मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology: संवाद कौशल्याची इतरांवर पडेल छाप; जन्मतारखेनुसार सविस्तर पाहा अंकशास्त्र

Numerology: संवाद कौशल्याची इतरांवर पडेल छाप; जन्मतारखेनुसार सविस्तर पाहा अंकशास्त्र

Numerology: संवाद कौशल्याची इतरांवर पडेल छाप; जन्मतारखेनुसार सविस्तर पाहा अंकशास्त्र

Numerology: संवाद कौशल्याची इतरांवर पडेल छाप; जन्मतारखेनुसार सविस्तर पाहा अंकशास्त्र

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. 21 नोव्हेंबर, 2022 रोजीचं भविष्य.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 21 नोव्हेंबर 2022नंतरचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमचा आत्मविश्वास डळमळीत होईल पण यशावर परिणाम होणार नाही. संवाद साधण्यात आणि नेटवर्किंगमध्ये वेळ घालवा. संपूर्ण आठवडा यश मिळवण्यासाठी ज्ञानाचा सर्वात जास्त उपयोग होईल. जोडप्यांना एकत्र राहण्याचा आणि पार्टी करण्याचा आनंद मिळेल. सार्वजनिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमांना तुम्ही जाऊ शकता परंतु मोह टाळा. तुमच्या दिसण्याची आणि संवाद कौशल्याची इतरांवर चांगली छाप पडेल. प्रॉपर्टी डीलर, शास्त्रज्ञ, गायक, ज्वेलर्स, इंटिरिअर डिझायनर, नर्तक, सौर उत्पादनांचे वितरक, लेखक, सरकारी अधिकारी, डॉक्टर आणि मीडिया उद्योगातील व्यक्तींना आर्थिक नफा मिळेल.

शुभ रंग: पिवळा आणि निळा

शुभ दिवस: रविवार आणि सोमवार

शुभ अंक: 1 आणि 3

दान: मंदिरात चंदन दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या मनात खूप भावना साचलेल्या आहेत. त्यामुळे त्या व्यक्त करा आणि रोमँटिक रिलेशनशीपचा आनंद घ्या. तुम्हाला एकटेपणाची भीती वाटेल म्हणून या आठवड्यात लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय किंवा नोकरीत प्रगती अपेक्षित आहे. सोमवारी शंकराला दुधाचा अभिषेक करा. जोडप्यांमध्ये सामंजस्य वाढवण्यासाठी मास्टर बेडरूमच्या वायव्य दिशेला स्फटिकाचा हंस ठेवा. तुम्ही एखादी मालमत्ता विकून नवीन बिझनेस युनिटमध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीनं तुम्ही यशस्वी व्हाल. फेरफटका मारण्यासाठी, कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी, स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खर्च कराल.

शुभ रंग: गुलाबी

शुभ दिवस: सोमवार

शुभ अंक: 2

दान: भिक्षेकऱ्यांना पांढरी साखर दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

घराच्या परिसरात नेहमी हिरवीगार झाडं ठेवावीत किंवा किमान घराच्या पूर्वेला हिरवळ निर्माण करा. तुमच्या योजना आकार घेत आहेत. वैयक्तिक जीवनात अधिक आनंद आणि आधार मिळेल. या आठवड्यात सामाजिक आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. एक्सपोजर आणि ज्ञान वाढवण्यासाठी प्रवास करण्याची वेळ आली आहे. या आठवड्यात तुम्ही करिअर, घर, लग्न किंवा वाहन यापैकी एक पर्याय निवडावा. विद्यार्थी, तंत्रज्ञ, खेळाडू, गायक, प्रशिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि वकील यांच्यासाठी अत्यंत प्रभावी आठवडा आहे. प्रवास करण्यासाठी, दागिन्यांची खरेदी, पुस्तकांची खरेदी, घराची सजावट, धान्य खरेदीसाठी किंवा प्रवासाचं बुकिंग करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. डिझायनर, हॉटेलिअर्स, अँकर, लाईफ अँड स्पोर्ट्स कोच, फायनान्सर्स आणि संगीतकार यांना आज विशेष कामगिरीचा आनंद घेता येईल.

