मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /#Numerology: विवाह-प्रेम संबंधांत प्युअर आणि निष्ठावान पार्टनर असतात या व्यक्ती

#Numerology: विवाह-प्रेम संबंधांत प्युअर आणि निष्ठावान पार्टनर असतात या व्यक्ती

अंकशास्त्र

अंकशास्त्र

या व्यक्तींना इतरांच्या पाठिंब्याची गरज असते. त्या स्वतंत्रपणे काम करू शकत नाहीत. त्यांना एकटेपणाची भीती असते. त्यामुळे त्यांनी गटात राहिलं पाहिजे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

क्रमांक 6 हा क्रमांक 1शी किती सुसंगत आहे.

#क्रमांक 1: क्रमांक 1 एक हा सूर्याचा अंक आहे. एक हा अंक शुक्राचा प्रभाव असलेल्या 6 या अंकाला पूर्णपणे प्रतिरोधक आहे. त्यामुळे या दोन्ही जन्मांकांच्या व्यक्तींनी व्यावसायिक भागिदारी करण्यापासून आणि एकमेकांशी लग्न करण्यापासून दूर राहिलं पाहिजे. या व्यक्तींचा इमोशनल कोशंट हे त्यांच्या एकत्र राहण्यास विरोध करण्यामागचं सर्वात मोठं कारण आहे. सहाचा प्रभाव असलेल्या व्यक्ती घर, कुटुंब, लोक, मित्र आणि समाजावर प्रेम करण्यासाठी ओळखल्या जातात. तर, एकचा प्रभाव असलेल्या व्यक्ती या स्वावलंबी असतात आणि त्या स्वत:मध्येच गुंग असतात.

क्रमांक 1 हा एकट्यानं काम करण्यास अनुकूल आहे. पण, सहा हा अंक तसा नाही. सहा अंकाचा प्रभाव असलेल्यांना इतरांच्या मदतीची किंवा पाठिंब्याची गरज असते. क्रमांक एकचा प्रभाव असलेल्या व्यक्ती स्वभावानं कठोर असतात आणि त्या सहजासहजी माघार घेत नाहीत. याउलट, सहाचा जन्मांक असलेल्या व्यक्ती इतरांच्या गरजांमध्ये विलीन होण्यास सहज तयार असतात. दोन्ही अंकांचा प्रभाव असलेल्या व्यक्तींकडे मजबूत पर्सनॅलिटी क्लास आहेत आणि ते जर एकत्र आले तर मोठे विवाद होऊ शकतात. जर एखाद्या प्रसंगी या व्यक्तींना एकत्र काम करावं लागलं तर त्यांनी मध्यस्थ म्हणून क्रमांक 2 ची मदत किंवा पाठिंबा घेतला पाहिजे. यामुळे त्यांच्यातील वाद मिटवण्यात आणि दीर्घकाळ संवाद प्रस्थापित होण्यास मदत होईल.

शुभ रंग: Beige

शुभ दिवस: रविवार आणि शुक्रवार

शुभ अंक: 5

दान: लहान मुलांना केशर दूध दान करा.

क्रमांक 6 हा क्रमांक 2शी किती सुसंगत आहे -

#क्रमांक 2: क्रमांक 2 हा क्रमांक 6 शी परिचित आहे तर क्रमांक 6 सह हा तटस्थ संबंधाच्या नमुन्याचं अनुसरण करतो. क्रमांक सहाला आपल्या पॅनेलमध्ये दोनला ठेवणं कठीण वाटतं. या दोन्ही जन्मांकाच्या व्यक्ती जगण्यासाठी भिन्न तत्त्वज्ञानासह समान पद्धतीचे अनुसरण करतात, त्यामुळे अशी स्थिती निर्माण होते. या व्यक्ती सहसा अशा वादात पडतात जे सहजपणे शांत केले जाऊ शकतात. या व्यक्ती कमिटेड आणि भावनिक असतात. त्या विवाह किंवा प्रेम संबंधांत प्युअर आणि निष्ठावान पार्टनर ठरतात.

हे वाचा - या झाडांमध्ये असतो देवी-देवतांचा वास! आपल्या हातून होऊ नये त्यांची अवहेलना

सहा किंवा दोन जन्मांक असलेले तरुण किंवा ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना यशाचा आनंद साजरा करण्याची संधी मिळते. सहा आणि दोनचा प्रभाव असलेली महिला नशिबवान असते तसंच ती आपल्या कुटुंबाला आधार देणारी सून ठरते. या जन्मांकांच्या व्यक्ती सर्जनशीलतेशी संबंधित करिअर, लिक्विड, सरकारी ऑर्डर्स, डिझायनिंग, दागिने, हिरे, ब्युटी प्रॉडक्ट्स, सजावट, टूर आणि ट्रॅव्हल्स, आयात-निर्यात आणि धान्य विक्री या क्षेत्रांत यशस्वी ठरतात. या व्यक्तींना इतरांच्या पाठिंब्याची गरज असते. त्या स्वतंत्रपणे काम करू शकत नाहीत. त्यांना एकटेपणाची भीती असते. त्यामुळे त्यांनी गटात राहिलं पाहिजे.

हे वाचा - मंदोदरीला सीतेची माता का म्हटले जाते? या धार्मिक ग्रथांमध्ये सांगितलंय रहस्य

शुभ रंग: Blue and white

शुभ दिवस: सोमवार आणि शुक्रवार

शुभ अंक: 2 आणि 6

दान: राधा आणि कृष्णला खडिसाखर अर्पण करा.

First published:
top videos

    Tags: Numerology, Rashibhavishya