मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : 'या' जन्मतारखेच्या व्यक्तींनी आज सावध राहावं; फसवणूक होण्याची शक्यता

Numerology : 'या' जन्मतारखेच्या व्यक्तींनी आज सावध राहावं; फसवणूक होण्याची शक्यता

Numerology 22 June 2022 : अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचा आजचा दिवस कसा जाणार पाहा.

Numerology 22 June 2022 : अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचा आजचा दिवस कसा जाणार पाहा.

Numerology 22 June 2022 : अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचा आजचा दिवस कसा जाणार पाहा.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 22 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जावं लागेल; मात्र तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा. सध्याची परिस्थिती गुंतागुंतीची वाटत असली, तरी भविष्यात ती तुमच्या फायद्याची ठरणार आहे. संपत्ती विक्री करून पैसे कमावण्यासाठी चांगला दिवस. टूल्स, मशीन, फर्निचर, साहित्य, औषध, ग्लॅमर, बांधकाम, ट्रॅव्हल एजन्सी अशा व्यवसायांतल्या व्यक्तींना आर्थिक फायदा संभवतो. राजकीय नेते आणि वैमानिकांना नेतृत्व मिळेल; मात्र निकाल विवादित राहील. लहान मुलांना शिक्षकांकडून वा प्रशिक्षकांकडून कौतुकाची थाप मिळेल. शुभ रंग : निळा (Blue) शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना केळी दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस तडजोड करण्याचा आहे. बऱ्याच ठिकाणी नमतं घ्यावं लागेल. लोक तुमच्या इच्छा-आकांक्षा दाबण्याचा प्रयत्न करतील. इतरांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध राहा. एखादी व्यक्ती तुमचा पाणउतारा करू शकते. त्यामुळे खबरदारी बाळगा. महिलांनी जोडीदाराच्या सावध स्वभावाकडे दुर्लक्ष करावं. आज सरकारी काँट्रॅक्ट मिळवण्यासाठी जुन्या ओळखींची मदत घ्या. ट्रान्सपोर्ट आणि ट्रॅव्हल व्यावसायिकांना नव्या ऑफर मिळतील. कायदेशीर कमिटमेंट्स आरामात पार पडतील. शुभ रंग : आकाशी निळा (Sky Blue) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 6 दान : कृपया मंदिरांमध्ये पांढरी मिठाई दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) मित्र आणि सहकाऱ्यांसोबतचे नातेसंबंध तणावपूर्ण राहतील. तुम्हाला जे बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोलल्यास गोंधळ टळेल. गुरू आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेण्यासाठी चांगला दिवस. संगीतकार, लेखक, राजकीय नेते, उत्पादक, डॉक्टर आणि मीडिया या क्षेत्रांतल्या व्यक्तींनी आज घेतलेले निर्णय फायद्याचे ठरतील. आज केलेली गुंतवणूक भविष्यात उत्तम परतावा देईल. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी मनातल्या भावना बोलून दाखवाव्यात. तसंच भविष्याचं प्लॅनिंग करणंही उत्तम. सरकारी अधिकाऱ्यांनी आजूबाजूच्या वातावरणाबाबत सावध राहावं. आज तुमच्या गुरूच्या नामाचा जप करणं गरजेचं आहे. तसंच, दिवसाची सुरुवात करताना कपाळावर चंदनाचा टिळा लावणं उत्तम. शुभ रंग : केशरी आणि निळा (Orange and Blue) शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया महिला मदतनीसाला केशर दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमचा परफॉर्मन्स सर्वांना दाखवण्याचा दिवस आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक कमाई कराल. आळशीपणा टाळल्यास तुम्ही हवं ते मिळवू शकाल. उत्पादक आणि शेतकऱ्यांनी नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याचा निर्णय थांबवावा. मीडिया, मार्केटिंग, मनोरंजन या क्षेत्रांमधल्या व्यक्ती आणि सर्जन, राजकीय व्यक्तींसाठी आज प्रवास फायद्याचा ठरेल. मेडिकल, सॉफ्टवेअर, हस्तकला, मेटल या क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. विद्यार्थ्यांना ध्येयप्राप्तीसाठी आपल्या योजनेवर भरपूर मेहनत घ्यावी लागेल. मार्केटिंग क्षेत्रातल्या व्यक्तींनी आज घरून काम करणं टाळावं. कृपया मांसाहार टाळा, आणि मेडिटेशन करा. शुभ रंग : निळा (Blue) शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 9 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना संत्री दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमची हुशारी तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करील. वैयक्तिक आयुष्यात वातावरण रोमँटिक राहील, कमिटमेंट कराल. तुमच्या कामाबद्दल प्रसिद्धी आणि फायदा मिळवण्याचा दिवस आहे. आज सोशलायझिंग टाळून कामावर लक्ष केंद्रित करा. निवेदक, ट्रॅव्हल एजंट, ब्रोकर, प्रॉपर्टी डीलर, बँकर्स, खेळाडू आणि राजकीय नेते या व्यक्तींचं भाग्य आज जोरावर असेल. सेल्स आणि खेळातल्या व्यक्तींनी आज जलद गतीने कामं करावीत. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. शुभ रंग : अ‍ॅक्वा (Aqua) शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया गरिबांना हिरवी केळी दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमच्यासमोर येणाऱ्या नव्या प्रस्तावांकडे दुर्लक्ष करा. सध्या तुमच्याकडे जो पर्याय आहे त्यावर लक्ष केंद्रित केल्यास उत्तम. तुमची कौशल्यं आणि प्रोफाइल अपग्रेड करण्यासाठी उत्तम दिवस. अप्रैझलची वाट पाहत असाल, तर आणखी थोडं थांबावं लागणार आहे. नवीन घर किंवा नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना आज काही चांगले पर्याय मिळतील. अभिनेते, गृहिणी, डॉक्टर, वकील आणि मीडिया या क्षेत्रांतल्या व्यक्तींना मोठं यश मिळेल. आज कामासाठी प्रवास टाळा. घरून काम केल्यास उत्तम. शुभ रंग : Teal शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरिबांना मिठाई दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) भविष्यातल्या आपल्या फायद्यासाठी एखादा नवीन कोर्स किंवा क्लास जॉइन करा. सरकारी अधिकारी, तरुण राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, डिफेन्स अधिकारी, वकील, वैज्ञानिक, शेतकरी, वितरक आणि सीए या व्यक्तींना करिअरमध्ये भरपूर प्रगती संभवते. खेळ आणि शिक्षण क्षेत्रांत यश मिळवण्यासाठी आईचा आशीर्वाद पाठीशी असणं गरजेचं. नातेसंबंधांमध्ये बरेच चढ-उतार येऊ शकतात, त्यामुळे चर्चा टाळल्यास उत्तम. गुरुमंत्राचा जप करणं फायद्याचं राहील. प्रामाणिक राहिलात, तर सर्व क्षेत्रांमध्ये यश मिळवाल. राजकीय नेत्यांना सभा घेण्यासाठी, तसंच वरिष्ठांवर छाप पाडण्यासाठी उत्तम दिवस. तरुणांना शेअऱ मार्केटमध्ये फायदा होईल. शुभ रंग : पिवळा (Yellow) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया मंदिरामध्ये सूर्यफुलाचं तेल दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज रिअल इस्टेट व्यवसायात भरपूर संधी उपलब्ध होतील. मोठे निर्णय घेताना तुमच्या मनाचा सल्ला ऐका, फायदा होईल. तुमच्या मोठ्या ओळखींचा फायदा आज तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना होईल. ज्ञानार्जनात आज भरपूर वेळ व्यतीत कराल. डॉक्टर्सना सेमिनारमध्ये सत्कार होईल. पब्लिक फिगर असणाऱ्या व्यक्तींना दिवसाच्या शेवटी भरपूर प्रसिद्धी मिळेल. शुभ रंग : तपकिरी आणि काळा (Brown and Black) शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना लाल फळं दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस हा भरपूर कामाचा आणि व्यवहार पार पाडण्याचा आहे. अचानक धनलाभ संभवतो. प्रमोशनबाबत बोलणी, मुलाखत किंवा ऑडिशन आणि सरकारी टेंडर भरणं या गोष्टींसाठी उत्तम दिवस. स्टॉक ब्रोकर, ज्वेलर्स, शिक्षणतज्ज्ञ, अभिनेते, गायक, डान्सर, चित्रकार, लेखक, प्रॉपर्टी डीलर्स आणि डॉक्टरांसाठी आजचा दिवस अगदी भाग्याचा आहे. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी आपले शब्द आणि कृती याबाबत सावधगिरी बाळगावी. खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी आज कागदपत्रांसंबंधी कामं उरकून घ्यावीत. अभिनेते, सीए, शिक्षक, खेळाडू आणि मॉडेल्सना नवीन ऑफर मिळेल. शुभ रंग : केशरी (Orange) शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : कृपया गरिबांना टोमॅटो दान करा. 22 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : टॉम अल्टर, अमरीश पूरी, अनुभव सिन्हा, विजय, नितीनभाई पटेल, देवीनेनी नेहरू
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या