मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

जानेवारीचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

जानेवारीचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

अंकशास्त्रानुसार राशीभविष्य

अंकशास्त्रानुसार राशीभविष्य

बहुतेकांसाठी जानेवारीचा शेवटचा आठवडा हा अनेक घडामोडींनी भरलेला असेल. त्यामुळे तुमच्यात आवश्यक ते बदल करण्याचं धैर्य असलं पाहिजे. 2023 या वर्षाची एकूण बेरीज सात आहे. सात हा अंक 1 सह तटस्थ आहे. त्यामुळे

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 जानेवारी : ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 2023 या वर्षातील जानेवारी महिना तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

बहुतेकांसाठी जानेवारीचा शेवठचा आठवडा हा अनेक घडामोडींनी भरलेला असेल. त्यामुळे तुमच्यात आवश्यक ते बदल करण्याचं धैर्य असलं पाहिजे. 2023 या वर्षाची एकूण बेरीज सात आहे. सात हा अंक 1 सह तटस्थ आहे. त्यामुळे तुमच्या मनतील भीती आणि असुरक्षितता सोडून द्या. तुमचं व्यक्तिमत्व आणि स्वातंत्र्य स्वीकारण्यासाठी जानेवारीचा वापर करा.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

हा महिना प्रेम आणि कौतुकानं भरलेला आहे. रोमँटिक संबंधांचा आनंद घेता येईल. परस्पर संवाद आणि भेटवस्तूंची देवाण-घेवाण केल्यास लव्ह पार्टनर्सचं नातं मजबूत होईल. तुम्ही वाद घालणं आणि वेळ वाया घालवणं यासारख्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. नवीन व्यवसायात भागीदारी करण्यासाठी हा सर्वोत्तम आणि आदर्श काळ आहे. परस्पर विश्वास टिकून राहील त्यामुळे यश अटळ आहे. तुम्ही फॅमिली फंक्शन्स, स्टेज शो आणि इव्हेंटमध्ये जाऊन माईकवर बोलू शकता. मात्र, प्रवास टाळा. सार्वजनिक ठिकाणी संबंध जोडण्याचं लक्षात ठेवा. विवाहित जोडपी सुखी आणि आनंदी राहतील. अभिनेते, डान्सर्स, सोलर एनर्जी डीलर्स, डॉक्टर, स्टॉक ब्रोकर आणि मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि ते आपलं लक्ष्य साध्य करतील.

शुभ रंग: पिवळा

शुभ दिवस: मंगळवार आणि रविवार

शुभ अंक: 1 आणि 3

दान: मंदिरात पिवळी मोहरी दान करा

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

उत्सव साजरा करण्याची आणि कौटुंबिक समारंभात सहभागी होण्याची ही वेळ आहे. रोमान्स आणि कमिटमेंटच्या भावनेमुळे तुमचा महिना आनंदात जाईल. सरकारी नोकरी आणि आयटी उद्योगातील व्यक्तींना प्रगतीसाठी अजून कठोर परिश्रम करावे लागतील. दूध, पाणी, रसायनं, रंग, औषधं आणि अन्न निर्मिती उद्योगात नफा होईल. सोमवारी शंकराला दुधाचा अभिषेक करा आणि सूर्यमंत्राचा जप करा. तुम्ही इतरांच्या टीकेकडे दुर्लक्ष केलं पाहिजे कारण त्यात काही तथ्य नाही. तुम्हाला नैसर्गिक अंतर्ज्ञानाचा वरदहस्त आहे आणि म्हणूनच तुम्ही त्याची नेहमी मदत घेतली पाहिजे. आजकाल अनेक बाबींमध्ये खुला आणि थेट संवाद साधणं आवश्यक आहे. प्रेमात पडणं, मित्रांसोबत खर्च करणं, सेमिनारला जाणं, कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहणं, छोट्या ट्रिपची योजना करणं, स्टॉकमध्ये गुंतवणूक करणं आणि तुमच्या जोडीदाराला सरप्राईज गिफ्ट दिलं पाहिजे. वैवाहिक जीवनातील रोमान्सला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल. त्यासाठी तुम्ही एकमेकांतील किरकोळ दोषांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे.

शुभ रंग: क्रीम

शुभ दिवस: सोमवार

शुभ अंक: 2

दान: भिक्षेकऱ्यांना दही दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

काही लोक तुम्हाला भावनिक रीतीनं दुखावण्यासाठी किंवा व्यवसायात तुमची फसवणूक करण्यासाठी संधी शोधत आहेत. म्हणून या संपूर्ण महिन्यात अतिशय काळजीपूर्वक वागा. आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. विश्वास कमी झाल्यामुळे मित्र-मैत्रिणींशी असलेलं नातं डळमळीत होण्याची शक्यता आहे. उद्दिष्ट स्पष्ट नसल्यामुळे या महिन्यात भरपूर कष्ट करावे लागतील. एक्सपोजर आणि ज्ञान वाढवण्यासाठी प्रवास करण्याची वेळ आली आहे. तुम्ही अपस्किलिंगचा पर्याय एक्सप्लोर केला पाहिजे आणि तुमच्या करिअरमध्ये नवीन संधींचा शोध घेतला पाहिजे. तुम्ही गायक, प्रशिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि वकील असाल तर तुमचं टॅलेंट इतरांना दाखवा. कपडे, दागिने, पुस्तकं, सजावट साहित्य, धान्यं खरेदी करण्यासाठी किंवा प्रवासाच्या तिकिट बुकिंगसाठी सर्वोत्तम काळ आहे. डिझायनर्स, हॉटेलिअर्स, अँकर्स, लाईफ अँड स्पोर्ट्स कोटेस, फायनान्सर्स आणि संगीतकार आज विशेष कामगिरीचा आनंद घेतील. तुळशीचं पान खाऊन दिवसाची सुरुवात करा.

शुभ रंग: नारंगी आणि लाल

शुभ दिवस: मंगळवार

शुभ अंक: 3 आणि 6

दान: आश्रमात अवोकन ऑब्जेक्ट्स दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमच्या करिअरमध्ये आव्हानं आणि अडथळे येतील. म्हणून कठोर परिश्रम करा. मोठ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जास्त विचार करणं टाळा. वैद्यकीय क्षेत्र, गुप्तचर सेवा, कायदा, लेखा परीक्षण, संरक्षण आणि वित्त क्षेत्रातील व्यक्तींसाठी हा अनुकूल काळ आहे. बिझनेस डिल्स किंवा सरकारी आदेशांमध्ये तुम्हाला अडकून पडावं लागेल. मालमत्तेशी संबंधित मोठ्या निर्णयांमध्ये विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम ठेवा. सेल्स कर्मचारी, आयटी कर्मचारी, थिएटर आर्टिस्ट किंवा अभिनेते, टीव्ही अँकर आणि डान्सर्स यांनी स्पर्धेसाठी अर्ज केले पाहिजेत. त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. बांधकाम साहित्य, धातू आणि वस्त्र उत्पादकांना व्यवसायात नवीन ऑफर मिळण्याची शक्यता आहे. बुध ग्रहाची शुद्ध उर्जा मिळविण्यासाठी ऑफिसमधील टेबलावर पाच टप्प्यांचं बांबूचं रोप ठेवा.

शुभ रंग: निळा

शुभ दिवस: मंगळवार आणि शुक्रवार

शुभ अंक: 9 आणि 6

दान: गरजूंना कपडे दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

खेळाडू, अभिनय आणि मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना या महिन्यात यश आणि पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. बॉस आणि सहकाऱ्यांशी असलेल्या उत्कृष्ट समन्वयामुळे तुम्हाला सर्व परिस्थितींमध्ये यश मिळेल. श्रीगणेशाची पूजा करा आणि आशीर्वाद घ्या. प्रवास वाढवा आणि नेतृत्व स्वीकारा. दीर्घकालीन समस्यांचं निराकरण करण्यासाठी तुम्हाला कुटुंब आणि मित्रांचं पूर्ण समर्थन मिळेल. आर्थिक नफा सातत्यानं वाढेल. मालमत्ता आणि स्टॉकमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. आयात-निर्यात, राजकारण, दागिने निर्मिती, गुंतवणूक, स्पोर्ट्स, इव्हेंट्स, स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतींमध्ये तुमचं नशीब आजमावून बघा. संपूर्ण महिनाभर तुमचा जोडीदार पूर्णपणे सपोर्टिव्ह असेल.

शुभ रंग: टील (Teal)

शुभ दिवस: बुधवार

शुभ अंक: 5

दान: प्राण्यांना किंवा अनाथाश्रमात हिरवी फळं दान करा.

#नंबर 6: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या भावना किंवा आर्थिक योजना लपवण्याचं लक्षात ठेवा. कारण, कोणाकडून तरी फसवणूक होण्याची शक्यता आहे. तुम्हाला सेलिब्रेशन, पार्टी, खरेदी, क्लबिंग आणि प्रवास करण्याची संधी मिळेल. तुमच्या चांगल्या सामाजिक प्रतिमेमुळे तुम्हाला पैसे आणि सन्मान दोन्ही मिळतील. सट्टेबाजीच्या सवयीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा अन्यथा त्रास होईल. तुम्हाला ऑफिसमध्ये अस्वस्थता आणि अलिप्तपणा जाणवेल. नवीन व्यवसायात गुंतवणुकीसाठी वेळ चांगली नाही. रात्रीच्या जेवणासाठी किंवा खरेदीसाठी बाहेर जाऊ शकता. गृहिणी, खेळाडू, प्रॉपर्टी डीलर्स, डर्माटॅलॉजिस्ट, गायक, डिझायनर्स, इव्हेंट मॅनेजर्स, ब्रोकर्स, शेफ आणि विद्यार्थ्यांची प्रगती आणि कौतुक होईल. रोमँटिक संबंध साधारण असतील.

शुभ रंग: व्हॉयलेट

शुभ दिवस: शुक्रवार

शुभ अंक: 6

दान : आश्रमात साखर दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुम्हाला जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दडपल्यासारखं वाटेल. या ओझ्याखालून तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणं जीवन जगण्यासाठी मोकळं होणं कठीण आहे. त्यामुळे, तुमची कामं आणि जबाबदाऱ्यांमधून वेळीच मोकळं होण्याचं लक्षात ठेवा. नेहमी फॅब्रिक किंवा लेदरऐवजी मेटलच्या वस्तूंचा वापर करा. निर्णय घेताना तुम्हाला तुमच्या पालकांचा आशीर्वाद घ्यावा लागेल आणि विरुद्धलिंगी व्यक्तीचं ऐकावं लागेल. तुमच्या भविष्यातील योजना लवकरच पूर्ण होतील. कारण देवाची तुमच्यावर विशेष कृपा असेल. आई आणि इतर ज्येष्ठांच्या सूचना ऐका. तुमचा प्लॅन तुमच्या जोडीदारासोबत शेअर केल्यास तुम्हाला उत्तम उपाय मिळतील. कोणीतरी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करेल पण त्याला त्यात यश मिळणार नाही. दागिने निर्मिती, वकिली, कुरिअर सर्व्हिस, विमान सेवा, राजकारण, थिएटर, सीए आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील व्यक्तींना नशिबाची विशेष साथ मिळेल.

शुभ रंग: नारंगी आणि टील

शुभ दिवस: सोमवार

शुभ अंक: 7 आणि 3

दान: घराकाम करणाऱ्या मदतनीसाला धातूची भांडी दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.).

प्रेमळ शब्द आणि दयाळू वृत्तीनं तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकाल. सॉफ्टवेअर इंजिनीअर्स, खेळाडू, तरुण राजकारणी, शिक्षणतज्ज्ञ, मेकअप आर्टिस्ट आणि डिझायनर्ससाठी हा महिना प्रभावी असेल. परदेशातील आणि प्रशिक्षण व्यवसायात प्रगती होऊ शकते. कुटुंबातील महिलांनी उदारपणा दाखवला पाहिजे आणि राग टाळला पाहिजे. कपल्स आनंदी आणि रोमँटिक मूडमध्ये राहतील. प्रेमात असलेल्यांसाठी कमिटमेंट देण्यासाठी अतिशय चांगला महिना आहे. बिझनेस रिलेशन्स आणि डील्स प्रत्यक्षात येतील. ग्लॅमर इंडस्ट्री आणि मीडियामधील व्यक्तींना नवीन ऑफर्स मिळतील. राजकारणी मोठ्या संधींची पूर्तता करतील. विद्यार्थी, प्रशिक्षक, संगीतकार, लेखक, डिझायनर्स, डॉक्टर्स, वकील, इंजिनीअर्स आणि अभिनेत्यांना लोकप्रियतेचा आनंद घेता येईल.

शुभ रंग: निळा आणि ग्रे

शुभ दिवस: मंगळवार

शुभ अंक: 9

दान: प्राण्यांना अन्नदान करा.

हे वाचा - अंकशास्त्रानुसार #नंबर 7 साठी 2023 हे वर्ष कसं असेल? जाणून घ्या भविष्य

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

नात्यात किंवा नवीन गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलताना आणि पैशांचा व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगा. प्रसारमाध्यमं आणि राजकारणातील व्यक्ती आपल्या योजनांनुसार पुढे जातील. तुमच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आणि घरगुती खर्चाचं बजेट तयार करा. असं केल्यास तुम्ही भविष्यासाठी भरपूर बचत करू शकता. विवाहित जोडप्यांनी आपापसातील समस्या सोडवण्यासाठी एकमेकांसोबत अधिक वेळ घालवणं आवश्यक आहे. आयटी कर्मचारी आणि समुपदेशकांना ओळख आणि प्रसिद्धीचा आनंद घेता येईल. खेळाडूंना मात्र, अधिक संधी आणि प्रगतीसाठी वाट बघावी लागेल. चर्चा करून मालमत्तेशी संबंधित वाद टाळावेत.

शुभ रंग: लाल

शुभ दिवस: मंगळवार

शुभ अंक: 9

दान: भिक्षेकऱ्यांना पिवळा भात दान करा.

First published:

Tags: Horoscope, Numerology