मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : आज कुणीच तुमच्यापासून यश हिरावू शकत नाही; 'या' क्षेत्रातील व्यक्तींना नशीबाचीही साथ

Numerology : आज कुणीच तुमच्यापासून यश हिरावू शकत नाही; 'या' क्षेत्रातील व्यक्तींना नशीबाचीही साथ

22 नोव्हेंबर 2022 रोजीचं अंकशास्त्र.

22 नोव्हेंबर 2022 रोजीचं अंकशास्त्र.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. 22 नोव्हेंबर, 2022 रोजीचं भविष्य.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 22 नोव्हेंबर 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

उद्दिष्टपूर्तीसाठी कष्ट करा. कारण तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जावं लागेल. मार्केटिंग प्लॅन आणि बजेट तयार करण्यासाठी चांगला दिवस. मालमत्तेची विक्री करून पैसे कमावण्यासाठी चांगला दिवस. टूल्स, मशीन, फर्निचर, पुस्तकं, औषध, ग्लॅमर, बांधकाम साहित्य, ट्रॅव्हल एजन्सी अशा व्यवसायांतल्या व्यक्तींना आर्थिक फायदा संभवतो. राजकीय व्यक्तींना डिस्प्युटेड रिझल्ट्ससह लोकप्रियता मिळेल. लहान मुलांचं शिक्षकांकडून वा प्रशिक्षकांकडून कौतुक होईल.

शुभ रंग : Blue & Violet

शुभ दिवस : रविवार

शुभ अंक : 1

दान : आश्रमात गहू दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज प्रवास करताना सामानाची काळजी घ्या. आजचा दिवस तडजोड करण्याचा आहे. बऱ्याच ठिकाणी नमतं घ्यावं लागेल. लोक तुमच्या इच्छा-आकांक्षा दाबण्याचा प्रयत्न करतील. लीगल कमिटमेंट्स सहज पूर्ण होतील. एखादी व्यक्ती तुमच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवू शकते. याबाबतही खबरदारी बाळगा. महिलांनी जोडीदाराच्या सावध स्वभावाकडे दुर्लक्ष करावं. आज सरकारी काँट्रॅक्ट मिळवण्यासाठी जुन्या ओळखींची मदत घ्या. ट्रान्सपोर्ट आणि ट्रॅव्हल व्यावसायिकांना नव्या ऑफर मिळतील.

शुभ रंग : Sky Blue

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 6

दान : मंदिरांमध्ये पांढरी मिठाई दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

मित्र आणि सहकाऱ्यांसोबतचे नातेसंबंध तणावपूर्ण राहतील. तुम्हाला जे बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोलल्यास गोंधळ टळेल. गुरू आणि वडिलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेण्यासाठी चांगला दिवस. पब्लिक फिगर्स भाषणातून प्रभाव पाडू शकतील. संगीतकार, लेखक, राजकीय नेते, उत्पादक, डॉक्टर आणि मीडिया क्षेत्रातल्या व्यक्तींनी आज घेतलेल्या निर्णयांना उशीर होईल. आज केलेली गुंतवणूक भविष्यात उत्तम परतावा देईल. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी मनातल्या भावना बोलून दाखवाव्यात. सरकारी अधिकाऱ्यांनी आजूबाजूच्या वातावरणाबाबत सावध राहावं. आज तुमच्या गुरूच्या नामाचा जप करणं गरजेचं आहे. तसंच, दिवसाच्या सुरुवातीला कपाळावर चंदनाचा टिळा लावणं उत्तम.

शुभ रंग : Orange and Blue

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3 आणि 1

दान : महिला मदतनीसाला केशर दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज परफॉर्मन्सवर आधारित दिवस आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक कमाई कराल. आळशीपणा टाळल्यास तुम्ही हवं ते मिळवू शकाल. उत्पादक आणि शेतकऱ्यांनी नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याचा निर्णय थांबवावा. मीडिया, मार्केटिंग, मनोरंजन या क्षेत्रांमधल्या व्यक्ती आणि सर्जन, राजकीय व्यक्तींसाठी आज प्रवास फायद्याचा ठरेल. मेडिकल, सॉफ्टवेअर, हस्तकला, मेटल या क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. विद्यार्थ्यांना ध्येयप्राप्तीसाठी आपल्या धोरणावर भरपूर मेहनत घ्यावी लागेल. मार्केटिंग क्षेत्रातल्या व्यक्तींनी आज घरून काम करणं टाळावं. मांसाहार टाळा आणि मेडिटेशन करा.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 9

दान : भिकाऱ्यांना लिंबूवर्गीय फळं दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुमची सद्सद्विवेकबुद्धी तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करील. वैयक्तिक आयुष्यात वातावरण रोमँटिक राहील, कमिटमेंट कराल. तुमच्या कामाची दखल घेतली जाण्याचा आणि लाभ मिळण्याचा दिवस आहे. आज सोशलायझिंग टाळून कामावर लक्ष केंद्रित करा. निवेदक, ट्रॅव्हल एजंट, ब्रोकर, प्रॉपर्टी डीलर, बँकर्स, खेळाडू आणि राजकीय नेते या व्यक्तींचं नशीब आज जोरावर असेल. सेल्स आणि खेळातल्या व्यक्तींची कामं आज जलद गतीने होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.

