मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : कुणाचे होतील वाद, तर कुणाचं वाढेल प्रेम; जोडीदारासोबत तुमचा आजचा दिवस कसा असेल पाहा

Numerology : कुणाचे होतील वाद, तर कुणाचं वाढेल प्रेम; जोडीदारासोबत तुमचा आजचा दिवस कसा असेल पाहा

Numerology 18 June 2022 : तुमच्या जन्मतारखेनुसार आज तुमच्या रिलेशनशिपमध्ये नेमकं काय होणार आहे पाहा.

Numerology 18 June 2022 : तुमच्या जन्मतारखेनुसार आज तुमच्या रिलेशनशिपमध्ये नेमकं काय होणार आहे पाहा.

Numerology 18 June 2022 : तुमच्या जन्मतारखेनुसार आज तुमच्या रिलेशनशिपमध्ये नेमकं काय होणार आहे पाहा.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 18 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस स्वप्नं सत्यात उतरवण्याचा आहे. त्यामुळे तुमच्या मनातल्या योजनांवर काम सुरू करा. स्पर्धांमध्ये मोठं यश मिळेल. एखाद्या संमेलनाला जाण्याची, तुमचं कौशल्य दाखवण्याची, लोकांसमोर बोलण्याची संधी सोडू नका. तुमच्या बोलण्याची पद्धत इतरांवर भलतीच छाप पाडेल. आज लोकांसमोर जेवढं बोलता येईल, तेवढं फायद्याचं. प्रेमसंबंध बळकट होतील. सरकारी अधिकारी, डॉक्टर, संगीतकार आणि ग्लॅमर क्षेत्रातल्या व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी मिळेल. शुभ रंग : Red and Orange शुभ दिवस : मंगळवार आणि गुरुवार शुभ अंक : 1 आणि 3 दान : कृपया लहान मुलांना केशरी रंगाचं पेन दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुम्हाला कुटुंबीयांचा आणि मित्रांचा भरपूर पाठिंबा मिळेल. छोट्या छोट्या अडचणी नाहीशा होतील. भूतकाळातल्या आठवणींमध्ये रमू नका. बोलताना डिप्लोमॅटिक राहा. नातेवाईक आणि लहान मुलांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी उत्तम दिवस. कन्सल्टन्सी फर्म्सना चांगलं यश मिळेल. शेअर मार्केट गुंतवणूक आणि निर्यात व्यवसाय फायद्यात राहतील. जोडप्यांमध्ये प्रेमभावना वाढतील; मात्र दोघांमधल्या गोष्टींमध्ये कोणा तिसऱ्याच्या बोलण्याचा परिणाम होऊ देऊ नका. शुभ रंग : Pink शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना दही दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही पब्लिक फिगर असलात, तर तुमची प्रसिद्धी आज आणखी वाढेल. क्रिएटिव्ह आर्टिस्ट असलेल्या व्यक्तींसाठी एक मोठी संधी चालून येईल. भरपूर मेहनत करून, याच आठवड्यात त्याची किंमतही मिळवाल. तुमच्या मनातल्या योजना कागदावरही तयार हव्यात. अभिनेते, डिझायनर, संगीतकार, लेखक, राजकीय नेते आणि वकिलांसाठी भाग्याचा दिवस. कपडे किंवा शोभेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस. डॉक्टर, निवेदक, हॉटेल व्यावसायिक, प्रशिक्षक, फायनान्सर आणि डान्सर या व्यक्तींना आज मोठं यश मिळेल. दिवसाच्या सुरुवातीला पिवळ्या रंगाचा भात खाल्ल्यास फायदा होईल. शुभ रंग : Red शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : कृपया मंदिरात चंदन दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज नशीब तुमच्या बाजूने आहे. करिअरमध्ये नवी सुरुवात होऊ शकते. बिझनेस डील्स वेळेवर आणि आरामात पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत घेतलेले मोठे निर्णय फायद्याचे ठरतील. नाट्यकलाकार, अभिनेते आणि डान्सर असलेल्या व्यक्तींनी ऑडिशनला नक्की उपस्थित राहावं, फायद्याचं ठरेल. मेटल आणि कापड उत्पादकांना दिवसाच्या शेवटी भरपूर आर्थिक फायदा होईल. आज हिरव्या पालेभाज्या खाणं आणि शाकाहार करणं उत्तम. शुभ रंग : Purple शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया लहान मुलांना रोपं दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज आळशीपणा टाळल्यास भरपूर आर्थिक फायदा करून घेऊ शकाल. एखादं रखडलेलं प्रकरण सोडवण्यासाठी मित्र आणि कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल. एक्सपोर्ट-इम्पोर्ट व्यवसायात भरपूर आर्थिक फायदा संभवतो. तुमच्या जोडीदाराचं तुमच्यावर असणारं प्रेम आणि तुमच्याप्रति असणारा आदर लक्षात घ्या. तुमचा जोडीदार आज तुमच्यासाठी पूर्ण वेळ देईल. शेअर मार्केट, खेळ, कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतींमध्ये नशीब आजमावण्यासाठी उत्तम दिवस. शुभ रंग : Green and Red शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया पाळीव प्राण्यांसाठी द्रव पदार्थ दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचा पार्टनर आज तुमच्याशी अगदी छान वागेल. त्यामुळे तुमच्यातले नातेसंबंध अधिक बळकट होतील. जोडीदारासोबतचे मतभेद दूर करून एकत्र शॉपिंगला जाल. दिवस रोमँटिक आणि ऐशोआरामाचा राहील. डिझायनर, इव्हेंट मॅनेजर, ब्रोकर, शेफ आणि विद्यार्थ्यांना नवीन असाइनमेंट मिळेल. ती त्यांच्या फायद्याची असेल. अ‍ॅक्सेसरी, फूड, ज्वेलरी, रिटेल, कापड अशा व्यवसायात असलेल्या व्यक्तींना नवीन संधी मिळेल. अभिनेत्यांना नवीन संधी आणि फायदे मिळतील. शुभ रंग : Violet शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया घरगुती कामगाराला पांढरा रुमाल दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या जोडीदारावर आणि सहकाऱ्यांवर विश्वासाने एखादी जबाबदारी टाकाल. दिवसाची सुरुवात आईचा आशीर्वाद घेऊन करा. तुमच्यासमोर येणारी आव्हानं स्वीकाराल, आपल्या हुशारीने त्यावर मात कराल. आई, बहीण किंवा पत्नीने दिलेला एखादा सल्ला नक्की स्वीकारा. एखादी अडचण सोडवण्यासाठी वेगळाच मार्ग निवडल्यास फायदा होईल. आज समोरून येणारे प्रस्ताव, प्रपोझल्स स्वीकारा. वकील, नाट्य कलाकार, सॉफ्टवेअर कर्मचारी यांच्यासाठी भाग्याचा दिवस. शुभ रंग : Orange शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 आणि 9 दान : कृपया तांब्याची एखादी छोटी गोष्ट दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने लागतील. एखादा कायदेशीर वाद संपण्यासाठी आणखी थोडा वेळ लागेल. डॉक्टर आणि उत्पादकांना भरपूर यश आणि प्रतिष्ठा मिळेल. सरकारी अधिकारी, सेल्स कर्मचारी, प्रॉपर्टी डीलर, मीडिया कर्मचारी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले कर्मचारी यांना आपल्या कंपनीकडून मोठा फायदा होईल. आज डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. जोडीदारासोबत भांडण संभवतं. धान्य दान करणं आणि संत्री खाणं फायद्याचं ठरेल. शुभ रंग : Deep Purple शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरजूंना छत्री दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आनंद, नशीब, पैसा, स्थैर्य आणि ऐशोआराम हे सगळं आज तुमच्या नशिबात आहे. प्रेमात असलेल्यांनी लेखी स्वरूपात आपल्या भावना जोडीदाराकडे व्यक्त कराव्यात. भरपूर प्रसिद्धी आणि फायदा संभवतो. बिझनेस रिलेशन आणि डील्स वेगळ्याच उंचीवर पोहोचतील. ग्लॅमर इंडस्ट्री आणि माध्यमांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना प्रसिद्धी मिळेल. राजकीय नेत्यांना आज मोठी संधी मिळेल. प्रशिक्षक, डिझायनर, डॉक्टर, वकील, इंजिनिअर आणि अभिनेते यांनाही भरपूर प्रसिद्धी मिळेल. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया लाल मसूर दान करा. 18 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : अनुराग नारायण सिन्हा, देवकीनंदन खत्री, अवंतिका मोहन, चिराग गांधी, कृष्णकांत उपाध्याय, क्रिश मोहन
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या