मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : अंकशास्त्रानुसार 26 जानेवारीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

Numerology : अंकशास्त्रानुसार 26 जानेवारीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

अंकशास्त्रानुसार आजचं राशीभविष्य

अंकशास्त्रानुसार आजचं राशीभविष्य

सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 26 जानेवारी 2023 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमचं व्यक्तिमत्व आणि तुम्ही नियोजन केलेल्या गोष्टी यांमध्ये आज तफावत आढळेल. आयुष्यात एखादी नवीन गोष्ट होण्याचा योग आहे. एखादी नवीन मैत्री, नवीन गुंतवणूक, नवा व्यापार, नवी नोकरी किंवा नवीन घर यांपैकी काहीही असू शकते. प्रॉपर्टी संबंधित प्रकरणे आरामात हाताळली जातील. आर्थिक लाभ होईल. कामाच्या ठिकाणी आळस टाळा. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना आज एखादी विशेष ऑफर मिळेल.

शुभ रंग : Blue and Yellow

शुभ दिवस : रविवार

शुभ अंक : 3

दान : कृपया आश्रमांमध्ये लाल मसूर दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज इतरांसमोर, किंवा इतरांसाठी झुकतं घेऊ नका, स्वतःचा आत्मसन्मान जपा. दिलेली वचने पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे. भूतकाळातील तुमच्या मेहनतीचं फळ आज तुम्हाला मिळेल. एक्सपोर्ट-इम्पोर्ट, ट्रॅव्हल एजन्सी, शेअर मार्केट आणि पार्टनरशिप फर्म या व्यवसायांमध्ये भरपूर यश मिळेल. कर्जांवर आळा घालण्यासाठी अकाउंट्स तपासणं गरजेचं आहे.

शुभ रंग : Aqua

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 2

दान : कृपया वासरांना पाणी दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या उजव्या हाताच्या मनगटावर नेहमी लाल धागा बांधलेला असू द्या. तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये काम करण्याची तयारी ठेवता, त्यामुळे लवकरच मोठे यश मिळेल. कामाच्या ठिकाणी खबरदारी घ्या, कोणताही पुरूष तुमची फसवणूक करू शकतो. कला क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिद्धी मिळेल. क्रीडा प्रशिक्षकांना मोठा विजय आणि आर्थिक फायदा होईल. तुमच्या जोडीदाराजवळ प्रेम व्यक्त करण्यासाठी उत्तम दिवस.

शुभ रंग : Orange

शुभ दिवस : गुरूवार

शुभ अंक : 3 आणि 9

दान : कृपया गरिबांना सूर्यफुलाचं तेल दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

भगवान शंकराला दुधाचा अभिषेक करा, तसंच राहू पूजा करा. वैयक्तिक गोष्टींबाबत कोणावरही विश्वास ठेवणं टाळा. हिरव्या पालेभाज्या दान केल्यास फायदा होईल. तुमच्या कामाचं कौतुक होईल, तसंच आर्थिक लाभ वाढेल. कुटुंबीय तसेच मित्र-मैत्रिणींना वेळ देता येणार नाही, त्यामुळे त्यांच्या तक्रारी ऐकाव्या लागतील. आज दानपुण्य करणं गरजेचं आहे.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : कृपया भिक्षेकऱ्यांना चपला दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

कामाच्या ठिकाणी तुमच्या टेबलवर क्रिस्टल लोटस ठेवा, समाधान वाढेल. तुमच्या मनातील प्रेमभावना जोडीदाराजवळ व्यक्त करण्यासाठी उत्तम दिवस. कागदपत्रांवर सही करण्यासाठी, तसेच सहलीला जाण्यासाठी चांगला दिवस. अभिनय क्षेत्रातील व्यक्ती आणि पब्लिक फिगर असणाऱ्या व्यक्तींचे सर्व स्तरातून कौतुक होईल. आज मोफत मिळणाऱ्या गोष्टी, गिफ्ट घेणं टाळा; हा कदाचित तुमच्या शत्रूंचा कट असू शकतो.

शुभ रंग : Teal

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : कृपया लहान मुलांना किंवा अनाथाश्रमात हिरवी फळं दान करा.

# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

दिवसाची सुरूवात भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी यांच्या मंत्रोच्चाराने करा. आज आयुष्यात अगदी परिपूर्ण वाटेल. तुमच्या नशिबात आज सर्व चांगल्या गोष्टी मांडून ठेवलेल्या आहेत. कुटुंबीयांचं प्रेम आणि आधार लाभल्यामुळे समाधानी वाटेल. अगदी ऐशोआरामाचा दिवस आहे. डिझायनर आणि अभिनेते असणाऱ्या व्यक्तींसाठी विशेष भाग्याचा आणि स्थिर दिवस.

शुभ रंग : Sky Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6 आणि 9

दान : कृपया गरिबांना पांढरा तांदूळ दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज जेवणात मेथीच्या बियांचा समावेश करा. कामाचा वेग काहीसा मंद राहील, मात्र हे थोड्या काळापुरतेच असेल. लवकरच तुमच्या कामाचे पुनरावलोकन करण्यात येईल, ज्यानंतर आर्थिक प्रगती वाढण्याची शक्यता आहे. मध्यस्थांपासून सावध रहा. खेळाडूंनी भविष्यातील वाद टाळण्यासाठी आपल्या प्रतिस्पर्ध्यांपासून दूर रहावे. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींमुळे नशीब उजळेल.

शुभ रंग : Teal and Yellow

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 3

दान : कृपया कांस्य धातूची एखादी वस्तू दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुम्ही जर स्वातंत्र्यप्रिय व्यक्ती असाल, तर आज कोणत्याही परिस्थितीत रिस्क घेणं टाळा. कामाचा ताण वाढेल. तुमच्या टीममधील व्यक्ती मनापासून तुमच्या सोबत आहेत, त्यामुळे त्यांचं नेतृत्व करायला आवडेल. तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. दानपुण्य केल्याने फायदा होईल. आज कृपया प्रवास टाळा.

शुभ रंग : Purple

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : कृपया गरिबांना छत्री दान करा.

हे वाचा - जानेवारीचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

महिलांनी त्यांच्या व्यक्तिमत्वात भर घालण्यासाठी कुंकू लावावं. राजकारणी आणि खेळाडूंना भरपूर प्रसिद्धी मिळेल. आजचा दिवस अगदी उत्साहपूर्ण आहे. दिवसाची ही सगळी ऊर्जा तुमचं ध्येय साध्य करण्याच्या दिशेने लावल्यास फायद्याचे ठरेल. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन व्यवहार आरामात पार पडतील. आर्थिक फायदा होईल.

शुभ रंग : Red

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : कृपया घरकाम करणाऱ्या व्यक्तीला सौंदर्यप्रसाधनं दान करा.

26 जानेवारी रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : वरुण ग्रोव्हर, रवी तेजा, मारिया गोर्रेट्टी, के.एस. नरसिंहस्वामी, रवीश कुमार, विजय शंकर.

First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology, Rashibhavishya