शुभ रंग : Aqua

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : गरिबांना हिरवी केळी दान करा.

#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

घरगुती जबाबदाऱ्यांपेक्षा सध्या तुमच्याकडे जो पर्याय आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. अन्यथा करिअरशी तडजोड होईल. तुमची कौशल्यं आणि प्रोफाइल अपग्रेड करण्यासाठी उत्तम दिवस. दखल घेतली जाण्याची वाट पाहत असाल, तर आणखी थोडं थांबावं लागणार आहे. नवीन घर किंवा नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना आज निवडीसाठी काही चांगले पर्याय उपलब्ध होतील. अभिनेते, गृहिणी, डॉक्टर, वकील आणि मीडिया क्षेत्रातल्या व्यक्तींना मोठं यश मिळेल. आज कामासाठी प्रवास टाळा. घरून काम करा.

शुभ रंग : Teal

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : गरिबांना कपडे दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

भविष्यातल्या विकासासाठी एखादा नवीन कोर्स किंवा क्लासकरिता गुंतवणूक करण्याचा दिवस. सरकारी अधिकारी, तरुण राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, डिफेन्स अधिकारी, वकील, वैज्ञानिक, शेतकरी, वितरक आणि सीए या व्यक्ती करिअरमध्ये मोठी झेप घेतील. खेळ आणि शिक्षण क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आईचा आशीर्वाद मिळेल. नातेसंबंधांमध्ये बरेच चढ-उतार येऊ शकता. त्यामुळे मोठ्या चर्चा टाळल्यास उत्तम. गुरुमंत्राचा जप करणं फायद्याचं राहील. आज प्रामाणिक राहिलात, तर सर्व क्षेत्रांमध्ये यश मिळवाल. राजकीय व्यक्तींना सभा घेण्यासाठी, तसंच वरिष्ठांवर छाप पाडण्यासाठी उत्तम दिवस. तरुणांना शेअर मार्केटमध्ये फायदा होईल.

शुभ रंग : Yellow

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 7

दान : मंदिरामध्ये सूर्यफुलाचं तेल दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुम्ही शेतजमीन किंवा शेतीत गुंतवणूक करण्याकडे आकर्षित व्हाल; मात्र तो निर्णय थांबावावा असे काळाचे संकेत आहेत. मोठा निर्णय घेताना तुमच्या मनाचा सल्ला ऐका. नक्की फायदा होईल. तुमच्या सोशल नेटवर्किंगचा फायदा आज तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना होईल. उच्च पातळीच्या ज्ञानार्जनात आज अधिक वेळ व्यतीत कराल. अभिनेते आणि डॉक्टर्सचा सेमिनारमध्ये सत्कार होईल. पब्लिक फिगर असणाऱ्या व्यक्तींना दिवसाच्या अखेरीला भरपूर लोकप्रियता मिळेल.

शुभ रंग : Brown & Grey

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : भिकाऱ्यांना लाल फळं दान करा.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

स्टॉक ब्रोकर, ज्वेलर्स, शिक्षणतज्ज्ञ, अभिनेते, गायक, डान्सर, चित्रकार, लेखक, प्रॉपर्टी डीलर्स आणि डॉक्टरांना अत्यंत कठीण दिवसानंतर स्पेशल अप्रैझल मिळेल. विरुद्धलिंगी व्यक्ती त्यांच्यासाठी लकी ठरेल. तसंच, त्यांना बुद्धिमत्ता साह्यकारी ठरेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी आपले शब्द आणि कृती याबाबत सावधगिरी बाळगावी. आजचा दिवस असाइनमेंट्स आणि व्यवहारांचा असेल. अचानक धनलाभ संभवतो. प्रमोशन्स, इंटरव्ह्यू देणं, ऑडिशन्स, सरकारी ऑर्डरसाठी अर्ज करणं आदींसाठी चांगला दिवस. खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी आज डॉक्युमेंटेशनसाठी पुढचं पाऊल उचलावं. अभिनेते, सीए, शिक्षक, खेळाडू आणि मॉडेल्सना नवीन ऑफर मिळेल.

शुभ रंग : Orange

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 6

दान : गरिबांना टोमॅटो दान करा.

22 नोव्हेंबर रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : कार्तिक आर्यन, राजकुमार हिरानी, मुश्ताक मोहम्मद, झलकारी बाई, सरोज खान, मुलायमसिंह यादव

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya