मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /हे 4 जन्मअंक असणाऱ्यांचे आज अडकलेले पैसे मिळतील; अचानक धनलाभ होण्याची शक्यता

हे 4 जन्मअंक असणाऱ्यांचे आज अडकलेले पैसे मिळतील; अचानक धनलाभ होण्याची शक्यता

अंकशास्त्रानुसार राशीभविष्य

अंकशास्त्रानुसार राशीभविष्य

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 9 फेब्रुवारी 2023 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

#नंबर 1: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी पिवळ्या किंवा केशरी रंगाचे कपडे घालणं फायद्याचं ठरेल. तुमच्या संवाद कौशल्यामुळे इतरांवर छाप पडेल. जुन्या बिझनेस ऑर्डरचं पेमेंट मिळेल, मात्र नव्या ऑर्डर धीम्यागतीने येतील. कपल्स भावनिकरित्या एकत्र राहतील, मात्र एकमेकांसोबत वेळ व्यतीत करणं अवघड जाईल. सरकारी अधिकारी, डॉक्टर, संगीतकार, पेंटर आणि शेफ असणाऱ्या व्यक्तींना भरपूर फायदा होईल. तुमचा निर्णय आज अंतिम आणि सर्वांना मान्य असेल, त्यामुळे आपल्या निर्णयावर किंवा मतांवर ठाम रहा.

शुभ रंग : Orange

शुभ दिवस : रविवार आणि मंगळवार

शुभ अंक : 1 आणि 9

दान : कृपया भिक्षेकऱ्यांना किंवा प्राण्यांना खारवलेले पदार्थ दान करा.

#नंबर 2: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये सुधारणा करण्यासाठी घरात चांदीच्या हंसांची जोडी ठेवणं फायद्याचं ठरेल. कोणताही मोठा निर्णय घेताना तुमच्या मनाचं ऐकणं योग्य ठरेल. तुम्ही अगदी निरागस व्यक्ती आहात, त्यामुळे लवकर दुखावले जाण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये रोमान्स आणि समाधान वाढेल, मात्र आंधळा विश्वास ठेवणं टाळा. एक्सपोर्ट बिझनेस डील्स फायद्याच्या ठरतील.

शुभ रंग : Pink & Sky Blue

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 2

दान : कृपया आज भिक्षेकऱ्यांना तेल दान करा.

#नंबर 3: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या कामाच्या ठिकाणी पूर्व दिशेला असणाऱ्या भिंतीवर जंगल-झाडी असलेल्या डोंगरांचं चित्र लावा. आपले शिक्षक आणि वयोवृद्ध व्यक्ती यांचा आदर करा. तुमच्या मेहनतीचे फळ मिळवण्याची वेळ आता आली आहे. भरपूर प्रसिद्धी आणि यश तुमच्या दारात आहे, मात्र त्यासाठी तुमच्या गुरूचे आभार मानायला विसरू नका. राजकारणी आणि वकील असलेल्या व्यक्तींसाठी अगदी भाग्याचा दिवस. खरेदी करणं, प्रवेश घेणं, वाहन किंवा घर खरेदी, कपडे खरेदी करणं, सुशोभीकरण अशा गोष्टींसाठी अगदी चांगला दिवस. डिझायनर, हॉटेल व्यावसायिक, निवेदक, प्रशिक्षक, फायनान्सर आणि संगीतकार असणाऱ्या व्यक्तींना विशेष यश मिळेल.

शुभ रंग : Red

शुभ दिवस : गुरूवार

शुभ अंक : 3 आणि 9

दान : कृपया मंदिरात चंदन दान करा.

#नंबर 4: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुळशीमाळ परिधान केल्याने फायदा होईल. आज अगदी कडक शिस्तीचा आणि मेहनतीचा दिवस आहे. अर्थात, मनापासून प्रयत्न केल्यास चांगला नफा मिळेल. वैयक्तिक ओळखींच्या वापराने कामं करून घेण्यासाठी अगदी योग्य दिवस. नाट्य कलाकार, अभिनेते, निवेदक आणि डान्सर असणाऱ्या व्यक्तींनी आज आवर्जून ऑडिशनला उपस्थित रहावं. धातू उत्पादक, बिल्डर, वितरक, इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेसमन, आयटी कर्मचारी, कापड व्यापारी असलेल्या व्यक्तींना मोठा नफा होईल. आज कृपया हिरव्या पालेभाज्या खा.

शुभ रंग : Teal and Purple

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : कृपया लहान मुलांना रोपं दान करा.

