Home /News /astrology /

Numerology : आज यश निश्चित; मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची हीच आहे योग्य वेळ

Numerology : आज यश निश्चित; मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची हीच आहे योग्य वेळ

Numerology 27 May 2022 : आजचा दिवस यशाचा आहे. तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचं अंकशास्त्र काय सांगतं सविस्तर वाचा.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 27 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज खेळाडूंसाठी उत्तम दिवस आहे. कोणत्याही स्पर्धेमध्ये आज मोठं यश मिळवाल. भरपूर प्रसिद्धी मिळेल. आज एखादं गॅदरिंग, स्टेज-इव्हेंट वा कार्यक्रमाला नक्की जा. अशा ठिकाणी बोलण्याची संधी मिळाल्यास सोडू नका. तुमच्या बोलण्याची छाप बऱ्याच जणांवर पडेल. आज तुमचे नेतृत्वगुण दाखवण्याची चांगली संधी मिळेल. बिझनेस रिलेशन वाढवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कलाकार, डान्सर्स, सोलार एनर्जी डीलर्स, सरकारी अधिकारी, डॉक्टर, संगीतकार आणि ग्लॅमर इंडस्ट्रीमधल्या व्यक्तींना आज भरपूर प्रसिद्धी मिळेल. शुभ रंग : केशरी शुभ दिवस : रविवार आणि मंगळवार शुभ अंक : 1 आणि 9 दान : लहान मुलांना लाल फळं दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज भावनिक नाही तर व्यावहारिक विचार करण्याची गरज आहे. अगदी गरज नसेल तर दुसऱ्यांना मदत करण्याचा विचार आज करू नका. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मदत घेतल्याचा फायदा होईल. एखाद्याचं मन वळवण्यासाठी प्रयत्न करणं टाळा, यश मिळण्याची शक्यता कमी आहे. आजचा दिवस मुलांसोबत, कुटुंबीयांसोबत व्यतीत करण्यासाठी उत्तम आहे. एखादी छोटी सहल आयोजित करण्यासाठी, शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी, तसंच आपल्या जोडीदाराला एखादं सरप्राइज गिफ्ट देण्यासाठी आज चांगली संधी आहे. तक्रार करणं टाळलं तर नात्यामध्ये रोमान्स वाढेल. शुभ रंग : गुलाबी शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : भिकाऱ्यांना साखर दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुम्हाला तुमची कौशल्यं दाखवण्याच्या भरपूर संधी मिळतील. तुम्हीदेखील या संधीचं सोनं करून भरपूर प्रसिद्धी मिळवाल. तुम्ही आधी केलेल्या कामाचे आर्थिक फायदे मिळवण्याची वेळ आता आली आहे. गुंतवणूकदारांना तुमच्या योजना आवडतील. त्यामुळे आज नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचा. गायक, प्रशिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, राजकीय नेते, वकील अशा व्यक्तींसाठी आज भाग्याचा दिवस आहे. कापड, ज्वेलरी, पुस्तक, डेकॉर, धान्य किंवा ट्रॅव्हल बुकिंग अशा व्यावसायिकांना आज फायदा संभवतो. डिझायनर्स, हॉटेलियर्स, निवेदक, फायनान्सर्स, संगीतकार या व्यक्तींना आज विशेष यश मिळेल. दिवसाच्या सुरूवातीला हळद खाल्ल्यास फायदा होईल. शुभ रंग : लाल शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : मंदिरात चंदन दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज उत्साह कमी जाणवला, वा मूड खराब वाटला तर दुधाच्या पाण्याने अंघोळ करा. तसंच, दिवसभरात भगवान शिवाचं नामस्मरण करत राहा. सीरियस रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस भाग्याचा आहे. बिझनेस डील किंवा सरकारी ऑर्डर तातडीने पार पडतील. मोठे आर्थिक निर्णय फायद्याचे ठरतील. सेल्स कर्मचारी, आयटी कर्मचारी, नाट्य कलाकार, टीव्ही निवेदक आणि डान्सर असणाऱ्या व्यक्तींनी आज नव्या मुलाखतीसाठी प्रयत्न करावा, फायदा होण्याची शक्यता भरपूर आहे. मेटल आणि वस्त्र उत्पादक व्यक्तींना बिझनेसमध्ये नवीन ऑफर मिळू शकते. आज खाण्यामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नक्की करा. शुभ रंग : जांभळा शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : लहान मुलांना रोपं दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस छोटी छोटी कामं पूर्ण करण्याचा आहे. एक्सपोर्ट-इम्पोर्ट व्यावसायिकांनी जोखीम असल्यास एक पाऊल मागे घेतलेलं चांगलं. आज इतर व्यक्ती तुम्हाला वाईटसाईट बोलण्याची शक्यता आहे. त्याकडे दुर्लक्ष करणं हाच सर्वोत्तम उपाय आहे. एखादी बऱ्याच काळापासूनची अडचण सोडवण्यासाठी कुटुंबीय आणि मित्रांचा आधार मिळेल. कुटुंबाप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज आहे. शेअर मार्केट, खेळ, इव्हेंट्स, स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतींमध्ये नशीब आजमावू शकता. तुमचा जोडीदार आज पूर्ण वेळ तुम्हालाच देईल. शुभ रंग : हिरवा आणि केशरी शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : जनावरांना अन्न खाऊ घाला. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस अगदी उत्साहपूर्ण राहील. काय करू अन् काय नको असं काहीसं होईल. समारंभाला उपस्थित राहणं, मुलाखत देणं, खेळात सहभागी होणं, शॉपिंग, सहल, फिरणं, कामं पूर्ण करणं अशा बऱ्याच गोष्टी करण्यासाठी आज भरपूर उत्साह राहील. आज आयुष्याला पूर्णत्व आल्याची भावना निर्माण होईल. बिझनेसमधल्या काही अडचणी दूर कराल. तसंच, रात्री जेवणासाठी बाहेर जाण्यासाठी आज चांगला दिवस आहे. गृहिणी, खेळाडू, प्रॉपर्टी डीलर, डरमॅटॉलॉजिस्ट, गायक, डिझायनर्स, इव्हेंट मॅनेजर, ब्रोकर्स, शेफ आणि विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी संधी मिळेल. रोमँटिक रिलेशनशिप आयुष्यात पुन्हा आनंद आणील. शुभ रंग : Violet शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : मंदिरात चांदीचं नाणं दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला आर्थिक फायदा किंवा महागडी भेटवस्तू मिळेल. आजूबाजूच्या लोकांवर विश्वास ठेवू नका. कदाचित तुमच्या विरोधात एखादा कट रचला जात असण्याची शक्यता आहे. एखादं चॅलेंज समोर आलं तर स्वीकारा, तुमच्या हुशारीने त्यातून नक्कीच मार्ग काढाल. आई आणि इतर ज्येष्ठांनी दिलेले सल्ले ऐका. आज एखादी मोठी वाटणारी अडचण लवकरच नाहीशी होईल. एखादी व्यक्ती तुमचा पाय ओढण्याचा प्रयत्न करील; मात्र तिला त्यात यश मिळणार नाही. ज्वेलरी, कुरिअर, राजकारण, सीए, सॉफ्टवेअर अशा क्षेत्रांमधल्या व्यक्तींना, वकील, पायलट, नाट्य कलाकारांना दिवस भाग्याचा. शुभ रंग : केशरी शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 आणि 9 दान : घरकाम करणाऱ्या व्यक्तीला एखादं लहान भांडं दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) राजकीय नेते आणि खेळाडूंसाठी आजचा दिवस ‘मोठी स्वप्नं पाहा आणि ती प्रत्यक्षात आणा’ असा काहीसा राहील. एखाद्या मोठ्या कंपनीशी करार करणं फायद्याचं ठरेल. प्रॉपर्टी आणि मशीन खरेदीसंबंधी निर्णय तुमच्या फायद्याचे ठरतील. खांद्यावर भरपूर जबाबदाऱ्या असल्यामुळे ताण राहील. बऱ्याच काळापासून सुरू असलेले कायदेशीर वाद लवकरच थांबतील. डॉक्टर आणि उत्पादकांना सन्मान लाभेल. आज जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोकं थंड ठेवा. धान्य दान केल्यामुळे आणि लिंबूवर्गीय फळं खाल्ल्यामुळे आज लाभ होईल. शुभ रंग : गडद जांभळा (Deep Purple) शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गरजूंना छत्री दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस हा पूर्णपणे तुमच्याबद्दल राहील. प्रेमात असलेल्या व्यक्तींना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी उत्तम दिवस. बिझनेस डील्स यशस्वी होतील. ग्लॅमर इंडस्ट्री आणि मीडियामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी मिळेल. राजकीय व्यक्तींना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. पब्लिक फिगर असलेल्या व्यक्तींनी आणि विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी आजच्या दिवसाचा फायदा करून घ्यावा. इम्पोर्ट-एक्स्पोर्ट, स्टॉक मार्केट, अ‍ॅस्ट्रॉलॉजी, खेळ अशा व्यवसायातल्या व्यक्तींना मोठं यश मिळेल. विद्यार्थी, ट्रेनर्स, संगीतकार, लेखक, डिझायनर, वकील, इंजिनियर आणि अभिनेत्यांना भरपूर प्रसिद्धी मिळेल. शुभ रंग : लाल शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : लाल मसूर दान करा. 27 मे रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : रवी शास्त्री, नितीन गडकरी, बिपिनचंद्र बोस, नटराजन, अमरिंदर सिंग
First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या