मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : तुमची जन्मतारीख 'ही' असेल तर आज रागावर नियंत्रण ठेवा; वाद घालणं टाळा

Numerology : तुमची जन्मतारीख 'ही' असेल तर आज रागावर नियंत्रण ठेवा; वाद घालणं टाळा

अंकशास्त्र

अंकशास्त्र

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 25 सप्टेंबर 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

घराच्या उत्तर दिशेला एक कारंजं ठेवा. आज घेतलेले सर्व निर्णय सकारात्मक आणि चांगले ठरतील. संयम राखा. कोणतीही कृती करण्यापूर्वी मेडिटेशन करा. अभिनेते आणि पब्लिक स्पीकर यांच्या कामात वृद्धी होईल. शिक्षक, डॉक्टर, मेटल उत्पादक, फायनान्सर आणि वकील यांनी मिळणारी ऑफर नक्की स्वीकारावी. आकर्षण वाढवण्यासाठी चामड्याच्या वस्तू वापरणं टाळा.

शुभ रंग : Yellow

शुभ दिवस : रविवार

शुभ अंक : 3 आणि 7

दान : गायी किंवा गरिबांसाठी केळी दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस बऱ्यापैकी संथ असेल. महिलांनी किमान आजचा दिवस तरी (कोणत्याही प्रकारे) कुंकू लावावं. अनावश्यक ड्रामा आणि कौटुंबिक वादांपासून स्वतःला दूर ठेवा. तुमचं इंट्यूशन आज तुम्हाला साथ देईल. त्यामुळे तुमच्या मनाचं ऐका. आजचा दिवस हा भावनांनी भरलेला आणि रोमँटिक असेल; मात्र स्वतःचा हट्टी स्वभाव बाजूला सारून तुमची स्वप्नं शेअर करा. एखाद्या मोठ्या कंपनीसोबत पार्टनरशिप करण्याचा काळ आहे. कामं वाटून देणं किंवा दुसऱ्याला देणं टाळा. राजकीय नेते, माध्यमकर्मी, शेतकरी, बँकर्स आणि मेडिकल क्षेत्रातील व्यक्ती यांनी प्रॉपर्टी खरेदी करताना सह्या करताना सावधगिरी बाळगावी.

शुभ रंग : Off White

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 2 आणि 6

दान : गरिबांना तांदूळ दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता, त्यांच्याशी वाद घालू नका. वयोवृद्ध व्यक्ती किंवा शिक्षकांना कोणत्याही प्रकारे दुखावू नका. मास स्पीकर्स आणि मीडिया क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी सर्वोत्तम दिवस. तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे तुम्ही टीमचं नेतृत्व करत राहाल आणि यशही मिळवाल. नाट्य कलाकारांनी कामाच्या ठिकाणी नवीन सुरुवात केली पाहिजे. मित्रांसोबत असताना आर्थिक गोष्टी शेअर करणं टाळा. संगीतकार, डिझायनर, विद्यार्थी, वृत्तनिवेदक, राजकीय नेते, अभिनेते, कलाकार, गृहिणी, हॉटेल व्यावसायिक आणि लेखकांना करिअरसंदर्भात एखादी चांगली बातमी मिळेल.

शुभ रंग : Orange and Violet

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3 आणि 1

दान : गरजूंना ब्राउन राइस दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, ज्यामुळे राहू ग्रहाची सकारात्मक ऊर्जा मिळेल. आजचा दिवस पैसे मिळवण्याचा आहे. आज तुम्ही घेतलेले सर्व मोठे निर्णय योग्य ठरतील. सध्याच्या तुमच्या नियोजनाचं पुनरावलोकन करणं गरजेचं आहे. सर्व असाइनमेंट्स वेळेवर पूर्ण कराल; मात्र परतावा मिळण्यास वाट पाहावी लागेल. धान्य दान केल्यामुळे जादुई परिणाम होतील. बांधकाम, मशिनरी, मेटल, सॉफ्टवेअर इत्यादी व्यवसायातल्या व्यक्तींनी आणि ब्रोकर्सनी आज कागदपत्रांवर सही करणं टाळावं. खेळाडूंच्या आई-वडिलांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल आणि ते एक्साइट होतील.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : गरिबांना धान्य किंवा ब्लँकेट दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज प्रेमसंबंधांमध्ये संयमाची गरज आहे. दररोज सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालण्याची सवय लावा. आज सर्व उद्दिष्टं सहज आणि वेगाने गाठली जातील. दुपारपर्यंत नशीब तुम्हाला चांगली साथ देईल. आज तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि बक्षीस मिळेल. आजचा दिवस मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा आहे. कारण लवकरच आर्थिक लाभाची शक्यता आहे. खेळाडू, निवेदक, ज्वेलर्स, विद्यार्थी आणि ट्रॅव्हलर्सना उत्तम आउटकम मिळेल. मीटिंगमध्ये हिरव्या रंगाचे कपडे घातल्यास नशीब चमकेल. आज जीवनाकडून तुमच्या आवडीच्या गोष्टी मिळण्याचा योग आहे. त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीला प्रपोझ करण्यासाठी उत्तम दिवस.

शुभ रंग : Green and Peach

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : मंदिरात नारळ दान करा.

#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज लक्ष्मीमातेचा पूजाविधी करा. तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती तुमच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेतात. त्यामुळे व्यावहारिक आणि डिप्लोमॅटिक राहा. आज तुम्ही सक्रिय असाल आणि अनेक कामं एकाच वेळी पूर्ण कराल. आज रोमान्स, त्याग अशा भावना मनात असतील. विश्वासघातापासून सावध राहा. आज इतरांच्या मनावर राज्य कराल आणि भरपूर आदर मिळेल. एकाच वेळी घरातल्या खूप जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेणं टाळा. कारण तुम्ही एकाच वेळी सर्वांना आनंदी करू शकत नाही. हॉटेल व्यावसायिक, ट्रॅव्हलर्स, ज्वेलर्स, अभिनेते, जॉकी आणि डॉक्टर्सना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. आजचा दिवस त्यांच्यासाठी लकी आहे. शैक्षणिक क्षेत्रात आपल्या आई-वडिलांचा सल्ला घ्या. भविष्यासाठी उपयुक्त ठरेल.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : मंदिरात चांदीचं नाणं दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज इतरांकडून तुमची दिशाभूल केली जाण्याची शक्यता असल्याने आज इतरांचे सल्ले किंवा सूचनांकडे दुर्लक्ष करा. आज गडद रंगाचे कपडे घालणं टाळा. आज एक तर भरपूर नफा किंवा भरपूर नुकसान होण्याची शक्यता आहे. वडीलधारी मंडळी आणि गुरूंचा आशीर्वाद घेतल्यास लाभ होईल. नेतृत्वगुण आणि विश्लेषणाचं कौशल्य हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे घटक आहेत. आर्थिक निर्णय हुशारीने घ्या. प्रेमात असलेल्यांना प्रामाणिकपणाच्या बदल्यात अविश्वास मिळेल. आज कोणत्याही कागदपत्रांवर विश्वास ठेवू नका. आज ऑडिट गरजेचं आहे. हीलिंग, कोर्ट, स्टेशनरी, थिएटर, तंत्रज्ञान, सरकारी टेंडर्स, रिअल इस्टेट, शाळा, इंटीरिअर आणि धान्य या व्यवसायांशी संबंधित व्यक्तींसाठी उत्तम दिवस. भागीदारीमध्ये नसाल तोपर्यंत बिझनेस रिलेशन्स हेल्दी राहतील.

शुभ रंग : Yellow and Orange

शुभ दिवस : सोमवार आणि गुरुवार

शुभ अंक : 7

दान : गरिबांना सूर्यफूल तेल दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज खाऱ्या पदार्थांचं वाटप केल्यास खूप सकारात्मक ऊर्जा मिळेल. तुमच्या विचारांमधली कठोरता सोडा आणि संधी स्वीकारा. कारण ते उत्तम असल्याचं दिसत आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी आणि इतर कर्मचाऱ्यांशी बोलताना बोलणं मृदू ठेवा. तुमच्या वस्तूंची काळजी घ्या. आध्यात्मिक मार्गावर चालण्याची गरज आहे. दुपारच्या जेवणानंतर केलेले बिझनेसविषयक व्यवहार यशस्वी होतील. कौटुंबिक कार्यक्रम, प्रेझेंटेशन, सरकारी अ‍ॅग्रीमेंट किंवा मुलाखतींना उपस्थित राहायलाच हवं. आज कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करणं अत्यावश्यक आहे. आज भगवान शिव आणि शनिदेवाचा आशीर्वाद घेतल्यास समृद्धी मिळेल.

शुभ रंग : Sea Blue and Creme

शुभ दिवस : शुक्रवार आणि गुरुवार

शुभ अंक : 6

दान : गायींना हिरवं धान्य खायला घाला.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

दक्षिणेकडच्या भिंतीवर लाल रंगाचा बल्ब लावा. आज अधिकार, पैसा, ऐशोआराम, लोकप्रियता अशा सर्व गोष्टी कमावण्याचा आणि दखल घेतली जाण्याचा दिवस आहे. अभिनय, मीडिया, निवेदन, क्रीडा, बांधकाम, मेडिकल, राजकारण आणि ग्लॅमर या क्षेत्रांमधल्या व्यक्ती नवी उंची गाठतील. शिक्षण किंवा क्रिएटिव्ह आर्ट क्षेत्रातल्या व्यक्तींना चांगलं यश, परतावा मिळेल. बिझनेस किंवा नोकरीत प्रगतीसाठी कौटुंबिक ओळखींचा वापर केल्यास फायदा होईल. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करण्यासाठी सकाळी डाळिंब खा.

शुभ रंग : Red

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9 आणि 6

दान : गरिबांना लाल रंगाचं धान्य दान करा.

25 सप्टेंबर रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : दीनदयाळ उपाध्याय, फिरोझ खान, जगमोहन, बिशनसिंग बेदी, अब्दुल अल्ला मौदुदी, मुरारी बापू

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya, Zodiac signs