शुभ रंग: नारंगी आणि व्हायलेट

शुभ दिवस: गुरुवार

शुभ अंक: 3 आणि 9

दान: भिक्षेकऱ्यांना हिरव्या भाज्या दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमचा सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यात तुम्ही वेळ घालवला पाहिजे. हा आठवडा बिझनेस डील्स फायनल करण्याचा आणि त्या पूर्ण करण्याचा आहे. एकूणच हा एक प्रभावी आठवडा आहे. त्यामुळे प्रेम व्यक्त करणं असो किंवा व्यवसायात गुंतवणूक असो, सगळ्या निर्णयांमध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला तुमच्या मुलांचा अभिमान वाटेल. स्टॉक आणि व्यावसायिक मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अनुकूल दिवस आहेत. सेल्स कर्मचारी, आयटी कर्मचारी, थिएटर कलाकार किंवा अभिनेते, टीव्ही अँकर आणि डान्सर्सनी मुलाखतीसाठी अर्ज केला पाहिजे. त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. बांधकाम साहित्य, धातू आणि वस्त्रांच्या उत्पादकांना व्यवसायात नवीन ऑफरची मिळण्याची शक्यता आहे.

शुभ रंग: निळा आणि जांभळा

शुभ दिवस: मंगळवार

शुभ अंक: 9

दान: मंदिरात दोन श्रीफळं दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

घरात नेहमी क्वार्ट्ज क्रिस्टल ठेवा. गणपतीची पूजा करून आशीर्वाद घ्या. या आठवड्यात केवळ गुंतवणुकीच्या जोखमीतून बिझनेसमध्ये वाढ होईल म्हणून जोखीम घ्या. खेळाडू, राजकारणी, अभिनेते, स्टॉक ब्रोकर आणि तंत्रज्ञ यांच्या अडचणी कमी होतात. दीर्घकालीन समस्यांचे निराकरण करण्यासाठी तुम्हाला कुटुंब आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. निर्यात-आयातमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. मॉडेलिंग, वैद्यकीय, क्रीडा, इव्हेंट्स, स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतींमध्ये नशीब आजमावा.

शुभ रंग: ग्रीन आणि टील (Teal)

शुभ दिवस: बुधवार

शुभ अंक: 5

दान: प्राण्यांना ग्रीन मिल्क (नारळ किंवा तांदळापासून तयार केलेलं दूध) द्या.

#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

या आठवड्यात इतर ब्रँडसोबत कोलॅबरेशन करण्याचा किंवा लग्नासारख्या कायमस्वरूपी नातेसंबंधात अडकण्याचा निर्णय घेतला जाईल. तुम्हाला कामाच्या बदल्यात पैसे मिळतील पण ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागेल. नेतृत्त्व करण्याची संधी मिळाल्यास तिचा स्वीकार करावा. भविष्यासाठी ही संधी उपयुक्त ठरेल. जबाबदाऱ्यांमुळे मानसिक ताण जाणवेल. बिझनेस क्लायंटच्या समस्या सोडवण्यात आणि रात्रीच्या जेवणासाठी किंवा खरेदीसाठी बाहेर जाण्यात वेळ खर्च होईल. महिला कर्मचारी, खेळाडू, प्रॉपर्टी डीलर्स, डर्माटॅलॉजिस्ट, गायक, डिझायनर, इव्हेंट मॅनेजर्स, ब्रोकर्स, शेफ आणि विद्यार्थ्यांची प्रगती होईल अशा नवीन ऑफर मिळतील. रोमँटिक रिलेशनशीपमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे.

शुभ रंग: गुलाबी आणि व्हायलेट

शुभ दिवस: शुक्रवार

शुभ अंक: 6

दान: आश्रमामध्ये पांढरा तांदूळ दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

स्वत:च्या कोशात राहू नका. इतरांशी संवाद साधा नाहीतर गैरसमज होतील. बिझनेसमध्ये नफा मिळेल. नेहमी फॅब्रिक किंवा लेदरऐवजी धातूच्या वस्तूंचा वापर करा. तुम्हाला तुमच्या आईचा किंवा एखाद्या विरुद्धलिंगी व्यक्तीचा सल्ला विचारात घ्यावा लागेल. कारण, तो तुमच्यासाठी योग्य ठरेल. तुमची हुशारी सर्व परिस्थितींवर विजय मिळवू शकते त्यामुळे दिलेलं आव्हान स्वीकारा. प्रेमात असलेले लोक प्रपोज करण्यासाठी बाहेर जाऊ शकतात. फायनान्स, मालमत्ता, दागिने निर्मिती, वकील, कुरिअर, पायलट, राजकारणी, थिएटर कलाकार, सीए, आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील व्यक्तींच नशीब जोरावर असेल.

शुभ रंग: नारंगी

शुभ दिवस: सोमवार

शुभ अंक: 7 आणि 9

दान: अनाथ आश्रमात साखर दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

जे तुम्हाला त्यांची सेवा देतात अशांशी बोलताना नेहमी शांतपणे बोला. नियोजन, सोशल नेटवर्किंग, मार्केटिंग, खरेदी आणि प्रवास या गोष्टींचा आठवड्याच्या सुरुवातीला आनंद घ्या. आठवड्याची सुरुवात दानधर्मानं करा. मोठमोठ्या कंपन्यांशी तुमचे संबंध चांगले आहेत. म्हणून, त्यानुसार योजना तयार करा. आर्थिक लाभांमध्ये वाढ होईल. मालमत्ता आणि यंत्रसामग्री खरेदीशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने होतील. पण, अनेक जबाबदाऱ्यांमुळे मानसिक तणाव वाढेल. कायदेशीर विवाद लवकरच मिटतील. निरोगी राहण्यासाठी हिरव्यागार वातावरणात वेळ घालवत रहा. धान्य दान करणं आणि लिंबूवर्गीय पदार्थ खाणं गरजेचं आहे.

शुभ रंग: पर्पल

शुभ दिवस: शुक्रवार

शुभ अंक: 6

दान: आश्रमात मीठ दान करा.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

या आठवड्यात महिलांनी नवीन संधी शोधण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. कारण, यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. खर्चावर आणि आक्रमक स्वभावावर नियंत्रण ठेवा. या आठवड्यात एज्युकेशन बिझनेसमध्ये वेगाने वाढ होईल. आठवड्याचा शेवटच्या काही दिवसांमध्ये जोडपे आनंदी आणि रोमँटिक वातावरणात राहतील. अपमानाला सामोरं जावं लागण्याची शक्यता असल्यानं तुम्ही मोहापासून दूर राहावं. प्रेमात असलेल्यांसाठी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा आठवडा अतिशय चांगला आहे. व्यावसायिक संबंधांना जागतिक बाजारपेठेत मान्यता मिळेल. ग्लॅमर इंडस्ट्री आणि मीडियामधील व्यक्ती प्रसिद्धीचा आनंद घेतील. राजकारणी आज मोठ्या संधींची पूर्तता करतील. गृहिणी, ज्योतिषी, वास्तू सल्लागार, विद्यार्थी, प्रशिक्षक, संगीतकार, लेखक, डिझायनर, डॉक्टर, वकील, अभियंते आणि अभिनेत्यांना लोकप्रियतेचा आनंद मिळेल.

शुभ रंग: लाल

शुभ दिवस: मंगळवार

शुभ अंक: 9

दान: लाल मसूर दान करा.

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya