ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 4 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
रिलेशनशिप सुरू करण्यासाठी किंवा बिझनेस पार्टनरशिप सुरू करण्यासाठी एक उत्तम दिवस. मशीन्स, शेतजमीन यांसारखे असेट्स खरेदी केल्यास चांगला परतावा मिळेल. खेळात जिंकण्याची शक्यता खूप जास्त आहे. मशिनरी, मॅन्युफॅक्चरिंग, कॉस्मेटिक्स, हस्तकलेच्या वस्तू, शेती, पुस्तकं, औषधं आणि फायनान्स या बिझनेसची कामगिरी प्रभावी आणि सुरळीत असेल. शिक्षक किंवा प्रशिक्षकांकडून मुलांचं कौतुक होईल. आजच्या दिवसात तुम्हाला मृदू शब्दांत संभाषण करण्याचं पथ्य पाळावं लागणार आहे.
शुभ रंग : Sky Blue & Grey
शुभ दिवस : शुक्रवार आणि मंगळवार
शुभ अंक : 6
दान : मंदिरात सूर्यफुलाच्या बिया दान कराव्यात.
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमच्या भावना कागदावर उतरण्यासाठी उत्तम दिवस आहे. तुम्हाला महत्त्वाची, गुप्त माहिती बॉसला ई-मेलने कळवायची असेल, तर परिणामांचा विचार न करता तसं करून टाका. लीगल कमिटमेंट्स अगदी सुरळीतपणे पार पाडल्या जातील. जुन्या संपर्कातली एखादी व्यक्ती तुम्हाला भेटण्याची शक्यता असून, तिच्याकडून तुमचा अपमान होऊ शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगावी. महिलांनी वरिष्ठांना सहकार्य करावं. सरकारी काँट्रॅक्ट्स मिळवण्यासाठी तुमची जुनी रिलेशन्स वापरण्याचा आजचा दिवस आहे. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट, केमिकल्स उद्योग, बिल्डर्स, राजकीय नेते आदी नवी उंची गाठतील.
शुभ रंग : Sky Blue & White
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 6
दान : मंदिरात दूध किंवा पाणी दान करावं.
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
पर्सनल नातेसंबंधांत आज तुम्ही स्पष्टता पाहाल. सरकारी जॉब वर्क किंवा काँट्रॅक्ट्सचा प्रवास सुरू होईल. राजकीय नेत्यांना आपलं टॅलेंट, ज्ञान, कौशल्यं आणि अनेक गोष्टींचं चांगलं दर्शन घडवता येईल. कामाच्या ठिकाणी नव्याने भरती झालेली व्यक्ती तुमचं स्वागत करील. तुमचं ज्ञान आणि संभाषण यांमुळे लोक प्रभावित होतील. राजकीय नेते, संगीतकार, इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या व्यक्ती, ऑटोमोबाइल बिझनेसमन, लेखक आदींनी आज घेतलेले निर्णय अनुकूल ठरतील. आज केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. प्रेमात असलेल्यांनी आपल्या भावना खुल्या दिलाने व्यक्त कराव्यात. सरकारी अधिकाऱ्यांना सर्व व्यवहारांत नशीब अनुभवता येईल. नशिबाची साथ मिळण्यासाठी गुरूचं नाव घेण्यास आणि पिवळ्या रंगाचे कपडे घालण्यास विसरू नका.
शुभ रंग : Yellow & Orange
शुभ दिवस : गुरुवार
शुभ अंक : 3, 1
दान : महिला मदतनीसाला केशर दान करावं.
#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज शेती, उत्पादन, हस्तकला, दिग्दर्शन, प्रशिक्षण, खेळाचं साहित्य, बँकिंग, सौर ऊर्जा आदी क्षेत्रांतून चांगलं उत्पन्न मिळू शकेल. शिस्त आणि पर्फेक्शन या गोष्टींचं भान राखणं आवश्यक आहे. भविष्यासाठी बीजरोपण करणं ही आजच्या दिवसाची आवश्यक कृती आहे. खासकरून राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूप कामाचा असेल. वैद्यकीय आणि शेती क्षेत्रात सकारात्मक बदल दिसतील. विद्यार्थ्यांनी गटामध्ये अभ्यास करावा किंवा चांगल्या विकासासाठी पीअर्सचं साह्य घ्यावं. आज मांसाहार करणं टाळावं.
शुभ रंग : Blue
शुभ दिवस : शनिवार
शुभ अंक : 9
दान : भिकाऱ्याला कच्ची केळी दान करावीत.
