मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /आजचा दिवस मनाचं ऐकण्याचा आणि पॅशन फॉलो करण्याचा; अंकशास्त्रानुसार असं आहे भविष्य

आजचा दिवस मनाचं ऐकण्याचा आणि पॅशन फॉलो करण्याचा; अंकशास्त्रानुसार असं आहे भविष्य

अंकशास्त्रानुसार आजचं राशीभविष्य

अंकशास्त्रानुसार आजचं राशीभविष्य

ज्योतिषशास्त्राप्रमाणंच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 5 फेब्रुवारी 2023 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस मनाचं ऐकण्याचा आणि पॅशन फॉलो करण्याचा आहे. खेळामध्ये, स्पर्धा-परीक्षांमध्ये मोठं यश मिळवाल. शेअर मार्केट गुंतवणूक टाळणं उत्तम. आत्मविश्वासाच्या बळावर कामाच्या ठिकाणी मोठं पद मिळवाल, तसंच स्वतःचा ब्रँड तयार कराल. जोडीदारावर चांगली छाप पडेल, तसंच भरपूर पाठिंबा मिळेल. तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून प्रपोजल, बक्षीस आणि भरपूर आधार मिळेल. सिंगल व्यक्तींना जोडीदार मिळण्यात अडचणी येतील. अभिनय, सोलर एनर्जी, कला, सौंदर्यप्रसाधने, शेती आणि प्रॉपर्टी संबंधित व्यवसायांमध्ये असणाऱ्या व्यक्तींसाठी भाग्याचा दिवस.

शुभ रंग : Teal

शुभ दिवस : रविवार

शुभ अंक : 1 आणि 5

दान : गरिबांना केळी दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

कामाच्या ठिकाणी तुमचं नशीब जोरावर असेल. रिलेशनशिपमध्ये असलेल्यांनी दोघांमध्ये तिसरा येऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी. महिलांनी आज नवीन नोकरीसाठी अर्ज किंवा नवीन बिझनेसची सुरुवात करावी. महिलांनी आज नवीन गुंतवणूक केल्यास फायदा होईल. लहान मुलांचा आत्मविश्वास वाढेल. पालकांना पाल्याच्या शालेय आणि खेळातल्या कामगिरीबद्दल अभिमान वाटेल. जोडप्यांमध्ये रोमान्स वाढेल; मात्र गर्दीची ठिकाणं किंवा पार्टींपासून दूर राहणं उत्तम. महत्त्वाच्या बैठकींमध्ये किंवा मुलाखतीला जाताना Sea Green रंगाचे कपडे घातल्यास फायदा होईल. आज वडिलधाऱ्या व्यक्तींसोबत वेळ व्यतीत करा, भविष्यात फायदा होईल. मीडिया कर्मचारी, डिझायनर, डॉक्टर आणि अभिनेते यांना विशेष यश मिळेल.

शुभ रंग : Sea Green

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 2 आणि 6

दान : मंदिरात नारळ दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या जन्मांकावर गुरू ग्रहाचा प्रभाव आहे. गुरूची शक्ती जागृत करण्यासाठी केळीच्या झाडाला साखरेचं पाणी घाला. सध्या सर्व शत्रूंकडे दुर्लक्ष करा. कारण त्यांच्या प्रयत्नांचा काहीही उपयोग होणार नाही. जोडप्यांनी आज एकत्र डिनरला जाणं फायद्याचं ठरेल. कलाकार व्यक्तींनी गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे, चांगला परतावा मिळेल. एखादं नवीन काम सुरू करण्यासाठी उत्तम दिवस. खेळाडू, स्टॉक ब्रोकर्स, विमान कर्मचारी, संरक्षण कर्मचारी, शिक्षणतज्ज्ञ, हॉटेल व्यावसायिक, संगीतकार आणि राजकीय व्यक्तींना बढती आणि प्रसिद्धी मिळेल. व्यापाऱ्यांनी क्लायंटला दुपारच्या जेवणानंतर भेटणं उत्तम.

शुभ रंग : Brown

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3, 1

दान : आश्रमांमध्ये गहू दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

जुनी रखडलेली कामं पूर्ण होतील. आर्थिक आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी कार्यरत ठेवा, चांगला परतावा मिळेल. आजचा दिवस थोडा दगदगीचा वाटेल; मात्र त्याचे सकारात्मक परिणाम सकाळपासूनच दिसतील. तरुणांनी प्रेमभावना व्यक्त कराव्यात. तसंच मैत्री किंवा रिलेशनशिप बिघडवण्याचा प्रयत्न टाळावा. आज मांसाहार आणि मद्यपान टाळा.

शुभ रंग : Teal

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : गरिबांना हिरवं धान्य दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

प्रवास, शॉपिंग, पार्टी अशा गोष्टींमध्ये जात असलेल्या वेळेचा योग्य वापर करा. करिअरमध्ये मोठं यश मिळवण्यासाठी तुम्हाला आताच वेळेचा अपव्यय टाळणं गरजेचं आहे. आजचा दिवस रिलेशनशिप, सहल, रिस्क घेणं, प्रॉपर्टी खरेदी, खेळात आणि स्पर्धांमध्ये सहभागी होणं अशा गोष्टींसाठी उत्तम आहे. प्रवास आरामदायी होईल. एखाद्या विशेष व्यक्तीची भेट होईल. आज खरेदी केलेली छोटी किंवा मोठी गोष्ट भविष्यात फायद्याचीच ठरेल. प्रमोशन किंवा अप्रूव्हलची कामं मार्गी लागतील. सिंगल व्यक्तींना आज अनुरूप जोडीदार मिळू शकतो.

शुभ रंग : Sea Green

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : लहान मुलांना हिरवी रोपं दान करा.

# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

मुलाखत किंवा ऑडिशनमध्ये तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा लोक फायदा घेऊ शकतात. त्यामुळे खबरदारी बाळगा. बरेच जण तुम्हाला गृहीत धरून चालत आहेत. त्यामुळे अति भावनिक होणं टाळा. उच्च शिक्षण, नवीन घर, नवीन नोकरी, नवीन नातं, आर्थिक नफा, प्रवास, पार्टी अशा सर्व गोष्टी आज नशिबात आहेत. आज मोठ्या कमिटमेंट्स कराल आणि त्या आनंदाने पूर्णही कराल. ठरवलेली सर्व ध्येयं आज गाठाल. राजकीय नेते, गृहिणी, खेळाडू, ब्रोकर, रिटेल व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक आणि विद्यार्थी आपलं उद्दिष्ट गाठतील. गृहिणी आणि शिक्षकांना कुटुंबीयांकडून आदर आणि प्रेम मिळेल. सरकारी अधिकाऱ्यांना नवीन पद किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीशी संबंधित व्यवहार आरामात पार पडतील. विवाहाचे प्रलंबित प्रस्ताव आज प्रत्यक्षात येऊ शकतील.

शुभ रंग : Sky Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6, 2

दान : लहान मुलांना निळं पेन किंवा पेन्सिल दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

जुन्या रखडलेल्या गोष्टींमधून चांगली कमाई होईल. वडिलधाऱ्या व्यक्ती आणि गुरूंचं नामस्मरण करून दिवसाची सुरुवात करा. पुरुषांना बिझनेसमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे; मात्र महिलांना व्यापारात भरपूर वाढ दिसेल. आज बोलण्यापूर्वी दहा वेळा विचार करणं गरजेचं आहे. वर्क फ्रॉम होम टाळा. पिवळ्या डाळी दान केल्याने फायदा होईल. मोठ्या ब्रँडच्या तुलनेत लहान ब्रँड्सचा अधिक फायदा होईल. वकील आणि सॉफ्टवेअर इंजिनीयर व्यक्तींनी आज वर्क फ्रॉम होम टाळून घराबाहेर पडावं.

शुभ रंग : Orange and Green

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 7

दान : अनाथ मुलांना स्टेशनरी साहित्य दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल कायम ठेवा, लवकरच यश मिळेल. मेहनत आणि आत्मविश्वास या गोष्टींच्या बळावर आज कोणत्याही अडचणीवर आरामात मात कराल. गोसेवा करण्यासाठी चांगला दिवस. जोडप्यांना नातेसंबंध अधिक चांगले करण्याची संधी मिळेल. डॉक्टर, बांधकाम व्यावसायिक, नाट्य कलाकार, फार्मासिस्ट, इंजिनीअर आणि उत्पादक या व्यक्तींना आर्थिक फायदा होईल. मशीन, फर्निचर, धातू, जमीन अशा गोष्टींची खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस. कामाच्या ताणामुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ व्यतीत करा.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : अनाथाश्रमात मोहरीचं तेल दान करा.

हे वाचा - पैसा-संपत्ती असूनही पती-पत्नीमध्ये सतत होतात वाद; वास्तुशास्त्रात सांगितलंय कारण

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

सकाळी मेडिटेशन केल्यामुळे घरातल्या समस्या दूर होण्यास मदत होईल. अभिनेते, गायक, डिझायनर, राजकीय व्यक्ती, डॉक्टर, लेखक, इतिहासकार किंवा माध्यम क्षेत्राशी संबंधित सर्व व्यक्तींसाठी आज भाग्याचा दिवस. प्रसिद्धी, ऐशोआराम, संधी, स्थैर्य, समाधान अशा सर्व गोष्टी आज मिळतील. सोनं आणि जमीन या बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी शुभ दिवस. तरुणांना जोडीदारावर छाप पाडण्याची संधी मिळेल. हॉटेलिंग, इव्हेंटला उपस्थित राहणं, पार्टी होस्ट करणं, ज्वेलरी खरेदी करणं, समुपदेशन किंवा खेळात सहभागी होणं अशा सर्व गोष्टींसाठी आजचा दिवस उत्तम आहे.

शुभ रंग : Brown

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9, 6

दान : गरिबांना टोमॅटो दान करा.

5 फेब्रुवारी रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : ख्रिस्तियानो रोनाल्डो, राज किरण, नेमार, भुवनेश्वर कुमार, अभिषेक बच्चन, प्रताप सी. रेड्डी

First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology