Home /News /astrology /

Numerology : या जन्मतारखेच्या व्यक्तींसाठी लकी आहे आजचा दिवस; अंकशास्त्रानुसार पाहा तुमचं भविष्य

Numerology : या जन्मतारखेच्या व्यक्तींसाठी लकी आहे आजचा दिवस; अंकशास्त्रानुसार पाहा तुमचं भविष्य

Numerology 25 June 2022 : अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 25 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज नशिबाची साथ मिळण्यासाठी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. तुमच्या इंट्यूशन्सचं प्रमाण मोठं आहे. पार्टनरशिपसाठी संबंधित व्यक्तींना जोखण्यासाठी त्यांचा चांगला उपयोग होतो. तुमची कामगिरी उंचावून स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला नव्या पद्धतीने काम करावं लागेल. अभिनेते, तंत्रज्ञ, वकील, शिक्षक, सार्वजनिक वक्ते आदींची कामाच्या क्षेत्रात प्रगती होईल. डॉक्टर्स, मेटल मॅन्युफॅक्चरर्स, रिटेलर्स, फायनान्सर्स, वकील आदींना काही ऑफर मिळाली, तर ती त्यांनी स्वीकारायला हवी. अधिक आकर्षक दिसण्यासाठी चामड्याच्या वस्तू परिधान करणं टाळा. शुभ रंग : Yellow शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 3 दान : मंदिरात सूर्यफुलाच्या बिया दान कराव्यात. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कौटुंबिक समस्यांबद्दल मॅच्युअर व्हा आणि कमी सेन्सिटिव्ह व्हा. तुमचा जोडीदार तुम्हाला साथ देईल. त्यामुळे त्याचं ऐका आणि त्यानुसार कृती करा. आजचा दिवस रोमँटिक असेल आणि भावनांनी भरलेला असेल. तुमच्या खऱ्या भावना शेअर करा. बिझनेसमधल्या जबाबदाऱ्या कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होतील. महत्त्वाचे निर्णय चंद्रकलेनुसार घ्या. राजकीय नेते, दूध व्यापारी, हीलर्स, माध्यमकर्मी, शेतकरी, बँकर्स, मेडिकल क्षेत्रातल्या व्यक्ती आदींनी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करताना खूप सावधगिरी बाळगावी. शुभ रंग : Sky Blue & Yellow शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : गरिबांना दही दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) पब्लिक फिगर्सनी आजच्या दिवसाचा पुरेपूर वापर करून घ्यावा. कारण आज त्यांना धवल यश मिळण्याचा दिवस आहे. तुमच्या नेतृत्वगुणाची जादू कायम आहे. या गुणाचा प्रभाव अन्य व्यक्तींवर पडतो आहे. राजकीय नेते, सरकारी अधिकारी, नाट्यकलावंत आदींनी कामाच्या ठिकाणी नवी सुरुवात करायला हवी. नशीब साथ देईल; पण तुम्ही मित्रांसोबत असताना आर्थिक गोष्टी त्यांच्याशी शेअर करू नका. संगीतकार, डिझायनर्स, विद्यार्थी, न्यूज अँकर्स, राजकीय नेते, अभिनेते, कलाकार, गृहिणी, हॉटेलियर, लेखक आदींच्या करिअरमधल्या प्रगतीच्या दृष्टीने खास घोषणा होण्याची शक्यता आहे. शुभ रंग : Orange शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 1 दान : प्राण्यांना केळी खाऊ घाला. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज व्यवसायात ऑडिट करणं, आढावा करणं गरजेचं आहे. आपली मालमत्ता आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. महत्त्वाचे आर्थिक निर्णय योग्य ठरतील. सर्व असाइनमेंट्स तुम्ही वेळेवर पूर्ण कराल आणि त्याचे चांगले रिझल्ट्स मिळतील, असं संकेत आहेत. अन्नधान्य दान केल्यास नशिबाची साथ चांगली मिळेल. शिक्षण, बांधकाम, मशिनरी, धातू, सॉफ्टवेअर, स्टॉक मार्केट आदी क्षेत्रातल्या व्यक्तींनी मोठी गुंतवणूक करून कायदेशीर समस्या टाळाव्या. शुभ रंग : Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : गरिबांना अन्नधान्य किंवा हिरव्या डाळी दान कराव्यात. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमची बुद्धिमत्ता आणि वैविध्य असलेल्या दृष्टिकोनामुळे तुम्हाला खेळ जिंकता येतो; मात्र त्यामुळे आत्मकेंद्रीपणाही येतो. भावनांवर नियंत्रण ठेवा आणि दुसऱ्यांना दुखावणं टाळा. आजचा दिवस तुमच्या कामगिरीची दखल घेतली जाण्याचा आणि बक्षीस मिळण्याचा आहे. आजचा दिवस मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा आहे. कारण लवकरच आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. क्रीडापटू, निवेदक, ज्वेलर्स, विद्यार्थी, ट्रॅव्हलर्स यांच्या प्रयत्नांना चांगलं यश मिळेल. नशिबाची साथ मिळण्यासाठी बैठकीत हिरव्या रंगाचे कपडे घाला. कामातून ब्रेक घ्या, थोडा वेळ बाहेर जा, रिलॅक्स व्हा, एंजॉय करा. शुभ रंग : Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : गायी-गुरांना हिरवं धान्य खाऊ घाला. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमच्या आत्मसन्मानाला धक्का लागणार नाही, याची काळजी घ्यावी. व्यवहार आणि कायदेशीर डॉक्युमेंटेशन यांमध्ये आज सावधगिरी बाळगा. तुम्ही आज कृतिशील असाल आणि एकाच वेळी अनेक कामं पूर्ण कराल. आज तुमच्या मनावर त्यागाची भावना राज्य करील; मात्र फसवले जाण्यापासून सावध राहा. आज कौटुंबिक आयुष्यात डिप्लोमॅटिक वागू नका. कारण त्यातून अधिक समस्या निर्माण होतील. हॉटेलियर, ट्रॅव्हलर्स, ज्वेलर्स, अभिनेते, जॉकी, डॉक्टर्स आदी व्यक्ती त्यांचं कौशल्य प्रदर्शित करतील. आजचा दिवस त्यांच्यासाठी लकी आहे. शिक्षण क्षेत्रातल्या पुढच्या वाटचालीसाठी आई-वडिलांचं मार्गदर्शन घ्या. ते अनुकूल ठरेल. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : अनाथांना दूध दान करावं. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) अनेक गुंतागुंतीचे व्यवहार झाल्यानंतर बिझनेसमध्ये खूप नफा मिळवून देणारा आजचा दिवस आहे. आज पूर्वज, गुरू आणि आईचे आशीर्वाद घ्या. चांगला नफा मिळेल. तुमचे नेतृत्वगुण आणि विश्लेषण कौशल्य ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्यं आहेत. आज आर्थिक व्यवहार करताना शहाणपण विसरू नका. तुमच्या स्टाफचा गैरवापर करणं, त्यांच्यावर अविश्वास दाखवणं अशी कृत्यं करू नका. प्रेमसंबंधांमध्ये काही गोंधळ निर्माण होईल. औषधं, हीलिंग, कोर्ट्स, स्टेशनरी, नाट्य, तंत्रज्ञान, संरक्षण, सरकारी टेंडर्स, रिअल इस्टेट, शाळा, इंटिरिअर्स, धान्यं आदी क्षेत्रांत काम करणाऱ्यांसाठी चांगला दिवस. शुभ रंग : Yellow शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : मंदिरात मोहरी दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) पैसे किंवा प्रॉपर्टीशी संबंधित मुद्दे अद्याप प्रलंबित आहेत. सॉफ्टवेअर क्षेत्रातले कर्मचारी, तसंच डॉक्टर्सना प्रगतीसाठी नवं काही हाती मिळेल. स्टाफ मेंबर्सशी बोलताना मृदू भाषेचा वापर करा. रूटीन पाळा आणि हेल्दी लाइफस्टाइल अंगीकारा. सामाजिक कामासाठी बाहेर पडण्याचा दिवस. या कामातून देवाचे आशीर्वाद घ्याल. बिझनेसमधले व्यवहार खूप प्रयत्नांनंतर यशस्वी होतील. कॉर्पोरेट इव्हेंट्स, लग्नं, प्रेझेंटेशन्स, सरकारी करार किंवा इंटरव्ह्यूज आदींना जरूर उपस्थित राहावं. समृद्धीसाठी आज भगवान शिव आणि भगवान शनी यांचे आशीर्वाद घ्यावेत. शुभ रंग : Blue & Yellow शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गायी-गुरांना पालक खाऊ घाला. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचं भविष्यातलं नियोजन आणि गुंतवणुकीचे प्लॅन्स एका दिवसासाठी थांबवा. महिलांनी एखाद्या प्रकारचा वर्कआउट करावा. अभिनय, मीडिया, अँकरिंग, क्रीडा, बांधकाम, मेडिकल, राजकारण आणि ग्लॅमर इंडस्ट्रीत बरेच चढ-उतार पाहायला मिळतील. आजचा दिवस खूप कामाचा आहे आणि परतावा सरासरी असेल. प्रगतीसाठी फॅमिली कनेक्शन्सना भेटण्याचा दिवस आहे. दिवसाची सकारात्मक सुरुवात होण्यासाठी पिवळा भात खावा. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9, 6 दान : गरिबांना लाल रंगाचं धान्य दान करावं. 25 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : जॉर्ज ऑर्वेल, करिष्मा कपूर, आफताब शिवदासानी, शाह आलम 2, व्ही. पी. सिंग, सतीश शहा, सुरेश कृष्णा
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या