मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology: जन्मतारखेनुसार 27 जूनचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

Numerology: जन्मतारखेनुसार 27 जूनचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 27 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 27 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 27 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 27 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुमचे नेतृत्वगुण दाखवण्यासाठी उत्तम दिवस आहे. गॅदरिंग किंवा इतर कार्यक्रमांमध्ये स्टेजवर बोलण्याची संधी सोडू नका. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीने इतरांवर छाप पाडाल. शैक्षणिक किंवा क्रीडा स्पर्धांमध्ये आज मोठा विजय प्राप्त कराल. बिझनेसमध्ये नवे संबंध जोडण्यासाठी चांगला दिवस. जोडप्यांसाठी भाग्याचा दिवस, दोघांमधील प्रेमसंबंध आणखी खुलतील. शिक्षणतज्ज्ञ, लेखक, सिनेदिग्दर्शक, कलाकार, डान्सर, संगीतकार, सरकारी अधिकारी, डॉक्टर, ज्वेलर्स, सोलर एनर्जी डीलर्स आणि ग्लॅमर इंडस्ट्रीमधील व्यक्तींना आज भरपूर प्रसिद्धी मिळेल.

शुभ रंग : केशरी

शुभ दिवस : रविवार आणि मंगळवार

शुभ अंक : 1 आणि 9

दान : कृपया पिवळ्या मोहरीचे दाणे मंदिरात दान करा.

#नंबर 2: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या सर्व समस्या आता संपत आल्या आहेत, तेव्हा संयम बाळगा. विनाकारण इतरांना मदत करण्याची गरज नाही, हे लक्षात घ्या. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या मदतीने यश मिळवाल. मुलांसोबत आणि कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी चांगला दिवस. कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित रहाल. एखादी सहल आयोजित करणं, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं किंवा जोडीदाराला एखादं सरप्राईज गिफ्ट देणं यासाठी उत्तम दिवस. शेअर मार्केट आणि एक्सपोर्ट बिझनेसमध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल. अतिसंवेदनशील न राहिल्यास नातेसंबंधांमधील रोमान्स वाढेल.

शुभ रंग : गुलाबी

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 2

दान : कृपया घरातील कामगारांना गुलाबी कपडे दान करा.

#नंबर 3: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

दिवसाच्या सुरुवातीला चिमूटभर हळद खा. आजचा दिवस तुमच्या कामाचं कौतुक होण्याचा आहे. करिअरमध्ये भरपूर संधी मिळतील. तुम्ही आतापर्यंत केलेल्या मेहनतीचा आर्थिक फायदा मिळवण्याची आता वेळ आहे. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल, त्याबाबत विचार करावा. गायक, प्रशिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि वकीलांसाठी फायद्याचा दिवस. कपडे, दागिने, पुस्तके, डेकोर, धान्य खरेदीसाठी; तसेच ट्रॅव्हल बुकिंग करण्यासाठी उत्तम दिवस. डिझायनर, हॉटेल व्यावसायिक, निवेदक, लाईफ आणि क्रीडा प्रशिक्षक, फायनान्सर्स, संगीतकार या व्यक्तींना आज भरपूर यश मिळेल.

शुभ रंग : लाल

शुभ दिवस : गुरूवार

शुभ अंक : 3 आणि 9

दान : कृपया मंदिरांमध्ये चंदन दान करा.

#नंबर 4: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

पैशांच्या योग्य नियोजनामुळे आज प्रॉपर्टीमध्ये मोठी गुंतवणूक करू शकाल. भगवान शिवाच्या नावाचा जप दिवसभरात करत रहा. यामुळे दिवसातील आव्हानं कमी होतील, आणि दिवस सत्कारणी लागेल. सीरियस रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींसाठी चांगला दिवस. बिझनेस डील्स आणि सरकारी कंत्राटं वेळेत पूर्ण होतील. मोठे आर्थिक निर्णय़ फायद्याचे ठरतील. सेल्स, आयटी या क्षेत्रांमधील कर्मचारी, नाट्य कलाकार किंवा अभिनेते, टीव्ही निवेदक आणि डान्सर या सर्वांनी इंटरव्ह्यू किंवा ऑडिशनची संधी सोडू नये. मेटल किंवा कापड उत्पादकांना व्यवसायात नवीन ऑर्डर मिळू शकते. आज प्रकृती स्थिर राहण्यासाठी कृपया मांसाहार टाळा.

शुभ रंग : जांभळा

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : कृपया लहान मुलांना कपडे दान करा.

