Home /News /astrology /

Numerology : नशीबाची साथ मिळेल, यश तुमच्याच पदरात पडेल; फक्त एक गोष्ट आवर्जून करा

Numerology : नशीबाची साथ मिळेल, यश तुमच्याच पदरात पडेल; फक्त एक गोष्ट आवर्जून करा

Numerology 19 May 2022 : तुमच्या जन्मतारखेवरून ठरणाऱ्या अंकशास्त्रानुसार तुमचं आजचं भविष्य जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 19 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस ज्ञानाच्या देवाणघेवाणीचा आहे. आजचा दिवस सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला आहे. बिझनेससाठी प्रवासाचं नियोजन करू शकता. सर्व असाइनमेंट्स वेळेवर पूर्ण करू शकता. आज तुम्ही सर्व प्रकारच्या सुखसोयींचा अनुभव घ्याल. पैसे मिळवणं किंवा लक्ष्य गाठणं आज सोपं होईल. कारण तुमची रिलेशनशिप स्किल्स अगदी जादूसारखी काम करतील. यश प्राप्त करण्यासाठी सूर्यदेव, तसंच तुमच्या गुरूचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका. कारण त्यांचा संयोग खास आहे. रोमँटिक वातावरणामुळे तुमचं आयुष्य गोड भावनांनी भरून जाईल. खेळाडू विजय मिळवून घरी येतील. गॅदरिंगचं यजमानपद भूषवून महिला मनं जिंकतील. कामाच्या ठिकाणी कृत्रिम सूर्यफुलं ठेवावीत. शुभ रंग : Red & Orange शुभ दिवस : रविवार, सोमवार शुभ अंक : 1 दान : सूर्यफूल तेल दान करावं. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज अन्य कोणाच्याही प्रभावाखाली न येण्याची काळजी घ्या. अन्यथा तुमची प्रतिमा/ओळख डायल्यूट होण्याची शक्यता आहे. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांमध्ये संतुलन साधण्यासाठी उत्तम दिवस. तुमची मुलं आणि नातेवाईकांसमवेत व्यतीत करण्यासाठीही उत्तम दिवस. गुंतवणुकीवर खूप चांगला परतावा मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे घर किंवा कमर्शियल प्रॉपर्टी यांबाबतीत मोठी झेप घेण्याचा प्रयत्न करा. लिक्विड्, इलेक्ट्रॉनिक्स, धान्यं, ज्वेलरी, केमिकल्स, औषधं, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट आदी क्षेत्रांत व्यवहार करत असलात, तर तुमच्या लाभाच्या दृष्टीने काही घोषणा होण्याची शक्यता आहे. शुभ रंग : Blue & Yellow शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : भिकाऱ्यांना दूध दान करावं. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज सर्व प्रकारच्या कामांमध्ये तुमची जादू दिसेल. आज तुमच्या सर्व विचारांवर ताण मात करील. त्यामुळे आज मानसिक आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल. सन्मानाची भावना तुमच्या सेलिब्रेशनला चार चाँद लावील. बिझनेस डील्समध्ये केवळ लेखी संवादावरच विश्वास ठेवावा. खासकरून तुम्ही राजकीय क्षेत्रात असाल किंवा सरकारी अधिकारी असलात, तर आज जनतेचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठराल. विद्यार्थ्यांनी आज परीक्षेला जाण्यापूर्वी, तसंच इंटरव्ह्यूला उपस्थित राहण्यापूर्वी गुरुमंत्राचं पठण करणं आवश्यक आहे. आज पिवळ्या रंगाचे खाद्यपदार्थ तयार करावेत आणि साऱ्या कुटुंबीयांना खाऊ घालावेत. त्यामुळे गुरू ग्रहाचं बळ वाढेल. शुभ रंग : Orange शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 1 दान : गरिबांना पिवळ्या डाळी दान कराव्यात. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज भविष्यातल्या आर्थिक नियोजनासाठी सज्ज राहा. मौखिक संवाद साधण्यासाठी आणि माइलस्टोन गाठण्यासाठी पर्फेक्ट दिवस. सरकारी ऑर्डर्स मिळण्यासाठी पैशांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल. मीटिंग्ज आणि प्रेझेंटेशनमध्ये बराचसा काळ व्यतीत करावा. लीगल केसेस हाताळत असलात, तर अन्य व्यक्तींच्या सल्ल्याबद्दल सावध राहा आणि केवळ स्वतःच्या मनाचं ऐका. पर्सनल रिलेशनशिप्स भावनिक वळण घेतील. संवाद साधत राहा. व्यायामात थोडा वेळ व्यतीत करावा. शुभ रंग : Blue & Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : गरिबांना हिरवं धान्य दान करावं. