मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology: भविष्यात आरोग्याच्या कोणत्या समस्या उद्भवू शकतात, जाणून घ्या तुमच्या जन्मतारखेनुसार

Numerology: भविष्यात आरोग्याच्या कोणत्या समस्या उद्भवू शकतात, जाणून घ्या तुमच्या जन्मतारखेनुसार

तुमच्या जन्मतारखेनुसार तुमच्या जन्मांक निश्चित केला जातो. त्याबद्दल सविस्तर माहिती देत आहोत.

नवी दिल्ली,25 ऑगस्ट:   अंक ज्योतिष्य म्हणजेच न्युमरॉलॉजी (Numerology) ही ज्योतिष्य विज्ञानाची एक शाखा आहे. आपल्या दैनंदिन जीवनावर आपल्या भोवताली, किंवा आपल्याशी संबंधित अंकांचा काय प्रभाव पडतो याचा अभ्यास यात केला जातो. तुमचा जन्मांक हा तुमच्यावर कोणत्या ग्रहाचा प्रभाव (Numerology and planets) आहे हे सांगू शकतो. त्यामुळेच भविष्यात काय होऊ शकतं याचा अंदाज अंकज्योतिष्य बांधू शकतं. यासोबतच एक खास बाब म्हणजे, तुम्हाला भविष्यात आरोग्याच्या कोणत्या समस्या (Numerology and health issues) उद्भवू शकतात याबद्दलही माहिती तुम्हाला अंकज्योतिष्याने कळू शकते. यात तुमच्या जन्मतारखेनुसार तुमच्या जन्मांक निश्चित केला जातो. खाली त्याबद्दल सविस्तर माहिती देत आहोत.

अंक 1 : कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांवर सूर्याचा प्रभाव असतो. या दिवशी जन्म घेणाऱ्या लोकांना उत्तम आरोग्याची देणगी (Numerology and health) लाभलेली असते. तसेच, हे लोक अत्यंत नशीबवानही असतात. सूर्याचा प्रभाव पाठ, हृदय, धमन्या, डोकं, यकृत आणि पोटावर असतो. त्यामुळे जन्मांक एक असलेल्या व्यक्तींना या अवयवांशी संबधित आजार उद्भवण्याची शक्यता असते.

अंक 2 : कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांवर चंद्राचा प्रभाव असतो. हे लोक प्रकृतीच्या बाबतीत बऱ्यापैकी कमकुवत (Birth date and health connection) असतात. पचनाच्या समस्या तसंच, रक्ताभिसरणाच्या समस्यांमुळे हे लोक वारंवार आजारी पडतात. यामुळेच अनिमिया, तणावामुळे भीती, निद्रानाश आणि मानसिक ताण अशा समस्या या लोकांमध्ये अधिक दिसून येतात.

हाडं मजबूत करतात हे 6 पदार्थ; संधिवात, फ्रॅक्चर, कॅन्सरची राहणार नाही भीती

अंक 3 : कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींवर गुरू ग्रहाचा प्रभाव असतो. गुरू ग्रहाचा प्रभाव हा यकृत, फुफ्फुस आणि शिरांवर (My birth date and health problems) असतो. त्यामुळे या लोकांना छातीचे, फुफ्फुसाचे विकार जाणवतात. यासोबतच त्यांना मधुमेह, घशाचे आजार आणि त्वचारोगही होण्याची शक्यता असते. तसेच, नर्व्हस सिस्टीमवर ताण येऊन त्यासंबंधी आजार होण्याचीही शक्यता असते.

अंक 4 : कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या लोकांवर राहू ग्रहाचा प्रभाव असतो. या लोकांना लवकर थकवा येणे किंवा श्वासाचे विकार (Numerology and health problems) जाणवतात. यामध्ये दम लागणे, सर्दी-खोकला यांचा समावेश आहे. यासोबतच या व्यक्तींना हृदयविकार आणि युरिन इन्फेक्शनही होण्याची शक्यता असते.

अंक 5 : कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. बुध ग्रहाचा प्रभाव जीभ, स्मरणशक्ती, नर्व्हस सिस्टीम (Nervous system) आणि नाकावर असतो. या लोकांना सर्दी, खोकला किंवा फ्लू आणि त्वचा विकारांचा धोका असतो. यासोबतच निद्रानाश, पोटाचे विकार आणि मानसिक तणावाचाही या व्यक्तींना धोका असतो.

सकाळी अंथरुणामधून उठतांना येत असेल चक्कर तर, घातक आजाराचे आहेत संकेत

अंक 6 : कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींवर शुक्र ग्रहाचा प्रभाव (my birth date and planet) असतो. या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींना भीती वाटणे, नाक आणि फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन असे विकार जाणवतात. तसेच, उतारवयात यांना हृदयाचे विकार होण्याचीही शक्यता असते. महिलांना ब्रेस्टसंबंधी आजार, पाळीसंबंधी आजार किंवा इन्फ्लुएन्झा (Influenza) आजार होऊ शकतो.

अंक 7 : कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींवर केतू ग्रहाचा प्रभाव असतो. या व्यक्तींना अपचन, इन्फेक्शन (Numerology for health) आणि भीती वाटणं असे विकार होऊ शकतात. उतारवयात त्यांना रक्ताभिसरणासंबंधी विकार, किंवा शरीरात गाठी होण्याची शक्यता असते.

अंक 8 : कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींवर शनी ग्रहाचा प्रभाव असतो. शनीचा प्रभाव असणारे लोक हे ‘सेल्फ मेड’ प्रकारात मोडतात. या व्यक्तींना रक्तदाब, दातांच्या समस्या, डोकेदुखी, लिव्हर आणि आतड्यांशीसंबंधित विकार अशा समस्या जाणवू शकतात.

ऑनलाईन अभ्यासामुळे डोळे होतील खराब; अशी घ्या मुलांची काळजी

अंक 9 : कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. या व्यक्ती अत्यंत संवेदनशील असतात. मंगळ ग्रहाचा प्रभाव हा डोके, चेहरा, किडनी, मूत्राशय, प्रजनन अवयव अशा अवयवांवर असतो. यासोबतच रक्ताभिसरणावरही मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे या लोकांना साधारणपणे सर्व प्रकारचे ताप, चिकनपॉक्स, किडनीचे विकार, घशाचे विकार आणि ब्रॉन्कियल ट्यूब (Bronchial tube) अशा समस्यांचा धोका असतो.

अशा प्रकारे तुम्हीही तुमचा जन्मांक ओळखून, त्यानुसार आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देऊ शकता. योग्य वेळी योग्य ती खबरदारी बाळगून तुम्ही भविष्यातील धोके टाळू, किंवा कमी करू शकता.

First published:

Tags: Astrology and horoscope