मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology: जन्मतारखेनुसार 25 जानेवारीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

Numerology: जन्मतारखेनुसार 25 जानेवारीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

अंकशास्त्र (फोटो सौजन्य - Canva)

अंकशास्त्र (फोटो सौजन्य - Canva)

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 25 जानेवारी 2023चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

जोडप्यांचा एकमेकांवर विश्वास असेल आणि त्यांचे बंध मजबूत राहतील. तुम्ही स्टेजवर किंवा कार्यक्रमांना जाऊ शकता पण, प्रवास टाळा. तुमची हुशारी आणि उत्कृष्ट बोलण्यामुळे इतरांवर छाप पाडेल. नातेसंबंध तयार करणं आणि त्यात प्रामाणिकपणा राखण्याचं लक्षात ठेवा. थिएटर आर्टिस्ट, क्रिकेटपटू, डान्सर्स, बॅटरी डीलर्स, लेखक, सरकारी अधिकारी, डॉक्टर, संगीतकार आणि मीडिया इंडस्ट्रीमध्ये चांगली आर्थिक कमाई होईल.

शुभ रंग: Orange and Blue

शुभ दिवस: मंगळवार

शुभ अंक:1 आणि 9

दान: मंदिरात नारळ दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीसमोर मनातील प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रोमान्सची आणि काहीतरी नवीन व्यावसायिक सुरुवात होणं अपेक्षित आहे. सोमवारी शंकराला दुधाचा अभिषेक करा आणि महिलांनी कपाळी कुंकू लावावं. तुमचे वैयक्तिक संबंध वाढवण्यासाठी तुम्ही इतरांच्या चुकांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. तुम्ही एखादी मालमत्ता विकून नवीन व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. पालकांच्या मदतीनं तुम्ही यशस्वी व्हाल. आळस तुमच्या कामगिरीत बाधा आणेल. तुमच्या मुलांसोबत आणि नातेवाईकांसोबत वेळ घालवण्यासाठी, कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी, छोट्या सहलीचं नियोजन करण्यासाठी, स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि तुमच्या जोडीदाराला सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

शुभ रंग: Pink

शुभ दिवस: सोमवार

शुभ अंक: 2

दान: मंदिरात दोन नारळ दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

करिअरमधील प्रगतीची प्रतीक्षा आणि विलंब संपुष्टात येण्याची शक्यता आहे. वैयक्तिक जीवनात अधिक आनंद मिळेल. सध्याचा काळ कामगिरीच्या दबावाचा तसेच स्पर्धेचा आहे. करिअरचा पर्याय म्हणून तुम्ही आध्यात्मिक समुपदेशनाचा मार्ग पडताळला पाहिजे. गायक, प्रशिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि वकील यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत प्रभावशाली आहे. कपडे, दागिने, पुस्तकं, सजावटीचं साहित्य, धान्यं खरेदी करण्यासाठी आणि प्रवास बुकिंगसाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे. डिझायनर, हॉटेलिअर्स, अँकर, लाईफ अँड स्पोर्ट्स कोचेस,फायनान्सर्स आणि संगीतकार आज विशेष कामगिरी करतील. हळदीच्या सेवनानं दिवसाची सुरुवात करा.

शुभ रंग: Red

शुभ दिवस: गुरुवार

शुभ अंक: 3 आणि 9

दान: मंदिरात चंदन दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

या आठवड्यात तुमची लोकप्रियता वाढेल आणि तुम्ही समुदायामध्ये तुम्हाला हिरोसारखं वाटेल. तुम्हाला तुमच्या मुलांचा अभिमान वाटेल. स्टॉक आणि व्यावसायिक मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. विक्री कर्मचारी, आयटी कर्मचारी, थिएटर आर्टिस्ट किंवा अभिनेते, टीव्ही अँकर आणि डान्सर्सनी मुलाखतीसाठी अर्ज करणं आवश्यक आहे. कारण, आज लाभ मिळण्याची शक्यता जास्त आहे. बांधकाम साहित्य, धातू आणि कापड उत्पादकांना व्यवसायात नवीन ऑफर मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य स्थिर ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खा.

शुभ रंग: Purple

शुभ दिवस: मंगळवार

शुभ अंक: 9

दान: मित्राला मनी प्लँट दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

श्रीगणेशाची पूजा करा आणि आशीर्वाद घ्या. समविचारी लोकांमध्ये मिसळण्याची वृत्ती बाजूला सारून इतरांवर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा. दीर्घकालीन समस्यांचे निराकरण करण्यासाठी तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण समर्थन मिळेल. आर्थिक नफा सामान्य असेल पण, आयात-निर्यातीतील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबानं तुम्हाला दिलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आज शेअर मार्केट, स्पोर्ट्स, इव्हेंट्स, स्पर्धा परीक्षा, मुलाखती यामध्ये नशीब आजमावा. आज तुमचा जोडीदार सर्वस्वी तुमचा असेल.

शुभ रंग: Green and Orange

शुभ दिवस: बुधवार

शुभ अंक: 5

दान: प्राण्यांना किंवा अनाथाश्रमात दूध दान करा.

