मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : कशा असतात नंबर 1 च्या व्यक्ती? 'हे' असतात विशेष गुण

Numerology : कशा असतात नंबर 1 च्या व्यक्ती? 'हे' असतात विशेष गुण

Numerology : कशा असतात नंबर 1 च्या व्यक्ती? 'हे' असतात विशेष गुण

Numerology : कशा असतात नंबर 1 च्या व्यक्ती? 'हे' असतात विशेष गुण

एक हा अंक कामाचा ताण वाढण्याचे संकेत देतो. कारण हा अंक एक्स्प्रेशन्स, कम्युनिकेशन, इगो, स्वतंत्रता यांचा निदर्शक आहे आणि संवादाची क्षमता देतो. हा नंबर आशा तयार करतो आणि जीवनात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

#Number 1 :

एक हा अंक कामाचा ताण वाढण्याचे संकेत देतो. कारण हा अंक एक्स्प्रेशन्स, कम्युनिकेशन, इगो, स्वतंत्रता यांचा निदर्शक आहे आणि संवादाची क्षमता देतो. हा नंबर आशा तयार करतो आणि जीवनात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतो. आत्मविश्वासाने तुम्ही पुढे जाता, तेव्हा कामाच्या ठिकाणी नाव आणि प्रसिद्धी आपसूक मिळतेच.

जेव्हा 1 हा अंक मोबाइल सीरिजमध्ये (मोबाइल नंबर) एकदा येतो, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो, की त्या व्यक्तीची सर्वसाधारण समज नेमकी आहे; मात्र ती व्यक्ती कमी बोलते किंवा खरंच गरज असते, तेव्हाच बोलते. त्यामुळे अशा व्यक्ती विशिष्ट कामांमध्ये यशस्वी होतात; मात्र व्यक्त होण्यास अक्षम असल्याने खूप यशस्वी होत नाहीत.

जेव्हा 1 हा अंक मोबाइल सीरिजमध्ये दोनदा येतो, तेव्हा तो मोबाइल नंबर ज्या व्यक्तीचा असतो ती व्यक्ती प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यात चांगलं संतुलन साधणारी असते. त्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी असतो. ती व्यक्ती समोरच्याचं संयमाने ऐकून घेणारी असते.

जेव्हा 1 हा अंक मोबाइल नंबरमध्ये तीनपेक्षा जास्त वेळा येतो, तेव्हा ती व्यक्ती एनर्जेटिक, हॅपी गो लकी असते. अशी व्यक्ती खूप बोलणारी असते, मनोरंजन करणारी असते. अशा व्यक्ती एकट्याने किंवा स्वतंत्रपणे काम करतात, तेव्हा यशस्वी होतात.

जेव्हा 1 हा अंक मोबाइल नंबरमध्ये 4, 5 किंवा 6 वेळा येतो, तेव्हा या व्यक्ती अति महत्त्वाकांक्षी, अति बोलणाऱ्या असतात आणि त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे 1 हा आकडा अनेक वेळा असलेले मोबाइल नंबर्स टाळलेच पाहिजेत.

जेव्हा मोबाइल नंबरमध्ये 1 हा अंक एकदाही नसतो, तेव्हा अशी व्यक्ती उदासीन बनते, भावनांना प्रतिसाद देत नाही. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यावर परिणाम होतो. अशा व्यक्तींची नकारात्मकता आणि दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची वृत्ती वाढते.

मोबाइल नंबरमधल्या सर्व अंकांची बेरीज 1 असली, तर असा मोबाइल नंबर संबंधित व्यक्तीला बिझनेस सफिशियंट आणि संबंधित क्षेत्रात सर्वोत्तम बनवतो. असा मोबाइल नंबर संबंधित व्यक्तीची पर्सनॅलिटी सुधारतो आणि त्याला यश देतो. अशी व्यक्ती नवे शोध लावणारी, खूप संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवणारी असते. तसंच ही व्यक्ती स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास सक्षम असते.

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya