Home /News /astrology /

Numerology: तुमची जन्मतारीखही सांगते भविष्य; अंकशास्त्रानुसार असा असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या भविष्य

Numerology: तुमची जन्मतारीखही सांगते भविष्य; अंकशास्त्रानुसार असा असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या भविष्य

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 1 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

  ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 1 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

  #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  बिझनेसचं बजेटिंग आणि मार्केटिंग करण्यात वेळ व्यतीत करा. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळतील. आज तुमच्यात भरपूर उत्साह असेल, ज्यामुळे कोणतंही आव्हान स्वीकारू शकाल. बिझनेसमध्ये रिस्क घेणं फायद्याचं ठरेल. जोडप्यांमध्ये काही वाद होऊ शकतो. अशा वेळी समोरच्याला माफ करणं हा सर्वांत चांगला पर्याय ठरेल. आज यश मिळवण्यासाठी सूर्यदेवाचे आशीर्वाद घ्या, तसंच गरिबांना पिवळ्या रंगाचे खाद्यपदार्थ दान करा. तुमच्या आजूबाजूच्या बऱ्याच जणांना तुमच्या यशाबाबत मत्सर वाटतो. याचा दुष्परिणाम टाळण्यासाठी संध्याकाळी दुधाच्या पाण्याने अंघोळ करा. खेळाडूंना मोठं यश मिळेल. तुमच्या खेळाशी संबंधित एखादी मोठी व्यक्ती भेटेल. सूर्याला जल अर्पण करणं फायद्याचं ठरेल.

  शुभ रंग : Creme

  शुभ दिवस : रविवार आणि शुक्रवार

  शुभ अंक : 1

  दान : कृपया आश्रमात साखर दान करा.

  #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  आज मित्रांना आणि कुटुंबीयांना भरपूर काही प्रॉमिस कराल. प्रेमात असलेल्यांना सीरियस कमिटमेंट करण्यासाठी चांगला दिवस. काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये चांगला समतोल साधाल. खेळाच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी, किंवा नवीन नोकरीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी उत्तम दिवस. गुंतवणुकीचा परतावा साधारण राहील, मोठे आर्थिक निर्णय घेणं टाळा. कॉस्मेटिक्स, लिक्विड, इलेक्ट्रॉनिक्स, मेडिसिन, एक्सपोर्ट-इम्पोर्ट, सोलर एनर्जी, शेती, केमिकल्स या क्षेत्रांमधल्या व्यक्तींना चांगला नफा संभवतो.

  शुभ रंग : Crème and Sky Blue

  शुभ दिवस : सोमवार

  शुभ अंक : 2

  दान : कृपया भिक्षेकऱ्यांना आणि गायींना पिण्याचं पाणी दान करा.

  #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  तुमच्या व्यक्तिमत्वाची क्रिएटिव्ह बाजू दाखवण्यासाठी उत्तम दिवस. विद्यार्थ्यांना आज मोठं यश मिळेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल; मात्र तुमच्या मार्गदर्शकाचे आभार मानण्यास विसरू नका. तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाची जोडीदारावर छाप पडेल. प्रियकर वा प्रेयसीला लग्नाची मागणी घालण्यासाठी उत्तम दिवस. खेळाडूंना जुन्या प्रशिक्षकाच्या मदतीने मोठं यश मिळेल. सरकारी अधिकारी किंवा राजकीय व्यक्ती लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात यशस्वी होतील. विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यापूर्वी किंवा मुलाखतीपूर्वी गुरुमंत्राचा जप करणं फायद्याचं ठरेल. महिलांनी संध्याकाळी आपल्या गुरूसाठी दीप प्रज्ज्वलित करावा.

  शुभ रंग : Orange

  शुभ दिवस : गुरुवार

  शुभ अंक : 3 आणि 1

  दान : कृपया गरिबांना किंवा गायींना केळी दान करा.

  #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  तुमच्या आजूबाजूच्या हिरव्या रोपांना नियमित पाणी घाला. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रातल्या व्यक्तींना नवीन संधी मिळतील. आज कामाचं योग्य नियोजन केल्यामुळे चांगले रिझल्ट मिळतील. आजचा बराचसा वेळ हा नियोजनात व्यतीत करा. सोलर एनर्जी, चित्रपट दिग्दर्शन, नाटक, उत्पादन आणि कुकिंग क्षेत्रातल्या व्यक्तींनी आज मशीन्स हाताळताना काळजी घ्यावी. वैयक्तिक नातेसंबंध रोमँटिक राहतील. संवाद टाळू नका. आज तुमचा छंद जोपासण्यासाठी काही वेळ काढा. लिंबूवर्गीय पदार्थ खाणं फायद्याचं ठरेल.

  शुभ रंग : Blue

  शुभ दिवस : मंगळवार

  शुभ अंक : 9

  दान : कृपया प्राण्यांना अन्न दान करा.

  #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  टीममध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना आज आपलं नेतृत्वकौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. तुमच्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणं टाळा. तुमच्या सहकाऱ्यांपासून सावध रहा, आणि तुमची गुपितं त्यांना सांगणं टाळा. मित्रांशी आणि नातेवाईकांशी विनम्रतेने बोला. ग्लॅमर, मीडिया, फॉरीन कमॉडिटी, आणि क्रीडा क्षेत्रांतील व्यक्तींना अप्रैझल मिळेल. पुरुषांना हिरवे, तर महिलांना निळ्या रंगाचे कपडे घालणं फायद्याचं ठरेल. प्रॉपर्टी संबंधी निर्णय तुमच्या बाजूने लागतील. खेळात यश मिळेल. आज प्रवास टाळा आणि साधा आहार घ्या.

  शुभ रंग : Aqua

  शुभ दिवस : बुधवार

  शुभ अंक : 5

  दान : कृपया मंदिरात नारळ दान करा.

  #नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  घरात किंवा कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून काहीसा दबाव येईल; मात्र हे तात्पुरतं आहे. सध्या समोर येणाऱ्या संधी आणि आव्हानं स्वीकारणं गरजेचं आहे. याचा भविष्यात फायदा होईल. तुम्हाला चांगला जोडीदार दिल्याबद्दल आज देवाचे आभार मानाल. पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. तुमचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. आजचा दिवस हा जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आणि ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देण्यासाठी उत्तम आहे. सरकारी टेंडरच्या बाबतीत नशीब तुमच्या बाजूने असेल, त्यामुळे रिस्क घेऊ शकता. महागड्या वस्तू, शोभेच्या वस्तू, कपडे, वाहन, मोबाइल, घर इत्यादी गोष्टी खरेदी करण्यासाठी किंवा एखादी छोटीशी सहल आयोजित करण्यासाठी उत्तम दिवस. डॉक्टरांनी प्रमोशन किंवा नवीन जॉबसाठी अर्ज करावा. जोडप्यांमध्ये एखाद्या कोणाच्या दबावामुळे ताण येईल.

  शुभ रंग : Beige

  शुभ दिवस : शुक्रवार

  शुभ अंक : 6

  दान : कृपया गरिबांना गहू दान करा.

  #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  तुमच्या पर्समध्ये किंवा बॅगेत नेहमी तांब्याचं किंवा काश्याचं एक नाणं ठेवा. आजचा दिवस पैशांचे व्यवहार टाळा. कागदपत्रांचे व्यवहार करू शकता. मेडिकल चेकअप करण्याचं सुचवलं असल्यास ते संध्याकाळी पार पाडा. आजचा दिवस बऱ्याच बाबतींत तडजोड करावी लागेल. विरुद्धलिंगी व्यक्तीकडून आलेला सल्ला स्वीकारा. पैशांची योग्य बचत करण्यासाठी वकिलांचा सल्ला घेणं उत्तम. सॉफ्टवेअर क्षेत्रातली बिझनेस डील्स यशस्वी होतील. आज येणारे विवाहाचे प्रस्ताव अनुरूप असतील. भगवान शंकराच्या मंदिरात अभिषेक केल्यास समाधान मिळेल.

  शुभ रंग : Yellow

  शुभ दिवस : सोमवार

  शुभ अंक : 7

  दान : कृपया मंदिरात पिवळं कापड दान करा.

  #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  आज बिझनेसमध्ये बदल घडवण्यासाठी थोडे पैसे खर्च करा. कायदेशीर प्रकरणं सोडवण्यासाठी ओळखीची किंवा पैशांची गरज भासेल. बिझनेस डील यशस्वी करण्यासाठी तुमच्या ओळखी कामी येतील. तुमचं आर्थिक बॅकग्राउंड पाहून जोडीदारावर छाप पडेल. आज घेतलेले सर्व निर्णय योग्य ठरतील. विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी फी जास्त वाटत असली, तरी भविष्यात त्याचा होणारा फायदा लक्षात घ्यावा. खेळाडू आपल्या मेहनतीने मोठं यश संपादन करतील. प्रवासाचे बेत टाळावेत. दानधर्म करणं गरजेचं.

  शुभ रंग : Sea Green

  शुभ दिवस : शनिवार

  शुभ अंक : 6

  दान : कृपया गरजूंना चपला दान करा.

  #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  मंगळ ग्रहाची ऊर्जा मिळवण्यासाठी केशरी वा लाल रंगाचे कपडे घाला. लहान मुलांना भविष्याबाबत नियोजनासाठी उत्तम दिवस. सरकारी टेंडर आणि बिझनेस डील्स आरामात पार पडतील. ग्लॅमर, सॉफ्टवेअर, गूढविद्या, संगीत, मीडिया किंवा शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तींना आज भरपूर प्रसिद्धी मिळेल. तरुण राजकीय व्यक्तींना नव्या पदाची ऑफर येईल. आजचा दिवस सभेत भाषणासाठी, मुलाखतीसाठी आणि स्पर्धा परीक्षा देण्यासाठी उत्तम आहे. संगीतकार व्यक्तींच्या पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. डॉक्टर, सर्जन्सना बक्षीस मिळेल.

  शुभ रंग : Orange and Red

  शुभ दिवस : मंगळवार

  शुभ अंक : 9

  दान : कृपया लाल मसूर दान करा.

  1 ऑगस्ट रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : मीना कुमारी, सुनील छेत्री, तापसी पन्नू, कृष्णा, गुरिंदर सिंग, दिल्ली गणेश

  First published:

  Tags: Astrology and horoscope, Numerology

  पुढील बातम्या