मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : तुमची जन्मतारीख सांगतेय नक्की होणार तुमचं प्रमोशन; अंकशास्त्रानुसार पाहा भविष्य

Numerology : तुमची जन्मतारीख सांगतेय नक्की होणार तुमचं प्रमोशन; अंकशास्त्रानुसार पाहा भविष्य

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 23 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुम्हाला चांगली सोबत मिळेल. बऱ्याच दिवसांपासूनचा एकटेपणा दूर होईल. आज भरपूर जण तुमच्याशी संवाद साधतील. तुमच्या कामाच्या माध्यमातून भरपूर प्रसिद्धी मिळेल. तसंच प्रमोशन होण्याची शक्यताही आहे. वैयक्तिक जीवनामध्ये नशीब तुमच्या बाजूने राहील. जोडीदारावर तुमची चांगली छाप पडेल. अभिनय, सोलर एनर्जी, आर्टवर्क, कॉस्मेटिक्स, शेती आणि प्रॉपर्टी डीलिंग क्षेत्रांतल्या व्यक्तींना भरपूर यश मिळेल. शुभ रंग : Green and Yellow शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 आणि 5 दान : कृपया आश्रमांमध्ये गहू दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आपल्या सहकाऱ्यांवर आज आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. महिलांना कामाच्या ठिकाणी आणि घरीदेखील आपलं कौशल्य दाखवून छाप पाडण्याची संधी मिळेल. लहान मुलांना भरपूर आत्मविश्वास आणि नशिबाची साथ लाभेल. पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणातल्या प्रगतीबद्दल अभिमान वाटेल. जोडप्यांसाठी आज रोमँटिक वातावरण राहील, ज्यामुळे नातेसंबंध दृढ होतील. महत्त्वाच्या बैठकीला किंवा मुलाखतीला जाताना पांढरे किंवा अ‍ॅक्वा रंगाचे कपडे घातल्यास फायदा होईल. आध्यात्मिक गुरूंच्या सान्निध्यात काही काळ व्यतीत केल्यास भविष्यासाठी फायद्याचं ठरेल. मीडिया क्षेत्रातल्या व्यक्ती, राजकीय व्यक्ती, डिझायनर, डॉक्टर आणि अभिनेत्यांना मोठं यश मिळेल. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 आणि 6 दान : कृपया गरिबांना साखर दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज येणारी एखादी नवी ऑफर किंवा नवा बदल स्वीकारा. यामुळे नशीब उजळेल. रिलेशनशिप टिकवण्यासाठी संवाद साधणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. कलाकार व्यक्तींना गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. एखादं नवीन व्हेंचर सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. खेळाडू, स्टॉक ब्रोकर, विमान कर्मचारी, डिफेन्स कर्मचारी, शिक्षणतज्ज्ञ, हॉटेल व्यावसायिक, संगीतकार आणि राजकीय व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी आणि प्रमोशन मिळेल. बिझनेस क्लायंटना दुपारच्या जेवणानंतर भेटणं उत्तम. शुभ रंग : Brown शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया आश्रमात ब्राउन शुगर दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज कमी मेहनतीत जास्त काम होईल. ठरवलेली सर्व कामं अगदी सुरळीत पार पडतील. मार्केटिंग स्ट्रॅटेजीला नशिबाची साथ मिळेल. आजचा दिवस काहीसा निरर्थक वाटेल; मात्र संध्याकाळनंतर सर्व गोष्टी तुमच्या बाजूने होतील. तरुणांनी आपल्या मनातल्या प्रेमभावना व्यक्त कराव्यात आणि मैत्री किंवा रिलेशनशिपचा गैरफायदा घेणं टाळावं. आज कृपया मांसाहार आणि मद्यपान टाळा. शुभ रंग : Teal शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया गरिबांना कपडे दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचं नशीब सध्या तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे आज करिअरमध्ये भरपूर वृद्धी होईल. रिलेशनशिप, शॉपिंग, रिस्क टेकिंग, स्टॉक विकत घेणं, स्पर्धा किंवा खेळात सहभागी होणं या सर्व गोष्टींसाठी आज चांगला दिवस आहे. एखादा छोटासा, मात्र आरामदायी प्रवास घडेल. एखाद्या खास व्यक्तीची भेट होऊ शकते. आज खरेदी केलेली कोणतीही वस्तू भविष्यात फायद्याची ठरेल. शेअर मार्केट किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल. प्रमोशन आणि अप्रैझल रखडलं असेल, तर आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया हिरवी रोपं दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस हा तुमचा आहे. नवं घर, नवी नोकरी, नवीन नातेसंबंध, आर्थिक फायदा, ऐशोआराम, समाधान, प्रवासाचे बेत, पार्टी असं सर्व काही आज तुमच्या नशिबात वाढून ठेवलंय. आज तुमची सर्व टार्गेट्स आरामात पूर्ण होतील. राजकीय व्यक्ती, गृहिणी, खेळाडू, ब्रोकर, रिटेल व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना मोठं यश मिळेल. गृहिणी आणि शिक्षकांना कुटुंबीयांकडून भरपूर प्रेम मिळेल. सरकारी अधिकाऱ्यांना नवीन प्रोफाइल किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कलाकार व्यक्ती भरपूर लोकांवर छाप पाडतील. प्रॉपर्टी संबंधी व्यवहार आरामात पार पडतील. विवाहासाठी अनुरूप स्थळ मिळेल. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 आणि 2 दान : कृपया लहान मुलांना निळं पेन किंवा पेन्सिल दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज कोर्ट केस आणि कागदपत्रांशी संबंधित गोष्टींमध्ये खबरदारी बाळगा. दिवसाची सुरुवात गुरुनामाच्या जपाने, तसंच वडिलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेऊन केल्यास फायदा होईल. ज्येष्ठ महिलांना बिझनेस डील्स फायद्याची ठरतील. आज कोणावरही विश्वास ठेवू शकणार नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी असलेल्या सहकाऱ्यांसोबत भावनिक गोष्टी शेअर करू नका. आज पिवळ्या डाळी दान करणं फायद्याचं ठरेल. मोठ्या ब्रँड्सपेक्षा लहान ब्रँड्सना अधिक फायदा होईल. वकील आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या व्यक्तींनी आज घरून काम करणं टाळावं. शुभ रंग : Orange शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया तांब्याची भांडी दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) जगात कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते हे लक्षात घ्या आणि इतरांना जज करणं थांबवा. भूतकाळात केलेली मेहनत आणि तुमचा आत्मविश्वास या गोष्टींमुळे आज कोणत्याही अडचणीवर आरामात मात कराल. गायींसाठी दानधर्म करणं फायद्याचं ठरेल. जोडप्यांमध्ये नातेसंबंध खुलवणाऱ्या काही घटना घडतील. डॉक्टर, बांधकाम व्यावसायिक, नाट्य कलाकार, फार्मासिस्ट, इंजिनीअर आणि उत्पादक असणाऱ्या व्यक्तींना आर्थिक फायदा होईल. मशिनरी विकत घेण्यासाठी आणि मेटल खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस. कामाच्या तणावामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. झोपण्यापूर्वी योगासनं केल्यामुळे फायदा होईल. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया अनाथाश्रमात मोहरीचं तेल दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) इतरांना मदत करण्यापूर्वी घरातल्या समस्या सोडवणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. मास कम्युनिकेशन क्षेत्रातल्या व्यक्ती म्हणजेच अभिनेते, गायक, डिझायनर, राजकीय व्यक्ती, डॉक्टर, लेखक, इतिहासकार किंवा मीडिया कर्मचारी यांना भरपूर प्रसिद्धी, पैसा आणि समाधान लाभेल. शेअर मार्केट आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. तरुणांना आपल्या जोडीदारावर छाप पाडण्याची संधी मिळेल. मित्र जोडणं, हॉटेलमध्ये जाणं, ऑडिशनला उपस्थित राहणं, इव्हेंट, पार्टी होस्ट करणं, ज्वेलरी खरेदी करणं, समुपदेशन किंवा खेळासाठी उत्तम दिवस. शुभ रंग : Brown शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 आणि 6 दान : कृपया एखाद्या लहान मुलीला लाल रुमाल दान करा. 23 जुलै रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : बाळ गंगाधर टिळक, चंद्रशेखर आझाद, अभिनेता सूर्या, एल. सुब्रह्मण्यम, हिमेश रेशमिया, युझवेंद्र चहल, राजा चौधरी, मोहन आगाशे, कोडी रामकृष्ण
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Zodiac signs

पुढील बातम्या