मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /Numerology: तुमचा हा जन्म अंक असेल तर आज तुम्हाला या तीन गोष्टी मिळू शकतात

Numerology: तुमचा हा जन्म अंक असेल तर आज तुम्हाला या तीन गोष्टी मिळू शकतात

अंकशास्त्र (फोटो सौजन्य - Canva)

अंकशास्त्र (फोटो सौजन्य - Canva)

ज्योतिषशास्त्राप्रमाणंच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 30 जानेवारी 2023 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

सेल्स आणि राजकारण या क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी आज भाग्याचा दिवस. तुमच्या ज्ञानाने प्रभावित होऊन एखादी चांगली ऑफर मिळू शकते. ऑफिसमधले सहकारी आणि जवळच्या व्यक्ती तुमच्याबद्दल आदर बाळगतील. आपल्या व्यक्तिमत्त्वाची राजकीय बाजू दाखवण्याचा आजचा दिवस आहे. कौटुंबिक कार्यक्रम, संगीत कार्यक्रम, इव्हेंट आयोजित करणं किंवा मुलाखत देणं या सर्व गोष्टी उत्कृष्टपणे पार पडतील. आज प्रॉपर्टी खरेदी टाळा. स्टेशनरी, शाळा, रेस्टॉरंट, समुपदेशन, पुस्तकं, डिजिटल मार्केटिंग, धातू, कला प्रशिक्षण केंद्र आणि स्पोर्ट्स अकॅडमी अशा व्यवसायांमधल्या व्यक्तींना भरपूर नफा मिळेल. लहान मुलांवर अभ्यासाचा ताण वाढेल.

शुभ रंग : Yellow and Orange

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3

दान : मंदिरात चंदन दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमचे हितचिंतक तुमच्यावर टीका करणार नाहीत; त्यामुळे आज लोकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करा. आज तुमच्या साध्या स्वभावामुळे दुखावले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांसाठी लवचीक होणं टाळा. प्रेमात असणाऱ्या व्यक्तींना आपला जोडीदार अधिक वर्चस्व गाजवतो आहे असं वाटेल. तुम्ही आधीच भरपूर ठिकाणी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे नवी गुंतवणूक टाळा. महिलांनी आज पांढर्‍या रंगाचे खाद्यपदार्थ बनवावेत. जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पैशांचा वापर करावा लागेल. विद्यार्थी, उत्पादक, रिटेलर, ब्रोकर्स आणि खेळाडूंना आपली कामगिरी सुधारण्यासाठी आणखी वाट पाहावी लागेल.

शुभ रंग : Aqua

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 2

दान : अनाथाश्रमात दूध दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

लेखक आणि संगीतकार व्यक्तींना आज आपली सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती दाखवण्याची संधी मिळेल. तुमच्या भाषण कौशल्याने लोक प्रभावित होतील. आज घेतलेले सर्व निर्णय नजीकच्या भविष्यात फायद्याचे ठरतील. सध्या तुमच्या आर्थिक योजनांबाबत इतरांसोबत चर्चा करणं टाळा. शेअर मार्केट आणि तत्सम प्रकारच्या गुंतवणुकीतून परतावा मिळण्यासाठी वेळ लागेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी शब्दांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त कराव्यात. सरकारी अधिकारी असलेल्यांनी नवीन आलेल्या व्यक्तींपासून सावध राहावं. दिवस सुरू करण्यापूर्वी आपल्या गुरूच्या नावाचा जप करणं विसरू नका.

शुभ रंग : Orange

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3 आणि 1

दान : आश्रमांमध्ये पुस्तकं दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. तणाव दूर करण्यासाठी मेडिटेशनची मदत घ्याल. आर्थिक आवक चांगली आहे; मात्र त्यासाठी किती तरी दायित्वांची किंमत चुकवावी लागेल. बांधकाम आणि मेडिकल क्षेत्रात गतिमानता राहील; मात्र शेअर मार्केट क्षेत्रात गती संथ राहील. अर्थात, स्टॉक मार्केटमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. मार्केटिंग क्षेत्रातल्या व्यक्तींनी प्रवास टाळू नये. जेवढा जास्त प्रवास, तेवढं यश जास्त हे लक्षात ठेवा. महिन्याचं टार्गेट पूर्ण होईल. आज मांसाहार आणि मद्यपान टाळा.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : शनिवार

शुभ अंक : 9

दान : भटक्या जनावरांना Salty पदार्थ दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज भरपूर फायद्याचा दिवस आहे. जवळच्या व्यक्तीला किंवा जोडीदाराला मनातल्या भावना बोलून दाखवाल. कर्जाच्या जाळ्यात अडकू नका. दिवसाच्या उत्तरार्धात नशीब तुमच्या बाजूने असेल. त्यामुळे महत्त्वाची कामं दुपारनंतर करण्याचा प्रयत्न करा. सेल्स आणि खेळातल्या व्यक्तींसाठी जलद हालचाल फायद्याची ठरेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींचं लक्ष आज विचलित होण्याची शक्यता आहे; मात्र प्रामाणिक राहणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा.

शुभ रंग : Sea Green

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : हिरवी फळं किंवा भाज्या दान करा.

#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या अंकाचा स्वामी असलेल्या ग्राहाची शक्ती वाढवण्यासाठी शुक्रपूजा करा. विद्यार्थी आणि राजकीय व्यक्ती यांनी समजूतदारपणे नवीन संधी स्वीकारावी, फायदा होईल. वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये असुरक्षित आणि अस्वस्थ वाटेल. नवीन फॅक्टरी उभारण्यासाठी जागेचा शोध घेत असलात, तर चांगला पर्याय मिळेल. प्रेझेंटेशन, खेळ अशा गोष्टींना उपस्थित राहा. तुमच्या भूतकाळापासून दूर पळणं गरजेचं आहे.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : आश्रमांमध्ये पांढरी मिठाई दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

नवीन काम घेण्यापूर्वी त्याबाबत नीट रिसर्च करणं गरजेचं आहे. कोणताही निर्णय शहाणपणाने घ्या. प्रसिद्ध व्यक्ती, राजकीय व्यक्ती, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंजिनीअर, बांधकाम व्यावसायिक, ज्योतिषी, मेकअप आर्टिस्ट आणि खेळाडूंसाठी अगदी भाग्याचा दिवस. न्यायालयीन प्रकरणांमध्ये विजय प्राप्त होईल. गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडशी वाद टाळा, अन्यथा ब्रेकअप होऊ शकतो. नातेसंबंध सुरळीत राहतील. खेळाडूंना भरपूर प्रसिद्धी आणि पैसा मिळेल. सावकार आणि बँकिंग क्षेत्रातल्या व्यक्तींनी आज सावध राहावं. गुरूमंत्राचा जप करणं गरजेचं आहे.

शुभ रंग : Teal

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 7

दान : कांस्य किंवा तांबे धातूची एखादी वस्तू दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

फसवणूक किंवा गैरवर्तन यांसारखे प्रकार तुमच्यासोबत घडू शकतात. त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्तींपासून सावध राहा. वेळेत कामं पूर्ण कराल. त्यामुळे नफा भरपूर होईल. तुम्हाला पैसा, प्रसिद्धी, हुशारी, आदर आणि कुटुंबीयांचं प्रेम मिळवून दिल्याबद्दल मंदिरात जाऊन देवाचे आभार मानणं गरजेचं आहे. आज प्रवास आरामदायी होईल. सध्याचा काळ अगदी व्यग्र आणि गुंतागुंतीचा वाटेल; मात्र हे तात्पुरतं आहे. डॉक्टर आणि फायनान्सर असलेल्या व्यक्तींची भरपूर प्रशंसा होईल. तुमच्या रोमँटिक भावना सत्यात उतरवण्यासाठी उत्तम दिवस.

शुभ रंग : Sea Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : भिकाऱ्यांना कलिंगड दान करा.

हे वाचा - भारतातील या मंदिरात प्रसादा म्हणून वाटले जाते चक्क सोने आणि चांदी !

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

अभिनय, मीडिया, सूत्रसंचालन, सेल्स आणि मार्केटिंग या क्षेत्रातल्या व्यक्तींना आज समाजातील स्थान उंचावण्याची चांगली संधी मिळेल. टेंडर किंवा प्रॉपर्टीशी संबंधित गोष्टींसाठी मध्यस्थाची मदत घेणं फायद्याचं ठरेल. खेळाडू, व्यापारी, शिक्षक, बँकर्स, संगीतकार, अभिनेते आणि विद्यार्थी या व्यक्तींनी आज डॉक्युमेंटेशन करून घेणं फायद्याचं ठरेल. शेअर मार्केट गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींनी आज मोठ्या प्रमाणात शेअर खरेदी करण्यावर भर द्यावा. लाल आणि जांभळ्या रंगाच्या कपड्यांचं कॉम्बिनेशन आज नशीब आणि स्थैर्य वाढवेल. डोळ्यांची काळजी घ्या. तसंच प्रवास टाळा. शक्यतो ऑनलाइन काम करण्यावर भर द्या.

शुभ रंग : Purple

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 3

दान : घरकाम करणाऱ्या व्यक्तीला लाल मसूर दान करा.

30 जानेवारी रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : प्रकाश जावडेकर, प्रियदर्शन, अनूप सोनी, दिया कुमारी, फैजल खान, एस. एन. गोयंका

First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology