Home /News /astrology /

Numerology : आयुष्यात लवकरच नव्या पर्वाची सुरुवात; तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या भविष्य

Numerology : आयुष्यात लवकरच नव्या पर्वाची सुरुवात; तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घ्या भविष्य

Numerology 17 May 2022 : अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 17 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही आयुष्यभर एकटे काम करू शकत नाही हे सत्य समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून इतरांची मदत घेण्यासाठी मनाची तयारी करा. बहुतेकशा अडचणी नाहीशा होण्याच्या मार्गावर आहेत. आयुष्यात लवकरच एखाद्या नवीन पर्वाची सुरुवात होऊ शकते. ठिकाण, स्थान, मित्र किंवा बिझनेसमधली नवीन इन्व्हेस्टमेंट, नवीन नोकरी, नवीन घर असं काहीही असू शकतं. प्रॉपर्टी मॅटर्स आणि पैशाचे लाभ सर्वसाधारण असतील. परंतु ते कुठल्याही विवादाशिवाय मिळतील. मेडिकल प्रॅक्टिशिनर्सना आज एक स्पेशल नवीन ऑफर मिळू शकते. शेती आणि शिक्षण उद्योग फायद्यात असू शकतो. शुभ रंग : Blue and Yellow) शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 3 दान : आश्रमामध्ये अन्नदान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या अति जुळवून घेण्याच्या स्वभावामुळे अनेक अडचणी निर्माण होतील. त्यामुळं 'नाही' म्हणायला शिकलं पाहिजे. हुशारी वापरण्याचा प्रयत्न करा. कारण लोक तुमच्या निरागसतेचा गैरफायदा घेण्याचा करण्याचा प्रयत्न करतील. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट, डॉक्टर, इंजिनीअर्स, ब्रोकर, ट्रॅव्हल एजन्सी, शेअर मार्केट आणि पार्टनरशीप फर्म्सना आज यश मिळेल. पार्टनर किंवा समवयस्कांकडून भावना दुखावल्या जातील. शुभ रंग : Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : गायींना पाणी द्या. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या सहकाऱ्यांच्या हेतूंचा अंदाज लावण्यासाठी आज कामात फ्लेक्झिबल आणि जजमेंटल व्हावं लागेल. तुमचे क्रिएटिव्ह थॉट्स आणि मॅजिकल स्पीच तुमच्या बॉसला आणि कुटुंबातल्या सदस्यांना आकर्षित करतील. आज तुम्ही कुठल्याही परिस्थितीत काम करण्यासाठी तयार असाल. त्यामुळे सहज यश मिळेल.पैशांचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. क्रिएटिव्ह व्यक्ती आणि पब्लिक फिगर्सना आज प्रसिद्धी मिळेल. स्पोर्ट्स कोचेसना आज विजय आणि रोख बक्षीसं मिळतील. कन्स्ट्रक्शन आणि कृषी क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. सकाळी कपाळावर चंदन लावावं. शुभ रंग : Orange and Blue शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : गरिबांना सूर्यफूल तेल दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सरकारी नोकऱ्या आणि राजकारणातल्या व्यक्तींनी आज ध्येय साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. कारण, अर्ध्या दिवसानंतर त्यांना यश मिळण्याची जास्त शक्यता आहे. उच्च स्थानावर असलेल्या व्यक्ती आणखी यशस्वी होतील. पैशांच्या व्यवहाराचे प्लॅन कोणाशीही शेअर करू नका. सरकारी नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी नोकऱ्यांसाठी अर्ज करणं गरजेचं आहे. आज हिरव्या पालेभाज्या दान करणं शुभ ठरेल. खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक होऊन त्यांना जास्त आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि मित्रांना वेळ देणं शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांच्या तक्रारी शांतपणे ऐका. आज दानधर्म करणं आवश्यक आहे. शुभ रंग : Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : गरजूंना चपला दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) पास्ट इश्यूज विसरून नवीन रिलेशन्सची सुरुवात करा. पार्टनरला प्रपोझ करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मशिनरी खरेदी करण्यासाठी, मालमत्ता विकण्यासाठी, अधिकृत कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी, तसंच सहलीसाठी बाहेर जाण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. न्यूज अँकर, अभिनेते, हँडीक्राफ्ट आर्टिस्ट, इंजिनीअर्सच्या कामाचं कौतुक होईल. कुठल्याही गोष्टीमध्ये मन अडकवू नका. कारण तुम्हाला फसवण्यासाठी ही तुमच्या शत्रूची युक्ती असू शकते. तुमच्यातल्या नेतृत्वगुणांमुळे आजूबाजूच्या अनेकांचा फायदा होईल. स्पोर्ट्स कोचेसनी नवीन आव्हानं स्वीकारण्यासाठी तयार असलं पाहिजे. राजकीय नेत्यांनी चांगल्या भविष्यासाठी रिस्क घेतली पाहिजे. शुभ रंग : Teal शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : अनाथाश्रमातल्या मुलांना हिरवी फळं दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सेल्स, फूड, मार्केटिंग, ट्रेडिंग, डिस्ट्रिब्युशन, डिफेन्स, एअरलाइन्स, ज्वेलरी, कॉस्मेटिक्स आणि होम डेकोर सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांना आज यशाचा आनंद मिळेल. आज तुमच्या कृतीला यश मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तयार राहा. आज तुम्हाला सर्व प्रकारचे लाभ मिळतील. कौटुंबिक जिव्हाळा आणि सपोर्टमुळं समृद्धी मिळेल. दिवस आरामदायी जाईल. डिझायनर, वकील, तंत्रज्ञ, राजकीय नेते आणि अभिनेत्यांना स्पेशल अप्रैझल आणि स्टॅबिलिटी मिळेल. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 आणि 9 दान : गरिबांना पांढरं धान्य दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकल विचारांनी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे यश मिळवाल. लवकरच रिलेशनशिप, परफॉर्मन्स आणि आर्थिक विकासाचा आनंद घेण्याची संधी मिळेल. आज बिझनेसमध्ये नातेवाईक आणि मित्रांपासून सावध राहा. खेळाडूंनी वाद टाळण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांपासून दूर राहावं. एखाद्या विरुद्धलिंगी व्यक्तीमुळे तुम्ही लकी ठराल. देवाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी शिव आणि शनीची पूजा करणं गरजेचं आहे. शुभ रंग : Yellow शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : अनाथाश्रमामध्ये कपडे दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) जुनी कामं पूर्ण करण्यास उशीर झाल्यामुळे तुम्हाला आज व्यावसायिक जबाबदाऱ्यांचा भार जाणवेल. आजूबाजूच्या सर्वांचा तुमच्यावर विश्वास असल्याने तुम्हाला आज लीडरशीपचा आनंद घेण्याची संधी मिळेल. अकाउंट्स व्यवस्थित सांभाळणं आणि कुटुंबासोबत वेळ व्यतीत करणं गरजेचं आहे. दानधर्माचे आश्चर्यकारक फायदे होतील. गार्डनमध्ये थोडा वेळ घालवा. आज जास्तीत जास्त सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहून विचार व्यक्त करा. शुभ रंग : Purple शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गरिबांना छत्री दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस घरगुती कामात, घरगुती जबाबदाऱ्या पार पाडण्यात, पार्टी आयोजित करण्यात, सामाजिक कार्यात, शेअर्समध्ये ट्रेडिंग करण्यात जाईल. डरमॅटॉलॉजिस्ट, ऑडिटर्स, सायंटिस्ट, सर्जन, राजकीय नेते आणि खेळाडूंना आज पैसा आणि प्रसिद्धी मिळेल. आजचा दिवस आनंद, ऊर्जा आणि उत्साहानं भरलेला आहे. तुमची उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी याचा वापर करा. आर्थिक मिळकत आणि मालमत्तेची नोंदणी आज सुरळीतपणे होण्याची शक्यता आहे. विश्वास आणि समृद्धीसह तुमचे नातेसंबंध आणखी बहरतील. शुभ रंग : Red and Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : घरकाम करणाऱ्या स्त्री लाल रुमाल दान करा. 17 मे रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : पंकज उधास (Pankaj Udhas), नुसरत भरुचा (Nusrat Bharucha), प्रीती गांगुली (Preeti Ganguly), शाम रॅमसे (Shyam Ramsey), बी. एस. चंद्रशेखर (B S Chandrasekhar)
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या