#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
उत्पादन क्षेत्रातल्या व्यक्ती, परदेशात अभ्यास करणारे विद्यार्थी, सोलर एनर्जी डीलर्स, बांधकाम व्यावसायिक, राजकीय व्यक्ती आणि क्रीडा प्रशिक्षकांसाठी महिन्याचा शेवटचा आठवडा अनुकूल आहे. जी अविवाहित जोडपी लग्नासाठी पालकांच्या संमतीची वाट पाहत आहेत त्यांना आता ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचारी आणि मध्यस्थांशी संवाद साधताना अडचण येईल. तुमचा बुद्ध्यांक उच्च राहील आणि त्यामुळे यश मिळेल. नफा आणि ब्रँड व्हॅल्यू मिळविण्यासाठी मालमत्ता, स्टार्टअप्स, ज्वेलरी, सौर उत्पादनांची डिलरशिप, सरकारी असाइनमेंट, वैद्यकीय शिक्षण आणि मीडिया इंडस्ट्री आदींमध्ये गुंतवणूक करा.
शुभ रंग : Peach and Blue
शुभ दिवस : रविवार
शुभ अंक : 1
दान : आश्रमात गहू दान करा.
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
या आठवड्यात दाम्पत्यांना आपापसांतला वाद-विवाद मिटवण्यासाठी योग्य वेळ आहे. समाधानासाठी स्वतःला वेळ देण्याचं लक्षात ठेवा. सोमवारी शंकराला दुधाचा अभिषेक करा. अविवाहितांना अनुकूल जोडीदार मिळू शकतो. जोडीदाराच्या वर्चस्वामुळे प्रेमसंबंधांमध्ये त्रास होऊ शकतो. कुटुंब आणि नातेवाईकांसोबत पैसा आणि वेळ व्यतीत करा. छोट्या ट्रिपचं नियोजन, स्टॉकमध्ये गुंतवणूक आणि जोडीदाराला सरप्राइज गिफ्ट देण्यासाठी हा आठवडा चांगला आहे.
शुभ रंग : Aqua
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 2
दान : गरिबांना दूध दान करा.
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
घराच्या मध्यभागी असलेली विद्युत उपकरणं बाजूला काढा. तुळशीचं पान खाऊन दिवसाची सुरुवात करा. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. व्यक्तिमत्त्व विकास किंवा सोशल नेटवर्किंग, तसंच उच्च शिक्षणासाठी अर्ज करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे. सरकारी प्रकल्पांशी निगडित योजना आखल्यास त्या आठवड्याच्या उत्तरार्धात पूर्ण होऊ शकतात. सल्लागार, शिक्षक, गायक, प्रशिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, राजकीय व्यक्ती आणि वकील यांच्यासाठी हा आठवडा प्रभावी आहे. वाद मिटवण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. पुस्तकं, सजावट साहित्य, धान्य किंवा वाद्यं हे व्यवसाय चांगले होतील. संगीतकार, हॉटेलिअर्स, जॉकी, लाइफ कोचेस, फायनान्सर्स आणि संगीतकारांना नफा मिळेल आणि प्रगती होईल.
शुभ रंग : Violet
शुभ दिवस : गुरुवार
शुभ अंक : 3
दान : लहान मुलांना झाडाची रोपं दान करा.
#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
डॉक्टर आणि शेतकऱ्यांनी कागदपत्रांच्या व्यवहारात सावध राहण्याची गरज आहे. हा आठवडा आर्थिक व्यवहार, नोकरीचा शोध, लग्नाचे प्रस्ताव, नवीन ऑर्डर किंवा परदेशात प्रवास यांसारख्या घडामोडींनी भरलेला असेल. राहू ग्रहाची शुद्ध ऊर्जा मिळविण्यासाठी चर्चा करताना सौम्यपणे बोला. व्यावसायिक मालमत्तेतल्या गुंतवणुकीत कृषी क्षेत्रापेक्षा जास्त परतावा मिळेल. बँक कर्मचारी, आयटी कर्मचारी, कलाकार किंवा अभिनेते, न्यूज अँकर आणि डान्सर्स गुंतवणूक करू शकतात. कारण त्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. हार्डवेअर, बांधकाम साहित्य, धातू आणि कपडे यांच्या निर्मात्यांनी व्यवसायात नवीन ऑफरची अपेक्षा केली पाहिजे. आपला परिसर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका ठेवा.
शुभ रंग : Blue and Grey
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 5 आणि 6
दान : अनाथाश्रमात भांडी दान करा.
#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमचा वर्चस्व गाजवण्याचा स्वभाव तुमच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक भागीदारांसोबतच्या वादाचं कारण बनू शकतो. गणेशाची पूजा करा आणि आशीर्वाद घ्या. पत्रकार, प्रसारमाध्यमं, संरक्षण, ट्रॅव्हल, थिएटर, खेळाडू आणि वैद्यकीय व्यवसायिक आपल्या वरिष्ठांवर छाप पाडू शकतील. या आठवड्यात लाँग ट्रिप नको. सेल्फ-लाँग ड्राइव्हदेखील टाळा. आज मॉडेलिंग, मेडिकल, स्पोर्ट्स, इव्हेंट्स क्षेत्रातल्या व्यक्तींनी ऑडिशन आणि मुलाखतींमध्ये नशीब आजमावलं पाहिजे.
शुभ रंग : Sea green
शुभ दिवस : बुधवार
शुभ अंक : 5
दान : प्राण्यांना पाणी पाजा.
#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
सिंगल असलेल्यांनी या आठवड्यात नवीन रिलेशनशिप सुरू करण्यास आणि कमिटमेंट देण्यास हरकत नाही. लव्ह पार्टनर्स, मित्र, पालक, मुलं किंवा नातेवाईकांसह प्रवास करण्याचं नियोजन करू शकता. आयटी किंवा ब्युटी इंडस्ट्रीमध्ये असाल तर आज नशीबाची साथ आणि स्थिरता मिळेल. मजबूत ब्रँड इमेज तयार केल्यामुळे तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल. प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी मास कम्युनिकेशन हा सर्वोत्तम पर्याय आहे. संधी मिळण्यासाठी वेळ लागेल. कुटुंबात आनंद आणि जीवनात पूर्णता आणणारा हा एक आरामदायक आठवडा आहे. लग्नाचे प्रस्ताव गांभीर्याने घेतले पाहिजेत. कारण ते खूप अनुकूल आहेत. गृहिणी, खेळाडू, प्रॉपर्टी डीलर्स, डरमॅटॉलॉजिस्ट, गायक, डिझायनर, इव्हेंट मॅनेजर्स, ब्रोकर्स, शेफ आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.
शुभ रंग : Pink and Aqua
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6
दान : गरिबांना दूध दान करा.
#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
नात्यात पारदर्शकता ठेवा. नाही तर गैरसमज होतील. कौटुंबिक जीवनाचा सतत विकास आणि वाढ होईल. सुसंवाद साधण्यासाठी वैयक्तिक नातेसंबंधांबाबत मौन टाळलं पाहिजे. मोठे वैयक्तिक निर्णय घेण्यापूर्वी शंकर आणि केतूचा आशीर्वाद घेतला पाहिजे. संधी स्वीकारण्यापूर्वी त्यातल्या कायदेशीर बाबींचं विश्लेषण करा. बॉसच्या सूचना काळजीपूर्वक ऐका आणि त्यांचं पालन करा. गुंतणं टाळा. संरक्षण, कायदा, वैद्यक क्षेत्रातल्या व्यक्ती, शास्त्रज्ञ, राजकीय नेते, थिएटर आर्टिस्ट, सीए आणि अभिनेत्यांना नशिबाची विशेष साथ मिळेल.
शुभ रंग : Peach
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 7
दान : गरिबांना स्टीलची भांडी दान करा.
#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.).
कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. त्यामुळे या आठवड्यात व्यग्रता वाढेल. प्राण्यांना चारा देऊन आठवड्याची सुरुवात करा. सरकारी कंपन्यांशी असलेले संबंध तुम्हाला उत्कृष्ट परतावा मिळवून देतील. म्हणून त्यासाठी तयारीला लागा. आर्थिक लाभ जास्त होतील. शेतजमीन आणि यंत्रसामग्री खरेदीशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने लागतील. आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. अनेक जबाबदाऱ्या आणि कायदेशीर विवाद टाळणं आवश्यक आहे. डॉक्टर आणि उत्पादकांना मिळालेल्या यशाबद्दल धन्यता वाटेल. वैयक्तिकरित्या भागीदारांशी वाद होण्याची शक्यता असल्यानं आपलं डोकं शांत ठेवा.
शुभ रंग : Violet
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6
दान : गरजूंना कपडे दान करा.
हे वाचा - भारतातील या मंदिरात प्रसादा म्हणून वाटले जाते चक्क सोने आणि चांदी !
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
या आठवड्यात तुमच्या जवळच्यांना तुमच्या यशाबद्दल सांगणं टाळा. कारण तुमची दिशाभूल होण्याची शक्यता आहे. विश्वास मिळवण्यासाठी लव्ह पार्टनरशी मनातल्या भावना शेअर करा. शेअर बाजार आणि प्रशिक्षण व्यवसायात झपाट्याने वाढ होईल. या आठवड्यात जोडपी आनंदी आणि रोमँटिक मूडमध्ये राहतील. मद्यापासून दूर राहिलं पाहिजे. अन्यथा तुमची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे. प्रेमात असलेल्यांसाठी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी अतिशय चांगला काळ आहे. व्यावसायिक संबंध आणि सौदे लवकरच पूर्ण होतील. डिझाइन, एक्सपोर्ट-इम्पोर्ट, लेखन, ग्लॅमर इंडस्ट्री आणि मीडिया या क्षेत्रातल्या व्यक्तींना प्रसिद्धी मिळेल. राजकीय व्यक्ती आज मोठ्या संधींची पूर्तता करतील. विद्यार्थी, प्रशिक्षक, संगीतकार, लेखक, डिझायनर, डॉक्टर, वकील, अभियंते आणि अभिनेते लोकप्रियतेचा आनंद घेतील.
शुभ रंग : Pink
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 9
दान : महिलांना कुंकू दान करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.