मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : आज नशीबाची साथ मिळणार; तुमच्या आयुष्यात काय काय चांगलं घडणार पाहा

Numerology : आज नशीबाची साथ मिळणार; तुमच्या आयुष्यात काय काय चांगलं घडणार पाहा

Numerology 21 June 2022 : अंकशास्त्रानुसार 21 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

Numerology 21 June 2022 : अंकशास्त्रानुसार 21 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

Numerology 21 June 2022 : अंकशास्त्रानुसार 21 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 21 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कामाच्या अनुभवापेक्षा तुमचं भूतकाळातलं क्वालिफिकेशन आणि प्रशिक्षण यांचा आज इंटरव्ह्यू किंवा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी जास्त उपयोग होईल. मालमत्तेची विक्री करून पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. खेळात विजय मिळण्याची शक्यता मोठी आहे. होम डेकॉर, शाळा, इलेक्ट्रॉनिक्स, औषधं तसंच अर्थविषयक बिझनेसमध्ये रिकव्हरी सहज होईल. आज सूर्यास्तापूर्वी महत्त्वाच्या असाइनमेंट्स संपवाव्यात. शुभ रंग : Brown शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 दान : भिकाऱ्यांना ब्राउन राइस दान करावा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस सुंदर आहे. आज तुम्हाला लोकांकडून प्रेम मिळेल आणि कौतुक होईल. लीगल कमिटमेंट्स अगदी सहज पूर्ण होतील. आज कोणी तरी तुमच्या निरागसपणाचा गैरफायदा घेईल. त्यामुळे सावध राहा. महिलांना सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहून लोकप्रियता मिळवावी. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बिझनेस आणि राजकीय व्यक्ती नवी उंची गाठतील. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : मंदिरात दूध किंवा तेल दान करावं. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या सर्कलमध्ये काही जेलस आणि निगेटिव्ह व्यक्ती आहेत. त्यामुळे आज सावध राहा. अशा व्यक्तींकडे भावना व्यक्त करू नका. तुमचा दिवस यशस्वी ठरेल. ताण हलका होण्यासाठी संध्याकाळी पाण्यात दूध मिसळून स्नान करावं. कामाच्या ठिकाणी प्रमोशन किंवा अप्रैझल होईल. तुमचं ज्ञान आणि भाषणामुळे लोक प्रभावित होतील. आज घेतलेले निर्णय अनुकूल ठरतील. खासकरून शिक्षणतज्ज्ञ, संगीतकार, बँकर्स, लेखक आदींच्या बाबतीत तसं होण्याची शक्यता आहे. आज केलेल्या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळेल. प्रेमात असलेल्यांनी आपल्या भावना खुल्या दिलाने व्यक्त कराव्यात. सरकारी अधिकाऱ्यांना सर्व व्यवहारांमध्ये नशीब साथ देईल. दिवसाची सुरुवात करताना तुमच्या गुरूंचं नाव घ्यायला आणि कपाळावर चंदन लावायला विसरू नका. शुभ रंग : Orange & Red शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 दान : मुलांना पिवळं पेन किंवा पेन्सिल दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही इतरांकडून स्मार्टपणे काम करवून घ्याल. त्यामुळे यश फार दूर नाही. आज रिलॅक्सेशनला वेळ नाही. भविष्यासाठी आजच बीज पेरायला हवं हाच आजच्या दिवसाचा मंत्र आहे. खासकरून खेळ, राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रात असलेल्यांसाठी आजचा दिवस प्रवासाकरिता उत्तम आहे. बांधकाम, तसंच स्टॉक मार्केट बिझनेसमध्ये चांगली वाढ होईल. मीडिया, मेटल, मेडिकल आणि कृषी आदी क्षेत्रांत नव्या संधी मिळतील. विद्यार्थी, मार्केटिंग क्षेत्रातल्या व्यक्ती त्यांचं महिनाअखेरीचं टार्गेट पूर्ण करू शकतील. आज नॉन-व्हेज आहार टाळा. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 9 दान : भिकाऱ्यांना कपडे दान करावेत. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यातही घटना-घडामोडींचा असेल. विवाहित व्यक्तींसाठी आजचा दिवस बेस्ट फॅमिली डे असेल. सिंगल असलेल्यांना आजचा दिवस प्रेम शोधायला उपयोगी ठरेल. जुना मित्र किंवा नातेवाईक मदतीसाठी तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे आणि तुम्ही त्यांना मदत केली पाहिजे. बँकर्स, क्रीडापटू, अभिनेते, राजकीय नेते यांना नशीब खास साथ देईल. सेल्स आणि क्रीडा क्षेत्रात असलेल्यांच्या आयुष्यात अनुकूल वेगवान हालचाली घडतील. विद्यार्थी त्यांचं शैक्षणिक यश साजरं करतील. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : हिरव्या पालेभाज्या दान कराव्यात. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमची कार्यशैली आणि एंटरटेनिंग व्यक्तिमत्त्व यांचा आज जगावर प्रभाव पडेल. भावनांची देवघेव करण्यासाठी, कौटुंबिक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी, एंगेजमेंटसाठी, प्रेमभावनांसाठी, प्रवासासाठी, कौशल्यांचं प्रदर्शन घडवण्यासाठी, मास मीडियाला सामोरं जाण्यासाठी, विजय साजरा करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आजचा दिवस मुलं आणि जोडीदारासोबत व्यतीत करण्यासाठी उत्तम. व्हिसाची वाट पाहत असलात, तर पाठपुरावा करावा लागेल. नव्या फॅक्टरीसाठी जागा पाहत असलेल्या व्यक्ती एक पर्याय निश्चित करू शकतील. अभिनेते आणि माध्यमकर्मी यश मिळवतील. शुभ रंग : Teal शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गरिबांना मिठाई दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) विजय तुमच्या हातात असेल आणि आजच्या दिवसाचे तुम्ही हिरो ठराल. त्यामुळे आज बिझनेसमध्ये रिस्क घ्यायला हरकत नाही. कायदेविषयक प्रकरणांमध्ये तुमची बुद्धिमत्ता आणि विश्लेषणकौशल्य पणाला लावावं. खेळ, तसंच शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. सध्याचा काळ तुमच्या चमकण्याचा आहे. नातेसंबंध बहरतील. विरुद्धलिंगी व्यक्ती आज तुमच्यासाठी नशीबवान ठरतील. आज गुरुमंत्राचा जप करावा. राजकीय नेत्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे; मात्र मृदू भाषेचा वापर ही गोष्ट महत्त्वाची आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका, तसंच त्यांची सेवा करायला विसरू नका. शुभ रंग : Yellow शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : मंदिरात तेल दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) नशीब आणि स्थिरता या दोन गोष्टी आज महत्त्वाच्या ठरतील. खूप कष्ट महत्त्वाचे आहेत. पैसे मिळतील; मात्र काही मॅनिप्युलेशन्स अपेक्षित आहेत. ब्रँड जितका मोठा, तितकं यश मोठं असेल. तुमच्या गुडविलमुळे तुमचा आज दिवसाच्या शेवटी सत्कार होईल, खासकरून तुम्ही मॅन्युफॅक्चरर असलात तर. उच्च पातळीवरचं शिक्षण घेण्यात तुम्ही अधिक काळ व्यतीत कराल. डॉक्टर्सचा त्यांनी केलेल्या सेवेबद्दल सत्कार होईल. पब्लिक फिगर्सना संध्याकाळपर्यंत आर्थिक लाभाची शक्यता. कौटुंबिक स्नेहमेळाव्यांना उपस्थितीचं वचन देऊ नका. कारण तेवढा वेळ मिळणार नाही. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : भिकाऱ्यांना केळी दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) वर्किंग, तसंच नॉन-वर्किंग महिला आज इम्प्रेस करतील आणि आयकॉन्स बनतील. आजचा दिवस कौतुकाचा आणि प्रगतीचा आहे. अचानक यशाची शक्यता संभवते. सरकारी ऑर्डरसाठी जाण्याकरिता चांगला दिवस. खेळाडू, विद्यार्थ्यांनी संधी मिळवण्यासाठी पाऊल पुढे टाकलं पाहिजे. कारण आजचा दिवस चांगला आहे. शेफ, अभिनेत्री, गायक, सीए, शिक्षक, खेळाडू, हॉटेलियर्स आदींना नशीब मोठ्या प्रमाणावर साथ देईल. शुभ रंग : Red & Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 3, 9 दान : घरगुत मदतनीस किंवा भिकाऱ्यांना डाळिंबं दान करा. 21 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : शिव पंडित, अभिनंदन वर्धमान, रीमा लागू, गौतमी कपूर, मुक्ती मोहन
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या