Home /News /astrology /

Numerology : धनलाभ होईल पण मोजावी लागेल मोठी किंमत; पैशांसाठी शॉर्टकट्स तर बिलकुल नको

Numerology : धनलाभ होईल पण मोजावी लागेल मोठी किंमत; पैशांसाठी शॉर्टकट्स तर बिलकुल नको

Numerology 26 May 2022 : जन्मतारखेवरून ठरणारं तुमच्या अंकशास्त्रानुसार तुमचं भविष्य काय आहे पाहा.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 26 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) ज्या क्षेत्रांत तुम्हाला अडथळे येतात, त्यातल्या तुमच्या कॉन्फिडन्सला आज धक्का लागू नये. अन्य व्यक्तींच्या विजयामुळे तुमच्या परफॉर्मन्सवर परिणाम होईल; पण ही तात्पुरती स्थिती असेल. नव्या ठिकाणी, नव्या पदावर कामाची सुरुवात करू इच्छित असलात, नवे मित्र बनवू पाहत असलात किंवा बिझनेसमध्ये नवी गुंतवणूक करू इच्छित असलात, नवी नोकरी मिळवू इच्छित असलात किंवा नव्या घरात जाणार असलात, तर आधी तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तींचं साह्य, मार्गदर्शन घ्या. प्रॉपर्टीशी संबंधित प्रकरणांमध्ये संथ हालचाली होतील. आर्थिक लाभ खूप नसेल; मात्र कोणत्याही वादाशिवाय होईल. वैद्यकीय व्यावसायिकांना आज नवी ऑफर मिळेल. शेती आणि शिक्षण या क्षेत्रांना आज लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग : Blue & Red शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 9 दान : आश्रमात गहू दान करावेत. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमचं भावनिक संतुलन उच्च असण्याची गरज आहे. कुठे अश्रू दाखवायचे आणि कुठे लपवायचे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. तुमचे कष्ट आणि प्रामाणिकपणा हे विजयामागचं कारण आहे. तुमचा शहाणपणा जागृत ठेवा. कारण अन्य व्यक्ती तुमच्या निरागसपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. लिक्विड क्षेत्रातले बिझनेस डीलर्स, कन्सल्टंट्स, शिक्षक, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बिझनेस, डॉक्टर्स, इंजिनीअर्स, ब्रोकर्स, ट्रॅव्हल एजन्सीज, स्टॉक मार्केट आणि पार्टनरशिप फर्म्स आदींना संध्याकाळंतर यश साजरं करता येईल. तुमचे पार्टनर्स किंवा पीअर्स यांच्याकडून भावनिकदृष्ट्या दुखावले गेल्यासारखं वाटेल; मात्र ही तात्पुरती स्थिती आहे. शुभ रंग : Brown शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : गायी-गुरांना पाणी पाजा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) प्रेमात असलेल्या व्यक्तींचे नातेसंबंध कायमस्वरूपी होण्यासाठी आजचा दिवस थेट संवाद साधण्याकरिता चांगला आहे. तुमची कल्पनाशक्ती, तसंच तुमचे सर्जनशील विचार आणि जादुई भाषण यांमुळे कामाच्या ठिकाणी तुमचा बॉस, तसंच घरी कुटुंबीय आकर्षित होतील. कोणत्याही परिस्थितीत काम करण्यासाठी तयार राहण्याची लवचिकता तुम्हाला यश देते. आपल्या सामानाची काळजी घेणं अत्यावश्यक आहे. नातेवाईकांच्यात असताना स्वतःची प्रतिमा जपणं आवश्यक आहे. डिझायनर्स, लेखक, अभिनेते, संगीतकार, मोटिव्हेशनल स्पीकर्स, क्रीडा प्रशिक्षक आदींना अधिक नाव, प्रसिद्धी मिळेल. बांधकाम, तसंच कृषी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी उत्तम कालखंड. दररोज सकाळी तुमच्या गुरूचं पूजन करावं. शुभ रंग : Blue & Red शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 9 दान : मंदिरात चंदन दान करावं. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज मंदिरात जाऊन दिवसाची सुरुवात करावी. आज तुम्हाला खूप पैसे मिळतील; मात्र त्यासाठी तुमच्या प्रकृतीची किंवा फॅमिली लाइफची किंमत मोजावी लागेल. उच्चपदस्थ व्यक्तींची आणखी प्रगती होणार आहे. आज मद्यपान आणि नॉन-व्हेज आहार घेणं टाळा. इच्छुक विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीसाठी अर्ज करावा. अनुकूल प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. कपडे दान केल्यास नशीब चमकण्यास मदत होईल. उत्पादक, तसंच डॉक्टर्स यांचं आर्थिक उत्पन्न वाढेल आणि त्यांच्या कामगिरीसाठी त्यांचं कौतुकही होईल. आज दानधर्म करणं अत्यावश्यक आहे. शुभ रंग : Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : भिकाऱ्यांना चपला दान कराव्यात. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आपल्या प्रोफेशनमध्ये बदल करण्यासाठी ज्या व्यक्ती प्रतीक्षा करत आहेत, त्यांना अत्यंत सुंदर अशी नवी नोकरी मिळेल. आजच्या दिवसातले अडथळे कमी करण्यासाठी नशीब महत्त्वाची कामगिरी करील. तुमच्या भावना जोडीदारापर्यंत पोहोचवून प्रपोझ करण्यासाठी चांगला दिवस. स्टॉक्स, जमीन आदींच्या खरेदीसाठी, खेळांच्या मॅचेस खेळण्यसाठी, प्रॉपर्टी विकण्यासाठी, अधिकृत सरकारी कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर्स, दिग्दर्शक, न्यूज अँकर्स, अभिनेते, कलाकार, शिक्षणतज्ज्ञ, वकील, राजकीय नेते आदींचं सर्व ठिकाणी कौतुक होईल. भाषण करताना स्वतःवर नियंत्रण ठेवा. कारण त्यामुळे तुमच्या गुडविलला धक्का पोहोचू शकतो. शुभ रंग : Teal शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 6 दान : अनाथाश्रमातल्या मुलांना हिरवी फळं दान करावीत. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सध्या मिळालेल्या संधीचं सोनं करून यश मिळू शकतं. ती संधी भविष्यासाठी उत्तम असल्याचे संकेत आहेत. आजचा दिवस समृद्ध करणारा आहे. हा दिवस करिअरमध्ये अनेक संधी घेऊन येईल. आज एकट्याने काम करण्यापेक्षा टीमवर्क केल्यास अधिक चांगले रिझल्ट्स मिळतील. आज तुमच्या कृतीला काळाचीही साथ आहे. त्यामुळे तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तयार राहा. आज तुम्ही सर्व प्रकारच्या लाभांचा आनंद घ्याल. कुटुंबाकडून मिळणारा आदर आणि पाठिंबा यांमुळे समृद्धी मिळेल. गृहिणी, डिझायनर्स, वकील, तंत्रज्ञ, राजकीय नेते, अभिनेते यांना आज खास नशिबाची प्रचीती येईल आणि कौतुक होईल. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6, 9 दान : गरिबांना दही दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज संताप आणि गोंधळ कमी होण्याचा दिवस आहे. दुपारच्या जेवणानंतर एखादी नवी गोष्ट तुमचं दार ठोठावण्याची शक्यता आहे. आज मिळालेल्या नव्या ऑफर्स स्वीकारू नयेत. कारण त्या फायदेशीर नसतील. आयुष्याच्या सर्व क्षेत्रांत प्रगतीचा अनुभव येणार असल्याने रिलेशनशिप्स, परफॉर्मन्स आणि आर्थिक वृद्धी यांचा आनंद घेण्याचा काळ लवकरच येत आहे. आज अनहेल्दी फूडपासून सावध राहा, तसंच लेट लाइट पार्टीज टाळा. कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तीचा बिझनेसमधला सपोर्ट आज खूपच उपयुक्त ठरेल. खेळाडूंना विजय आणि प्रसिद्धी मिळेल. विरुद्धलिंगी व्यक्ती आणि ज्येष्ठ व्यक्तींची साथ मिळेल आणि नशीब चमकेल. भगवान शिवशंकरांचे आशीर्वाद घेण्यासाठी पूजाविधी करावेत. शुभ रंग : Green & Yellow शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 3 दान : पितळ किंवा तांब्याच्या धातूची वस्तू दान करावी. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज पैसे मिळणं शक्य आहे; मात्र त्यासाठी कोणतेही शॉर्टकट्स वापरू नका. अन्य कोणत्याही जबाबदाऱ्या घेता येणार नाहीत इतके बिझी असल्याची जाणीव आज होईल. बिझनेसमध्ये ऑफर मिळाल्यास मोठ्या ब्रँडशी सहयोग करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आजूबाजूच्या सर्व व्यक्ती तुमच्यावर निष्ठा ठेवून आहेत. त्यामुळे तुमची लीडरशिप एंजॉय करण्याचा काळ आहे. लाइफस्टाइल हेल्दी ठेवण्याची आणि कुटुंबीयांसमवेत वेळ व्यतीत करण्याची काळजी घ्या. मृदू बोलणं आणि दानधर्म यांचा जादूसारखा परिणाम होईल. हिरव्यागार बागेत काही वेळ व्यतीत करा. शुभ रंग : Purple शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गरिबांना काळ्या वस्तू दान कराव्यात. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) दानधर्माची सुरुवात घरापासून होते, हे लक्षात ठेवा. मानवता, माणुसकी ही तुमच्या खजिन्याची चावी आहे. त्यामुळे कायम प्रामाणिक आणि दयाळू राहा. अभिनेते, Healers, प्रशिक्षक, ज्वेलर्स, कौन्सेलर्स, सर्जन्स, राजकीय नेते, क्रीडापटू आदींची दखल घेतली जाईल, त्यांना गौरवलं जाईल. आजचा दिवस लाभ, संधी, प्रसिद्धी, ऊर्जा, मजा आणि उत्साह यांनी भरलेला आहे. तुमचं उद्दिष्ट गाठण्यासाठी त्याचा उपयोग करा. आर्थिक लाभ, तसंच प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन्स या गोष्टी आज अगदी सहज घडतील. नातेसंबंध विश्वास आणि समृद्धीने बहरतील. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : लाल हातरुमाल दान करावा. 26 मे रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : विलासराव देशमुख, सुशीलकुमार, मनोरमा, दिलीप जोशी, रामदोस
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या