Home /News /astrology /

Numerology : मुलाखत, ऑडिशन असो वा मीटिंग; आज 'या' रंगाचे कपडे तुमच्यासाठी ठरतील लकी

Numerology : मुलाखत, ऑडिशन असो वा मीटिंग; आज 'या' रंगाचे कपडे तुमच्यासाठी ठरतील लकी

Numerology 29 June 2022 : तुमच्या जन्मतारखेनुसार आज कोणत्या रंगाचे कपडे तुम्ही घालायला हवेत पाहा.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 29 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) बिझनेसमध्ये मोठी जोखीम घेण्यासाठी आजचा दिवस लकी आहे. सुंदर फ्रेंड सर्कलचा अनुभव घ्याल. कन्फ्युजन कमी होईल. इंटरव्ह्यूला सामोरं जा किंवा मजेची सहल आखा. आज तुमच्या भावनांना सकारात्मक परतावा मिळेल. यश मिळवण्यासाठी काउंटरपार्ट्सपासून सावध राहा. क्लायंटशी, तसंच नातेवाईकांशी हेल्दी रिलेशन्स प्रस्थापित करण्यासाठी आणि त्यांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी चांगला दिवस आहे. सौर ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, लिक्विड्स, शिक्षण, पुस्तकं आदी व्यवसायांमध्ये मोठ्या परताव्याची शक्यता आहे. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 दान : गरिबांना केळी दान करावीत. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) वैयक्तिक आयुष्यात तुमची सारी स्वप्नं सत्यात उतरणार आहेत. आजचा दिवस चांगला आहे. सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी ध्यानधारणेने दिवसाची सुरुवात करा आणि पाण्यात दूध घालून आंघोळ करा. इंटरव्ह्यूला जाण्यासाठी किंवा काँट्रॅक्ट करण्यासाठी उत्तम दिवस. वैयक्तिक आयुष्यात थेट संवाद आज महत्त्वाचा ठरेल. खास मित्रासोबत रोमँटिक क्षण व्यतीत करू शकाल, असे संकेत आहेत. आज तुमचे फ्युचर प्लॅन्स सत्यात उतरू शकतील, त्यामुळे तयारीत राहा. नशीब तुमच्या पाठीशी आहे. इंटरव्ह्यू किंवा ऑडिशनला जात असलात, तर आज पांढरे कपडे घालणं फायद्याचं ठरेल. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : आज गायी-गुरांना किंवा भिकाऱ्यांना दूध दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमची ऊर्जा विखुरलेली आहे. ती एकाच बिंदूवर केंद्रित होण्याची गरज आहे. सेल्स क्षेत्रातल्या व्यक्तींचं आज कौतुक होण्याची शक्यता आहे. तुमच्या कोचवर विश्वास ठेवा आणि ते सांगतील ते ऐका. उत्तम यश मिळेल. कटू भूतकाळ विसरा आणि आजच्या दिवसाचा चांगला उपयोग करण्यासाठी सत्यच बोला. आज सोशलाइझेशनसाठी आणि तुमच्या मित्रांना इम्प्रेस करण्यासाठी उत्तम दिवस. आज उच्च शिक्षण, नृत्य, स्वयंपाककला, डिझायनिंग, अभिनय, शिक्षकी पेशा किंवा ऑडिटिंगमध्ये नशीब आजमावा. फायनान्समधल्या व्यक्ती, शास्त्रज्ञ, राजकीय नेते, लेखक, पेंटर्स यांना मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता. शुभ रंग : Brown शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 9 दान : मंदिरात कुंकू दान करावं. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) पैसे कमावण्याच्या बऱ्याच कल्पनांचा जणू प्रवाहच वाहत आहे. त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे. कारण त्यातून मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस खूप हेक्टिक असेल. त्यामुळे ध्यानधारणा करा आणि भरपूर पाणी प्या. बरंचसं कन्फ्युजन दूर झाल्यामुळे आज तुम्हाला खूप दिलासा वाटेल. आजचा दिवस भविष्याविषयीच्या नियोजनाचा आणि अंमलबजावणीचा आहे. क्लायंटचं प्रेझेंटेशन सुंदर असेल. कौन्सेलिंग आणि मार्केटिंगमध्ये बराच वेळ व्यतीत करण्याची गरज आहे. मशीनशी संबंधित काम करत असलात, तर मशिनरीत सुधारणा करण्याची वेळ आली आहे. संत्री खाणं उपयुक्त ठरेल. काही वेळ मित्रांसोबत व्यतीत करा. शुभ रंग : Teal शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : गरिबांना धान्य दान करावं. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज नशिबाचं चक्र तुम्हाला अनुकूल आहे. त्याचा वापर चांगल्या कामासाठी करा. गैरवापर करू नका. पैशांवरचं नियंत्रण गमावू नका. इन्व्हेस्टमेंट प्लॅन्समधून खूप जास्त परतावा मिळेल. Aqua रंगाचे कपडे घालणं मीटिंग्जमध्ये फायद्याचं ठरेल. इंटरव्ह्यूज, प्रपोझल्ससाठी बाहेर जा. प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय आज योग्य ठरतील. प्रवास आवडत असलेल्या व्यक्ती परदेश प्रवासाबद्दल माहिती घेऊ शकतात. आज खाणं-पिण्यातली शिस्त महत्त्वाची आहे. मित्र, कुटुंबीय किंवा जुन्या मेंटॉरला भेटण्याचा दिवस. त्याचा भविष्यात फायदा होईल. शुभ रंग : Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : अनाथांना हिरवी फळं दान करावीत. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) वैयक्तिक उद्योगापेक्षा पार्टनर फर्म्सना आज अधिक लाभ मिळतील. आजचा दिवस सारी विसरलेली डील्स, कमिटमेंट्स पूर्ण करून नव्याने सुरुवात करण्याचा आहे. समजून घेणारा जोडीदार, कुटुंबीयांचा उत्तम पाठिंबा, मित्र, पाठीराखे, सहकारी आदी मिळाल्याबद्दल तुम्हाला देवाबद्दल कृतज्ञता वाटेल. जोडीदारासोबत वेळ व्यतीत करावा. प्रमोशन्ससाठी अर्ज करावा. बिझनेसशी संबंधित योग्य निर्णय घ्याल. वाहन, घर, मशिनरी, ज्वेलरी आदींच्या खरेदीसाठी उत्तम दिवस. आज संध्याकाळच्या रोमँटिक डेटमुळे तुमचा संपूर्ण आठवडा बहरून जाईल. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : घरगुती मदतनीसांना साखर दान करावी. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तंत्रज्ञान, विज्ञान, फॅशन, हस्तकला, कायदा, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट, शिक्षण आदी क्षेत्रांना आज नशिबाची साथ मिळेल. आज इंटरव्ह्यूला गेल्यास पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. पार्टनर किंवा क्लायंटसोबत आज कोणत्याही प्रकारची तडजोड करू नका. तुमच्या निर्णयांवर ठाम राहा. सकाळी गुरूमंत्र म्हणावा. लग्नाचे प्रस्ताव आल्यास त्यांचा जरूर विचार करावा. भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाऊन अभिषेक केल्यास उपयुक्त ठरेल. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : मंदिरात तांबं किंवा कासे धातूचा तुकडा दान करावा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या इच्छाशक्तीमुळे लोकप्रियता आणि अधिकार प्राप्त होईल. डॉक्टर्स, शास्त्रज्ञ, सरकारी अधिकारी, मेटल मॅन्युफॅक्चरर्स, सॉफ्टवेअर इंजिनीअर्स आदी व्यक्ती नव्या गुंतवणुकीची जोखीम पत्करू शकतात. परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज मोठी फी भरली पाहिजे. कारण ते त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आवश्यक आहे. प्रवास आणि संवादात संपूर्ण दिवस बिझी असाल. प्रवासाचे बेत असतील, तर त्यात उशीर करू नये. आज वृद्धाश्रमात दानधर्म करावा. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : गरजूंना कपडे दान करावेत. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) नवं काम, नवे निर्णय, मालमत्ता खरेदी, स्पर्धा परीक्षा आदींसाठी नियोजन करत असलात, तर थेट संवाद आणि नेटवर्किंग करा. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी पुढाकार घेऊन प्रपोझ केलं पाहिजे. राजकारण, माध्यम, अभिनय, क्रीडा, फायनान्स, शिक्षण आदी क्षेत्रांत असलेल्या व्यक्तींची प्रगती होईल. तरुण सरकारी अधिकाऱ्यांना आज लोकांसमोर बोलण्याची संधी मिळेल. डिझायनिंग इंडस्ट्रीत असलेल्या व्यक्तींनी आज इंटरव्ह्यू द्यावा किंवा स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करावेत. रागावर ताबा मिळवा. क्षमाशीलता अंगी बाणवा. तरच आज पुढे जाऊ शकाल. आई-वडिलांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. मोठे लाभ मिळतील. शुभ रंग : Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : मंदिरात लाल धागा दान करावा. 29 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : उपासना सिंग, हरीश कल्याण, शहनाझ ट्रेझरी, आशुतोष मुखर्जी, प्रतापसिंहराव गायकवाड
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Zodiac signs

पुढील बातम्या