#नंबर 5: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस हा छोटीछोटी कामं संपवण्याचा आहे. अनपेक्षितपणे काही घटनांमध्ये सहभाग नोंदवाल. एखादी दीर्घकालीन समस्या सोडवण्यासाठी मित्र आणि कुटुंबीयांचा भरपूर पाठिंबा मिळेल. मल्टिनॅशनल कंपनी आणि डिफेन्स क्षेत्रात गुंतवणूक फायद्याची ठरेल. जर तुम्ही स्टॉक्स, प्रॉपर्टी, एक्सपोर्ट-इम्पोर्ट, ट्रॅव्हल एजन्सी किंवा शिक्षण क्षेत्रात काम करत असाल, तर आज एक पाऊल पुढे टाका. तुमच्या कुटुंबात तुम्हाला मिळणारा आदर लक्षात घेऊन त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज आहे. सरकारी नोकरी, खेळ, इव्हेंट आणि स्पर्धा परीक्षा आणि मुलाखत यांमध्ये नशीब आजमावा.

शुभ रंग : शेवाळी

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : कृपया प्राण्यांना अन्नदान करा.

# नंबर 6: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस हा तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुमच्या मनातील भावना सांगण्याचा आहे. एखादा इव्हेंट, पर्सनल ग्रूमिंग, इंटरव्ह्यू, खेळ, शॉपिंग, फिरणं आणि असाईनमेंट पूर्ण करणं अशा गोष्टींमध्ये व्यग्र रहाल. आयुष्याला पूर्णत्व आणणारा आजचा दिवस आहे. बिझनेस क्लायंटसोबत असणाऱ्या समस्या सोडवण्याची वेळ आली आहे. गृहिणी, खेळाडू, प्रॉपर्टी डीलर, डर्मेटॉलॉजिस्ट, गायक, डिझायनर, इव्हेंट मॅनेजर, ब्रोकर, शेफ आणि विद्यार्थ्यांना नवीन काम मिळेल. रोमँटिक नातेसंबंधांमुळे आनंदी असाल.

शुभ रंग : जांभळा

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : कृपया मंदिरामध्ये चांदीचं नाणं दान करा.

#नंबर 7: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज दुधाच्या पाण्याने अंघोळ करुन दिवसाची सुरूवात करा. पार्टी किंवा प्रवास टाळावा. आज समोर येणारं आव्हान स्वीकारा, स्वतःच्या हुशारीने ते आरामात पूर्ण कराल. आई आणि इतर वरिष्ठांनी दिलेले सल्ले ऐका. आज मोठी वाटणारी एखादी समस्या काही दिवसांमध्येच निघून जाईल. एखादी व्यक्ती तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करेल, मात्र तिला यश मिळणार नाही. ज्वेलरी, कुरिअर, राजकारण, सॉफ्टवेअर या क्षेत्रांतील व्यक्ती; आणि वकील, पायलट, नाट्य कलाकार आणि सीए या व्यक्तींसाठी भाग्याचा दिवस.

शुभ रंग : केशरी

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 7 आणि 9

दान : कृपया गरिबांना पिवळा तांदूळ दान करा.

#नंबर 8: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

दीर्घकालीन उद्दिष्टांचा विचार करून, ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल करा. मोठ्या कंपन्यांसोबत केलेली भागीदारी फायद्याची ठरेल. प्रॉपर्टी आणि मशिनरी खरेदीसंबंधी तुमचे निर्णय फायद्याचे ठरतील. मोठा आर्थिक फायदा संभवतो. तुमच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे तणाव राहील. कायदेशीर वाद लवकरच संपुष्टात येतील. डॉक्टर, हॉटेल व्यावसायिक, शिक्षक, खेळाडू, राजकारणी आणि उत्पादक यांना भरपूर सन्मान मिळेल. तुमच्या जोडीदारासोबत वाद होऊ शकतो, त्यामुळे आज डोकं शांत ठेवा. आज धान्य दान करणं आणि लिंबूवर्गीय पदार्थ खाणं गरजेचं आहे.

शुभ रंग : गडद जांभळा

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : कृपया गरजूंना छत्री दान करा.

#नंबर 9: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज सर्वांचं लक्ष तुमच्याकडेच राहील. प्रेमात असलेल्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी उत्तम दिवस. बिझनेस रिलेशन आणि डील्स वेगळ्याच उंचीवर जातील. वकील, शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर, लेखक तसंच आयटी, एक्सपोर्ट-इम्पोर्ट, ग्लॅमर, अ‍ॅस्ट्रॉलॉजी आणि क्रीडा साधनं उत्पादक या क्षेत्रांमधील व्यक्तींसाठी आनंदाचा आणि भाग्याचा दिवस. संगीतकारांसाठी आजचा दिवस विशेष भाग्याचा ठरेल. मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी मिळेल. राजकारणातील व्यक्तींना करिअर चांगलं होण्यासाठी नव्या संधी मिळतील. पब्लिक फिगर्स आणि विद्यार्थ्यांना आज भरपूर प्रगती करण्याची संधी मिळेल. विद्यार्थी आणि प्रशिक्षकांना एखादी चांगली बातमी मिळेल.

शुभ रंग : लाल

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : कृपया लाल मसूर दान करा.

27 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज: आर.डी. बर्मन, पी.टी. उषा, ऑगस्टस डी. मॉर्गन, गंगाधर शास्त्री, नितीन मुकेश.

First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology