मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : प्रॅक्टिकल, इमोशनल का बेछूट? तुमचा मोबाईल नंबरच सांगेल स्वभाव

Numerology : प्रॅक्टिकल, इमोशनल का बेछूट? तुमचा मोबाईल नंबरच सांगेल स्वभाव

#Numerology : 25-11-2022 - विशेष लेख - मोबाइल न्यूमरॉलॉजी #Number 3

#Numerology : 25-11-2022 - विशेष लेख - मोबाइल न्यूमरॉलॉजी #Number 3

मीडिया अर्थात माध्यम क्षेत्रात असलेल्या व्यक्तींनी 3 अंकाचा समावेश असलेला मोबाइल नंबर घेतल्यास उत्तम रिझल्ट्स प्राप्त होऊ शकतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 25 नोव्हेंबर : तीन हा अंक विवेक, सामर्थ्य आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे. उत्तम शारीरिक आणि मानसिक क्षमता, उत्तम स्मरणशक्ती आणि क्रिएटिव्हिटी हा अंक देतो. या व्यक्ती लोकप्रिय नेते बनतात आणि त्यांच्या विषयातलं सखोल ज्ञान त्यांना असतं. जेव्हा 3 हा अंक मोबाइल सीरिजमध्ये (मोबाइल नंबर) एकदा येतो, तेव्हा असा मोबाइल नंबर असलेली व्यक्ती लकी, नाकासमोर वागणारी आणि उत्तम स्मरणशक्ती असलेली असते. या व्यक्ती कायम सकारात्मक राहतात आणि प्लॅननुसार कामं करतात. परिस्थितीचं सखोल विश्लेषण करणं आणि डेडलाइन्स पाळणं हे या व्यक्तींचं वैशिष्ट्य असतं.

जेव्हा 3 हा अंक मोबाइल नंबरमध्ये दोनदा येतो, तेव्हा तो मोबाइल नंबर ज्या व्यक्तीचा असतो त्या व्यक्तींची कल्पनाशक्ती दांडगी असते आणि या व्यक्ती जिज्ञासू असतात. या व्यक्तींना लेखन, माध्यम किंवा जनसंपर्कामध्ये रस असतो. जेव्हा 3 हा अंक मोबाइल नंबरमध्ये तीन वेळा येतो, तेव्हा त्या व्यक्तींची कल्पनाशक्ती अतिरेकी असते आणि वास्तव जगाशी त्याचा संबंध लावणं अवघड जातं. या व्यक्ती वाद घालणाऱ्या आणि दुसऱ्यांचं ऐकून न घेणाऱ्या असतात. त्यामुळे अशा प्रकारचा मोबाइल नंबर कायदा आणि राजकारण क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी योग्य ठरू शकतो.

जेव्हा 3 हा अंक मोबाइल नंबरमध्ये 4 किंवा जास्त वेळा येतो, तेव्हा या व्यक्ती अजिबात प्रॅक्टिकल विचार करणाऱ्या नसतात आणि भयंकर असतात. अशा व्यक्तींची आत्मविश्वासाची पातळी खूप कमी असते आणि त्यांना दैनंदिन जीवनातले व्यवहार करणं अवघड जातं. अशा व्यक्ती धूर्त आणि भौतिक गोष्टींसाठी अति धडपडणाऱ्या असतात. त्यांचे प्लॅन्स कायमच मोठे आणि काहीही न ठरवलेले असतात. या व्यक्ती दिवास्वप्नं पाहतात आणि त्यांना काही कौटुंबिक समस्याही भेडसावतात.

जेव्हा मोबाइल नंबरमध्ये 3 हा अंक एकदाही नसतो, तेव्हा अशा व्यक्ती बेछूट बोलणाऱ्या, दुसऱ्यांना दुखावणाऱ्या आणि त्यामुळे नातेसंबंधांमध्ये कायमच संघर्ष करावा लागणाऱ्या असतात. 3 हा अंक मोबाइल नंबरमध्ये नसल्यास अशा व्यक्ती स्वार्थी आणि मनमानी करणाऱ्या होऊ शकतात. त्यामुळे 3 या अंकाची ताकद लक्षात घेऊन तो संतुलित प्रमाणात मोबाइल नंबरमध्ये असावा. मीडिया अर्थात माध्यम क्षेत्रात असलेल्या व्यक्तींनी 3 अंकाचा समावेश असलेला मोबाइल नंबर घेतल्यास उत्तम रिझल्ट्स प्राप्त होऊ शकतात.

First published:

Tags: Numerology