Home /News /astrology /

Numerology : बिनधास्त मनसोक्त शॉपिंग करा; दागिने खरेदीसाठी तर आजचा दिवस उत्तम

Numerology : बिनधास्त मनसोक्त शॉपिंग करा; दागिने खरेदीसाठी तर आजचा दिवस उत्तम

Numerology 29 May 2022 : अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेला जन्मलेल्या व्यक्तींना आजचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 29 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचा स्वभाव आणि आजचा दिवस यांचा मेळ बसणार नाही. आज गोंधळाची परिस्थिती राहील. एखादी छोटी सहल किंवा मुलाखतीच्या तयारीमध्ये वेळ जाईल. आज तुम्हाला बऱ्याच आव्हानांना सामोरं जावं लागेल. यश मिळवण्यासाठी बिझनेस क्लाएंट्स आणि नातेवाईकांसोबत चांगले संबंध ठेवा. त्यांचा विश्वास संपादन करणं आवश्यक आहे. एखादी नवी गुंतवणूक करताना तुमच्या हुशारीचा फायदा होईल. सोलार एनर्जी, इलेक्ट्रॉनिक्स, लिक्विड्स, शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातल्या व्यक्तींना फायदा संभवतो. शुभ रंग : Beige शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 दान : कृपया हळद दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या भावनिक स्वभावाला आज थोडा आवर घालण्याची गरज आहे. मुत्सद्दीपणा आणि थेट संवाद साधणं आवश्यक आहे. आवडत्या व्यक्तीसोबत भावनिक वेळ व्यतीत करणं टाळा. आज तुमच्या काही योजना प्रत्यक्षात येणं अवघड आहे; मात्र काही दिवसांमध्येच तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे. आज मुलाखत किंवा महत्त्वाच्या बैठकीत पांढऱ्या रंगाचे कपडे घालणं फायद्याचं ठरेल. एखादा नवा करार करणं जोखमीचं ठरू शकतं. शॉपिंगसाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुमची कामं, असाइनमेंट्स संध्याकाळी उशिरा पूर्ण केल्यास फायदा होईल. शुभ रंग : Peach शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना किंवा गायींना दूध द्या. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) मनातल्या गोंधळाच्या परिस्थितीतून बाहेर या आणि एक ठराविक मार्ग पकडा. तुमच्या प्रशिक्षकावर विश्वास ठेवा आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा. सेल्स सेक्टरमध्ये काम करत असलेल्या व्यक्तींनी आज घराबाहेर पडणं गरजेचं आहे. वर्क फ्रॉम होम टाळा. आज खरं बोलण्याचा भरपूर फायदा होईल. मित्रांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी आणि त्यांच्यावर छाप पाडण्यासाठी उत्तम दिवस. उच्च शिक्षण, डान्सिंग, कुकिंग, डिझायनिंग, अभिनय किंवा ऑडिटिंग क्षेत्रांतल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संथ राहील. राजकीय नेते, वैज्ञानिक, लेखक, पेंटर्स किंवा फायनान्स क्षेत्रातल्या व्यक्तींना आज आर्थिक लाभ संभवतो. शुभ रंग : Green शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : कृपया मंदिरात कुंकू दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस ताण आणि चिडचिड होईल. मन शांत आणि डोकं थंड ठेवा. दिवसभरात भरपूर पाणी प्या. आज बऱ्याच गोष्टींबाबत स्पष्टता मिळेल. आज भविष्यासाठी योजना तयार कराल आणि त्या दृष्टीने पावलं उचलाल. क्लायंटसमोर केलेलं प्रेझेंटेशन उत्तम होईल. आजचा बराचसा वेळ कौन्सिलिंग आणि मार्केटिंगमध्ये जाईल. तुम्ही ज्या मशीन्सवर काम करत असाल, तर ती मशीन्स अद्ययावत करण्याची वेळ आली आहे. वैयक्तिक नातेसंबंध सुरळीत राहतील. आज मित्रांसोबत वेळ व्यतीत करणं फायद्याचं ठरेल. दिवसभरात केशरयुक्त मिठाई खाणं उत्तम. शुभ रंग : Teal शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया गरिबांना हिरवं धान्य दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज इतरांबद्दल जास्त विचार करत बसू नका. एखादा निर्णय घेताना त्यावर खूप भावनिक होऊ नका. आज केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. तसंच, प्रॉपर्टीसंबंधी निर्णयदेखील आज फायद्याचे ठरतील. महत्त्वाच्या मीटिंगला अ‍ॅक्वा रंगाचे कपडे घालून जा. मुलाखती आणि प्रपोझल्स शक्यतो दुपारच्या जेवणापूर्वीच करा. विदेशात फिरायला जाण्याची संधी मिळू शकते. आज खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्या. एखादा जुना मित्र वा मार्गदर्शक भेटेल, ज्याची भविष्यात तुम्हाला बरीच मदत होऊ शकते. शुभ रंग : Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया अनाथांना हिरवी फळं दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या योजनात अंमलात आणण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जुन्या कमिटमेंट्स पूर्ण कराल. आज मित्र, नातेवाईक, कुटुंबीय, सहकारी सर्वांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. जोडीदारासोबत बराच वेळ व्यतीत कराल. कामाच्या ठिकाणी अप्रैझल किंवा प्रमोशन होऊ शकेल. गाडी, घर, मशिनरी किंवा दागिने खरेदी करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. शेअर मार्केटमधली गुंतवणूक फायद्याची ठरेल. बिझनेसमधले निर्णय हुशारीने घ्याल. संध्याकाळी एखादी रोमँटिक डेट तुमचा सर्व आठवड्याचा शीण घालवेल. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया घरातल्या कामगारांना साखर दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमची सर्व कामं वेळेत पूर्ण होतील. आर्थिक गोष्टींबद्दल वरिष्ठांचा सल्ला नक्की पाळा. जोडीदार किंवा क्लायंटसमोर कोणत्याही प्रकारची तडजोड करू नका. तुमच्या निर्णयावर ठाम राहा. दिवसाच्या सुरुवातीला गुरूमंत्राचा जप केल्याने फायदा होईल. बिझनेस डील वेळेवर पार पडतील. लग्नाचं प्रपोझल आल्यास स्वीकारा. आर्थिक गोष्टींबाबत सीएचा सल्ला घ्या. टेक्नॉलॉजी, लॉ, हस्तकला, एक्सपोर्ट-इम्पोर्ट आणि शिक्षण क्षेत्रांतल्या व्यक्तींसाठी उत्तम दिवस. भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन अभिषेक केल्यास फायदा संभवतो. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया तांब्याची किंवा पितळेची एखादी वस्तू मंदिरात दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) भूतकाळातल्या चांगल्या कामांचं फळ आज तुम्हाला मिळणार आहे. पैसा, पद आणि प्रतिष्ठा सर्व लाभेल. तुमच्या उदार व्यक्तिमत्त्वामुळे तुम्हाला बऱ्याच व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. बिझनेस डील पार पाडण्यात कौटुंबिक संबंध आणि तुमचं बोलण्याचं कौशल्य या दोन्हींचा फायदा होईल. डॉक्टर, वैज्ञानिक, सरकारी कर्मचारी, धातू उत्पादक आणि सॉफ्टवेअर इंजिनीअर्स नव्या गुंतवणुकीत जोखीम घेऊ शकतात. विद्यार्थ्यांनी विदेशात शिक्षण घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. आत्ता त्यासाठी भरपूर फी असली, तरीही भविष्यातला त्याचा फायदा लक्षात घ्यावा. दिवसातला बराच वेळ आर्थिक व्यवहारात जाईल. भरपूर आर्थिक फायदाही संभवतो. आज प्रवास टाळा. एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन सेवा केल्यास उत्तम. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरजूंना चपला दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) नव्या ठिकाणी रहायला जाणं, नवं काम सुरू करणं, नवे नातेसंबंध सुरू करणं, उच्च शिक्षणासाठी जाणं आणि जमीन खरेदी करणं या सर्व गोष्टींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. प्रेमात असलेल्यांनी आपल्या जोडीदाराला प्रपोझ केल्यास मनासारखा प्रतिसाद मिळेल. राजकारण, मीडिया, अभिनय, खेळ, फायनान्स किंवा शिक्षण या क्षेत्रांतल्या व्यक्तींची आज भरपूर प्रगती होईल. तरुण सरकारी अधिकाऱ्यांना लोकांसमोर बोलण्याची संधी मिळेल. डिझायनिंग क्षेत्रातल्या व्यक्तींनी मुलाखत वा स्पर्धा परीक्षा दिल्यास यश मिळेल. आज रागावर नियंत्रण ठेवा आणि समोरच्या व्यक्तीला माफ करण्याची तयारी ठेवा. पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. बिझनेस पार्टनर्स आणि सहकाऱ्यांचा विश्वास जपा. शुभ रंग : Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया मंदिरात कुंकू दान करा. 29 मे रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : पंकज कपूर, गुलाब सिंग ठाकूर, एजाज खान, टी. एच. व्हाइट, अनुप्रिया गोयंका
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या