मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : मोबाईल नंबरच दाखवेल व्यक्तीचा खरा चेहरा; फक्त एका आकड्यावरून ओळखा स्वभाव

Numerology : मोबाईल नंबरच दाखवेल व्यक्तीचा खरा चेहरा; फक्त एका आकड्यावरून ओळखा स्वभाव

मोबाईलचं अंकशास्त्र.

मोबाईलचं अंकशास्त्र.

एखाद्याच्या मोबाईल नंबरमध्ये एखादा आकडा किती वेळा आहे, यावरूनही त्या व्यक्तीचा स्वभाव तुमच्यासमोर येईल.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

#Number 2

दोन हा अंक चंद्राचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे हा अंक मोबाइल नंबरमध्ये असेल, तर प्रेम आणि समजून घेण्याच्या भावनेला प्रोत्साहन मिळतं. अशा व्यक्तींकडे काही वेळा खूप आत्मविश्वास असतो आणि काही वेळा त्या पूर्णतः दुसऱ्यांवर अवलंबून असतात; मात्र अशा व्यक्ती खूप सहकार्य करण्याच्या वृत्तीच्या असतात. 2 हा अंक मोबाइल नंबरमध्ये असावाच. कारण तो बिझनेस क्लायंट्स आणि जोडीदारासोबत दीर्घ काळाच्या रिलेशनशिप्स तयार करतो. दोन हा अंक मोबाइल नंबरमध्ये किती वेळा आल्यास काय परिणाम होऊ शकतो, याबद्दल आता जाणून घेऊ या.

जेव्हा 2 हा अंक मोबाइल सीरिजमध्ये (मोबाइल नंबर) एकदा येतो, तेव्हा असा मोबाइल नंबर असलेली व्यक्ती बुद्धिमान आणि संवेदनशील बनते. त्यामुळे या व्यक्तीला सक्रिय राहण्यासाठी बळ मिळतं. अशा व्यक्ती कायमच आशावादी असतात आणि जेव्हा या व्यक्ती प्रेमात असतात, तेव्हा त्या ते चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतात.

जेव्हा 2 हा अंक मोबाइल नंबरमध्ये दोनदा येतो, तेव्हा तो मोबाइल नंबर ज्या व्यक्तीचा असतो त्या व्यक्ती नैसर्गिकरीत्या बुद्धिमान असतात. या व्यक्ती कायम काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या असतात आणि भविष्याच्या दृष्टीने कृतीही करतात; मात्र अशा व्यक्तींना निष्कर्ष काढणं आणि गोंधळातून बाहेर येणं शिकण्याची गरज असते.

जेव्हा 2 हा अंक मोबाइल नंबरमध्ये तीन वेळा येतो, तेव्हा त्या व्यक्तींच्या इतरांकडून अवास्तव अपेक्षा असतात. त्यामुळे समाजात या व्यक्तींचं वागणं क्वचितच मैत्रीपूर्ण असतं. जास्तीत जास्त घेणं आणि कमीत कमी देणं यावर त्यांचा विश्वास असतो. थोडक्यात सांगायचं तर या व्यक्ती दुःखी राहतात.

जेव्हा 2 हा अंक मोबाइल नंबरमध्ये 4 किंवा जास्त वेळा येतो, तेव्हा या व्यक्ती इतरांच्या बाबतीत आणि परिस्थितीबाबतीत अगदी जराही सहनशील नसतात. 2 या अंकाची वारंवारिता जास्त असली, तर अशा व्यक्ती अगदी टोपी पडली तरी रडू शकतील अशा असतात. एखादी छोटी गोष्टही त्यांच्यावर खूप मोठा परिणाम करू शकतो. त्यामुळे मोबाइल नंबरमध्ये असं कॉम्बिनेशन टाळावं.

जेव्हा मोबाइल नंबरमध्ये 2 हा अंक एकदाही नसतो, तेव्हा अशा व्यक्तींच्या रिलेशनशिपमध्ये मिठाचा खडा पडतो. घरच्या, तसंच कामाच्या ठिकाणच्या वातावरणावरही त्याचा परिणाम होतो. या व्यक्तींना स्वतःच्याच विश्वात राहायला आणि स्वतःच्या दुबळ्या बाजू झाकायला आवडतं. या व्यक्तींचा आयुष्यात स्वतःशीच संघर्ष असतो.

मोबाइल नंबरमधल्या सर्व अंकांची बेरीज 2 असली, तर असा मोबाइल नंबर संबंधित व्यक्तीला बुद्धिमान बनवतो. तसंच, या व्यक्ती व्यक्त होणाऱ्या, समजून घेणाऱ्या, सहकार्य करणाऱ्या आणि पर्सनल व प्रोफेशनल रिलेशनशिप्सचा सर्वोत्तम आनंद घेणाऱ्या असतात. या व्यक्ती मनापासून काम करतात आणि खूप यशस्वी होतात.

वैवाहिक जीवनात सेटल होण्यासाठी संघर्ष करणाऱ्या दाम्पत्याला 2 बेरीज असलेला मोबाइल नंबर उपयुक्त ठरू शकतो.

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Numerology