ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 24 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमची मानसिक ताकद खूप ठेवा. कारण आजचा दिवस आर्थिक व्यवहारांसाठी अवघड असू शकेल. प्रॅक्टिकल विचार करा आणि पार्टनरशिप्स टाळा. तुम्हाला एखादी व्यक्ती भेटेल, जी कायदेशीर आणि ऑफिशियल समस्या सोडवू शकेल; मात्र विश्वास ठेवू नका. अभिनेते, राजकीय नेते यांनी नवे प्रोजेक्ट्स नाकारावेत. कारण त्यातून त्यांची बदनामी होण्याची शक्यता आहे. अधिक आकर्षक दिसण्यासाठी चामड्याच्या वस्तू वापरणं टाळा. सूर्यदेवाची पूजा करा आणि कायमच त्याचे आशीर्वाद घ्या.
शुभ रंग : Aqua
शुभ दिवस : रविवार
शुभ अंक : 9
दान : आश्रमात गहू दान करावेत.
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
स्वतंत्र उद्योगांपेक्षा पार्टनरशिप्स फर्म्स अधिक यशस्वी ठरतील. जीवनात समृद्धी येण्यासाठी आज घरात आणि कुटुंबात जबाबदारी घेतलीच पाहिजे. तुमच्या प्रेमभावनांचं कायमस्वरूपी नातेसंबंधांत रूपांतर करण्यासाठी आजचा दिवस रोमँटिक आहे. बिझनेस कमिटमेंट्स थोडा उशीर होऊन पूर्ण होतील. मोठ्या कंपनीशी पार्टनरशिप करण्यासाठी योग्य काळ. आज प्रवास टाळा. वितरक, राजकीय नेते, वकील, रिटेलर्स, शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर्स, ज्वेलर्स आदींनी कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना सावधगिरी बाळगायला हवी.
शुभ रंग : Sky Blue
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 2, 6
दान : मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला दही दान करा.
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
वैयक्तिक आयुष्यात नवी सुरुवात होण्याची शक्यता आहे. तुमचं व्यक्तिमत्त्व खूप आकर्षक आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रदर्शन घडवता, तेव्हा तुम्ही नशीबवान ठरता. योगा ट्रेनर्स, शिक्षणतज्ज्ञ, मार्केटिंग आणि विक्री क्षेत्रातल्या व्यक्ती, संगीतकार, डिझायनर्स, विद्यार्थी, न्यूज अँकर्स, राजकीय नेते, अभिनेते, कलाकार, गृहिणी, हॉटेलियर्स, लेखक यांना आज करिअरमध्ये विशेष नफा होईल. दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी कपाळावर चंदन लावा.
शुभ रंग : Red & Blue
शुभ दिवस : गुरुवार
शुभ अंक : 3, 1
दान : मंदिरात चंदनाचं खोड दान करावं.
#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस नव्या स्रोतांतून किंवा नव्या कल्पनेच्या माध्यमातून पैसे मिळवण्याचा आहे. डोळे उघडा आणि मित्राने किंवा बॉसने दिलेल्या ऑफरचं स्वागत करा. धान्य दान केल्यामुळे खूप आशीर्वाद मिळतील. आज आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. ब्रोकर्स, कन्स्ट्रक्शन, मशिनरी, धातू, सॉफ्टवेअर, फार्मास्युटिकल आदी बिझनेसमधल्या व्यक्तींनी आज करारावर स्वाक्षऱ्या करणं टाळावं. उत्तम आर्थिक व्यवस्थापनामुळे तुमचा तोटा कमी आणि फायदा जास्त होईल. तुम्हाला मुलांविषयी अभिमान वाटेल.
शुभ रंग : Blue
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 9
दान : अनाथाश्रमात डाळी दान कराव्यात.
#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
प्रसिद्धी आणि करिअरमधली प्रगती यासाठी आज तुमचं मजबूत सोशल नेटवर्क साह्य करील. आज गोंधळात किंवा संभ्रमात पडू नका. प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटबद्दलचे महत्त्वाचे निर्णय स्वतःच्या इच्छेनेच घ्या. क्रीडापटू आणि प्रवासी व्यक्तींना सर्वोत्तम गोष्टींची वाट पाहावी लागेल. मीटिंगमध्ये नशीब अनुकूल ठरण्यासाठी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावेत. घरून काम करणं टाळावं. तसंच दिवसात चांगलं काम होण्यासाठी आळसही टाळावा.
शुभ रंग : Sea Green
शुभ दिवस : बुधवार
शुभ अंक : 5
दान : मुलांना हिरवं पेन दान करा.
# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज घरून किंवा ऑनलाइन काम करण्याची शिफारस केली जात आहे. करिअरमध्ये चांगली प्रगती आणि यश मिळवून देण्यासारखी स्थिती आहे. सर्वांकडून प्रेम, आदर, कौतुक मिळण्याच्या दृष्टीने तुम्ही नशीबवान आहात. गृहिणी, शिक्षक, ज्वेलर्स, अभिनेते, जॉकी, डॉक्टर्स त्यांची कौशल्यं दाखवतील आणि दिवस त्यांच्यासाठी लकी असेल. मुलांच्या कामगिरीमुळे पालकांना अभिमान वाटेल. ते देवाचे आभार मानतील.
शुभ रंग : Blue & Sea Green
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6
दान : आश्रमांना स्टीलचं भांडं दान करावं.
#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
भूतकाळ विसरून पुढे वाटचाल करणं ही भविष्याचं दार उघडण्याची किल्ली आहे. वेदनेचं कारण नष्ट करण्याची आता गरज आहे. कामाच्या ठिकाणी ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला स्वीकारा आणि त्यानुसार वागा. कपल्समधली रिलेशनशिप प्रेम आणि आदराच्या भावनेमुळे मजबूत बनत जाईल. आज महत्त्वाच्या कागदपत्रांवर विनाविलंब सह्या करू शकता. हीलिंग, मोटिव्हेशन, ऑकल्ट सायन्स, स्पिरिच्युअॅलिटी स्कूल्स, शेती, धान्यं आदी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्तम. जोपर्यंत तुमच्या बोलण्यात मृदूपणा असेल, तोपर्यंत बिझनेस रिलेशन्स हेल्दी राहतील.
शुभ रंग : Orange & Blue
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 7
दान : गरिबांना पिवळे तांदूळ दान करावेत.
#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
नव्या संधी आणि नवी नाती यांच्यासाठी दक्ष राहण्याची काळजी घ्या. एकापेक्षा अधिक उद्दिष्टं गाठण्यासाठी आज तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतील. तुमच्यासोबत कार्यरत असलेली एक वरिष्ठ व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करते. त्या व्यक्तीचं म्हणणं ऐका. बिझनेसमधले व्यवहार यशस्वी आणि फायदेशीर ठरतील. करार किंवा इंटरव्ह्यू यांत कोणताही विलंब करता कामा नये. आज कौटुंबिक सोहळ्यासाठी, मित्रांच्या पार्टीसाठी वेळ द्याल. आज सोशल नेटवर्क वाढवाल आणि प्रेमसंबंधांत विश्वास राखाल.
शुभ रंग : Sea Blue
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6
दान : गायी-गुरांना हिरवं धान्य खाऊ घाला.
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
समस्या सुटण्याच्या दिशेने वाटचाल होत आहे. त्यामुळे आज तुम्ही अधिक रिलॅक्स आणि समृद्ध असाल. शिक्षण, कायदा, कौन्सेलिंग, फायनान्स या क्षेत्रांतल्या व्यक्ती नवी उंची गाठतील. कलाकारांना नव्या आशेचा दिवस असेल. बिझनेस किंवा जॉबमध्ये सामर्थ्य मिळवण्यासाठी जुन्या मित्रांना भेटण्याकरिता उत्तम दिवस. कारण चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता. दिवसाची सुरुवात करताना लाल रंगाचे कपडे घालावेत. तुमचा लग्नाचा प्लॅन कुटुंबीयांशी शेअर करण्यासाठी चांगला दिवस आहे. कारण त्यांच्या पाठिंब्यामुळे भविष्य सुकर होईल. खर्चांवर नियंत्रण ठेवा. आहारात Veg Citrus Meal चा समावेश ठेवावा.
शुभ रंग : Red
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 9, 6
दान : गरिबांना कलिंगड दान करावं.
24 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : विजयाशांती, गौतम अदानी, सुमोना चक्रवर्ती, अतुल अग्निहोत्री, मुरली मोहन, मधू बालकृष्णन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya