Home /News /astrology /

Numerology : आज दिवसाच्या सुरुवातीला न विसरता करा एक काम; तुमच्या जन्मतारखेनुसार अंकशास्त्र काय सांगतंय पाहा

Numerology : आज दिवसाच्या सुरुवातीला न विसरता करा एक काम; तुमच्या जन्मतारखेनुसार अंकशास्त्र काय सांगतंय पाहा

Numerology : अंकशास्त्रानुसार 3 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य (Ank jyotish) वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 3 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आपले शब्द कसे विकायचे हे ज्यांना कळतं, त्यांच्यासाठी आजचा दिवस धाडसाचा असेल. तुम्ही शिक्षक किंवा प्रशिक्षकाचा सल्ला घ्यायला हवा आणि स्पर्धेत उतरण्यापूर्वी ते जे सांगतील, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायला हवा. प्रॉपर्टी खरेदी करणं आणि मालमत्तेची विक्की करणं या दोन्ही गोष्टी अगदी सुरळीत होतील. खेळात विजयाची शक्यता मोठी आहे. बांधकाम, कृषी, पुस्तकं, औषधं, फायनान्स आदी बिझनेसमध्ये वसुली सुरळीतपणे होईल. मुलांचं शिक्षक किंवा प्रशिक्षकांकडून कौतुक होईल. आज तुम्ही तुमच्या गुरूंचं पूजन केलं पाहिजे. दररोज सकाळी गुरूचं नाव घेतलं पाहिजे. आज पिवळे खाद्यपदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. शुभ रंग : Peach शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 3, 1 दान : भिकाऱ्यांना केळी दान करावीत. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) ज्ञान कागदावर उतरवण्यासाठी उत्तम दिवस आहे. म्हणजे स्पर्धेत उतरण्यासाठी चांगला दिवस. लीगल कमिटमेंट्स सुरळीतपणे पूर्ण केल्या जातील. तुम्हाला दुखावू शकेल, अशा व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगावी. वरिष्ठ मंडळींशी महिलांनी सहकार्याने वागावं. सरकारी काँट्रॅक्ट्स मिळवण्यासाठी जुन्या ओळखीचा उपयोग करण्याचा आजचा दिवस आहे. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बिझनेस, तसंच राजकीय नेते नवी उंची गाठतील. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 6 दान : मंदिरात दूध किंवा तेल दान करावं. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचं टॅलेंट, ज्ञान, कौशल्यं आदींच्या प्रदर्शनासाठी उत्तम दिवस. कामाच्या ठिकाणी नव्याने भरती झालेली व्यक्ती तुमचं स्वागत करेल. तुमचं ज्ञान आणि भाषण यांमुळे लोक प्रभावित होतील. आज घेतलेले सर्व निर्णय अनुकूल ठरतील, खासकरून संगीतकार आणि लेखक यांच्या बाबतीत असं घडण्याची शक्यता आहे. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी आपल्या भावना खुल्या दिलाने व्यक्त केल्या पाहिजेत. सरकारी अधिकाऱ्यांना सर्व व्यवहारांत नशीब अनुकूल असेल. दिवसाची सुरुवात करताना गुरूचं नाव घ्यायला आणि कपाळावर चंदन लावायला विसरू नका. शुभ रंग : Orange शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 1 दान : महिला मदतनीसाला केशर दान करावं. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज टाइम मॅनेजमेंटची खूप गरज आहे. त्यामुळे अपॉइंटमेंट्ससाठी चांगली तयारी करा. भविष्यासाठी आज बीजरोपण करणं आज महत्त्वाचं आहे. राजकीय नेते, तसंच मनोरंजन क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी प्रवासाकरिता आजचा दिवस चांगला नाही. बांधकाम आणि स्टॉक मार्केट बिझनेसमध्ये प्रगती संथ होईल; पण मेडिकल आणि कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. विद्यार्थ्यांनी आपली धोरणं कागदावर लिहून काढावीत. त्याचा त्यांना उद्दिष्टनिश्चितीसाठी उपयोग होईल. मार्केटिंग क्षेत्रातल्या व्यक्तींचं महिनाअखेरीचं टार्गेट पूर्ण होईल. आज नॉन-व्हेज आहार टाळा. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 9 दान : भिकाऱ्याला ब्लँकेट दान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून आजूबाजूचे सर्व जण प्रभावित होतील. आजचा दिवस कौतुक होण्याचा आणि लाभ मिळण्याचा आहे. मित्र किंवा नातेवाईक तुमच्याकडे मदत मागायला येण्याची शक्यता असून, तुम्ही मदत केली पाहिजे. बँकर्स आज उत्तम नशीब अनुभवतील. सेल्स आणि स्पोर्ट्समधल्या व्यक्तींसाठी वेगाने हालचाली होणं अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळेल. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : हिरव्या पालेभाज्या दान कराव्यात. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज प्रवास करा, कौशल्यं दाखवा, प्रेझेंटेशन्स द्या, मास मीडियाला सामोरं जा आणि विजय साजरा करा. आजचा दिवस मुलांसोबत व्यतीत करण्यासाठी उत्तम आहे. व्हिसासाठी प्रतीक्षा करत असाल, तर सकारात्मक घडामोडीमुळे तुम्हाला सुरक्षित वाटेल. नवी फॅक्टरी सुरू करण्यासाठी जे कोणी प्रॉपर्टीच्या शोधात आहेत, ते एक चांगला पर्याय निवडू शकतील. अभिनेते आणि माध्यम क्षेत्रातल्या व्यक्ती यश साजरं करतील. शुभ रंग : Teal शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गरिबांना मिठाई दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कायदेविषयक प्रकरणांमध्ये शहाणपणाने वागा. खेळ आणि शिक्षणातल्या यशासाठी मोठ्यांचे आशीर्वाद उपयोगी ठरतील. रिलेशनशिप बहरेल. विरुद्धलिंगी व्यक्ती आज तुमच्यासाठी नशिबवान ठरतील. आज गुरूमंत्राचं पठण करावं. मृदू शब्दांनी आज सारं काही जिंकता येईल. राजकीय नेत्यांना सार्वजनिक सभांना उपस्थित राहून पक्षश्रेष्ठींना इम्प्रेस करण्यासाठी चांगला दिवस. शुभ रंग : Orange शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : मंदिरात कुंकू दान करावं, #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) महत्त्वाचे निर्णय घेताना लवचिक राहा. यश मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. तुमच्या गुडविलच्या आधारे दिवसाच्या अखेरीस तुम्हाला बक्षीस मिळेल. उच्च पातळीचं ज्ञान संपादित करण्यासाठी अधिक वेळ खर्च कराल. सेमिनार्समध्ये डॉक्टर्सचं कौतुक होईल. पब्लिक फिगर्सना संध्याकाळपर्यंत आर्थिक लाभ होण्याची शक्यता. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : भिकाऱ्यांना संत्री दान करावीत. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस कौतुकाचा आणि वाढीचा आहे. अचानक धनलाभ किंवा यश मिळण्याची शक्यता आहे. सरकारी ऑर्डर्स मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी चांगला दिवस. खेळाडू, विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंटेशनसाठी पुढाकार घ्यावा. कारण आजचा दिवस चांगला आहे. अभिनेते, सीए, शिक्षक, खेळाडू, हॉटेलियर्स आदींना नशीब अनुकूल आहे. शुभ रंग : Red & Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 3, 9 दान : घरगुती मदतनीस किंवा भिकाऱ्यांना डाळिंबं दान करावीत. 3 मे रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : व्ही. के. कृष्ण मेनन, उमा भारती, अरुणा इराणी, अशोक गेहलोत, रघुबर दास
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या