#नंबर 6: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात संतुलन साधण्यासाठी अतिशय चांगला दिवस आहे. कमवलेला पैसा आणि सन्मान हा तुमच्या कर्माचं फळं आहे. संधी मिळाल्यास तुम्ही गटाचं नेतृत्व केलं पाहिजे. आजचा दिवस आरामदायक असून तो जीवनात आनंद आणि पूर्णता आणेल. बिझनेस क्लायंटशी असलेल्या समस्या सोडवण्यासाठी आणि रात्रीच्या जेवणासाठी किंवा खरेदीसाठी बाहेर जाण्यासाठी योग्य वेळ आहे. गृहिणी, खेळाडू, प्रॉपर्टी डीलर्स, डर्माटॅलॉजिस्ट, गायक, डिझायनर, इव्हेंट मॅनेजर्स, ब्रोकर्स, शेफ आणि विद्यार्थ्यांची प्रगती होईल अशा असाइनमेंट्स मिळतील. रोमँटिक नातेसंबधांमुळे घरामध्ये आनंदी वातावरण असेल.

शुभ रंग: Violet

शुभ दिवस: शुक्रवार

शुभ अंक: 6

दान: मंदिरात चांदीचं नाणं दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

समवयस्क व्यक्ती आणि कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध समृद्ध होतील. बिझनेस अकाउंटवर देखरेख आवश्यक आहे. फॅब्रिक किंवा लेदरऐवजी धातूच्या वस्तूंचा वापर करा. महत्त्वाचे वैयक्तिक निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही आज पालकांची संमती घेतली पाहिजे. आई आणि इतर ज्येष्ठांच्या सूचना लक्षपूर्वक ऐका. आज मोठी वाटणारी एखादी समस्या लवकरच नाहीशी होईल. कोणीतरी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करेल पण, त्यात यशस्वी होणार नाही. दागिने निर्मिती, वकील, कुरिअर, पायलट, राजकारणी, थिएटर आर्टिस्ट, सीए आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील व्यक्तींना आज नशिबाची साथ मिळेल.

शुभ रंग: Orange

शुभ दिवस: सोमवार

शुभ अंक: 7 आणि 9

दान: तांब्याचे लहान तुकडे दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.).

दिवसाचा पूर्वार्ध प्रवास करण्यात किंवा प्रवासाच्या नियोजनात घालवा. दानधर्मानं दिवसाची सुरुवात करा. मोठ्या कंपन्यांशी असलेले तुमचे संबंध भविष्यात फायद्याचे ठरतील. म्हणून, सध्या संयम ठेवा. आर्थिक लाभ जास्त होतील. मालमत्ता आणि यंत्रसामग्री खरेदीशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने होतील. अनेक जबाबदाऱ्यांमुळे ताण येण्याची शक्यता आहे. कायदेशीर वाद लवकरच मिटतील. डॉक्टर आणि उत्पादकांना मिळालेल्या यशाबद्दल सन्मानित वाटेल. वैयक्तिकरित्या भागीदारांशी वाद होण्याची शक्यता असल्यानं आपलं डोकं शांत ठेवा. धान्य दान करणं आणि लिंबू वर्गीय फळं खाणं गरजेचं आहे.

शुभ रंग: Purple

शुभ दिवस: शुक्रवार

शुभ अंक: 6

दान: गरजूला छत्री दान करा.

हे वाचा - जानेवारीचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुम्ही स्वतःच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी जास्त वेळ घालवाल. परदेशातील आणि प्रशिक्षण व्यवसायात चढ उतार जाणवतील. जोडपी आज आनंदी आणि रोमँटिक मूडमध्ये राहतील. दुखापत होण्याची आणि बदनामी होण्याची शक्यता असल्यानं आज तुम्ही गर्दीपासून दूर राहावं. प्रेमात असलेल्यांसाठी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस फार चांगला आहे. व्यावसायिक संबंध जुळून येण्यासाठी आणि डील्स प्रत्यक्षात येण्यासाठी जास्त वेळ लागेल. ग्लॅमर इंडस्ट्री आणि मीडियामधील व्यक्तींना प्रसिद्धी मिळेल. राजकारणी आज मोठ्या संधींची पूर्तता करतील. पब्लिक फिगर्स आणि विद्यार्थ्यांनी आजचा दिवस सहयोग आणि प्रगती साधण्यासाठी वापरला पाहिजे. विद्यार्थी, प्रशिक्षक, संगीतकार, लेखक, डिझायनर, डॉक्टर, वकील, अभियंते आणि अभिनेत्यांना लोकप्रियतेचा आनंद घेता येईल.

शुभ रंग: Red

शुभ दिवस: गुरुवार

शुभ अंक: 9

दान: लाल मसूर दान करा.

25 जानेवारी रोजी जन्मलेले सेलिब्रिटी: उर्वशी, कविता कृष्णमूर्ती, बिबेक देबरॉय, अनुश्री, चेतेश्वर पुजारा.

First published:

Tags: Horoscope, Numerology, Rashibhavishya