#नंबर 5: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

कृपया ऑफिसमध्ये किंवा घरी एखादा गुलाबी रंगाचा स्फटिक ठेवा. ट्रॅव्हल, शेअर मार्केट, खेळ, रिटेल आणि एक्सपोर्ट-इम्पोर्ट व्यवसायात केलेली गुंतवणूक चांगला परतावा देईल. आर्थिक प्रगती होईल. तुमचा जोडीदार तुमचा भरपूर आदर करतो, अर्थात तुम्हाला त्याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. राजकारण, बांधकाम, अभिनय, शेअर मार्केट, एक्स्पोर्ट व्यवसाय, इव्हेंट, स्पर्धा परीक्षा आणि मुलाखत अशा गोष्टींमध्ये आज नशीब आजमावू शकता.

शुभ रंग : Green and Orange

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : कृपया गरिबांना ब्राउन राईस दान करा.

# नंबर 6: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

सकाळी तुळशीचं पान जिभेवर ठेऊन दिवसाची सुरूवात करा. आजचा दिवस अगदी ऐशोआरामाचा आहे. आयुष्यात पूर्णत्वाची जाणीव आणि समाधान याचा अनुभव आज होईल. जोडीदारासोबत असलेले वाद मिटवून एकत्र शॉपिंगला जाण्यासाठी उत्तम दिवस. डिझायनर, इव्हेंट मॅनेजर, ब्रोकर, शेफ आणि विद्यार्थ्यांना नवीन काम मिळेल, ज्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये वृद्धी होईल. नातेसंबधांमुळे आनंदी असाल.

शुभ रंग : Violet

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : कृपया पांढरा रुमाल दान करा.

#नंबर 7: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

सोन्याचे दागिने किंवा चामड्याच्या वस्तूंऐवजी चांदीची चेन परिधान करा. आज कुटुंबीय आणि मित्रांचा विशेष आधार आणि मार्गदर्शन मिळेल. वकील, सीए, डिफेन्स अधिकारी, ट्रॅव्हलर, इंजिनीअर आणि बिझनेस टायकून असणाऱ्या व्यक्तींना आज समाजात उच्च स्थान मिळेल. आजचा दिवस अगदी सुरळीत जाईल, त्यामुळे सहकाऱ्यांवर संशय घेणं टाळा. समोर येणारं आव्हान बिनधास्त स्वीकारा, तुमच्या हुशारीने त्यावर मात कराल. कामाच्या ठिकाणी विरुद्धलिंगी व्यक्तीने दिलेला सल्ला खुल्या मनाने स्वीकारा. वकील, नाट्य कलाकार, सीए, सॉफ्टवेअर कर्मचारी यांच्यासाठी विशेष भाग्याचा दिवस.

शुभ रंग : Yellow and Aqua

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 7 आणि 9

दान : कृपया भटक्या जनावरांना अन्न दान करा.

#नंबर 8: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला पाण्याने भरलेला घडा ठेवा. अतिमहत्त्वाकांक्षीपणा टाळा, कारण त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि आरोग्यावर होतो आहे. कायदेशीर प्रकरणं लागण्यासाठी पैशांचा वापर करावा लागेल. उत्पादक, आयटी कर्मचारी, सरकारी अधिकारी, ब्रोकर, ज्वेलर्स, डॉक्टर आणि पब्लिक स्पीकर असणाऱ्या व्यक्तींना मोठे यश मिळेल. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे डोकं थंड ठेवा. आज धान्य दान करणं आणि लिंबूवर्गीय पदार्थ खाणं गरजेचं आहे.

शुभ रंग : Deep Purple

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : कृपया गरजूंना चपला दान करा.

हे वाचा - कुंडलीतील कमजोर ग्रहांमुळे हे आजार लागतील मागे; पहा ग्रहानुसार होणारे आजार

#नंबर 9: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

घराच्या दक्षिण दिशेला असलेल्या भिंतीवर लाल रंगाचा दिवा लावा. मंगळवारी न चुकता हनुमानाची पूजा करा. व्यवसायात तुम्ही आणि तुमचे पार्टनर अशा दोघांनाही भरपूर नफा होईल. आजचा दिवस भरपूर नाव आणि प्रसिद्धी कमावण्याचा आहे. तुमच्याकडे पाहून इतरांना भरपूर प्रेरणा मिळेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना आपल्या भावना लेखी स्वरूपात व्यक्त करण्यासाठी उत्तम दिवस. ग्लॅमर आणि मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिद्धी मिळेल. राजकारणी व्यक्तींना आपल्या करिअरमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. प्रशिक्षक, बेकरी व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, स्टॉक ब्रोकर्स, डिझायनर, डॉक्टर, वकील, इंजिनीअर आणि अभिनेते यांना भरपूर प्रसिद्धी मिळेल.

शुभ रंग : Red

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : कृपया एखाद्या महिलेला लाल रंगाच्या बांगड्या दान करा.

9 फेब्रुवारी रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज: अमृतासिंग, हंसूर कृष्णमूर्ती, राहुल रॉय, समंथा, निकेश अरोरा, परिमार्जन नेगी.

First published:

Tags: Numerology, Religion