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस बऱ्याच घटना-घडामोडी आणि सरप्राइजेसनी भरलेला असेल. आज तुम्हाला प्रचंड काम करावं लागेल. कारण नवं पद, लीडरशिप, डील्स यांपैकी काही तरी ऑफर केलं जाण्याची शक्यता आहे. तुमच्या वरिष्ठांपासून सावध राहा. कारण ते तुम्हाला कदाचित भावनिकदृष्ट्या मूर्ख बनवू शकतात. आज इंटरव्ह्यू असेल, तर त्याला आवर्जून जावं. मीटिंग्जमध्ये हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्यास उपयुक्त ठरेल. आज पार्टीज आणि नॉन-व्हेज खाणं टाळा. आज रोमँटिक रिलेशनशिप कायमस्वरूपी प्रगल्भ होईल. प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय तुम्हाला अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. खेळांत विजय मिळेल. शुभ रंग : Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : वृद्धाश्रमात झाडांची रोपं दान करावीत. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमची कामाची पद्धत बदला. कारण त्यामुळे तुमच्यात आणि वरिष्ठांच्यात अविश्वास निर्माण होत आहे. पार्टनर निवडताना प्रॅक्टिकल आणि स्मार्ट राहा. तुम्हाला कुटुंबीय, मित्रमंडळी, सहकारी अशा सगळ्यांचा पाठिंबा लाभला आहे, ही चांगली गोष्ट आहे; मात्र सगळ्यांची जबाबदारी घेणं टाळायला हवं. आजचा दिवस पार्टनरसोबत व्यतीत करण्याचा, तसंच ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन्स देण्याचा आहे. सरकारी टेंडर्समध्ये रिस्क घेण्याइतकं नशीब तुम्हाला अनुकूल आहे. वाहन, मोबाइल, घर घेण्यासाठी किंवा शॉर्ट ट्रिप आयोजित करण्यासाठी चांगला दिवस आहे. स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट अनुकूल ठरेल. रोमँटिक वातावरणामुळे तुमचा आजचा दिवस बहरेल. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : पांढरं नाणं दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सॉफ्टवेअर, अभिनय, राजकारण, अन्नपदार्थ, धातू आदी क्षेत्रांत असलेल्या व्यक्तींना मोठ्या मार्जिनसह नफा मिळेल. आर्थिक व्यवहार करताना शहाणपण बाळगावं आणि लीगल डॉक्युमेंट्सचा फेरआढावा घ्यावा. ज्येष्ठ व्यक्तींसोबत दिवस व्यतीत करावा आणि त्यांचा सल्ला मानावा. विरुद्धलिंगी व्यक्तीच्या सूचना स्वीकारण्यासाठी तुमचं मन खुलं करा. सॉफ्टवेअर, संरक्षण, सोनं, पेट्रोल, पेयं, कॉस्मेटिक्स आदींशी संबंधित बिझनेस डील्स मोठ्या प्रमाणात यशस्वी होतील. लग्नाचे प्रस्ताव स्वीकारण्यासारखे असतील. समृद्धी मिळण्यासाठी भगवान शिवशंकराच्या देवळात जाणं आवश्यक आहे. छोट्या ब्रँड्सशी कोलॅबोरेशन करण्याचा दिवस आहे. शुभ रंग : Yellow शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : मंदिरात पिवळं कापड दान करावं. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचं पद आणि पैसा यांच्या क्षमतेचा गैरवापर करू नका. तुम्ही अनेकांचे लीडर आणि मार्गदर्शक असाल; पण लवचिकता हरवणार नाही याची काळजी घ्या. प्रभावी व्यक्ती आणि पैसा यांच्या ताकदीच्या जोरावर लीगल केसेस सोडवल्या जाऊ शकतात. पैशांची समृद्धी वाढवण्यासाठी तुमचा पार्टनर साथ देईल. परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज मोठं शुल्क भरलं पाहिजे. कारण त्याचा त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी उपयोग होणार आहे. तुम्ही अत्यंत कष्ट कराल. त्यामुळे तुमचे निर्णय योग्य ठरतील. खेळाडू कष्टांनी गगनात झेप घेतील. प्रवासाचे बेत पुढे ढकलावेत. आज दानधर्म करणं आवश्यक आहे. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : गरजूंना तेल दान करावं. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) विद्यार्थी स्पर्धेत उतरणार असतील, तर त्यांनी नशीब साथ देण्याकरिता लाल रंगाचे कपडे परिधान करावेत. वृद्धीसाठी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नेटवर्किंगची गरज आहे. बिझनेस डील्सवर अगदी सहज स्वाक्षऱ्या होतील. सौर ऊर्जा, सरकार, शिक्षण, ग्लॅमर, सॉफ्टवेअर, ऑकल्ट सायन्स, संगीत, मीडिया आदी उद्योगांतल्या व्यक्तींना लोकप्रियता मिळेल. तरुणांना नव्या पदांची ऑफर येईल. आज तुम्ही जे काही कराल, तो निर्णय पर्फेक्ट असेल. आजचा दिवस कोलॅबोरेशन, सार्वजनिक भाषण, इंटरव्ह्यू, स्पर्धा परीक्षा आदींसाठी वापरावा. खेळाडूंच्या आई-वडिलांना त्यांच्या मुलांचा अभिमान वाटण्यासारखी कामगिरी होईल. डॉक्टर्स, सर्जन्सना पुरस्कार मिळतील. ट्रॅव्हल प्लॅन्समध्येही अचीव्हमेंट्स होतील. शुभ रंग : Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कोणत्याही स्वरूपात सूर्यफूल तेल दान करा. 19 मे रोजी जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती : संजीव रेड्डी, नवाझुद्दीन सिद्दिकी, रस्किन बाँड, पार्थ जिंदाल, नथुराम गोडसे
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या