मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : तुमच्या जन्मतारखेनुसार आज 'या' वस्तू करा दान; आयुष्यात होईल प्रगती

Numerology : तुमच्या जन्मतारखेनुसार आज 'या' वस्तू करा दान; आयुष्यात होईल प्रगती

अंकशास्त्र

अंकशास्त्र

अंकशास्त्रात जन्मतारखेवरून भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 30 सप्टेंबर 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 30 सप्टेंबर 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज राजकारण आणि सेल्स या क्षेत्रात प्रगतीची सरासरी शक्यता आहे. तुमच्या ज्ञानाचा संगीताची पार्श्वभूमी असलेल्या स्पर्धकांवर प्रभाव पडेल. आजचा दिवस दमवणारा असला, तरी आज तुमची दखल घेतली जाईल आणि तुम्ही घरी येताना काही पुरस्कारांसह याल. कामाच्या ठिकाणच्या व्यक्ती, तसंच नातेसंबंधातल्या व्यक्तींना तुमच्याबद्दल अपार आदर आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा राजकीय भाग दाखवण्याचा आजचा दिवस आहे. स्पर्धा, संगीत मैफली, कौटुंबिक सोहळे आदींना उपस्थित राहण्याचा, इंटरव्ह्यूसाठी अर्ज करण्याचा, सोहळा आयोजित करण्याचा आजचा दिवस आहे. आज प्रॉपर्टी खरेदी करणं, मालमत्तेची विक्री करणं टाळावं. आज तुमच्या आवडीचा जोडीदार मिळण्याची खूप शक्यता आहे. शाळा, रेस्तराँ, कौन्सेलिंगची पुस्तकं, डिजिटल मार्केटिंग, धातू, क्रिएटिव्ह क्लासेस, क्रीडा संस्था आदी उद्योगांना आज मोठा फायदा होईल. मुलांना आज अभ्यासाचा खूप ताण असेल.

शुभ रंग : Orange & Red

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3

दान : महिलांना संत्री दान करावीत.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

निर्णय घेताना लवचिक आणि व्यावहारिक राहा. पार्टनरशिप फर्म्सना आव्हानांना सामोरं जावं लागेल. आज खूप लवचिक राहणं आणि सर्वांसाठी रिसेप्टिव्ह राहणं टाळा. कारण तुमच्या मृदू स्वभावामुळे तुम्ही दुखावले जाण्याची शक्यता आहे. लीगल कमिटमेंट्स कोणत्याही तडजोडीशिवाय पूर्ण होतील. प्रेमसंबंधांत तुम्हाला जोडीदाराकडून वर्चस्व गाजवलं जात असल्यासारखं, नियंत्रित केलं जात असल्यासारखं वाटेल. महिलांनी आज वरिष्ठांकडून झालेल्या टीकेकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. जबाबदाऱ्या वाटून देण्यासाठी आज पैशांचा उपयोग केला पाहिजे. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बिझनेस आणि राजकीय नेत्यांनी आज डॉक्युमेंटेशन टाळावं. विद्यार्थी, उत्पादक, रिटेलर्स, ब्रोकर्स, क्रीडापटू आदींनी कामगिरीमध्ये उच्च रेटिंग पाहण्यासाठी एक दिवस वाट पाहावी लागेल.

शुभ रंग : Aqua

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 2

दान : अनाथाश्रमात कपडे दान करावेत.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुमचं क्रिएटिव्ह इमॅजिनेशन उच्च पातळीवर असेल. त्यामुळे संगीतकार आणि लेखकांसाठी उत्तम दिवस. आज घेतलेले सर्व निर्णय नजीकच्या भविष्यात अनुकूल ठरतील. सध्या मात्र तुमच्या विरोधातलं वातावरण आहे. तुमचे आर्थिक प्लॅन्स अन्य व्यक्तींशी शेअर करणं टाळा. प्रॉपर्टी आणि स्टॉकशी संबंधित गुंतवणुकीतून संथ गतीने परतावा मिळण्याची शक्यता आहे. प्रेमात असलेल्यांनी आपल्या भावना परस्परांना भेटवस्तू देऊन व्यक्त केल्या पाहिजेत. सरकारी अधिकाऱ्यांनी सावधगिरी बाळगून राहिलं पाहिजे. दिवसाची सुरुवात करताना तुमच्या गुरूचं नामस्मरण करायला विसरू नका.

शुभ रंग : Orange

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3, 1

दान : महिला मदतनीसाला केशर दान करावं.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज चढ-उतार असतील; मात्र आजचा दिवस नेटवर्किंगचा आहे. आज आरोग्याची काळजी घ्यावी. ताण हलका करण्यासाठी ध्यानधारणेची मदत घ्यावी. पैसे मिळतील; मात्र अनेक जबाबदाऱ्या असतील. राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रात असलेल्यांना प्रवासासाठी आजचा दिवस चांगला आहे. बांधकाम आणि मेडिकल क्षेत्रात वेगाने प्रगती होईल; स्टॉक्समधल्या गुंतवणुकीत संथ गतीने सकारात्मक बदल होतील. विद्यार्थ्यांनी ताण हलका होण्यासाठी ध्यानधारणा करावी. मार्केटिंगमधल्या व्यक्तींनी हे लक्षात घ्यावं, की जेवढा तुम्ही जास्त प्रवास कराल, तेवढं जास्त यश मिळेल आणि महिनाअखेरीचं टार्गेट पूर्ण करण्यात यश मिळेल. आज मांसाहार करणं आणि मद्यपान करणं टाळा.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : शनिवार

शुभ अंक : 9

दान : भिकाऱ्यांना हिरवे किंवा लाल कपडे दान करावेत.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

सकाळी दुधाच्या पाण्याने आंघोळ करा. आज सोशलायझेशनवरचा खर्च नियंत्रित करा. आज तुम्हाला एकटेपणा कमी जाणवेल आणि सोशलायझिंग अधिक असेल. तुमचा जोडीदार किंवा जवळच्या मित्राशी विचार आणि भावना शेअर करण्याचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी नफा मिळवण्याइतकं शहाणपण तुमच्याकडे नक्कीच आहे. कर्जासारख्या जबाबदारीच्या जाळ्यात अडकू नका. दुपारच्या जेवणानंतरच्या काळात नशीब आपलं काम करील. त्यामुळे त्या वेळेत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. प्रेमात असलेल्या व्यक्तींचं लक्ष इकडे-तिकडे विचलित होण्याचे प्रकार घडतील. त्यामुळे त्यांनी निष्ठेला प्राधान्य द्यावं.

शुभ रंग : Sea Green

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : मंदिरात नारळ दान करा.

#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या वर्किंग अवर्सची फ्लेक्झिबिलिटी वाढेल. आज सीनिअर्स आणि काउंटरपार्ट्ससह काम करताना सावधगिरी बाळगा. जोडीदार आणि मुलांसोबत चांगला वेळ व्यतीत करण्याचा दिवस. विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांनी नवी संधी विचारपूर्वक निवडावी. कारण ती अनुकूल ठरणार आहे. वैयक्तिक नात्यांत तुम्हाला असुरक्षित आणि अवघडल्यासारखं वाटेल. नव्या फॅक्टरीसाठी जागेच्या शोधात असलेल्यांना आज चांगला पर्याय निवडता येईल. प्रेझेंटेशन्ससाठी बाहेर जा किंवा खेळा आणि भूतकाळ विसरा.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : आश्रमांना पांढरी मिठाई दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

घरात पूर्व दिशेला Wind Chime ठेवा. पब्लिक फिगर्स, राजकीय नेते, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंजिनीअर्स, बिल्डर्स, भविष्यवेत्ते, मेकअप आर्टिस्ट्स, क्रीडापटू आदी व्यक्ती हिरोप्रमाणे विजय प्राप्त करतील. कायदेविषयक प्रकरणांत विजय मिळेल. प्रेयसी किंवा प्रियकरासोबत वाद घालू नका. ब्रेक-अपची स्थिती उद्धवू शकते. वादविवादाशिवाय नातेसंबंध पूर्ववत होतील. गुरूमंत्राचं पठण आवर्जून केलंच पाहिजे. क्रीडापटूंची दखल घेतली जाईल. पुरस्कार मिळतील. राजकीय नेते आणि अभिनेत्यांसाठी चांगला दिवस. सार्वजनिक बैठकांना उपस्थित राहून पक्षश्रेष्ठींना इम्प्रेस करण्यासाठी राजकीय नेत्यांना चांगला दिवस. पैसे कर्जाऊ देणाऱ्या व्यक्ती, बँकर्स आदींनी आज सावधगिरी बाळगावी.

शुभ रंग : Teal

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 7

दान : कोणत्याही स्वरूपात कासं किंवा तांबं या धातूचा तुकडा दान करावा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

ड्रायव्हिंग करणं टाळा. आरोग्य चांगलं राहण्यासाठी Citrus खा. दानधर्म ही आयुष्यात प्रगती होण्याकरिता आजच्या दिवसासाठीची गुरुकिल्ली आहे. तुम्ही कामं वेळेवर पूर्ण करू शकाल. त्यामुळे लाभाची शक्यता जास्त आहे. तुम्हाला ज्याच्यामुळे पैसे, प्रसिद्धी, हुशारी, आदर आणि कुटुंबीयांचं प्रेम या गोष्टी मिळाल्या, त्या देवाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात जा. आरामदायी वाटचाल करून अनेक उद्दिष्टं पूर्ण करण्यात व्यग्र असाल. तुमचं आयुष्य व्यग्र आणि गुंतागुंतीचं असल्यासारखं वाटेल; मात्र ती तात्पुरती अवस्था आहे. डॉक्टर्स आणि फायनान्सर्सना बक्षिसं मिळतील. रोमँटिक भावना सत्यात उतरवण्याचा दिवस.

शुभ रंग : Sea Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : भिकाऱ्यांना कलिंगड दान करा.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

सकाळी कपाळावर चंदन लावा. अभिनय, माध्यम, अँकरिंग, सेल्स, मार्केटिंग क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस प्रसिद्धीचा असेल. टेंडर्स, प्रॉपर्टी आदींसाठी मध्यस्थाकडे जाण्याकरिता उत्तम दिवस. क्रीडापटू, व्यावसायिक, शिक्षक, बँकर्स, संगीतकार, विद्यार्थी आदींनी डॉक्युमेंटेशनसाठी पुढाकार घ्यावा. कारण ते अनुकूल ठरेल. स्टॉक मार्केटमध्ये असलात, तर घाऊक प्रमाणात स्टॉक्स खरेदी करणं भविष्यासाठी चांगलं ठरेल. रेड आणि पर्पल या रंगांच्या कॉम्बिनेशनचे कपडे घातल्यास नशीब आणि स्थैर्य आदींच्या दृष्टीने चांगलं असतं. आज डोळ्यांची काळजी घ्या. आज प्रवास टाळा आणि ऑनलाइन काम करण्याचा प्रयत्न करा.

शुभ रंग : Purple

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 3

दान : प्राण्यांसाठी केळी दान करावीत.

30 सप्टेंबर रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : शान, प्रसेनजित चॅटर्जी, दीपक मलिक, महेश शर्मा, वेणुगोपाल धूत, शिवराजसिंग

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya