Home /News /astrology /

Numerology : आजचा दिवस 1, 2, 4 अंकांचं कॉम्बिनेशन; 'या' गोष्टींसाठी ठरेल उत्तम

Numerology : आजचा दिवस 1, 2, 4 अंकांचं कॉम्बिनेशन; 'या' गोष्टींसाठी ठरेल उत्तम

Numerology 20 May 2022 : अंकशास्त्रानुसार 20 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 20 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस म्हणजे 1, 2 आणि 4 या अंकांचं कॉम्बिनेशन आहे. यामुळे ज्ञान, ताकद, मॅनेजमेंट स्किल्स, हस्तकला, परीक्षा, मुलाखत अशा गोष्टींसाठी हे कॉम्बिनेशन उत्तम समजलं जातं. अर्थात, परिणाम अपेक्षेपेक्षा साधारण राहील. कामाच्या ठिकाणी तुमची भरपूर प्रशंसा होईल; मात्र त्यामुळे सहकाऱ्यांमध्ये तुमच्याविषयी मत्सर निर्माण होईल. हे टाळण्यासाठी तुमच्या भविष्यातल्या योजना सहकाऱ्यांसोबत शेअर करू नका. तसंच गुरुमंत्राचा जप करत राहा. खासगी आयुष्यातदेखील तुम्हाला डिप्लोमॅटिक राहावं लागेल. आज तुमच्या गुरूचा सल्ला मोलाचा ठरेल. दिवसाच्या सुरुवातीला आईचा आशीर्वाद घ्या. कारण तीच आपला पहिला गुरू असते. शुभ रंग : पिवळा आणि निळा (Yellow and Blue) शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 दान : कृपया सूर्यफुलाच्या बिया दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज रागावर ताबा ठेवणं गरजेचं आहे. वाद होऊ नयेत यासाठी काही ठिकाणी संवाद टाळल्यास उत्तम. नवं टेंडर, काँट्रॅक्ट, अ‍ॅग्रीमेंट, पार्टनरशिप किंवा इव्हेंट ऑर्गनाइज करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. शिक्षक वा प्रशिक्षकांसोबत वेळ व्यतीत केल्यास मोलाचा सल्ला मिळेल. आज आपल्या जोडीदारावर हक्क गाजवू नका. यामुळे भविष्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. आज पांढरे कपडे घालणं लकी ठरेल. चंद्रदेवतेची पूजा करण्यासाठी उत्तम दिवस. औषधी उत्पादन, हिरे, रबर, स्पोर्ट्स उत्पादनं, लिक्विड, पुस्तकं, स्टेशनरी आणि शाळेसंबंधी व्यवसायातल्या व्यक्तींना भरपूर फायदा होईल. शुभ रंग : पांढरा (White) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : कृपया भिक्षुकांना किंवा गायींना दूध दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) भविष्याचं प्लॅनिंग करण्यासाठी आणि त्याबाबत पावलं उचलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आजूबाजूच्या गोष्टींमधून बरंच काही शिकायला मिळेल. लेखनाच्या माध्यमातून आज स्वतःला व्यक्त कराल. भूतकाळातले वाद विसरून मोकळेपणाने संवाद साधा. मित्र-मैत्रिणींवर छाप पाडण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुम्ही शिक्षक, गायक, नर्तक, अकाउंटंट, शेफ, डिझायनर, अभिनेते किंवा ऑडिटर असाल, तर आज तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. इनडोअर गेम्स, फायनान्स आणि सरकारी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस लकी आहे. शुभ रंग : पीच (Peach) शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : कृपया महिलांना हळद दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्यातले नेतृत्वगुण दाखवून इतरांवर छाप पाडाल. क्लायंटसमोर केलेलं प्रेझेंटेशन सर्वांना आवडेल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. दिवसाचा बराचसा वेळ कौन्सिलिंग आणि मार्केटिंग करण्यात जाईल. मशीन, कन्स्ट्रक्शन, कौन्सिलिंग, अभिनय किंवा मीडिया क्षेत्रातल्या व्यक्तींनी लेखी स्वरूपाच्या संवादाबाबत खबरदारी बाळगावी. वैयक्तिक नातेसंबंध सुरळीत राहतील. केशरयुक्त गोड किंवा आंबट पदार्थ खाल्ल्यामुळे तब्येत ठीक राहील. तसंच, निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ व्यतीत करणं मानसिक आरोग्यासाठी फायद्याचं ठरेल. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया गरिबांना हिरवी धान्यं दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कधी कधी भविष्याचा विचार करून आज एक पाऊल मागे घेणं फायद्याचं ठरतं. आज तोच दिवस आहे. आज ठरवलेली कोणतीही कामं पूर्ण होण्यात अडथळे येतील. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. त्यामध्ये रिस्क असू शकते. आज एखादी गुंतवणूक केली असेल, तर भविष्यात त्याचा फायदा होईल. मुलाखत आणि प्रपोझल स्वीकारण्यासाठी उत्तम दिवस. मुलाखतीला जाताना अ‍ॅक्वा रंगाचे कपडे घातल्यास शुभ ठरेल. आज प्रॉपर्टीसंबंधी निर्णय घेतल्यास फायदा होईल. खाण्या-पिण्याचे नियम पाळा. आपल्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध जोपासा. भविष्यात त्याचा फायदा होईल. शुभ रंग : Sea green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया अनाथांना हिरवी फळं दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुम्ही सर्वांवर आपली छाप पाडाल. आजचा दिवस नव्या संधी शोधण्याचा आणि दिलेली वचनं पाळण्याचा आहे. प्रेमात असलेल्यांनी आपल्या जोडीदाराला प्रपोज केल्यास उत्तम. तुम्हाला कुटुंबीय, मित्र आणि सहकाऱ्यांची साथ लाभेल. अभिनेते, डॉक्टर, ट्रेनिंग, एक्सपोर्ट-इम्पोर्ट, कापड, रिअल इस्टेट आणि महागड्या वस्तूंचा व्यापार करणाऱ्यांचं नशीब जोरावर असेल. गाडी, घर, मशीन किंवा ज्वेलरी विकत घेण्यासाठी उत्तम दिवस. आज शेअर बाजारात केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. संध्याकाळी एखाद्या रोमँटिक डेटवर जाल. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया पांढरं नाणं दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज एखादी नवी संधी वा नवी व्यक्ती आयुष्यात येण्याची शक्यता आहे. बिझनेसमध्ये भावनिक न होता, विचारपूर्वक निर्णय घ्या. पार्टनर किंवा क्लायंटसोबत बोलताना अजिबात तडजोड करू नका. विरुद्धलिंगी व्यक्तीने दिलेला एखादा सल्ला स्वीकारा. अकाउंट्सशी संबंधित गोष्टींबाबत सीएचा सल्ला घ्या. विवाहासंबंधी प्रपोझल्स येतील. गणपती मंदिराला भेट दिल्याने किंवा अभिषेक केल्यामुळे प्रगती होईल. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया मंदिरामध्ये तांब्याचं किंवा पितळी नाणं दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सेल्स, स्टॉक मार्केट, मेडिकल, राजकारण, बेटिंग अशा व्यवसायांमध्ये असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस बेताचा राहील. आज यश मिळवण्यासाठी वाणी मधुर आणि विचार तर्कशुद्ध ठेवा. पैसा आणि संपर्क वापरून कायदेशीर प्रकरणं सोडवाल. बिझनेसशी संबंधित व्यवहारांमध्ये कुटुंबीयांचीही मदत होईल. विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावेत. थोडा खर्च झाला तरी भविष्यात त्याचे फायदे दिसतील. पैसा आणि समाधान यामध्ये समतोल साधण्यात आजचा दिवस जाईल. आज प्रवासाचे बेत यशस्वी होतील. गायींना चारा खाऊ घालणं फायद्याचं ठरेल. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरिबांना चपला दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज एकमेकांवर विश्वास ठेवल्याने यश मिळेल. प्रेमात असलेल्यांनी हिम्मत करून आपल्या जोडीदाराला प्रपोझ करावं. आज संवादातून वाद मिटवाल. बिझनेस रिलेशन्स, कागदपत्रांवर सही करणं, इव्हेंट किंवा सर्जरी अशा प्रकारची कामं पुढे ढकलली जातील. राजकारण, लिक्विड, मेडिसिन, डिझायनिंग, मीडिया, फायनान्स किंवा शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तींना आज मोठ्या प्रमाणात फायदा होईल. खेळाडूंच्या पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. शुभ रंग : Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया मंदिरात केशरी कापड दान करा. 20 मे रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : एन. टी. रामा राव, अंजुम चोप्रा, विजय मौर्य, अनंत कुमार हेगडे, मांचू मनोज
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या