मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : कुणाला मिळणार जोडीदार, तर कुणाला करावा लागेल संघर्ष; प्रेमासाठी असा असेल आजचा दिवस

Numerology : कुणाला मिळणार जोडीदार, तर कुणाला करावा लागेल संघर्ष; प्रेमासाठी असा असेल आजचा दिवस

Numerology 23 June 2022 : अंकशास्त्रानुसार प्रेमात आज कुणाला काय मिळणार पाहा.

Numerology 23 June 2022 : अंकशास्त्रानुसार प्रेमात आज कुणाला काय मिळणार पाहा.

Numerology 23 June 2022 : अंकशास्त्रानुसार प्रेमात आज कुणाला काय मिळणार पाहा.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 23 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस तुमची पॅशन फॉलो करण्याचा आहे. तुम्ही मॅचेस आणि स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हाल; मात्र जुगार किंवा स्टॉक मार्केटपासून लांब राहा. तुमच्या युनिकनेसमधून ब्रँड तयार करण्यासाठी, तसंच कामाच्या ठिकाणी उच्च पद स्वीकारण्यासाठी तुम्ही कॉन्फिडंट आणि इंडिपेंडंट आहात. नशीब तुम्हाला साथ देईल. सिंगल व्यक्ती प्रेमाचा शोध घेण्यासाठी संघर्ष करतील. जोडीदारावर तुमचा प्रभाव पडेल आणि तुम्हाला जोडीदाराचं साह्य मिळेल. आज पुरस्कार, प्रपोझल, बक्षीस किंवा प्रिय व्यक्तींकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता असल्याने चेहऱ्यावर हसू खुलेल. अभिनय, सौर ऊर्जा, आर्ट वर्क, कॉस्मेटिक्स, कृषी आणि प्रॉपर्टी आदी क्षेत्रांतल्या व्यक्ती आज बाजारपेठेवर राज्य करतील.

शुभ रंग : Teal

शुभ दिवस : रविवार

शुभ अंक : 1, 5

दान : गरिबांना केळी दान करावीत.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमचं नशीब प्रोफेशनल लाइफमध्ये खूप काम करतं; मात्र नातेसंबंधांत येणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीवर लक्ष ठेवा. महिलांनी आज नव्या नोकरीसाठी अर्ज करावा किंवा बिझनेसच्या दृष्टीने पाऊल टाकावं. महिला आज उद्योग-व्यवसायात गुंतवणूकही करू शकतात. मुलांना आज आत्मविश्वास वाटेल, ती कष्ट करतील, त्यांना नशीब साथ देईल, त्यांची कामगिरी उत्तम होईल. पालकांना आपल्या मुलांच्या शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल अभिमान वाटेल. रोमान्समुळे कपल्समधले नातेसंबंध बहरतील; मात्र गर्दीपासून आणि पार्टीजपासून दूर राहा. महत्त्वाच्या इंटरव्ह्यूजमध्ये Sea Green रंगाचे कपडे घालणं शुभफलदायी ठरेल. भविष्यात मदत मिळणं सोयीचं व्हावं, यासाठी ज्येष्ठांसोबत काही वेळ व्यतीत करा. माध्यमकर्मी, राजकीय नेते, डिझायनर्स, डॉक्टर्स, अभिनेते आदींना खास यश मिळेल.

शुभ रंग : Sea Green

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 2, 6

दान : मंदिरात नारळ दान करावा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमची कौशल्यं आणि नियोजनावर आत्मविश्वास ठेवा. तुमच्या शत्रूंनी तुम्हाला खाली ओढण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी सर्व गोष्टी व्यवस्थित होत आहेत. रिलेशनशिपवर विपरीत परिणाम होणार नाही. आज रात्री जेवण्यासाठी बाहेर जा. क्रिएटिव्ह व्यक्तींना गुंतवणुकीसाठी आणि परतावा मिळण्यासाठी चांगला काळ आहे. एखादं व्हेंचर सुरू करण्याबद्दलचा विचार आज यशस्वीपणे केला जाऊ शकतो. क्रीडापटू, स्टॉक ब्रोकर्स, एअरलाइन एम्प्लॉयीज, शिक्षणतज्ज्ञ, हॉटेलियर्स, संगीतकार आणि राजकीय नेते आदींना प्रसिद्धी मिळेल. उद्योजक/व्यावसायिक दुपारी जेवणानंतर क्लायंट्सना भेटतील.

शुभ रंग : Brown

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3, 1

दान : आश्रमात गहू दान करावेत.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

प्रलंबित किंवा उशीर झालेल्या असाइनमेंट्स आज पूर्ण होतील. आर्थिक आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजीज कृतीत उतरवा आणि परताव्याचा आनंद घ्या. आजचा दिवस दमवणारा आहे; मात्र निर्णय तुम्हाला अनुकूल होत असल्याचं सकाळपासूनच जाणवेल. तरुण व्यक्ती प्रेमभावना व्यक्त करतील. नातेसंबंध किंवा मैत्रीत विश्वासघात करू नका. आज नॉन-व्हेज आणि मद्यपान टाळा.

शुभ रंग : Teal

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : गरिबांना हिरवं धान्य दान करावं.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

बहुतांश वेळ प्रवास, मौजमजा, खरेदी, पार्टी किंवा सेलिब्रेशन यात जाईल. करिअरमध्ये चांगली प्रगती व्हायला हवी असेल, तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वेळ वाया घालवणं थांबवा आणि उपलब्ध स्रोतांचा जास्तीत जास्त वापर करा. आजचा दिवस रिलेशनशिप्स आणि प्रवासाचा आनंद घेण्याचा, जोखीम उचलण्याचा, प्रॉपर्टी खरेदी करण्याचा, मॅचेस खेळण्याचा आणि स्पर्धेला हजर राहण्याचा आहे. आज एखादा आरामदायी, छोटा प्रवास घडेल. एखाद्या खास व्यक्तीशी भेट होण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्हाला हव्या असलेल्या छोट्या-मोठ्या वस्तूंची खरेदी करा. सर्व वस्तू तुमच्यासाठी चांगल्या ठरतील. प्रमोशनचं अप्रूव्हल मिळवण्यासाठी जाण्याचा दिवस. सिंगल असलेल्यांना आज योग्य जोडीदार मिळू शकेल.

शुभ रंग : Sea Green

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : मुलांना हिरवी झाडं दान करावीत.

# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या निरागसपणाचा बाकीच्या व्यक्ती फायदा घेतील आणि त्यांच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर ढकलतील; पण तुम्ही ते टाळावं. उच्च शिक्षण, नवं घर, जॉब, नवी रिलेशन्स, आर्थिक लाभ, प्रवास, पार्टी अशा काही गोष्टींचा आनंद आज घेऊ शकाल. कमिटमेंट्स खूप मोठ्या आहेत; पण तुम्ही त्याचा आनंद घ्याल. आज सर्व उद्दिष्टं पूर्ण होतील. तुम्ही एखाद्या स्टारप्रमाणे तुमची ओळख निर्माण कराल. राजकीय नेते, क्रीडापटू, ब्रोकर्स, रिटेलर्स, हॉटेलियर्स, विद्यार्थी त्यांची उद्दिष्टं पूर्ण करून विजयी होतील. गृहिणी आणि शिक्षकांना कुटुंबीयांकडून आदर आणि प्रेम मिळेल. सरकारी अधिकाऱ्यांना नवं प्रोफाइल आणि प्रमोशन मिळेल. प्रॉपर्टी डील्स सहजपणे हाताळली जातील. प्रलंबित असलेले लग्नाचे प्रस्ताव आज प्रत्यक्षात येऊ शकतील.

शुभ रंग : Sky Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6, 2

दान : मुलांना निळ्या पेन्सिल्स किंवा पेन दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस गुरूमंत्राचा जप करून सुरू करा. तसंच पूर्वजांचं स्मरणही करा. पुरुषांना व्यवसायात कदाचित संघर्ष करावा लागेल; मात्र महिलांची प्रगती होईल. आज केवळ विश्वास या घटकाची मोजणी केली जाऊ शकेल. त्यामुळे भाषण करण्यापूर्वी त्यातल्या मुद्द्यांची उजळणी आणि विश्लेषण करा. घरून काम करणं टाळा आणि पिवळ्या डाळी दान करा. छोट्या ब्रँड्सना मोठ्या ब्रँड्सच्या तुलनेत अधिक फायदा होईल. वकील, सॉफ्टवेअर तंत्रज्ञांनी घरून काम करणं टाळावं आणि ऑफिसला जावं.

शुभ रंग : Orange & Green

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 7

दान : अनाथांना स्टेशनरीच्या वस्तू दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

उद्दिष्टाच्या दिशेने काम करणं सुरू ठेवा. कारण उद्दिष्ट जवळ आलं आहे. आत्मविश्वास आणि खूप कष्ट या दोन गोष्टी आज तुम्हाला कोणत्याही कठीण प्रसंगातून बाहेर काढतील. आजचा दिवस गायींसाठी दानधर्म करण्याकरिता उत्तम आहे. कपल्समध्ये आनंदाचे क्षण येतील. डॉक्टर्स, बिल्डर्स, नाट्य कलावंत, फार्मासिस्ट्स, इंजिनीअर्स आणि मॅन्युफॅक्चरर्सना आर्थिक लाभ होईल. मशिनरी, इन्व्हेंटरी, फर्निचर आदींच्या खरेदीसाठी, तसंच धातू किंवा जमिनीच्या खरेदीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. बिझी दिवस असेल. त्यामुळे शारीरिक तक्रारी उद्भवू शकतील. आज हिरवळीवर किंवा हिरवाईच्या सान्निध्यात काही वेळ घालवा.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : अनाथाश्रमात मोहरीचं तेल दान करा.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

सकाळी ध्यानधारणा करा. त्यामुळे आज घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या घरगुती समस्यांवर उपाय निघू शकेल. अभिनेते, गायक, डिझायनर्स, राजकीय नेते, डॉक्टर्स, लेखक, इतिहासकार, माध्यमकर्मी आदींना आज प्रसिद्धी, संधी, स्थिरता, समृद्धी आणि आराम या सगळ्या गोष्टी मिळतील. सोन्यासारख्या धातूत किंवा जमिनीत बिझनेस इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आदर्श दिवस. तरुणांना त्यांच्या पार्टनर्सना प्रभावित करण्यासाठी अनुकूल दिवस. हॉटेलिंग, कार्यक्रमाला उपस्थित राहणं, पार्टी आयोजित करणं, ज्वेलरीची खरेदी करणं, कौन्सेलिंग करणं किंवा खेळ खेळणं आदींसाठी आजचा दिवस चांगला.

शुभ रंग : Brown

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9, 6

दान : गरिबांना टोमॅटो दान करा.

23 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : रेहमान, राज बब्बर, तन्मय भट, वीरभद्रसिंह, एन. भास्कर राव, प्रशांत भूषण

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya