मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : 'या' जन्मतारखेच्या व्यक्तींनी आज गिफ्ट्सही स्वीकारू नये; सविस्तर वाचा तुमचं अंकशास्त्र

Numerology : 'या' जन्मतारखेच्या व्यक्तींनी आज गिफ्ट्सही स्वीकारू नये; सविस्तर वाचा तुमचं अंकशास्त्र

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 17 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 17 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 17 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 17 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) बिझनेस किंवा कामाच्या ठिकाणी एखादी नवी गोष्ट सुरू करायची असेल तर त्यासाठी उत्तम दिवस. प्रमोशन होण्याची शक्यता आहे. बऱ्याच अडचणी आता संपुष्टात येत आहेत. आयुष्यात काहीतरी नवीन गोष्ट लवकरच सुरू होईल. एखादी नवी जागा, पद, कोर्स, गुंतवणूक, नोकरी, घर किंवा नवी गाडी यापैकी कोणतीही गोष्ट असू शकते. आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडतील. आज सूर्यदेवाच्या नावाचा जप करणे आवश्यक आहे. डॉक्टर आणि खेळाडूंना आज नवी ऑफर मिळेल. शेती आणि शिक्षण दोन्ही व्यवसायांमध्ये भरपूर नफा होईल. शुभ रंग : Teal शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 5 दान : कृपया गरिबांना पिवळ्या डाळी दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज आळशीपणा सोडून भरपूर काम केलं तर फायदाही भरपूर होईल. तुमच्या भावनांना आवर घालणं गरजेचं आहे, कारण लोक तुमच्या निरागसतेचा फायदा घेऊ शकतात. एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनिअर, ब्रोकर, ट्रॅव्हल एजन्सी, शेअर मार्केट आणि पार्टनरशिप फर्म या उद्योगांशी संबंधित सर्वांसाठी अगदी भाग्याचा दिवस. जोडीदार किंवा सहकाऱ्यांकडून दुखावले जाल. शुभ रंग : Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : कृपया गायींना पाणी पाजा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) शिक्षणामध्ये एखाद्या नव्या कोर्ससाठी गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. आयटी क्षेत्रातील व्यक्ती स्वतःला अपस्किल करणे किंवा नवीन नोकरी शोधणे सुरू करू शकतात. कोणत्याही परिस्थितीत काम करण्याची तुमची तयारी असेल, त्यामुळे लवकरच यश मिळेल. आर्थिक व्यवहार करताना खबरदारी घ्या. क्रिएटिव्ह क्षेत्रातील आणि पब्लिक फिगर असणाऱ्या व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी मिळेल. क्रीडा प्रशिक्षकांना मोठे यश आणि आर्थिक फायदे मिळतील. बांधकाम आणि शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. सकाळी कपाळावर चंदनाचा टिळा लावल्यास फायदा होईल. शुभ रंग : Orange and Blue शुभ दिवस : गुरूवार शुभ अंक : 3 आणि 5 दान : कृपया गरिबांना केळी दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) बिझनेस वाढीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी आज उत्तम दिवस आहे. पैसा आणि पत यामुळे तुमची भरपूर प्रगती होईल. विद्यार्थ्यांनी आज सरकारी नोकरीसाठी अर्ज करणं फायद्याचं ठरेल. हिरव्या पालेभाज्या दान केल्याने भाग्य उजळेल. खेळाडूंचं त्यांच्या परफॉरमन्ससाठी कौतुक होईल, आर्थिक फायदेही संभवतात. कामाचा भरपूर व्याप असल्यामुळे मित्रांना आणि कुटुंबीयांना वेळ देता येणार नाही. तेव्हा त्यांच्या तक्रारी ऐकण्याची तयारी ठेवा. दानपुण्य करणे गरजेचे आहे. शुभ रंग : Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : दान : कृपया भिक्षेकऱ्यांना अन्न दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज मुलाखत देण्यासाठी अगदी भाग्याचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी मोठी उडी घेण्याचा विचार कराल. तुमच्या जोडीदाराला प्रपोज करण्यासाठी आज उत्तम दिवस. मशीन खरेदी, प्रॉपर्टी विक्री, करार, छोटीशी सहल इत्यादी गोष्टींसाठी आज चांगला दिवस आहे. वृत्त निवेदक, अभिनेते, हस्तकला कलाकार आणि इंजिनियर व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी मिळेल. आज मिळणारे गिफ्ट वा स्पेशल ट्रीटमेंट स्वीकारू नका, हा तुमच्या शत्रूंनी तुमच्यासाठी रचलेला सापळा असू शकतो. शुभ रंग : Teal शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया अनाथाश्रमातील मुलांना हिरवी फळं दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सध्या तुमचे लक्ष येणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या संधीचा उपयोग करून घेण्यात असायला हवे. महिलांनी आज ठरवलेली सर्व कामे पूर्ण होतील. आज तुम्ही जे काही कराल त्यात नशीब तुम्हाला साथ देईल. दिवस फायद्याचा राहील. कुटुंबीयांचे प्रेम आणि साथ मिळाल्यामुळे समाधानी असाल. आजचा दिवस अगदी ऐशोआरामाचा आहे. डिझायनर, वकील, टेक कर्मचारी, राजकारणी आणि अभिनेत्यांना विशेष कौतुक आणि स्थैर्य लाभेल. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : शुक्रवार आणि मंगळवार शुभ अंक : 6 आणि 9 दान : कृपया गरिबांना पांढरा तांदूळ दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) अध्यात्मिकता आणि हीलिंगकडे तुमची असणारी ओढ तुम्हाला वेगळ्याच उंचीवर पोहोचवेल. नातेसंबंध, आर्थिक प्रगती, चांगला परफॉर्मन्स सर्वकाही तुमच्या आयुष्यात येईल. बिझनेसमध्ये कित्येक मित्रांना आणि नातेवाईकांना मार्गदर्शन कराल. खेळाडूंना आपल्या प्रतिस्पर्ध्याचा सामना करावा लागेल. वैज्ञानिक, डिफेन्स अधिकारी, प्रशिक्षक, वकील, आयटी इंजिनियर आणि राजकारणी व्यक्तींना त्यांच्या कामासाठी प्रशंसा मिळेल. आज भगवान शंकराला अभिषेक करणं गरजेचं आहे. शुभ रंग : Green शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 3 दान : कृपया तांब्याची वा पितळेची भांडी दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्हाला कामाच्या ठिकाणी एखादं अप्ररायझल मिळण्याची शक्यता आहे. आज नशीब तुमच्या सोबत आहे, त्यामुळे तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसा, पद, ब्रँड आणि अधिकारांचा फायदा घ्या. तुमच्या भोवतालचे लोक तुम्हाला मनापासून फॉलो करतात. आज दानपुण्य केल्याने आणि शनिदेवाचे आशीर्वाद घेतल्याने फायदा होईल. निसर्गाच्या सानिध्यात काही काळ व्यतीत करा. शुभ रंग : Purple शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरिबांना कपडे आणि अन्न दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज विरुद्धलिंगी व्यक्तीच्या मदतीने आणि समाजातील तुमच्या ओळखींनी भरपूर प्रसिद्धी व पैसा मिळवू शकाल. डॉक्टर, सर्जन, राजकारणी आणि खेळाडूंना भरपूर प्रसिद्धी आणि बक्षीसे मिळतील. आजचा दिवस हा भरपूर उत्साहाचा, आनंदाचा आणि प्रसिद्धीचा आहे. तुमच्या उत्साहाचा वापर तुमच्या लक्ष्याच्या दिशेने जाण्यासाठी करा. विवाहासाठी अनुरूप जोडीदार मिळेल, प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनही सुरळीत पार पडेल. आज रिलेशनशिप बळकट होण्यास नशीब साथ देईल. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया लाल रुमाल दान करा. 17 जुलै रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज: सुनील लांबा, रविकिशन, झरिना वहाब, किरण जुनेजा, गुरबक्ष चहल, संयुक्ता हेगडे.
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology

पुढील बातम्या