#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
एकाकीपणाची भीती आज कमी होईल. तुमच्या कामातून भरपूर नाव आणि प्रसिद्धी मिळेल. कामाच्या ठिकाणी उच्चपदावर बसण्याची संधी मिळेल. वैयक्तिक आयुष्यात मूड बदलत राहील. वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचे आहे. जर तुम्ही प्रमुखपदावर असाल तर तुमची टीम पूर्णपणे तुमच्यासोबत असेल. मित्र-मैत्रिणीकडून मानसिक आधार किंवा प्रपोजल मिळण्याची शक्यता आहे. अभिनय, सोलर, कला, कॉस्मेटिक्स, शेती आणि प्रॉपर्टीसंबंधी व्यवसायांमध्ये असणाऱ्या व्यक्तींसाठी भाग्याचा दिवस.
शुभ रंग : Green and Yellow
शुभ दिवस : रविवार
शुभ अंक : 1 आणि 5
दान : कृपया आश्रमांमध्ये गहू दान करा.
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज सहकाऱ्यांवर आंधळा विश्वास ठेवणं टाळा. काहीसा खडतर अनुभव येण्याची शक्यता आहे. महिलांनी आज नातेसंबंध सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील रहावं. लहान मुलांसाठी आत्मविश्वासपूर्ण, उत्साहाचा, मेहनतीचा आणि भाग्याचा दिवस आहे. पालकांना आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर अभिमान वाटेल. मीटिंग किंवा मुलाखतीला जाताना पांढरे किंवा अॅक्वा रंगाचे कपडे घालणे भाग्याचे ठरेल. मीडिया क्षेत्रातील व्यक्ती, राजकारणी, डिझायनर्स, डॉक्टर आणि अभिनेते या लोकांना विशेष यश मिळेल.
शुभ रंग : Aqua
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 2 आणि 6
दान : कृपया गरिबांना साखर दान करा.
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
नातेसंबंध सुरळीत रहावे असे वाटत असेल, तर आज खुल्या मनाने संवाद साधणे गरजेचे आहे. कोणत्याही कला क्षेत्रातील व्यक्तीला आज गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल. खेळाडू, शेअर मार्केट ब्रोकर्स, विमान कर्मचारी, संरक्षण कर्मचारी, शिक्षणतज्ज्ञ, हॉटेल व्यावसायिक, संगीतकार आणि राजकारणी व्यक्तींना बढती तसेच प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. बिझनेसमन असणाऱ्या व्यक्तींनी क्लाएंटला भेटण्यासाठी दुपारच्या जेवणानंतरची वेळ निवडावी.
शुभ रंग : Brown
शुभ दिवस : गुरूवार
शुभ अंक : 3 आणि 1
दान : कृपया आश्रमांमध्ये साखर दान करा.
#नंबर 4: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस अगदी स्थिर असणार आहे. त्यामुळे तुमच्या योजना अंमलात आणण्यासाठी मेहनत केल्यास यश मिळेल. कामाच्या बाबतीत नशीब चांगलीच साथ देईल. तरुणांनी आपल्या मनातील प्रेमभावना व्यक्त कराव्यात, तसेच मैत्रीचा किंवा नातेसंबंधांचा गैरफायदा घेणे टाळावे. आज कृपया मांसाहार किंवा मद्यपान टाळावे. प्राण्यांना अन्नदान केल्यास उत्तम.
शुभ रंग : Teal
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 9
दान : कृपया गरिबांना कपडे दान करा.
#नंबर 5: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुम्ही अतिशय धाडसी आणि स्वातंत्र्यप्रिय व्यक्ती आहात, मात्र सध्या स्वतःला आवर घालणं गरजेचं आहे, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. नातेसंबंध, शॉपिंग, शेअर खरेदी, खेळ आणि स्पर्धांमध्ये सहभागी होणे इत्यादी गोष्टींसाठी उत्तम दिवस. प्रवासाचा बेत असल्यास आरामात पार पडेल. एखाद्या खास व्यक्तीशी भेट होईल. आज खरेदी केलेली छोटी किंवा मोठी वस्तू भविष्यात भरपूर फायद्याची ठरेल. प्रमोशन किंवा अपरायझलचे काम रखडले असल्यास आज मार्गी लागेल.
शुभ रंग : Sea Green
शुभ दिवस : बुधवार
शुभ अंक : 5
दान : कृपया हिरवी रोपं दान करा.
# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
रिलेशनशिप उत्तम राहील. नवीन घर, नोकरी, नाती, ऐषोआराम, प्रवास, पार्टी तुम्ही ज्या गोष्टीचा विचार कराल ते आज अगदी आरामात पार पडेल. तुमचे टार्गेट आज पूर्ण होईल. राजकारणी, गृहिणी, खेळाडू, ब्रोकर्स, रिटेलर, हॉटेल व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना आज आपापल्या क्षेत्रात मोठे यश मिळेल. गृहिणी आणि शिक्षकांना कुटुंबीयांकडून भरपूर सन्मान तसेच प्रेम लाभेल, लग्नासाठी अनुरूप स्थळ चालून येईल.
शुभ रंग : Sky Blue
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6
दान : कृपया लहान मुलांना निळी पेन्सिल किंवा पेन दान करा.
#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज कोर्ट-कचेरी आणि कागदपत्रांच्या बाबतीत खबरदारी घ्या. आज विश्वास मिळवणं आणि तो कायम ठेवणं अवघड वाटेल. महिला, व्यावसायिकांसाठी भाग्याचा दिवस आहे. दिवसाच्या सुरुवातीला पूर्वजांचा आशीर्वाद घ्या. आज पिवळ्या डाळी दान करणं फायद्याचं ठरेल. आज मोठ्या ब्रँडच्या तुलनेत लहान ब्रँड्सना अधिक फायदा होईल. वकील आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील व्यक्तींनी आज घरून काम करणं टाळावं.
शुभ रंग : Orange
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 7
दान : कृपया तांब्याचं भांडे दान करा.
#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते, त्यामुळे इतरांना जज करणं थांबवा. भूतकाळातील मेहनत आणि तुमचा आत्मविश्वास यांच्या बळावर आज कोणत्याही अडचणीतून बाहेर पडता येईल. जोडप्यांसाठी आज प्रेमसंबंध मजबूत करण्यासाठी खास क्षण मिळतील. डॉक्टर, बिल्डर, नाट्य कलाकार, फार्मासिस्ट, इंजिनीअर आणि उत्पादक यांना आर्थिक फायदा होईल. मशीन खरेदी, धातू खरेदी, गुंतवणूक यासाठी चांगला दिवस. शारीरिक आणि मानसिक आरोग्य स्थिर राहील.
शुभ रंग : Blue
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6
दान : कृपया अनाथाश्रमात मोहरीचं तेल दान करा.
हे वाचा - अंकशास्त्रानुसार #नंबर 7 साठी 2023 हे वर्ष कसं असेल? जाणून घ्या भविष्य
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
इतरांची मदत करण्यापूर्वी स्वतःच्या घरातील तक्रारी दूर करण्यावर भर द्या. अभिनेते, गायक, डिझायनर, राजकारणी, लेखक, डॉक्टर, इतिहासतज्ज्ञ अशा मास कम्युनिकेशन क्षेत्रातील व्यक्तींसाठी भाग्याचा दिवस. या व्यक्तींना आज नाव, प्रसिद्धी, आणि समाधान मिळवण्यासाठी उत्तम योग आहे. तरुणांना आपल्या जोडीदारावर छाप पाडण्यासाठीही आज चांगला दिवस आहे. मित्र बनवणे, हॉटेलमध्ये जाणे, ऑडिशन, इव्हेंट, पार्टी होस्ट करणे, दागिने खरेदी, समुपदेशन किंवा क्रीडा स्पर्धेत भाग घेणे अशा गोष्टींसाठी अगदी सुयोग्य दिवस.
शुभ रंग : Brown
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 9 आणि 6
दान : कृपया लहान मुलीला लाल रूमाल दान करा.
23 जानेवारी रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज: रमेश सिप्पी, रेखा भारद्वाज, बाळासाहेब ठाकरे, सुभाषचंद्र बोस.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.