मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /#Numerology: या अंकाच्या जोडप्यांनी थोडी तडजोड ठेवली की सगळं आपसूक जमतं

#Numerology: या अंकाच्या जोडप्यांनी थोडी तडजोड ठेवली की सगळं आपसूक जमतं

अंकशास्त्र

अंकशास्त्र

या अंकांच्या पती आणि पत्नी अशा दोघांनाही वर्चस्व राखणं आवडतं, म्हणून त्यांना तडजोड करणं प्रत्येक वेळी कठीण जातं. त्यामुळे हे क्रमांक असलेल्या जोडप्यांनी वैवाहिक जीवनात तडजोड केली तर त्यांची गणना प्रतिष्ठित जोडप्यांमध्ये होऊ शकते.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

क्रमांक 5 हा क्रमांक 1 आणि क्रमांक 2शी किती सुसंगत आहे?

क्रमांक 1 : क्रमांक 5 आणि क्रमांक 1 असलेल्या व्यक्ती तितक्याच प्रतिभावान आणि यशस्वी असल्याने त्या सहसा एकत्र काम करायला तयार होत नाहीत. परंतु, 1 हा क्रमांक 5 क्रमांक असलेल्यांसाठी अत्यंत लकी ठरत असल्याने अशा व्यक्ती एकमेकांच्या सहवासात राहून आकाशाला गवसणी घालू शकतात. हे क्रमांक असलेल्या विवाहित जोडप्यांमधल्या संघर्षाचं सर्वांत मोठं कारण म्हणजे एक प्रकारचं वर्चस्व होय. हे कारण वैवाहिक जीवनात मुख्य भूमिका बजावतं. पती आणि पत्नी अशा दोघांनाही वर्चस्व राखणं आवडतं म्हणून त्यांना तडजोड करणं प्रत्येक वेळी कठीण जातं. त्यामुळे हे क्रमांक असलेल्या जोडप्यांनी वैवाहिक जीवनात तडजोड केली तर त्यांची गणना प्रतिष्ठित जोडप्यांमध्ये होऊ शकते. क्रमांक 5 आणि क्रमांक 1 असलेल्या व्यावसायिक भागीदारांना त्यांच्या व्यवसायात अनेक चढ-उतार पाहावे लागतात आणि या व्यक्ती नेतृत्व करतात. या क्रमांकाच्या व्यक्ती क्रीडा, राजकारण, ट्रॅव्हल एजन्सी, ऑटोमोबाइल, आयटी, सौर ऊर्जा, बांधकाम, जाहिरात, ज्वेलरी, परकीय कमोडिटीज, अभिनय या क्षेत्रांमध्ये चांगली प्रसिद्धी आणि यश मिळवू शकतात.

शुभ रंग - Aqua & Teal

शुभ दिवस - बुधवार आणि रविवार शुभांक - 1

दान - आश्रमात गहू दान करावेत. सूर्याला अर्घ्य द्यावं.

क्रमांक 2 : क्रमांक 2 हा सहकार आणि संतुलनाचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे क्रमांक 5च्या धाडसी आणि तर्कसंगत व्यक्तिमत्त्वाचा सामना करणं क्रमांक दोनला कठीण जातं. साधारणपणे क्रमांक 2चा प्रभाव असलेल्या व्यक्ती क्रमांक 5 असलेल्या व्यक्तींच्या सॉफ्ट टार्गेट बनतात, असं आढळून आलं आहे. क्रमांक 5 असलेल्या व्यक्तींना विविधता, बदल, स्वातंत्र्य, वेग आणि जोखीम आवडते आणि ते स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी क्रमांक 2 असलेल्या व्यक्तींचा वापर करतात.

हे वाचा - मिठाचे हे उपाय नकारात्मकतेला काढतात उंबरठ्याबाहेर; घर राहतं हसतं-खेळतं

क्रमांक 2 असलेल्या व्यक्ती भावनाप्रधान आणि व्यावहारिक विचारांपासून दूर असतात. त्यामुळे या व्यक्ती बऱ्याचदा एखाद्या जाळ्यात अलगद अडकतात. क्रमांक 5 असलेल्या व्यक्तींच्या कृतीमुळे क्रमांक 2 असलेल्या व्यक्ती दुखावल्या जातात. क्रमांक 2 आणि क्रमांक 5च्या व्यक्तींनी दूर राहून एकत्र काम केल्यास त्यांना नशिबाची साथ मिळू शकते. पण जीवनात पूर्णपणे मानसिक स्थिरता आणि आनंद मिळू शकत नाही.

शुभ रंग - Aqua

शुभ दिवस - बुधवार

दान - गायींना पाणी किंवा दूध द्यावं.

First published:

Tags: Numerology, Rashibhavishya