मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : फक्त पिवळे कपडेच नाही, तर अंकशास्त्रानुसार हा पिवळा पदार्थ खाणंही आज फायद्याचं ठरेल

Numerology : फक्त पिवळे कपडेच नाही, तर अंकशास्त्रानुसार हा पिवळा पदार्थ खाणंही आज फायद्याचं ठरेल

अंकशास्त्र (फोटो सौजन्य - Canva)

अंकशास्त्र (फोटो सौजन्य - Canva)

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 29 सप्टेंबर 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

संयम राखा आणि राग नियंत्रणात ठेवा. आज तुमचं मोठ्या ग्रुपसोबतचं असोसिएशन यशस्वी होईल असं दिसतंय. नवी मार्गदर्शक तत्त्वं किंवा मेंटॉरशी भेट होण्याची मोठी शक्यता आहे. आजचा दिवस खरेदी, काँट्रॅक्ट्स करणं, कौटुंबिक सोहळ्याला उपस्थिती, छोटी ट्रिप किंवा इंटरव्ह्यूची तयारी यांसाठी व्यतीत होईल. आज तुम्ही सर्व ऐशोआरामाचा लाभ घ्याल. वैयक्तिक नातंसंबंधांत विश्वासाला तडा जाण्याची शक्यता आहे. आज जेवणात पिवळ्या मिठाईचा समावेश करायला विसरू नका. क्लायंट्स, नातेवाईक यांच्याशी आरोग्यपूर्ण नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी आज आणखी एक चांगला दिवस आहे. आज डिप्लोमॅटिक राहू नका. थेट बोला. नव्या गुंतवणुकीसाठी तुमच्या ज्ञानाची यशस्वीपणे अंमलबजावणी करता येईल. आज सौर ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, लिक्विड्स, शिक्षण, पुस्तकं आदी क्षेत्रांतल्या बिझनेसमध्ये मोठा परतावा अपेक्षित आहे.

शुभ रंग : Creme & Sky Blue

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 6

दान : आज मंदिरात मोहरीचं तेल दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस भावना आणि प्रेमभावना गुप्त राखण्याचा आणि कोणाशीही शेअर न करण्याचा आहे. ट्रॅव्हल प्लॅन आणि शॉपिंगपासून सुरुवात करण्यासाठी सुंदर दिवस. सरकारी काँट्रॅक्ट करण्यासाठी उत्तम दिवस. वैयक्तिक आयुष्यात मुत्सद्देगिरी आणि थेट संवाद यांचं आज महत्त्वाचं स्थान असेल. आज तुमचे फ्युचर प्लॅन्स प्रत्यक्षात येताना दिसतील. त्यामुळे घरी येताना आनंदी चेहऱ्याने याल. Sky Blue रंगाचे कपडे घालणं आज श्रेयस्कर ठरेल. खासकरून इंटरव्ह्यू, ऑडिशन्स, प्रेझेंटेशन्स, स्पर्धा, सेमिनार आदी ठिकाणी जाताना त्या रंगाचे कपडे घालावेत. मित्रमंडळी, बॉस आदींचा सपोर्ट मिळेल. आज यश आणि नशीब साजरं करा.

शुभ रंग : Peach

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 2

दान : भिकारी किंवा गायींना अन्नदान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज हट्टीपणा आणि इगो बाजूला ठेवा. थेट मौखिक संवादाच्या माध्यमातून व्यक्त होण्याचा आजचा दिवस आहे. प्रशिक्षकावर विश्वास ठेवा आणि उत्तम रिझल्टसाठी त्यांचं ऐका. निरुपयोगी गोष्टी विसरा. दिवसाचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करण्यासाठी सत्य बोला. सोशलायझेशन आणि मित्रांना इम्प्रेस करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. उच्च शिक्षण घेत असलात किंवा नृत्य, स्वयंपाक, डिझायनिंग, अभिनय क्षेत्रात असलात किंवा शिक्षक असलात किंवा ऑडिटर असलात, तर आज तुमचं टॅलेंट दर्शवण्याचा दिवस आहे. अर्थ, विज्ञान, राजकारण, लेखन, चित्रकला आदी क्षेत्रांतल्या व्यक्तींना आज मोठे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

