मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /Numerology: पालकांना मुलांच्या शैक्षणिक कामगिरीचा अभिमान वाटेल, अंकशास्त्रानुसार भविष्य

Numerology: पालकांना मुलांच्या शैक्षणिक कामगिरीचा अभिमान वाटेल, अंकशास्त्रानुसार भविष्य

अंकशास्त्र

अंकशास्त्र

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 23 मार्च 2023चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज सर्व नेत्यांसाठी जनतेला आकर्षित करण्यासाठी संख्यांचं एक सुंदर मेट्रिक तयार झालेलं आहे. आज सर्वांचं तुमच्याकडे लक्ष असेल, त्यामुळे स्टारडमचा आनंद घ्या. कामाच्या माध्यमातून प्रसिद्धी आणि कीर्ती प्रस्थापित करण्यासाठी व नोकरीमध्ये उच्च पद प्राप्त करण्यासाठी तुमच्यामध्ये आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य आहे. तुमचा जोडीदार प्रभावित होईल आणि पूर्णपणे तुम्हाला समर्पित असेल. आज प्रशंसा, प्रपोजल्स, बक्षिसं किंवा प्रियजनांकडून पाठिंबा मिळेल, त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. अभिनय, सौर ऊर्जा, कलाकृती, सौंदर्य प्रसाधनं, शेती आणि मालमत्ता या क्षेत्रातील व्यक्ती आज बाजारात अव्वलस्थानी असतील.

शुभ रंग: Aqua and Yellow

शुभ दिवस: रविवार

शुभ अंक:1 आणि 5

दान: मंदिरात पिवळी फळं दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

नशिबाची साथ आणि संधी मिळण्याची शक्यता आहे. संख्यांच्या संयोजनामुळे उज्ज्वल भविष्याचा पाया तयार होईल. मुलांच्या कामगिरीमध्ये त्यांचा आत्मविश्वास, कठोर परिश्रम, नशीब आणि आकर्षण दिसून येईल. पालकांना आपल्या मुलांच्या शैक्षणिक कामगिरीचा अभिमान वाटेल. प्रणय आणि विश्वास हे घटक जोडप्यांचं नातं मजबूत करतील. महत्त्वाच्या मीटिंगमध्ये किंवा मुलाखतींमध्ये अॅक्वा किंवा टील रंगाचे कपडे घातल्यास नशिबाची साथ मिळेल. मीडिया क्षेत्रातील व्यक्ती, राजकारणी, डिझायनर, डॉक्टर आणि अभिनेते यांना विशेष यश मिळेल.

शुभ रंग: Aqua and Sea Green

शुभ दिवस: सोमवार

शुभ अंक: 2 आणि 6

दान: गरिबांना साखर दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आयुष्य आज एक छोटंसं पण सकारात्मक वळण घेत आहे, त्यामुळे आनंदाने पुढे जा. एखादा उपक्रम सुरू करण्याचा विचार आज यशस्वीपणे प्रत्यक्षात आणता येईल. खेळाडू, स्टॉक ब्रोकर्स, एअरलाइन कर्मचारी, संरक्षण कर्मचारी, शिक्षणतज्ज्ञ, हॉटेल व्यावसायिक, संगीतकार आणि राजकारणी यांना पदोन्नती आणि प्रसिद्धी मिळेल. व्यावसायिकांनी दुपारच्या जेवणानंतर क्लायंट्सना भेटावं.

शुभ रंग: Brown and Violet

शुभ दिवस: गुरुवार

शुभ अंक: 3 आणि 1

दान: आश्रमात ब्राऊन शुगर दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या सहकार्‍यांच्या किंवा प्रिय जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे तुम्ही सर्व आव्हानं सहजपणे पार कराल. प्राण्यांना नेहमी मदत करा आणि त्यांची सेवा करा. आज तुमचे कष्ट कमी होतील. स्थिर योजना अंमलात आणण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मार्केटिंग पॉलिसींबाबत कृती करत राहा आणि नशिबाला त्याची भूमिका बजावू द्या. तुमच्या मनासारखं घडायला उशीर होईल कदाचित आज संध्याकाळ उजाडेल. तरुणांनी त्यांच्या मनातील प्रेमभावना शेअर कराव्यात. मैत्री किंवा नातेसंबंधांचा गैरवापर टाळावा. आज मांसाहार किंवा दारू टाळा.

शुभ रंग: Teal

शुभ दिवस: मंगळवार

शुभ अंक: 6

दान: गरिबांना कपडे आणि खारे पदार्थ दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या सभोवतालच्या सर्व शक्तींचा आशीर्वाद घेण्याचा हा दिवस आहे. आजचा दिवस अद्भुत आणि अत्यंत भाग्यवान आहे जो तुमच्या अनुकूल अंकांकडे वळत आहे. त्यामुळे जीवनात यश आणि करिअरमध्ये प्रगती दोन्हीही एकत्रपणे मिळतील. नातेसंबंधांचा आनंद घेण्यासाठी, खरेदीसाठी, जोखीम घेण्यासाठी, स्टॉक खरेदी करण्यासाठी, क्रीडा सामने खेळण्यासाठी आणि स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. एखाद्या खास व्यक्तीची भेट होऊ शकते. आज तुम्हाला पाहिजे ती गोष्ट खरेदी करता येईल. स्टॉक किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे.

शुभ रंग: Sea Green

शुभ दिवस: बुधवार

शुभ अंक: 5

दान: गुरांना किंवा गरिबांना हिरवं धान्य करा.

#नंबर 6: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

सर्व प्रमुख निर्णय घेताना तुमच्या सिक्स्थ सेन्सचा वापर करा. नवीन घर, नोकरी, नवीन नातेसंबंध, आर्थिक लाभ, ऐश्वर्य, समृद्धी, प्रवास, मेजवानी आणि तुम्हाला आवडेल ती बाब आज मिळेल. आज सर्व टारगेट्स पूर्ण होतील आणि एखाद्या चॅम्पियनप्रमाणे तुम्ही तुमची ओळख निर्माण कराल. राजकारणी, घर खरेदी-विक्री, खेळाडू, ब्रोकर्स, रिलेटलर्स, हॉटेलिअर्स आणि विद्यार्थी आज ध्येय गाठतील आणि विजय मिळवतील. गृहिणी आणि शिक्षकांना त्यांच्या कुटुंबियांकडून आदर आणि प्रेम मिळेल. सरकारी कामं आणि मालमत्तेचे सौदे सहजपणे हाताळले जातील. लग्नाचे प्रस्ताव आज प्रत्यक्षात येतील.

शुभ रंग: Sky Blue and White

शुभ दिवस: शुक्रवार

शुभ अंक: 6 and 2

दान: लहान मुलांना निळा पेन किंवा पेन्सिल दान करा.

हे वाचा - हनुमानाला का म्हटलं जातं 'अष्टसिद्धी के दाता'; कोणत्या आहेत त्या आठ सिद्धी?

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

मुलाखतींमध्ये किंवा परदेशी सहलींमध्ये सहभाग घ्या. आयुष्यातील अडथळे कमी करण्यासाठी केतू पूजा करा. आज कायदेशीर खटल्यांमध्ये यश मिळेल. आज महिलांना बिझनेस डिल्समध्ये नशीबाची साथ मिळेल. तुमच्या पार्टनरचा तुमच्यावर विश्वास असल्यानं तुम्हाला धन्य वाटेल. दिवसाची सुरुवात करताना पूर्वजांचे आशीर्वाद घ्या आणि आज पिवळ्या डाळी दान करा. दिग्गजांपेक्षा लहान ब्रँड्सना अधिक फायदा होईल. वकिली आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील व्यक्तींनी घरातून काम करणं आणि ऑफिसमधून बाहेर पडणं टाळलं पाहिजे.

शुभ रंग: Orange and Pink

शुभ दिवस: सोमवार

शुभ अंक: 7

दान: तांब्याची भांडी दान करा.

हे वाचा - कपाळावर नव्हे, शरीराच्या या भागात हळदीचा टिळा लावण्याचा होतो विशेष फायदा

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

बुधाच्या पाठिंब्याने तुम्ही संकाटाच्या स्थितीवर नायकाप्रमाणे मात कराल. त्यामुळे तुम्हाला विजयाचा आनंद मिळेल. शनिवारी शनिपूजा करा. गुरांसाठी दान करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडप्यांसाठी प्रेमसंबंधाचा आनंद घेण्यासाठी आजच दिवस विशेष असेल. डॉक्टर्स, बिल्डर्स, थिएटर आर्टिस्ट, फार्मासिस्ट, इंजिनीअर आणि उत्पादकांना आर्थिक लाभ मिळतील. लोकांमध्ये मिसळा आणि एका जागी बसून विचार करून वेळ वाया घालवणं थांबवा.

शुभ रंग: Blue

शुभ दिवस: शुक्रवार

शुभ अंक: 6

दान: अनाथाश्रमात मोहरीचं तेल दान करा.

हे वाचा - चैत्रनवरात्रीला 9 दिवशी या 9 मंत्राचा करा जप; देवीदुर्गेची कुंटुंबावर राहील कृपा

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज आवश्यक असलेली शक्ती मिळवण्यासाठी लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे घाला. कलाकार, गायक, डिझायनर्स, राजकारणी किंवा डॉक्टर्स, लेखक, इतिहासतज्ज्ञ, माध्यमकर्मी यांसारख्या मोठ्या समाजाशी संबंधित काम करणाऱ्या व्यक्तींना फेम, ऐशोआराम, संधी, स्थैर्य आणि समृद्धी या सगळ्या गोष्टी एकाचवेळी मिळण्याचा आजचा दिवस आहे त्यामुळे तो त्यांच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. शेअर्स आणि जमिनीत व्यावसायिक गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. हॉटेलिंगचा आनंद घेण्यासाठी, एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी, पार्टीचं आयोजन करण्यासाठी, दागिन्यांची खरेदी करण्यासाठी, समुपदेशनासाठी किंवा खेळ खेळण्याचा आनंद घेण्यासाठी आजचा दिवस सामान्य आहे.

शुभ रंग: Brown

शुभ दिवस: मंगळवार

शुभ अंक: 9 आणि 6

दान: लहान मुलीला लाल रुमाल दान करा.

23 मार्च रोजी जन्मलेले सेलिब्रिटी: कंगना रनौत, स्मृती इराणी, अरमान कोहली, किरण मुझुमदार शॉ, विजय येसुदास, राम मनोहर लोहिया.

First published:
top videos

    Tags: Numerology, Rashibhavishya