#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
हार्ड वर्कची स्मार्टपणे अंमलबजावणी करून नशीबवान होण्याचा आजचा दिवस आहे. तुमच्या मॅग्नेटिक पर्सनॅलिटीमुळे आजूबाजूच्या सर्वांवर प्रभाव पडेल. कामगिरीची दखल घेतली जाण्याचा आणि लाभ मिळण्याचा आजचा दिवस आहे. एखादा मित्र किंवा नातेवाईक तुमच्याकडे मदतीचा हात मागण्याची शक्यता आहे. तुम्ही त्यांना मदत करायला हवी. बँकर्सना आज नशिबाची खास साथ लाभेल. सेल्स आणि स्पोर्ट्समधल्या व्यक्तींना वेगाने हालचाली अनुकूल ठरतील. विद्यार्थी आज शैक्षणिक यशाचा आनंद घेतील.
शुभ रंग : Sea Green
शुभ दिवस : बुधवार
शुभ अंक : 5
दान : हिरव्या पालेभाज्या दान कराव्यात.
# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस तुमचा आहे आणि अनेकांच्या विकासाचे तुम्ही निर्माते असाल. आजचा दिवस प्रपोझ करण्यासाठी, कमिटमेंट्स देण्यासाठी, लक्झरी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी, समृद्धी मिळवण्यासाठी, प्रवासाला जाण्यासाठी, प्रेझेंटेशन देण्यासाठी, मास मीडियाला सामोरं जाण्यासाठी आणि विजय साजरा करण्यासाठी चांगला आहे. कुटुंबीयांसमवेत व्यतीत करण्यासाठी नव्या संधी शोधण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. व्हिसासाठी प्रतीक्षा करत असलात, तर सकारात्मक हालचालीमुळे सुरक्षित वाटेल. नवं मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारण्यासाठी प्रॉपर्टीच्या शोधात असलेल्या व्यक्ती चांगला पर्याय निवडण्यात यशस्वी होतील. अभिनेते, मीडियातल्या व्यक्ती यश साजरं करतील.
शुभ रंग : Teal
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6
दान : गरिबांना पांढरी मिठाई दान करावी.
#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस बिझी असेल. लॉसूट्समध्ये शहाणपण दाखवण्याची गरज आहे. खेळ, कायद्याच्या केसेस, बिझनेस डील्स, इंटरव्ह्यूज, स्पर्धा परीक्षा आदींमध्ये उत्तम यश मिळेल; मात्र त्यासाठी तुमच्या घरातल्या मोठ्या व्यक्ती आणि पूर्वजांचे आशीर्वाद आवश्यक. गुरूमंत्र वाचणं आणि पठण करणं आवश्यक. अॅग्रेशन नियंत्रणात ठेवावं. मृदू शब्दांनी आज सारं काही जिंकता येईल. तंबाखू, मद्य आदींपासून दूर राहून, साधा शाकाहारी आहार घ्यायला शिकलं पाहिजे.
शुभ रंग : Orange
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 7
दान : मंदिरात कुंकू दान करावं.
#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
महत्त्वाचे निर्णय घेताना फ्युचरिस्टिक आणि लवचिक राहा. यश मिळवण्यासाठी खूप कष्ट करण्याची गरज आहे; मात्र तुमचा ब्रँड आणि गुडविल यांच्यामुळे तुमचा दिवसअखेरीला गौरव होईल. उच्च पातळीवरचं ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही अधिक वेळ व्यतीत कराल. डॉक्टर्सचा सेवेसाठी गौरव होईल. पब्लिक फिगर्सना संध्याकाळपर्यंत आर्थिक लाभ होईल. दानधर्म करण्यात, व्यायामात वेळ व्यतीत करावा. सकाळी उठल्यानंतर आपल्या अंथरुणाच्या घड्या करून ठेवाव्यात.
शुभ रंग : Sea Blue
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6
दान : भिकाऱ्यांना संत्री दान करावीत.
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
रोमान्स आणि कृतज्ञतेची भावना दिवसभर तुमच्या मनात भरून राहील. आजचा दिवस कौतुकाचा आणि विकासाचा आहे. अचानक धनलाभाची किंवा यशाचीही शक्यता आहे. सरकारी ऑर्डर्ससाठी संपर्क साधण्याकरिता चांगला दिवस आहे. खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी डॉक्युमेटेंशनसाठी पुढाकार घ्यायला हवा. कारण आजचा दिवस त्यासाठी चांगला आहे. हीलर्स, पब्लिक स्पीकर्स, शेफ्स, मीडियामधल्या व्यक्ती, अभिनेते, सीए, शिक्षक, खेळाडू, हॉटेलियर्स आदींना नशीब उत्तम साथ देईल.
शुभ रंग : Red & Orange
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 3, 9
दान : घरगुती मदतनीस महिलेला लाल बांगड्या दान कराव्यात.
4 मे रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : ज्योती रंधावा, त्रिशा, सिद्धार्थ महापात्रा, टिनू आनंद
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.