शुभ रंग : Pink

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3, 9

दान : मंदिरात कुंकू दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

संपूर्ण आयुष्यभर प्राण्यांसाठी दानधर्म करावा. बरंचसं कन्फ्युजन दूर झाल्यामुळे आज तुम्हाला बराचसा दिलासा मिळेल. आजचा दिवस फ्युचर प्लॅनिंग आणि त्याच्या अंमलबजावणीचा आहे. वर्तमानात खूप जोर देणं टाळा. क्लायंट प्रेझेंटेशनचं कौतुक होईल. कौन्सेलिंग आणि मार्केटिंगमध्ये बराच वेळ व्यतीत करायला हवा. मशीन्सशी संबंधित व्यवहार असतील, तर सध्याचा काळ मशिनरीमध्ये सुधारणा करण्याचा आहे. वैयक्तिक नातेसंबंध कोणत्याही कन्फ्युजनशिवाय हेल्दी असतील. केशरी रंगाचे गोड पदार्थ खाणं शांततेसाठी आवश्यक आहे. काही काळ मित्रांसमवेत व्यतीत करा.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 6

दान : गरिबांना हिरवं धान्य दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज डोळ्यांची काळजी घेण्याचा दिवस आहे. बदलांचा काळ आणि मैत्रीचा आज आनंद घ्या. तुमच्या निर्णयांवर भावना राज्य गाजवणार नाहीत, याची काळजी घ्या. गुंतवणूक योजना आज परतावा मिळण्यासारख्या असतील. मीटिंगमध्ये Aqua रंगाचे कपडे घालणं उपयुक्त ठरेल. इंटरव्ह्यू, प्रपोझल्ससाठी दुपारच्या जेवणापूर्वी बाहेर जा. प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय आज पर्फेक्ट ठरतील. प्रवास आवडणाऱ्या व्यक्ती परदेशप्रवासाचे पर्याय तपासून पाहू शकतील. खाण्यापिण्याची शिस्त बाळगणं गरजेचं. आज जुन्या मित्राला भेटा. जुना मेंटॉर भविष्यात मार्गदर्शनासाठी पुढे येईल.

शुभ रंग : Green

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : अनाथांना हिरवी फळं दान करा.

#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

प्रेमी युगलातला परस्परांवरचा विश्वास उच्च असेल. आजचा दिवस नशिबाचा, आरामाचा, आनंदाचा, हालचालींचा आणि पूर्णत्वाचा आहे. शुक्र तुम्हाला लोकप्रियता आणि समृद्धीचा आशीर्वाद देईल. कुटुंबीय, मित्र, फॉलोअर्स, सहकारी, ओळखीच्या व्यक्ती आदींचा पाठिंबा असल्याने तुम्हाला खूप छान वाटेल. पार्टनरसोबत वेळ व्यतीत करावा. ऑफिसमध्ये अप्रैझल-प्रमोशनचा काळ. बिझनेसशी संबंधित यशस्वी निर्णय घेण्याची बुद्धिमत्ता तुमच्याकडे आहे. कॉस्मेटिक्स, लक्झरी आयटेम्स, वाहन, घर, मशिनरी, ज्वेलरी आदींच्या खरेदीसाठी चांगला दिवस. स्टॉक मार्केट गुंतवणूक अनुकूल ठरेल. संध्याकाळच्या रोमँटिक डेटमुळे संपूर्ण आठवडा बहरून जाईल.

