या विशेष व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. आज खरेदी केलेली छोटी किंवा मोठी गोष्ट भविष्यात फायद्याची ठरेल. शेअर मार्केट किंवा प्रॉपर्टीमध्ये नक्की गुंतवणूक करा. प्रमोशन आणि अप्रैझलची बोलणी करण्यासाठी चांगला दिवस. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया हिरवी रोपं दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या मनातली रोमँटिक भावना सत्यात उतरवण्यासाठी उत्तम दिवस. वैवाहिक जीवनात जोडप्यांमधला विश्वास आणि नातं अधिक घट्ट होईल. आज तुमची सर्व उद्दिष्टं पूर्ण होतील. राजकीय व्यक्तींना आपल्या क्षेत्रात यश मिळेल. गृहिणींना कुटुंबीयांचं प्रेम आणि आदर मिळेल. सरकारी अधिकाऱ्यांना प्रमोशन किंवा नवीन पद मिळेल. कलाकार व्यक्ती लोकांवर छाप पाडतील. प्रॉपर्टीसंबंधी व्यवहार आरामात पार पडतील. विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 आणि 2 दान : कृपया घरगुती मदतनीसाला कॉस्मेटिक आयटेम्स दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) दिवसभरात बरं वाटत नसेल, तेव्हा बडीशेप खा. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुमच्या मॅच्युरिटीची भूमिका महत्त्वाची ठरेल. आजूबाजूला असणारं प्रेम आणि सद्भावना यामुळे तुम्ही आनंदी असाल. दिवसाच्या सुरुवातीला वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या आणि आज पिवळ्या डाळी दान करा. लहान ब्रँड्सना मोठ्यांपेक्षा जास्त फायदा होईल. आज तुम्ही घेतलेले निर्णय इतर व्यक्ती निश्चितपणे मान्य करतील. शुभ रंग : Orange शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया तांब्याचं भांडं दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमच्या कौशल्याला आणि ऊर्जेला सीमा नसेल. त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे नेतृत्व करू शकाल. भूतकाळात केलेल्या कामामुळे आज कोणत्याही अडचणीवर मात करता येईल. गायींसाठी दानधर्म करण्याकरिता आज चांगला दिवस आहे. जोडप्यांमध्ये प्रेमसंबंध चांगले राहतील. डॉक्टर, फार्मासिस्ट, इंजिनीअर आणि उत्पादक यांना आर्थिक फायदा होईल. मशिनरी खरेदी आणि प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. कामाच्या ताणामुळे तब्येतीच्या तक्रारी येतील; मात्र झोपण्यापूर्वी योगासनं केल्यामुळे फायदा होईल. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गायींना पिण्याचं पाणी दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचा जन्मांक मानवता गुणधर्माशी संबंधित आहे, हे विसरू नका. तुमच्या वस्तू, साहित्य आणि तुमची इमेज या गोष्टींची काळजी घ्या. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून या गोष्टींना इजा पोहोचू शकते. बिझनेस गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस; मात्र शेअर्समध्ये गुंतवणूक टाळा. तरुणांना आपल्या जोडीदारावर छाप पाडण्याची संधी मिळेल. सभेला किंवा समारंभाला संबोधित करणं, एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं, पार्टी होस्ट करणं, दागिने खरेदी, समुपदेशन किंवा खेळ खेळण्यासाठी साधारण दिवस. शुभ रंग : Brown शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 आणि 6 दान : कृपया लहान मुलीला लाल रुमाल दान करा. 14 ऑगस्ट रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : कुलदीप नय्यर, जॉनी लिव्हर, दिना वाडिया, सुनिधी चौहान, मोहित रैना, आझम खान
First published:

Tags: Numerology

पुढील बातम्या