मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : मालमत्ता विक्री, कागदपत्रांवर सही करण्याआधी अंकशास्त्र वाचणं ठरेल फायद्याचं!

Numerology : मालमत्ता विक्री, कागदपत्रांवर सही करण्याआधी अंकशास्त्र वाचणं ठरेल फायद्याचं!

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 8 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 8 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 8 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 8 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) भूतकाळातल्या प्रयत्नांची फळं मिळायला उशीर होईल. काळ तुमच्याविरुद्ध असल्याने हा दिवस आव्हानात्मक राहील. राजकारणी आणि खेळाडूंनी ऑफर नाकारावी कारण ती हितकारक नाही. मालमत्तेसंबंधी व्यवहार लांबतील. भांडणाविना मध्यम प्रमाणात पैसे मिळतील. मानसिक आरोग्यासाठी रात्री उशिरापर्यंत काम करू नका. वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी, खेळातील कॅप्टन्स, सौर उर्जा उद्योजक, इंजिनीअर्स आणि सरकारी अधिकाऱ्यांना नवी ऑफर मिळेल. शेती आणि शिक्षण क्षेत्रातील मंडळींना लाभ होईल. शुभ रंग : निळा, पिवळा शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 9 दान : आश्रमात गहू दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) मन स्थिर राहण्यासाठी जेवणात पांढरी मिठाई खा. खरं बोलण्याची सवय आणि प्रामाणिकपणा यामुळे तुम्हाला विजय मिळेल. तुमच्या निरागसपणाचा लोक फायदा घेण्याची शक्यता असल्याने चातुर्याने वागा. एक्सपोर्ट-इंपोर्ट, डॉक्टर, इंजिनीअर्स, ब्रोकर, ट्रॅव्हल एजन्सी, स्टॉक मार्केट आणि पार्टनरशीप फर्मशी संबंधित व्यक्तींना यश मिळेल. जोडीदार किंवा सहकाऱ्यांकडून मान मिळेल आणि आनंदी वाटेल. शुभ रंग : आकाशी शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : गुरांना पाणी दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सहकाऱ्यांची तुमच्याबद्दलची ईर्ष्या विसरून पुढे चला. सर्वोच्च उर्जा आणि अनंत क्षमता यांमुळे तुम्ही कायम करिअरमध्ये सर्वोच्चस्थानीच राहता. तुमचे सर्जनशील विचार आणि वक्तृत्वाचा प्रभाव ऑफिसात बॉसवर आणि घरी कुटुंबियांवरही पडेल. तुम्ही सर्व परिस्थितीत लवचिकता दाखवता त्यामुळे तुम्हाला यश दूर नाही. पैसे आणि मौल्यवान वस्तू जपा. क्रिएटिव्ह व्यक्ती व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना आज प्रसिद्धी मिळेल. खेळांतील कोचना विजय आणि आर्थिक बक्षीसही मिळेल. बांधकाम आणि शेतीमध्ये गुंतवणूक करण्यास उत्तम काळ. सकाळी कपाळाला चंदन लावा. शुभ रंग : नारिंगी आणि निळा शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 9 दान : मंदिरात लाकडी वस्तू दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) पैसे मिळवण्याच्या सर्व कल्पना प्रत्यक्षात उतरवून बघा कारण त्या फळाला येण्याची शक्यता आहे. भविष्यात चांगल्या आरोग्यासाठी पोषक आहार घ्या आणि शिस्तबद्ध जीवनशैली ठेवा. उच्चपदस्थ आणखी उंची गाठतील. आर्थिक नियोजन कुणाला सांगू नका. रस असेल त्या तरुणांनी सरकारी नोकरीसाठी अर्ज करावा कारण मिळण्याची शक्यता आहे. हिरव्या पालेभाज्या दान केल्यास नशीब फळफळेल. खेळाडू, सर्जन यांच्या कामाचं कौतुक होऊन मोठा आर्थिक लाभ होईल. कामाच्या व्यस्ततेमुळे कुटुंबीय आणि मित्रांना तुम्ही सध्या वेळ देऊ शकत नाही त्यामुळे मुकाट्याने त्यांच्या तक्रारी ऐकून घ्या. दान करा. शुभ रंग : निळा शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 6 दान : भिक्षेकऱ्यांना चपला दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) बिनकष्टाच्या नशीबानं मिळणाऱ्या पैशांची स्वप्नं सोडा आणि कष्टांसाठी कंबर कसा. नेतागिरी करण्यात दिवस जाईल. जोडीदाराला प्रपोज करण्यासाठी उत्तम दिवस मशीन खरेदी, मालमत्ता विक्री, कागदपत्रांवर सही करणं आणि बाहेर फिरायला जाणं या सगळ्यासाठी चांगला दिवस आहे. वृत्त निवेदक, कलाकार, शिल्पकार, इंजिनीअर्स यांचं सगळ्या क्षेत्रांतून कौतुक होईल. वादात पडू नका कारण ती तुम्हाला अडकवण्याची शत्रूंची चाल असू शकते. शुभ रंग : अक्वा शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : अनाथालयातील मुलांना हिरवी फळं दान करा. #नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी मित्रांची, हितचिंतकांची मदत घ्या. पत्रिकेतलं शुक्राचं बळ वाढवण्यासाठी शुक्राची पूजा करा. नवी संधी मिळवण्यासाठी प्रयत्न करा. कष्ट केल्यास कामं पूर्ण होतील. तुमच्या कर्माला नशीबाची आज जोड मिळणार आहे त्यामुळे स्वप्न सत्यात उतरवण्यास सज्ज रहा. आज सर्वप्रकारचा ऐशोआराम अनुभवाल. जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात दिवस जाईल. रिटेलर्स, शिक्षक, सोनार, कॉस्मेटिक व्यावसायिक, डिझायनर्स, वकील, तंत्रज्ञ, राजकारणी आणि कलाकारांना विशेष अपरायझल आणि स्थैर्य लाभेल. शुभ रंग : आकाशी शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6,9 दान : घरकामाच्या बाईंना बांगड्या दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) घरपरिसर स्वच्छ ठेवून केतूचा मंत्र जपा. माणसं चलाखीनं निवडा आणि तुमची कामं इतरांवर सोपवू नका. लवकरच नाती, कामातील आनंद आणि आर्थिक बाबींतील वाढ या सगळ्यांचा आनंद लुटण्याचे दिवस येतील. नातेवाईक आणि उद्योगातील मित्रांपासून सावध रहा. खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांपासून दूर रहावं जेणेकरून भविष्यातील वाद टळतील. नशीब उजळवण्यासाठी भिन्नलिंगी व्यक्ती मदत करेल. शिव शंकरांचे आशीर्वाद मिळण्यासाठी पूजा करा. शुभ रंग : हिरवा शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 3 दान : पिवळ्या रंगाचा भात किंवा डाळी दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) जुनी कर्ज फिटण्यासाठी आशेचा किरण आज दिसेल. दिवसभर एका मागे एक कामांत व्यस्त रहाल. तुमच्या सोबतचे सगळे सहकारी तुमच्याशी एकनिष्ठ आहेत त्यामुळे नेतृत्वाचा आनंद लुटा. आरोग्याची काळजी घ्या आणि कुटुंबाला वेळ द्या. दान केल्यास चांगली फळं मिळतील. बागेत आणि जलपर्णीच्या परिसरात काही वेळ घालवा. करिअरबाबतचे तुमचे निर्णय योग्य आहेत, पण मार्गदर्शकांचं मार्गदर्शन घ्या आणि पुढे जा. शुभ रंग : जांभळा शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गरिबांना छत्र्या दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) प्रोफेशनमध्ये प्रसिद्धी आणि लौकिक मिळवण्यासाठी सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंगचा वापर आठवणीने करा. बँकर्स, शेफ, हॉटेलियर्स, डॉक्टर, हीलर, फार्मसिस्ट, सर्जन, राजकारणी आणि खेळाडूंचं कौतुक होईल. आजचा दिवस प्रसिद्धी, लौकिक, आनंद, उर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. उर्जा तुमच्या ध्येयाच्या दिशेने वळवा. आज मालमत्तेची नोंदणी आर्थिक फायदा सहजपणे होऊन जाईल. परस्परांवरील विश्वासामुळे नाती बळकट होतील. शुभ रंग : तपकिरी शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : गरिबांना लाल मसूर दान करा. 8 ऑगस्ट रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : कपिल सिब्बल, फहाद फसिल, अबू आझमी, दादा कोंडके, गूफी पेंटल, दिलीप सरदेसाई, राजीव महर्षी.
First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या