Home /News /astrology /

Numerology : तुमची जन्मतारीख ही असेल तर खूप पैसा मिळेल पण मोजावी लागेल मोठी किंमत

Numerology : तुमची जन्मतारीख ही असेल तर खूप पैसा मिळेल पण मोजावी लागेल मोठी किंमत

Numerology 27 June 2022 : तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचा आजचा दिवस कसा जाणार अंकशास्त्रात पाहा.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 26 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचं सोशल नेटवर्क सुरू करा आणि नव्या संधी स्वीकारा. तुमच्या कामगिरीवर दुसऱ्यांमुळे विपरीत परिणाम होईल; मात्र तुमच्या भविष्यातल्या प्रगतीसाठी हे उपयुक्त ठरेल. तुम्हाला नवा कोर्स सुरू करायचा असेल, नव्या जागी काम करायचं असेल, नवी मशिनरी खरेदी करायची असेल, बिझनेसमध्ये नवी गुंतवणूक करायची असेल, नवा जॉब स्वीकारायचा असेल किंवा नवं घर घ्यायचं असेल, तर कायदेशीर गोष्टींचा विचार पुन्हा पुन्हा करा. वृद्ध कुटुंबीयांचं मार्गदर्शन घ्या. आर्थिक लाभांचं प्रमाण मोठं असेल आणि तेही कोणत्याही वादाशिवाय. मेडिकल प्रॅक्टिशनर्सना आज नशीब विशेष साथ देईल. शेती आणि शिक्षण उद्योग नफ्यात राहील, असं दिसतं. शुभ रंग : Yellow & Blue शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 दान : आश्रमात गहू दान करावेत. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस संपत्तीवृद्धीसाठी साह्य करणारा आहे. आपले अश्रू कुठे दाखवावेत आणि कुठे लपवावेत, हे तुम्हाला कळलं पाहिजे. तुमचा प्रामाणिकपणा हे विजयाचं कारण आहे. समस्या सोडवण्यासाठी प्रॅक्टिकल दृष्टिकोन ठेवा. कारण लोक तुमच्या निरागसतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतील. आज सिंगल्सना त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी चांगला दिवस आहे. लीगल ऑफिसर्स, लिक्विड बिझनेस डीलर्स, कन्सल्टंट्स, शिक्षक, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बिझनेसमन, डॉक्टर्स, इंजिनीअर्स, ब्रोकर्स, ट्रॅव्हल एजन्सीज, स्टॉक मार्केट आणि पार्टनरशिप फर्म्स एका गुंतागुंतीच्या दिवसानंतर यश साजरं करतील. जोडीदार किंवा पीअर्सकडून भावनिकदृष्ट्या दुखावलं गेल्यासारखं वाटेल किंवा अस्वस्थ वाटेल. परंतु ही स्थिती तात्पुरती असेल. शुभ रंग : Brown शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : गायी-गुरांना पाणी पाजा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) थेट संवाद साधल्यास जादुई परिणाम होतील. आजचा दिवस महत्त्वाकांक्षांना स्पर्श करण्याचा आहे. कायद्याविषयी सल्ला घ्या. कोणत्याही परिस्थितीत लवचिक राहण्याची तुमची क्षमता उच्च असल्यामुळे तुम्हाला यश मिळतं. काही जण तुमचं प्रतिमाहनन करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे सावधगिरी बाळगायला हवी. सोशल सर्कलबद्दलही सावध राहा. डिझायनर्स, लेखक, अभिनेते, संगीतकार, मोटिव्हेशनल स्पीकर्स, प्रशिक्षक अशा क्रिएटिव्ह व्यक्तींना नाव आणि प्रसिद्धी मिळेल. बांधकाम आणि शेती यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ. दररोज सकाळी तुमच्या गुरूची प्रार्थना करा. शुभ रंग : Brown शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 9 दान : मंदिरात चंदन दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कोणत्या ना कोणत्या प्रकारचा दानधर्म करून दिवसाची सुरुवात करा. आज तुम्ही खूप पैसे मिळवाल; मात्र त्यासाठी आरोग्य किंवा कौटुंबिक जीवन याची किंमत मोजावी लागेल. उच्चपदस्थ व्यक्तींची आणखी प्रगती होईल. आज मांसाहार आणि मद्यपान टाळा. इच्छुक विद्यार्थ्यांनी आज सरकारी नोकरीसाठी जरूर अर्ज करावा. कारण आज त्यासाठी अनुकूलता असल्याचे संकेत आहेत. कपड्यांचं दान केल्यास नशीब अधिक साथ देईल. मॅन्युफॅक्चरर्स आणि डॉक्टर्स यांचं आर्थिक उत्पन्न मोठं असेल. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांचं कौतुकही होईल. आज दानधर्म करणं अत्यंत आवश्यक आहे. शुभ रंग : Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : भिकाऱ्यांना चपला दान कराव्यात. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) वैयक्तिक आयुष्यात किंवा प्रोफेशनल लाइफमध्ये काही तरी नवीन घडण्याची वाट पाहत असलात, तर आज तुम्हाला अनपेक्षित असा बदल घडून येईल. आजच्या दिवसातले अडथळे दूर करण्यासाठी नशीब महत्त्वाची भूमिका निभावेल. तुमच्या भावना सांगून जोडीदाराला प्रपोझ करण्यासाठी आदर्श दिवस. आजचा दिवस जमीन, स्टॉक्स खरेदी करण्यासाठी, खेळ खेळण्यासाठी, प्रॉपर्टी विकण्यासाठी, ऑफिशियल डॉक्युमेंट्सवर सह्या करण्यासाठी उत्तम आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर्स, डायरेक्टर्स, न्यूज अँकर्स, अभिनेते, कलाकार, शिक्षणतज्ज्ञ, वकील, राजकीय नेते यांचं कौतुक होईल. भाषणावर नियंत्रण ठेवा. कारण अन्यथा तुमच्या गुडविलवर परिणाम होण्याची शक्यता आहे. शुभ रंग : Teal शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 6 दान : अनाथाश्रमातल्या मुलांना हिरवी फळं दान करावीत. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमचं वर्क प्रोफाइल व्यापक करण्याचा दिवस आहे. ते भविष्यासाठी चांगलं ठरेल. आजचा दिवस समृद्ध करणारा, आरामदायी आणि रोमँटिक असेल. करिअरसाठी काही संधीही आजचा दिवस घेऊन येईल. एकट्याने काम करण्यापेक्षा टीमने किंवा गटाने काम केल्यास आज चांगले रिझल्ट्स मिळतील. आज तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तयार राहा. कारण आजच्या तुमच्या कृतींना काळाची साथ मिळेल. आज तुम्ही सर्व प्रकारच्या लाभांचा आनंद घ्याल. कुटुंबाचा आदर आणि पाठिंबा यांमुळे समृद्धी मिळेल. गृहिणी, डिझायनर्स, वकील, तंत्रज्ञ, राजकीय नेते आणि अभिनेते यांना आज नशीब चांगली साथ देईल, त्यांचं विशेष कौतुक होईल. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6, 9 दान : गरिबांना साखर दान करावी. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) नव्या ऑफर्स स्वीकारू नका आणि शक्यतो सध्याच्या परिस्थितीतच काम करा. त्यामुळे कन्फ्युजन आणि अ‍ॅग्रेशन कमी होईल. संधींचं विश्लेषण करत राहा. कारण ते नंतर उपयुक्त ठरू शकेल. रिलेशनशिप्स, परफॉर्मन्स आणि आर्थिक वृद्धी आदींचा आनंद घेण्याचा काळ जवळ येत आहे. बिझी रूटीन, अनहेल्दी फूडपासून सावध राहा. लेट नाइट पार्टीज आज टाळा. बिझनेसमध्ये कुटुंबातल्या वृद्ध व्यक्तीचा पाठिंबा खूप उपयुक्त ठरू शकतो. खेळाडूंना विजयाचा अनुभव मिळेल. विरुद्धलिंगी व्यक्ती आणि ज्येष्ठ व्यक्तींमुळे भाग्य उजळेल. भगवान शिवशंकरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजाविधी करा. शुभ रंग : Teal शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 3 दान : मुलांना पिवळ्या रंगाच्या पेन्सिल्स दान कराव्यात. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) पैसे मिळवण्यासाठी शॉर्ट कट वापरू नका. कामासाठी आज पारंपरिक पद्धतीचाच वापर करा. नवी जबाबदारी घेण्यासाठी आपण खूपच बिझी आहोत, असं वाटेल; मात्र सक्रिय राहा आणि लक्ष ठेवा. ऑफर मिळाली, तर बिझनेसमध्ये मोठ्या ब्रँड्ससोबत भागीदारीचा प्रयत्न करा. लीडरशिप एंजॉय करण्याचा काळ आहे. कारण तुमच्या आजूबाजूला असलेल्या सर्व व्यक्तींची तुमच्यावर निष्ठा आहे. लाइफस्टाइल हेल्दी असेल याची काळजी घ्या आणि कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करा. दानधर्मातून, तसंच घरगुती कामगारांशी मृदू भाषणातून तुमचा दयाळूपणा दाखवा. आजूबाजूला असलेल्या झाडांना पाणी घाला. शुभ रंग : Violet शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गरिबांना काळ्या डाळी दान कराव्यात. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) मानसिकदृष्ट्याही हेल्दी राहायला विसरू नका. सामाजिक काम ही तुमच्या खजिन्याची चावी आहे. त्यामुळे कायम प्रामाणिक आणि दयाळू राहा. म्युझिक कॉन्सर्ट्स किंवा ग्लॅमर शोज एंजॉय करण्याचा दिवस. अभिनेते, हीलर्स, ट्रेनर्स, ज्वेलर्स, कौन्सेलर्स, सर्जन, राजकीय नेते, क्रीडापटू आदींची दखल घेतली जाईल, बक्षिसं मिळतील. आजचा दिवस फायद्याचा, संधींचा, प्रसिद्धीचा, मजेचा, ऊर्जेचा आणि उत्साहाचा असेल. त्याचा उपयोग तुमचं उद्दिष्ट गाठण्यासाठी करा. आज आर्थिक लाभ होतील आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन्स सुरळीतपणे पार पडतील. विश्वास आणि समृद्धीतून नातेसंबंध बहरतील. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : लाल हातरुमाल दान करावा. 26 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : तरुण सागरजी, सुरेश गोपी, कुणाल कपूर, बंकिमचंद्र चॅटर्जी, अर्जुन कपूर
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या