ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 28 नोव्हेंबर 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
सूर्यदेवाचे आशीर्वाद घ्या आणि चांगलं आउटपुट मिळण्यासाठी लाल रंगाचे कपडे घाला. तुम्ही अन्य ग्रुप्ससोबत जोडलं जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसंच, आज टीमचं नेतृत्व करणं, भाषण करणं, कौटुंबिक सोहळ्याला उपस्थित राहणं, इंटरव्ह्यूला उपस्थित राहणं, खास मित्राकडे/मैत्रिणीकडे प्रेम व्यक्त करणं आदींसाठी आजचा दिवस चांगला आहे. आरोग्य चांगलं राहण्यासाठी दुपारच्या जेवणात पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा समावेश करा. खेळाडूंना सांघिक खेळात जास्त यश मिळेल. सूर्यदेवाला पाणी अर्पण करा.
शुभ रंग : Biege & Orange
शुभ दिवस : रविवार
शुभ अंक : 1
दान : गरिबांना पिवळी फळं दान करावीत.
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
प्रेमसंबंधांतल्या समस्या जवळपास संपुष्टात येणार आहेत. आज कामात मॅनिप्युलेशन्स आणि डिप्लोमसीची गरज आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना चंद्राच्या कला लक्षात घ्या. भगवान शिवशंकर आणि चंद्र ग्रहाचे आशीर्वाद घ्या. लिक्विड्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, औषधं, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट, सौर ऊर्जा, कृषी, रसायनं आदी क्षेत्रांत व्यवहार करत असलात, तर आज तुम्हाला नफा मिळण्याच्या दृष्टीने खास घोषणा होण्याची शक्यता आहे.
शुभ रंग : Creme
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 2
दान : भिकाऱ्यांना पांढरा भात दान करा.
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज नवं पद स्वीकारणाचा दिवस आहे. तुम्ही राजकीय नेते, खेळातले कॅप्टन, प्रशिक्षक, शिक्षक, फायनान्सर्स असलात, तर आज दीर्घकाळ टिकणाऱ्या यशाची चव चाखता येईल; पण आजच्या दिवसाची सुरुवात करताना तुमचे गुरू आणि आई यांचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी यशाचा आहे. तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल; मात्र तुमच्या मेंटॉरला धन्यवाद द्यायला विसरू नका. आजचा दिवस इम्प्रेसिव्ह अचीव्हमेंट्समधून तुमच्या जोडीदाराला इम्प्रेस करण्याचा आहे. खेळाडूंना जुन्या प्रशिक्षकाच्या मदतीने यश मिळेल. सरकारी अधिकारी, कलाकार, क्रीडापटू, वितरक आणि शिक्षणतज्ज्ञांची प्रगती होईल. महिलांनी आज पिवळ्या रंगाचे पदार्थ तयार करावेत आणि साऱ्या कुटुंबाला खाऊ घालावेत. त्यामुळे गुरू ग्रहाची ताकद वाढेल.
शुभ रंग : Orange
शुभ दिवस : गुरुवार
शुभ अंक : 3, 1
दान : मंदिरात चंदनाचं खोड दान करावं.
#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज आनंद आणि शांतता प्राप्त करण्यासाठी तुमचे पाळीव प्राणी किंवा अन्य प्राण्यांसोबत काही वेळ व्यतीत करा. आर्थिक व्यवहार आणि नव्या संधी या दोन्हींची पडताळणी करण्याची आज गरज आहे. फायनान्सेसमधल्या उत्तम व्यवस्थापनाचा आजचा दिवस आहे. आज केलेली आर्थिक गुंतवणूक गुप्त ठेवावी. आजचा बराच वेळ कागदपत्रांचा आढावा घेण्यात घालवावा. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट, रेस्तराँ, स्टॉक्स, ज्वेलरी, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल आदी क्षेत्रांत व्यवहार करत असलात, तर केवळ आपल्या मनाचं ऐका, सावध राहा. रिलेशनशिप्सना आज भावनिक वळण मिळण्याची शक्यता आहे. कोणी तरी दुखावलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संवाद साधताना काळजी घ्या
शुभ रंग : Brown
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 9
दान : मुलांना हिरवी द्राक्षं दान करावीत.
#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
स्वातंत्र्याचा अति वापर टाळून तुमच्या वेगवान भावनांना आवर घाला. तुमच्या उधळ्या स्वभावाला वेसण घाला आणि भविष्यासाठी बचत करा. मित्र, नातेवाईक यांच्याबाबतीत उदार आणि भावनिक राहा. क्रीडा, ग्लॅमर, बांधकाम, मीडिया, फॉरीन कमॉडिटीज आदी क्षेत्रांतल्या व्यक्तींना स्पेशल अप्रैझल मिळेल. Aqua रंगाचे कपडे घातल्यास आज नशीब साथ देईल. आज मद्यपान आणि मांसाहार टाळा. प्रॉपर्टीतल्या गुंतवणुकीतून समाधानकारक परतावा मिळेल.
शुभ रंग : Aqua
शुभ दिवस : बुधवार
शुभ अंक : 5
दान : अनाथाश्रमात दूध दान करावं.
#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
लक्ष्मीमातेचं पूजन करणं आणि तिचे आशीर्वाद घेणं आयुष्यभर उपयोगी पडतं. आई-वडील सेलिब्रेशनचा आनंद घेतील. कारण त्यांच्या मुलांनी अभिमान वाटण्यासारखी कामगिरी केली असेल. कपल्समध्ये मतभेद असतील. मीटिंग्ज, डीलिंग्ज, होस्टिंग, मार्केटिंग आणि ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देण्यासाठी योग्य काळ. हीलिंग, इंटरव्ह्यूला जाण्यासाठी, तसंच कपडे, ज्वेलरी, वाहनं, मोबाइल, घर आदींच्या खरेदीसाठी किंवा छोट्या ट्रिपचं आयोजन करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज फिकट रंगाचे कपडे परिधान करा.
शुभ रंग : Peach day white
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6
दान : मंदिरात साखर दान करावी.
#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
सौर ऊर्जा, लिक्विड्स या क्षेत्रातल्या व्यक्तींना आज उत्तम परतावा मिळेल. आज आंघोळीपूर्वी पाण्यात मीठ घाला. आज वैयक्तिक आयुष्यात चढ-उतार असतील. शहाणपण वापरायला हवं. नवी संधी स्वीकारण्यासाठी तुमचं मन खुलं करा, खासकरून ती छोट्या ब्रँडकडून असेल तर... मॅन्युफॅक्चरिंग, मशिनरी, सोनं, शिक्षण, सॉफ्टवेअर आदी क्षेत्रांतली बिझनेस डील्स खूप यशस्वी ठरतील. विवाहाचे प्रस्ताव आज प्रलंबित ठेवावेत. भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन पूजाविधी केल्यास समृद्धीसाठी आशीर्वाद मिळतील.
शुभ रंग : Yellow
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 7
दान : गायींना केळी खाऊ घालावीत.
#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
शक्ती, कुटुंबाचं गुडविल, ज्ञान, पैसे आदींचा वापर आज अशा ठिकाणी करा, जिथे तुम्हाला उत्तम आउटपुटची गरज असेल. प्रभावशाली व्यक्तींची शक्ती किंवा पैसा यांच्या साह्याने लीगल केसेस सोडवल्या जातील. आज बिझनेस डील्स क्रॅक करण्यासाठी नेटवर्किंग महत्त्वाची भूमिका निभावेल. तुमच्या जोडीदाराला तुमच्या वेळाची गरज आहे. त्यामुळे तुमच्या व्यग्र वेळापत्रकाचं योग्य व्यवस्थापन करा. विद्यार्थ्यांनी आपल्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी समर्पण भावनेने काम करावं. कारण आता ते जवळ आलं आहे. तुमच्याकडे शहाणपण आहे. त्यामुळे तुमचे सगळे निर्णय योग्य ठरतील. खेळाडू उत्तुंग यश साध्य करतील. आज प्राण्यांसाठी दानधर्म करणं गरजेचंच आहे.
शुभ रंग : Sea Green
शुभ दिवस : शनिवार
शुभ अंक : 6
दान : गायी-गुरांना पालक खाऊ घाला.
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आयटी प्रोफेशनल्स, शिक्षक, बिल्डर्स, डॉक्टर्स, फार्मासिस्ट्स, न्यूज अँकर्स, अभिनेते आदींची जुन्या सोर्समधूनच एखाद्या नव्या व्यक्तीशी भेट होईल. कपल्सना बाहेर जाण्यासाठी आणि विश्वास वाढवण्यासाठी चांगला दिवस. सरकारी टेंडर्स, प्रॉपर्टी डील्स, डिफेन्स कोर्स, मेडिकल कोर्सेस फायदेशीर ठरतील. ग्लॅमर, सॉफ्टवेअर, ऑकल्ट सायन्स, संगीत, माध्यम किंवा शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तींना लोकप्रियता मिळेल. तरुण राजकीय नेते आणि तरुण कलाकारांना आज नव्या पदाची ऑफर येईल. संगीतकारांच्या पालकांना आज त्यांच्या मुलांचा अभिमान वाटेल.
शुभ रंग : Brown
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 9
दान : गरिबांना कलिंगडं दान करावीत.
28 नोव्हेंबर रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : यामी गौतम, प्रतीक बब्बर, ईशा गुप्ता, वहाबीज दोराबजी, सय्यद अहमद बरेलावी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.