मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /Numerology: फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

Numerology: फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

जन्मतारखेवरून राशीभविष्य

जन्मतारखेवरून राशीभविष्य

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. फेब्रुवारी हा वर्षाचा दुसरा महिना. हा महिना प्रेम, सोबत, सहकार्य, पॅशन, निरागसपणा आणि सुसंगतता दाखवणारा आहे. 2023 या क्रमांकातल्या अंकांची बेरीज 7 होते. ती फेब्रुवारी म्हणजेच 2 या अंकासाठी भाग्यकारक आहे.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

वेळेत कामं पूर्ण करण्यासाठी या महिन्यात भरपूर सेल्फ-मोटिव्हेशनची गरज भासणार आहे. व्यावहारिक विचारसरणी ठेवणं गरजेचं आहे. केवळ नशिबावरच नाही, तर मेहनतीवर लक्ष केंद्रित केल्यास तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगले परिणाम दिसतील. स्वतःच्या गावात किंवा जवळपास काम करत असलात, तर नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसंच, सध्याच्या कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्यादेखील वाढतील. मित्रपरिवार आणि कुटुंबीयांच्या समस्या कमी होतील. अनुरूप जोडीदार भेटण्याची शक्यता आहे. एकंदरीत, थोडेफार चढ-उतार दिसतील. सध्या ताण देणाऱ्या गोष्टी हळूहळू शांत होतील.

शुभ रंग : Peach and Creme

शुभ दिवस : रविवार

शुभ अंक : 1

दान : मंदिरात चंदन दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

दोन या अंकासाठी अगदी आरामदायी आणि शुभ असा हा महिना असणार आहे. वादविवाद संपुष्टात आणण्यासाठी हा फेब्रुवारी योग्य ठरेल. न्यूमरॉलॉजीनुसार हा महिना तुमच्या प्रोफेशनल आणि आर्थिक बाबींसाठी भरपूर फायद्याचा ठरेल. या गोष्टींमुळे तुमचा आत्मविश्वासदेखील वाढेल. मनात रोमँटिक विचार असतील. त्यामुळे प्रेमाच्या बाबतीत तुमचं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहाल. विवाहित जोडप्यांना आपल्या नात्यामध्ये सुधारणा होताना दिसेल. मालमत्ताखरेदीचं नियोजन थोडं लांबू शकतं.

शुभ रंग : White and Blue

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 2

दान : गरिबांना पांढरी मिठाई दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तीन भाग्यांक असलेल्या व्यक्तींसाठी हा महिना व्यक्त होण्याचा आहे. बोलणं, लिहिणं, अभिनय किंवा कलेच्या माध्यमातून तुम्ही आपल्या भावना, आपले विचार इतरांसमोर सहजपणे व्यक्त कराल. तुम्हाला आलेला भावनिक अनुभव काही तरी शिकवून जाईल. हा संपूर्ण महिना सकारात्मक राहील. अर्थात, तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नवीन ओळखी होतील. त्यांचा करिअरमध्ये फायदा होईल. स्वतःची कंपनी असलेल्या व्यक्तींना नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी हा महिना अगदी उत्तम आहे. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी, तसंच विवाहित जोडप्यांनी एकमेकांच्या सीमांचा आदर राखावा. तसंच, मोठ्या चर्चा टाळाव्यात. नात्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी संयम हीच गुरुकिल्ली हे लक्षात घ्यावं. शिक्षण, सरकारी कंत्राट, पुस्तकं, स्टेशनरी, समुपदेशन, केमिकल्स आणि फायनान्स या क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी भाग्याचा महिना.

शुभ रंग : Peach

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3

दान : गरिबांना किंवा प्राण्यांना केळी दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

लहान ध्येयं डोळ्यांसमोर ठेवून, त्यातूनच मोठं यश मिळवण्याचा हा महिना आहे. कामाप्रति तुमची निष्ठा आणि कमिटमेंट पाहून वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा सर्व सहकाऱ्यांवर चांगली छाप पडेल. तुम्ही खऱ्या अर्थाने देशभक्त आहात. त्यामुळे संरक्षण, एनजीओ, आरोग्य सेवा, वेल्फेअर संस्था आणि सामाजिक सेवांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना भरपूर प्रशंसा आणि कौतुक मिळेल. सोबतच, या क्षेत्रांतल्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळतील. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी भूतकाळ विसरून पुढे पाहावं. तसंच, आजूबाजूच्या व्यक्तींमुळे आपण एखाद्या विचित्र परिस्थितीत अडकत तर नाही ना याची खबरदारी घ्यावी. वडिलोपार्जित व्यवसायात असलेल्या महिलांना आपलं काम दाखवण्याची संधी मिळेल. इंजिनीअर व्यक्ती करिअरमध्ये मोठी झेप घेतील. प्राण्यांना खाऊ घालणं आणि त्यांची सेवा करणं हा तुमच्या दिनचर्येचा भाग असावा. यामुळे राहू ग्रहाच्या नकारात्मकतेपासून बचाव होईल.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : भिकाऱ्यांना Salty पदार्थ दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

नातेवाईकांसोबत पार्टनरशिप फर्ममध्ये गुंतवणूक करणं टाळा. तुमच्या जन्मांकाची शक्ती वाढवण्यासाठी बुध ग्रहाची पूजा करा. एखाद्या व्यक्तीकडून रोमँटिक रिप्लाय मिळेल, तसंच डेटवर जाण्याची शक्यता आहे. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात वेगाने गाडी चालवणं किंवा कोणत्याही प्रकारची जोखीम घेणं टाळा. नोकरीच्या ठिकाणी टेबलवर पाच खंड असलेलं छोटेसे बांबूचं रोप ठेवल्यास नशीब उजळेल. नवीन घर किंवा दुकान खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर ते शक्य होईल. डीलरशिप, फिल्म, राजकारण, फुटबॉल, इव्हेंट आणि जाहिरात या क्षेत्रांमधल्या व्यक्तींना बिझनेस ट्रिपची संधी मिळेल. या ट्रिप्स फलदायी ठरतील. पाच या जन्मांकाचा अधिपती भगवान गणेश असल्यामुळे, या महिन्यात दर बुधवारी गणपतीला दूर्वा वाहणं लाभाचं ठरेल.

शुभ रंग : Green and Aqua

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : गायींना किंवा अनाथाश्रमात दूध दान करा.

# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

शुक्र ग्राहाचा प्रभाव असलेल्या सहा अंकासाठी हा महिना अत्यंत भाग्याचा आहे. कौटुंबिक कार्यक्रम, कॉर्पोरेट पार्टी, सामाजिक-राजकीय सभा, इव्हेंट, ऑडिशन, अध्यात्मिक बैठका अशा गोष्टींमध्ये सहभाग घेतल्याने चांगले परिणाम मिळतील. प्रेमात असलेल्यांनी नात्यात विश्वास वाढवण्यासाठी आणि बंध मजबूत करण्यासाठी अधिक वेळ द्यावा. कॉस्मेटिक्स आणि डिझायनिंग क्षेत्रातल्या व्यक्तींनी मार्केटिंगवर जास्त लक्ष द्यावं. या महिन्यात भरपूर यश मिळेल. डॉक्टर, खेळाडू, पत्रकार, विद्यार्थी, फिटनेस ट्रेनर्स, दूध उत्पादक शेतकरी आणि ब्रोकर या व्यक्ती आपलं ध्येय गाठू शकतील.

शुभ रंग : Blue and White

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : गरिबांना स्टीलची भांडी दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

बिझनेसमध्ये नशीब उजळवण्यासाठी कामाच्या ठिकाणी टेबलवर क्रिस्टलचं कमळ ठेवणं फायद्याचं ठरेल. वकील, संरक्षण अधिकारी, दिग्दर्शक, अभिनेते, ऑडिटर्स आणि राजकीय व्यक्तींनी सभा किंवा मुलाखतींना आवर्जून उपस्थित राहावं. रिलेशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तींनी एकमेकांचा आदर ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा गैरसमज वाढू शकतात. सीए आणि सरकारी अधिकारी असलेल्या व्यक्तींचं कौतुक होईल. तसंच, एखादी छोटेखानी सहल आयोजित कराल. एक्सपोर्ट-इम्पोर्ट, परदेश जमीन-व्यवहार या क्षेत्रांतल्या व्यक्तींना नवीन काम मिळेल. तसंच आर्थिक प्रगती होईल. दर सोमवारी भगवान शंकराला दुधाचा अभिषेक करा. तसंच केतू पूजा केल्याने फायदा होईल.

शुभ रंग : Yellow

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 7

दान : लहान मुलांना कपडे दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

व्यावसायिक आणि खासगी अशा दोन्ही बाबतींत हा महिना अगदी भाग्याचा ठरेल. सर्जन, बांधकाम व्यवसायिक, उत्पादक, इंजिनीअर, राजकीय व्यक्ती आणि शेतकरी यांच्यासाठी महिन्याचा उत्तरार्ध संधीचं सोनं करणारा ठरेल. या महिन्यात तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. दिनचर्येमध्ये आरोग्यासाठी चांगल्या सवयींचा समावेश करून घ्या. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केलेल्या पैशांचा आढावा घेणं गरजेचं आहे. महिलांनी घरगुती जबाबदाऱ्यावंर लक्ष केंद्रित करावं. वर्क फ्रॉम होमऐवजी घराबाहेर पडून काम करणं जास्त फायद्याचं ठरेल.

शुभ रंग : Blue and Grey

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 5 आणि 6

दान : गायींना हिरव्या पालेभाज्या खाऊ घाला.

हे वाचा - फेब्रुवारी 2023असं असेल लव्ह लाइफ, या राशींच्या व्यक्ती करू शकतात प्रपोझ

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

महिलांनी आपल्या दिनचर्येत न चुकता व्यायामाचा समावेश करणं गरजेचं आहे. अन्यथा नैराश्याचा सामना करावा लागू शकतो. ग्लॅमर आणि डिझायनिंग क्षेत्रातल्या व्यक्तींना भरपूर प्रशंसा आणि यश मिळेल. 9 या अंकावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे तुमच्या अंकाची शक्ती वाढवण्यासाठी मंगळ पूजा करणं फायद्याचं ठरेल. उजव्या हाताच्या मनगटावर लाल धागा बांधल्याने फायदा होईल. परदेशात असलेले विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील. जमिनीत केलेली गुंतवणूक मोठा परतावा देईल. वाहन किंवा घर खरेदीचा विचार करत असाल, तर हा महिना शुभ आहे. जोडप्यांनी एखादी छोटीशी ट्रिप आयोजित करणं फायद्याचं ठरेल. सिंगल व्यक्तींना या महिन्यात अनुरूप जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. मॅट्रिमोनिअल साइटवर नावनोंदणी केल्यास फायदा होईल.

शुभ रंग : Pink

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9 आणि 2

दान : आश्रमांमध्ये स्टेशनरी साहित्य दान करा.

First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology, Rashibhavishya