Home /News /astrology /

Numerology : आज मनसोक्त शॉपिंग करा; अंकशास्त्रानुसार खरेदीसाठी आजचा दिवस उत्तम

Numerology : आज मनसोक्त शॉपिंग करा; अंकशास्त्रानुसार खरेदीसाठी आजचा दिवस उत्तम

Numerology

Numerology

Numerology 18 May 2022 : जन्मतारखेनुसार तुम्ही आज काय काय करणं योग्य ठरेल, ते अंकशास्त्रानुसार जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 18 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमचं नेटवर्किंग चांगल्या स्थितीत असेल. त्यामुळे बिझनेसमध्ये नफा मिळवण्यासाठी जुनी आणि नवीन कनेक्शन्स वापरण्याचा प्रयत्न करा. एखाद्या योद्ध्याप्रमाणं तुम्ही आज स्पर्धा जिंकू शकाल. आज एखाद्या कार्यक्रमामध्ये तुम्ही बोललं पाहिजे. बोलण्याच्या क्रिएटिव्ह स्टाइलमुळे इतरांवर इम्प्रेशन पडेल. आज लोकांशी जास्त संवाद होण्याची शक्यता आहे. कपल्सचं लव्ह रिलेशन चांगल्या स्थितीत असेल. सरकारी अधिकारी, डॉक्टर, संगीतकार आणि ग्लॅमर इंडस्ट्रीतल्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळेल. शुभ रंग : लाल आणि ब्राउन (Red and Brown) शुभ दिवस : रविवार आणि मंगळवार शुभ अंक : 1 आणि 9 दान : लहान मुलांना नारिंगी पेन दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) इतरांकडून काम करून घेण्यासाठी तुम्ही भावना बाजूला ठेवून प्रॅक्टिकल विचार करणं गरजेचं आहे. तुमच्यावर इतरांच्या भावनिक गोष्टींचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या जास्त ऐकू नका. हेराफेरी करणं तुम्हाला जमणार नाही. त्यामुळे स्वतःला आवर घाला. तुमच्या मुलांसोबत आणि नातेवाईकांसोबत वेळ घालवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कन्सल्टन्सी फर्म्सना आज विशेष यश मिळेल. शेअर मार्केटमधली गुंतवणूक आणि एक्सपोर्ट बिझनेस डीलसाठी आजचा दिवस चांगला आहे. रिलेशनशिपमधला रोमान्स बहरेल, तेव्हाच तुमच्यावरचा इतरांचा प्रभाव कमी होईल. शुभ रंग : पिंक (Pink) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : भिकाऱ्यांना दही दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सतत प्रसिद्धी मिळेल. याचं सर्व श्रेय तुमच्या गुरूला आणि पालकांना दिलं पाहिजे. क्रिएटिव्ह आर्टिस्टना आज काम करण्यासाठी चांगली संधी आहे. पिकाची काढणी आणि विक्री करण्यासाठी आज चांगला दिवस आहे. तुमचे प्लॅन्स एक्झिक्युट करण्यापूर्वी ते ऑन पेपर रेडी पाहिजेत. राजकीय व्यक्ती आणि वकिलांसाठी आजचा दिवस अत्यंत प्रभावी आहे. कपडे किंवा सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी आज सर्वोत्तम दिवस आहे. डिझायनर, हॉटेलिअर्स, अँकर, ट्रेनर्स, फायनान्सर्स, म्युझिशिअन्सना आज विशेष कामगिरीचा आनंद घेण्याची संधी आहे. पिवळा भात खाऊन आपल्या दिवसाची सुरुवात करा. शुभ रंग : लाल (Red) शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : मंदिरामध्ये चंदन दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी उच्चपदस्थ व्यक्तींनी आपली पर्सनल कनेक्शन्स वापरण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. बिझनेस डील्स लवकर क्रॅक होतील. आज घेतलेल्या फायनान्शिअल डिसिजन्समुळे भरपूर फायदा होईल. थिएटर आर्टिस्ट, अभिनेते, अँकर आणि डान्सर्सनी आज ऑडिशनसाठी अर्ज केला पाहिजे. कारण आज संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. मेटल आणि कपड्यांच्या उत्पादकांना आज मोठ्या प्रमाणात नफा मिळेल. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाव्यात. शुभ रंग : पर्पल (Purple) शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : लहान मुलांना रोपं दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमची कौशल्यं वापरून पैसे कमावण्याइतपत तुम्ही हुशार आहातच; पण आज या गुणाचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. दीर्घ काळापासून सुरू असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला कुटुंब आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही मोकळ्या मनानं पार्टनरकडून मिळणारं प्रेम आणि आदर स्वीकारला पाहिजे. आज शेअर मार्केट, स्पोर्ट्स, इव्हेंट्स, स्पर्धा परीक्षा आणि मुलाखती यामध्ये नशीब आजमावा. आज तुमचा पार्टनर पूर्णपणे तुमच्यासोबत असेल. शुभ रंग : हिरवा आणि लाल (Green and Red) शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : प्राण्यांना द्रवपदार्थ द्या # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) अ‍ॅक्सेसरीज, फूड, ज्वेलरी, रिटेल, क्लॉथ बिझनेस आणि पॉलिटिक्स सेक्टरमधल्या व्यक्तींना नवीन संधी आणि फायदे मिळतील. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात समृद्धी आणि पूर्णत्वाचा भाव आणेल. जोडीदारासोबतच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि खरेदीला बाहेर जाण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. डिझायनर, इव्हेंट मॅनेजर्स, ब्रोकर्स, शेफ आणि स्टुडंट्सना नवीन असाइनमेंट्स मिळतील. त्यामुळे त्यांचा विकास होईल. रोमँटिक रिलेशनशिपमुळे घरात आनंदी वातावरण असेल. शुभ रंग : व्हायोलेट (Voilet) शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : पांढरा रुमाल दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) भविष्याच्या दृष्टीने पुढे जाण्यापूर्वी सद्य परिस्थितीचा काळजीपूर्वक विचार करा. एखादी जबाबदारी सोपवण्यासाठी आज तुम्ही पार्टनर किंवा सहकाऱ्यांवर विश्वास ठेवू शकता. आज तुमच्या हुशारीच्या बळावर यश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिलेलं आव्हान स्वीकारा. आई, बहीण किंवा पत्नीकडून मिळणारे सल्ले मोकळ्या मनाने स्वीकारा. आज मोठी वाटत असलेली अडचण आठवडाभरात नक्कीच कमी होईल. एखादं पर्सनल किंवा बिझनेस प्रपोजल मिळण्याची शक्यता आहे. त्याचा स्वीकार करा. कारण भविष्यात तुम्हाला फायदा होईल. वकील, थिएटर आर्टिस्ट, सीए, सॉफ्टवेअर इंजिनीअर्ससाठी आजचा दिवस चांगला आहे. शुभ रंग : नारिंगी (Orange) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 आणि 9 दान : तांबं दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सरकारी अधिकारी, सेल्स प्रोफेशनल, मालमत्ता बांधकाम व्यावसायिक, मीडिया कर्मचारी आणि तंत्रज्ञ यांना कंपनीकडून पदोन्नती किंवा भरपाईच्या बाबतीत फायदा होईल. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांचे निर्णय तुमच्या बाजूनं होतील. असं असलं तरी कायदेशीर वाद मिटण्यास अजून वेळ लागेल. डॉक्टर आणि मॅन्युफॅक्चरर्सना यश आणि गौरव मिळेल. भागीदारांशी वैयक्तिकरित्या वाद होण्याची शक्यता असल्यानं डोकं शांत ठेवा. आज धान्य दान करणं आणि मोसंबी खाणं गरजेचं आहे. शुभ रंग : डीप पर्पल (Deep Purple) शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गरजूंना छत्री दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुम्हाला लोकप्रियता, नशीब, पैसा, स्थिरता आणि आराम मिळेल. प्रेमात असलेल्यांनी आज त्यांच्या भावना लिखित स्वरूपात व्यक्त कराव्यात. त्यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे. व्यावसायिक संबंध आणि डील्स अधिक चांगल्या स्थितीमध्ये जातील. ग्लॅमर इंडस्ट्री आणि मीडियामधल्या व्यक्तींना प्रसिद्धीचा आनंद घेता येईल. राजकीय व्यक्तींना आज मोठ्या संधींचा लाभ घेता येईल. पब्लिक फिगर्सनी सहयोग आणि प्रगती साधण्यासाठी आजच्या दिवसाचा वापर केला पाहिजे. ट्रेनर, डिझायनर, डॉक्टर, वकील, इंजिनीअर्स आणि अभिनेत्यांना लोकप्रियतेचा अनुभव मिळेल. शुभ रंग : लाल (Red) शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : लाल मसूर दान करा. 18 मे रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : अली जफर (Ali Zaffar), रॉबर्ट वद्रा (Robert Wadra), एच. डी. देवगौडा (H D Devegowda), मानुषी छिल्लर (Manushi Chillar), थावरचंद गहलोत (Thawar Chand Gehlot)
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या