मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Mobile Numerology : मोबाईल नंबरमधील या आकड्याचा आरोग्याशी खास संबंध; नसेल तर अनेक आजारांना आमंत्रण

Mobile Numerology : मोबाईल नंबरमधील या आकड्याचा आरोग्याशी खास संबंध; नसेल तर अनेक आजारांना आमंत्रण

मोबाईल अंकशास्त्र (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)

मोबाईल अंकशास्त्र (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)

अंकशास्त्रानुसार मोबाईल नंबरही बरंच काही सांगतो. मोबाईल नंबरमध्ये एखादा आकडा नसणं याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

सात हा अंक अध्यात्माकडे एक पाऊल टाकतो. 7 ही संपूर्ण संख्या आहे. आठवड्यात 7 दिवस असतात. इंद्रधनुष्यात 7 रंग असतात आणि सप्तर्षींमध्ये सात तारे असतात. 7 अंक असलेल्या व्यक्तींना स्वतःची ओळख असते. त्या व्यक्ती धार्मिक असतात. त्यांचं व्यक्तिमत्त्व आकर्षक असतं. त्यांच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींवर त्यांचा कायम प्रभाव पडतो. या व्यक्ती मदत करणाऱ्या, संयमी आणि त्याग करणाऱ्या असतात.

जेव्हा 7 हा अंक मोबाइल सीरिजमध्ये (मोबाइल नंबर) एकदा येतो, तेव्हा तो नंबर असलेल्या व्यक्ती आयुष्यात तोटा झाल्यानंतर, निराशा झाल्यानंतर, धक्का बसल्यानंतर बरंच काही शिकतात. एवढं होऊनही या व्यक्ती शांत असतात आणि आयुष्यात प्रगल्भता दाखवतात. आयुष्य आहे तसं जगावं असा त्यांचा दृष्टिकोन असतो.

जेव्हा 7 हा अंक मोबाइल नंबरमध्ये दोनदा येतो, तेव्हा तो मोबाइल नंबर ज्या व्यक्तीचा असतो अशा व्यक्ती प्रेम, आरोग्य आणि पैसा गमावल्यानंतरही ज्ञान आणि बुद्धिमत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहतात. त्या व्यक्ती देवाला घाबरणाऱ्या आणि आध्यात्मिक बनतात. अशा व्यक्तींना इतरांकडून फसवणुकीला तोंड द्यावं लागतं. अशा व्यक्ती दुसऱ्यांना तारण म्हणून उभ्या राहतात. या व्यक्ती खूप विश्लेषण करतात आणि समस्या सोडवतात.

जेव्हा 7 हा अंक मोबाइल नंबरमध्ये तीन वेळा येतो, तेव्हा असा नंबर असलेल्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात कष्ट करावे लागतात. बहुतांश वेळा त्यांना आपल्या माणसांकडूनच घात सहन करावा लागतो. पैसा आणि आरोग्य यांमुळे या व्यक्ती कायम चिंतेत असतात. आयुष्यात अनेक समस्यांना तोंड दिल्यानंतर त्यांच्याकडे एक प्रकारची क्षमता तयार होते. या व्यक्ती वेदना आणि दुःखात राहतात. या व्यक्तींच्या वैवाहिक आयुष्यात समस्या असतात. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही समस्या वाढू शकतात.

जेव्हा 7 हा अंक मोबाइल नंबरमध्ये 4 किंवा जास्त वेळा येतो, तेव्हा असा मोबाइल नंबर असलेल्या व्यक्तींची परिस्थिती खूप अवघड बनते. या व्यक्तींच्या आरोग्यविषयक समस्या वाढतात. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यावर परिणाम होतो. संकटं आल्यामुळे त्यामध्ये संतुलन साधणं त्यांना जवळपास अशक्यच बनतं. त्यांना अनेक त्याग करावे लागतात. या व्यक्ती खूप ज्ञान प्राप्त करतात आणि खूप अनुभवी बनतात आणि चांगल्या वक्त्या बनतात. या व्यक्तींना गूढशास्त्रात रस असतो.

जेव्हा मोबाइल नंबरमध्ये 7 हा अंक एकदाही नसतो, तेव्हा अशा व्यक्तींना मनःशांती मिळत नाही. या व्यक्तींना कायम मानसिक ताणतणावाला सामोरं जावं लागतं. या व्यक्ती नास्तिक बनतात. या व्यक्तींना आरोग्यविषयक समस्या जाणवतात. खासकरून मूत्रपिंडाशी निगडित समस्या त्यांना उद्भवतात. या व्यक्तींना डायबेटीस आणि मूत्रविकार असू शकतात. सात हा अंक मोबाइल नंबरमध्ये असणं किती महत्त्वाचं आहे, हे यावरून कळतं. हा अंक नसेल, तर आयुष्याची गती संथ असते. या व्यक्ती आपल्या समस्या इतरांशी शेअर करत नाहीत.

मोबाइल नंबरमधल्या सर्व अंकांची बेरीज 7 असेल, तर असा मोबाइल नंबर असलेल्या व्यक्तींना सावध राहावं लागतं. त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे त्यांना शिकायला प्रोत्साहन मिळतं आणि इतरांना शिकवण्याचंसुद्धा. या व्यक्ती आध्यात्मिकतेकडे वळतात. त्यांचा देवावरचा विश्वास वाढतो. नव्या तंत्रज्ञानात त्यांचा रस वाढतो. तसंच त्यांना परदेशातल्या कामात यश मिळतं. या व्यक्तींना दैनंदिन जीवनात अनिश्चिततेला सामोरं जावं लागतं.

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya