Home /News /astrology /

Numerology : आज यश मिळेल पण एक गोष्ट मात्र करायला बिलकुल विसरू नका

Numerology : आज यश मिळेल पण एक गोष्ट मात्र करायला बिलकुल विसरू नका

Numerology 28 May 2022 : तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्ही आज काय करणं योग्य ठरेल, अंकशास्त्रानुसार जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 28 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सूर्यमंत्राचा जप करून दिवसाची सुरुवात केल्यास फायदा होईल. नेते आज आपलं संवाद कौशल्य वापरून यश मिळवू शकतात. आज तुम्ही इतर गट किंवा ब्रँड्सशी पार्टनरशिप करण्याचा, भाषण देण्याचा, मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा, मुलाखतींना उपस्थित राहण्याचा किंवा खास मित्राप्रति प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज तुम्ही सर्व सुखसोयींचा आनंद घ्याल. तुमच्या ओळखींचा वापर झाल्यानं आज पैसा मिळवणं किंवा लक्ष्य साध्य करणं सोपं होईल. यश मिळवण्यासाठी गुरूंचा आशीर्वाद घ्यावा. खेळाडूंना विजय मिळेल. आजचा दिवस महिलांसाठी अनुकूल असल्यानं त्यांनी आत्मविश्वास उंचावला पाहिजे. सूर्यदेवाला अर्घ्य द्या. शुभ रंग : Yellow and Orange शुभ दिवस : रविवार आणि गुरुवार शुभ अंक : 1 दान : सूर्यफुलाचं तेल दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 12, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) जोडीदार शोधणाऱ्या व्यक्ती आज योग्य पर्याय शोधण्यात यशस्वी होतील. काम आणि वैयक्तिक जीवनात संतुलन साधण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मुत्सद्देगिरी आज यशस्वी होईल. मुलांसोबत आणि नातेवाईकांसोबत वेळ घालवण्यासाठीदेखील आजचा दिवस चांगला आहे. भगवान शिव आणि चंद्रदेवाचा आशीर्वाद घ्या. द्रवपदार्थ, इलेक्ट्रॉनिक वस्तू, औषधं आणि निर्यात-आयात, सौर ऊर्जा, कृषी, द्रव आणि रसायनं यांचा व्यवहार करत असाल तर नफा मिळवण्याजोगी एखादी विशेष घोषणा होऊ शकते. शुभ रंग : Blue and Off white शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : गरजूंना साखर दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) नेते, कर्णधार, प्रशिक्षक, शिक्षक आणि वित्तपुरवठादारांसाठी आजचा दिवस यशाची चव चाखण्यासाठी अतिशय चांगला आहे. परंतु, दिवसाच्या सुरुवातीला गुरू आणि आईचे न विसरता आशीर्वाद घ्या. विद्यार्थ्यांना आज यश मिळेल. आज तुमच्या प्रयत्नांना ओळख मिळेल. तुमच्या मार्गदर्शकाचे आभार मानायला विसरू नका. लिखित संवादाद्वारे तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रभावित करू शकता. तुम्ही प्रेम करत असलेल्या व्यक्तीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. खेळाडूंना विजयासाठी जुन्या प्रशिक्षकाची मदत होईल. सरकारी अधिकारी, कलाकार, खेळाडू, वितरक आणि शिक्षणतज्ज्ञांची प्रगती होईल. गुरू ग्रहाची शक्ती वाढवण्यासाठी महिलांनी कुटुंबासाठी पिवळ्या रंगाचं अन्न शिजवावं. शुभ रंग : Orange शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : मंदिरामध्ये चंदन दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमचं मन गुंतागुंतांनी भरलेलं आहे. पण, जसजसा दिवस जाईल तसतसा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मनाचा गोंधळही कमी होईल. आजचा दिवस उत्तम व्यवस्थापनामुळेच सर्वोत्तम यश साधून देणारा असेल. तुमची पैशांची गुंतवणूक गोपनीय ठेवा. बहुतांश वेळ कागदपत्रांचं पुनरावलोकन करण्यात घालवावा लागेल. निर्यात-आयातीशी तुम्ही संबंधित असल्यास सावधगिरी बाळगा आणि फक्त तुमच्या मनाचं ऐका. वैयक्तिक नातेसंबंधांना भावनिक वळण मिळेल. एखादी व्यक्ती दुखावली जाऊ शकते. त्यामुळे बोलताना सावधगिरी बाळगा. शांत राहण्यासाठी लिंबूवर्गीय पदार्थ खा आणि व्यायामासाठी वेळ द्या. शुभ रंग : Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : लहान मुलांना हिरवं पेन किंवा पेन्सिल दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा आणि भविष्यासाठी तरतूद करा. तुमच्याकडून स्वातंत्र्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या सहकाऱ्यांपासून आणि ओळखीच्या व्यक्तींपासून सावध राहा. त्यांच्याशी तुमची गुपितं शेअर करू नका. मित्र आणि नातेवाईकांशी उदारपणे वागा. ग्लॅमर, बांधकाम, मीडिया, परदेशी वस्तू आणि क्रीडा क्षेत्रातल्या लोकांना आज विशेष मूल्यांकनाला सामोरं जावं लागेल. Teal रंगाचे कपडे घातल्याने मीटिंगमध्ये मदत होईल. कृपया आज मद्यपान आणि मांसाहार टाळा. मालमत्तेशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने होतील. खेळाडूंना आज विजय मिळेल. शुभ रंग : Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : लहान मुलांना झाडांची रोपं दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) वैयक्तिक संबंधांमध्ये तणाव तयार होऊ शकतो. त्यामुळे आज जास्त विचार करणं टाळा. पालकांनी त्यांचा पझेसिव्ह स्वभाव सोडला पाहिजे. कारण आज मुलांबद्दल अभिमान बाळगण्याची संधी मिळेल. कुटुंब, मित्र आणि सहकारी यांचा पाठिंबा मिळाल्यानं तुम्हाला धन्य वाटेल. मीटिंग, डिलिंग्ज, होस्टिंग, मार्केटिंग आणि ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देण्यात वेळ जाईल. सरकारी निविदांमध्ये धोका पत्करण्यास हरकत नाही. उपचारांसाठी, रिव्ह्यू मीटिंगला उपस्थित राहण्यासाठी, कपडे, दागदागिने, वाहनं, मोबाइल, घर खरेदी करण्यासाठी किंवा लहान ट्रिपचं नियोजन करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. शेअर बाजारातली गुंतवणूक आज अनुकूल ठरेल. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : मंदिरामध्ये मीठ दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) पब्लिक फिगर्स असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या पैसा कमावण्याच्या कल्पना गोपनीय ठेवाव्यात. कागदपत्रांवर सही करणं टाळा. आयुष्यात चढ-उतार येतील. आज तुमची हुशारी वापरण्याची गरज आहे. लहान ब्रँड किंवा विरुद्धलिंगी व्यक्तीशी संबंधित असलेल्या संधी मनमोकळेपणाने स्वीकारा. वकिलाचा सल्ला घेतल्यास पैशाची योग्य बचत होण्यास मदत होईल. सॉफ्टवेअरशी निगडित व्यावसायिक सौदे मोठ्या प्रमाणात यशस्वी होतील. लग्नाच्या प्रस्तावांकडे आज दुर्लक्ष होईल. भगवान शंकराचं दर्शन घेऊन पूजा केल्यास समृद्धी मिळवण्यासाठी आशीर्वाद मिळेल. शुभ रंग : Yellow शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : मंदिरामध्ये पिवळ्या रंगाची भांडी दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आशीर्वाद, चिकाटी आणि नवीन कल्पनेची निवड केल्याने आज सहज यश मिळेल. जिथे तुम्हाला सुरळीत व्यवहार हवा असेल तिथे ज्ञान आणि पैशांचा वापर करा. प्रभावशाली व्यक्ती किंवा पैशांच्या जोरावर कायदेशीर प्रकरणं सोडवली जातील. बिझनेस डील क्रॅक करण्यासाठी ओळखींची मदत होईल. तुमचा जोडीदार तुमच्या आर्थिक कमाईमुळे प्रभावित होईल. विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी वेळ द्यावा. तुम्ही हुशारीचा वापर केल्यामुळे तुमचे सर्व निर्णय परिपूर्ण ठरतील. खेळाडूंना यश मिळेल. आज दान करणं गरजेचं आहे शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : गरजूंना चपला दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) ग्लॅमर इंडस्ट्रीतल्या व्यक्तींना आज पैसा आणि प्रसिद्धीचा आनंद मिळेल. कपल आज भविष्याचं नियोजन करू शकतात. सरकारी निविदा, प्रॉपर्टी डील्स, संरक्षण अभ्यासक्रम, वैद्यकीय अभ्यासक्रम सुरळीतपणे पार पडतील. ग्लॅमर, सॉफ्टवेअर, गूढ विज्ञान, संगीत, मीडिया किंवा शिक्षण उद्योगातल्या व्यक्तींना लोकप्रियता मिळेल. तरुण राजकीय नेते आणि तरुण कलाकारांना आज काही नवीन पदांची ऑफर दिली जाईल. सार्वजनिक ठिकाणी भाषण, मुलाखती, स्पर्धा परीक्षा देण्यासाठी या दिवसाचा उपयोग केला पाहिजे. संगीतकारांच्या पालकांना आज आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. डॉक्टर आणि सर्जन्सना बक्षिसं मिळतील. प्रवासाच्या योजना यशस्वी होतील. शुभ रंग : Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : लाल मसूर दान करा. 28 मे रोजी जन्मलेले सेलेब्रिटी : एन. टी. रामाराव, विनायक दामोदर सावरकर, मीर ताकी मीर, रॉड्रिक्स, महंत अवैद्यनाथ, पिनाकीचंद्र घोष
First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या