शुभ रंग : Aqua

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : गायींसाठी किंवा अनाथाश्रमात दूध दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुम्हाला अनेक असाइनमेंट्स असतील आणि तुम्ही त्या सगळ्या वेळेत पूर्ण कराल. खासकरून आर्थिक व्यवहार आणि जमीनविषयक प्रकरणांमध्ये वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला पाळला पाहिजे. आज पार्टनर किंवा क्लायंटसोबत कोणत्याही प्रकारची तडजोड नको. तुमच्या निर्णयांवर ठाम राहा. सकाळी गुरूमंत्राचं पठण करा. केतू ग्रहाची पूजा करा. बिझनेस डील्स योग्य वेळी होतील. वकील आणि आयटी प्रोफेशनल्स उत्तम यशाचा अनुभव घेतील. लग्नाचे प्रस्ताव विचार करण्यासारखे असतील. भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाऊन अभिषेक केल्यास आजच्या दिवसाची उत्तम सांगता होईल.

शुभ रंग : Sea Green

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 7

दान : गरिबांना पिवळा भात दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

प्राण्यांना अन्न खाऊ घातल्यामुळे आयुष्याची नशिबाची साथ मिळेल आणि शांतता लाभेल. प्राण्यांना त्रास देणं टाळा आणि त्यांची सेवा करा. गुडविलची, तसंच सोशल नेटवर्कची शक्ती आज कुठे अडकल्यासारखं वाटेल तिथे वापरा. तुमची उदार वृत्ती आणि उच्च पातळीचं ज्ञान यांमुळे अनेक जण तुमचे फॅन होतात. आज बिझनेस डील्स क्रॅक होण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. फॅमिली कनेक्शन्स कामी येतील. डॉक्टर्स, शास्त्रज्ञ, सरकारी अधिकारी, मेटल मॅन्युफॅक्चरर्स, सॉफ्टवेअर इंजिनीअर्स नव्या गुंतवणुकीची जोखीम घेऊ शकतात. परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्त शुल्क भरण्याची तयारी ठेवली पाहिजे. कारण त्यामुळे त्यांची स्वप्नपूर्ती होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये दिवसभर व्यग्र असाल. आर्थिक लाभासह दिवस संपेल. प्रवासाचे बेत पुढे ढकलावेत. वृद्धाश्रमात दानधर्म करणं गरजेचं आहे.

शुभ रंग : Sea Blue

शुभ दिवस : शनिवार

शुभ अंक : 6

दान : गरजू व्यक्तींना चपला दान करा.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

हालचाली सुरू राहिल्या पाहिजेत. आज 'वर्क फ्रॉम होम' नको. टीमवर्क करताना तुमचा इगो बाजूला ठेवा. स्थलांतर करणाऱ्या, जॉब बदलणाऱ्या, नव्या रिलेशनशिपमध्ये जाणाऱ्या, जमीन खरेदी करणाऱ्या आणि उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या व्यक्तींसाठी चांगला दिवस. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी पुढे जाऊन त्यांच्या प्रिय व्यक्तीला प्रपोझ करायला हवं. राजकारण, माध्यम, अभिनय, खेळ, फायनान्स, शिक्षण आदी क्षेत्रांतल्या व्यक्तींची चांगली प्रगती होईल. तरुण सरकारी अधिकाऱ्यांना आज जनतेसमोर बोलण्याची संधी मिळेल. डिझायनिंग इंडस्ट्रीतल्या व्यक्तींनी इंटरव्ह्यूला किंवा स्पर्धा परीक्षांना हजर राहावं. आई-वडिलांना त्यांच्या मुलांचा अभिमान वाटेल. आज मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. बिझनेस पार्टनर्स, टीमवर विश्वास कायम राखावा. नजीकच्या भविष्यात ते तुमच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे.

शुभ रंग : Orange

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : भिकारी महिलेला लाल बांगड्या दान करा.

29 सप्टेंबर रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : महमूद, श्रद्धा श्रीनाथ, सय्यद अली शाह गिलानी, समीर सोनी, दर्शन जरीवाला, ब्रजेश मिश्रा

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya