मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : हातची संधी वारंवार निसटून जातेय; तुमच्या मोबाईल नंबरमधील हा आकडा कारणीभूत

Numerology : हातची संधी वारंवार निसटून जातेय; तुमच्या मोबाईल नंबरमधील हा आकडा कारणीभूत

(फोटो सौजन्य - Canva)

(फोटो सौजन्य - Canva)

अंकशास्त्रानुसार मोबाईल नंबरही बरंच काही सांगतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

सहा हा अंक जबाबदारी देतो, मित्र आणि नातेवाईकांना मदत करण्याची वृत्ती देतो, त्यांच्या गरजा समजून घेण्याची समज देतो आणि त्यांच्याशी अटॅचमेंटची भावना देतो. 6 हा अंक खासकरून मजा आवडणाऱ्या आणि चिंतामुक्त जगणाऱ्या व्यक्तींचा आहे. या व्यक्तींना त्यांच्या कामासाठी घराबाहेर राहावं लागणार असेल, तर या व्यक्ती चुकीच्या दिशेला जाऊ शकतात आणि अस्वीकारार्ह नात्यात गुंतू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा अंक सौंदर्यात रस असलेल्या आणि चांगल्या दिसणाऱ्या बाबींचा निदर्शक असतो, जो सुंदर आणि रंगीबेरंगी सभोवतालाकडे आकर्षिला जातो. हा अंक फ्रेंडशिपमध्ये वाढ करतो आणि आयुष्याकडे पाहण्याच्या प्रॅक्टिकल दृष्टिकोनात वाढ करतो. हा अंक आयुष्यात आनंद, आरामदायी बाबी आणि संधी आणतो.

जेव्हा 6 हा अंक मोबाइल सीरिजमध्ये (मोबाइल नंबर) एकदा येतो

तेव्हा तो कुटुंबामध्ये आणि नात्यांमध्ये प्रेमभावना निर्माण करतो. हा अंक जबाबदारी आणतो आणि दिलेल्या कामाची काळजी घेण्याची क्षमताही देतो. या व्यक्ती चांगले आई-वडील असतात. या व्यक्तीं सर्वांसाठीच चिंता करतात आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येकाला आनंदी असलेलं पाहू इच्छितात. या व्यक्ती जबाबदारी आई-वडिलांची सारी कर्तव्यं पार पाडतात.

जेव्हा 6 हा अंक मोबाइल नंबरमध्ये दोनदा येतो

तेव्हा तो मोबाइल नंबर ज्या व्यक्तीचा असतो अशा व्यक्ती अति चिंता करणाऱ्या आणि अति सावधगिरी बाळगणाऱ्या असतात. या व्यक्ती अति संरक्षित बनतात. या व्यक्तींना सौंदर्य, चांगलं दिसणं यांमध्ये विशेष रस असतो. या व्यक्तींना कायमच आपल्या मुलांची काळजी वाटत राहते. या व्यक्ती आपल्या मुलांना जबाबदार, स्वतंत्र आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यास सक्षम बनवण्यात यशस्वी ठरण्याचं प्रमाण अत्यंत कमी असतं.

जेव्हा 6 हा अंक मोबाइल नंबरमध्ये तीन वेळा येतो

तेव्हा असा नंबर अभद्राचा संकेत असतो. या व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असतात. या व्यक्ती आपली सामाजिक प्रतिमा जपण्यासाठी अति काळजी घेतात. त्यामुळे इतरांना आपल्या क्षमतेपेक्षा जास्त मदत करतात; मात्र त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाला मात्र सोसावं लागतं. या व्यक्ती नकारात्मक विचार करतात आणि खूप निराशावादी बनतात. अशा व्यक्ती व्यावहारिक नसतात. या व्यक्तींनी समाजकार्यात सहभागी झालं पाहिजे.

जेव्हा 6 हा अंक मोबाइल नंबरमध्ये 4 किंवा जास्त वेळा येतो

तेव्हा असा मोबाइल नंबर असलेल्या व्यक्ती अति सक्रिय किंवा एकदम निष्क्रीय बनतात. अशा व्यक्ती इतरांसाठी समस्या बनतात. अशा व्यक्ती आजूबाजूचं वातावरण समजून घेत नाहीत. अशा व्यक्ती दैनंदिन जीवनात चांगल्या पद्धतीने कार्यरत राहू शकत नाहीत आणि आपल्याकडे असलेलं सारं काही दुसऱ्यांना देऊन बसतात.

जेव्हा मोबाइल नंबरमध्ये 6 हा अंक एकदाही नसतो

तेव्हा अशा व्यक्ती जबाबदारीपासून दूर पळतात आणि अनेक प्रकारच्या सुवर्णसंधी गमावून बसतात. अशा व्यक्तींना अनेक कामांमध्ये समस्या आणि अडथळे येतात. चांगली संधी मिळाली, तरी या व्यक्ती त्याचा पूर्ण आनंद घेऊ शकत नाहीत. अशा व्यक्तींना कोणतंही वचन देण्यास आत्मविश्वास वाटत नाही.

मोबाइल नंबरमधल्या सर्व अंकांची बेरीज 6 असेल

तर असा मोबाइल नंबर असलेल्या व्यक्तींना सर्व प्रकारचा आनंद आणि सुविधा मिळतात. त्यामुळे या व्यक्तींचं व्यक्तिमत्त्व जबाबदार असतं. या व्यक्तींना सुवर्णसंधी मिळतात. जेव्हा सुविधांची एखाद्या व्यक्तीला सवय लागते, तेव्हा आपोआपच अशा व्यक्ती कष्ट करत नाहीत आणि या व्यक्ती घरी राहून घरातल्या बाबींकडे पाहण्यात जास्त रस घेतात.

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology