मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology: जन्मतारखेनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

Numerology: जन्मतारखेनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 16 सप्टेंबर 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 16 सप्टेंबर 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 16 सप्टेंबर 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 16 सप्टेंबर 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमचं व्यक्तिमत्त्व प्रगल्भ आणि व्यावहारिक आहे. त्यामुळे प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी घेतले जात असल्याचं दिसतं. हीलिंग सेशन्स घेण्यासाठी, सरकारी काँट्रॅक्ट्सवर स्वाक्षरी करण्यासाठी, प्रेझेंटेशनला उपस्थित राहण्यासाठी, इव्हेंट्स स्पॉन्सर करण्यासाठी आणि टुर्नामेंट्स खेळण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करावा. कायदेविषयक किंवा ऑफिशियल समस्या सोडवण्यासाठी मित्र किंवा नातेवाईकांना तुमच्या मजबूत पार्श्वभूमीच्या माध्यमातून मदत करा. अधिक आकर्षक दिसण्यासाठी चामड्याच्या वस्तू वापरणं टाळा.
शुभ रंग : Yellow & Blue
शुभ दिवस : रविवार
शुभ अंक : 1
दान : आश्रमात खाद्यतेल दान करा.
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज कागदपत्रांच्या बाबतीत, तसंच तुमच्या गुडविलबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगायला हवी. कोणी तरी त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न करू शकेल. वैयक्तिक समस्यांकडे दुर्लक्ष करून आज तुम्ही करिअरकडे लक्ष द्यायला हवं, जेणेकरून तुमच्या प्रगतीचा वेग वाढेल. तुमच्या स्वप्नातल्या भावना सत्यात उतरवण्यासाठी आजचा दिवस रोमँटिक आहे. बिझनेस कमिटमेंट्स अगदी सहज पूर्ण केल्या जातील. मोठ्या कंपनीसोबत भागीदारी करण्यासाठी योग्य काळ. तुमचे भविष्यातले प्लॅन्स कोणाशी शेअर करणं टाळा. राजकीय नेत्यांनी कागदपत्रांवर सह्या करताना सावधगिरी बाळगली पाहिजे.
शुभ रंग : Grey
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 2, 6
दान : गरिबांना दूध दान करा.
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
घराच्या उत्तरेकडच्या भिंतीवर कारंजाचं चित्र/फोटो लावावा. अध्यात्म आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून आज तुम्ही तुमच्या सिक्स्थ सेन्सची क्षमता वृद्धिंगत करावी. त्यातून तुम्हाला विकासाच्या दिशेचा मार्ग दिसेल. तुमची स्टेजवरची उपस्थिती आज आकर्षक असेल. नाट्य कलावंतांनी कामाच्या ठिकाणी नवी सुरुवात जरूर करावी. नवी रिलेशनशिप सुरू होण्याची शक्यता. पब्लिक फिगर्स आणि वकील यांना नशीब साथ देईल. संगीतकार, डिझायनर्स, विद्यार्थी, वृत्तनिवेदक, राजकीय नेते, अभिनेते, कलावंत, गृहिणी, हॉटेलियर्स आणि लेखक यांच्या करिअरच्या दृष्टीने काही विशेष घोषणेची शक्यता.
शुभ रंग : Brown
शुभ दिवस : गुरुवार
शुभ अंक : 3, 1
दान : मुलांना पिवळी पाकिटं दान करा.
#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपल्या पांघरुणाची घडी घालून ठेवा. मोठ्या प्रमाणावर पैसे मिळण्याची शक्यता दिसते; मात्र त्यासाठी तडजोडी कराव्या लागतील. त्या भविष्यात लाभदायक ठरतील, त्यामुळे पुढे जा. हिरवे आणि लिंबूवर्गीय पदार्थ खाल्ल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील. बांधकाम, मशिनरी, धातू, सॉफ्टवेअर आणि ब्रोकर्स आदी बिझनेसमधल्या व्यक्तींनी आज करारावर सह्या करणं टाळावं. प्रोफेशनल लाइफ उत्तम असेल. आई-वडिलांना आपल्या मुलांचा अभिमान वाटण्याचा सुंदर अनुभव घेता येईल.
शुभ रंग : Blue
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 9
दान : गरिबांना लिंबं दान करा.
#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमच्या ड्रॉइंग रूमच्या पूर्वेकडच्या भिंतीवर काही तरी हलती वस्तू ठेवा. तुमचे बॉस किंवा वरिष्ठ आज तुमच्या शब्दांनी प्रभावित होतील आणि तुमचं कौतुक करतील. तुमच्या कामगिरीची दखल घेतली जाण्याचा आणि कौतुक-बक्षीस मिळवण्याचा आजचा दिवस आहे. आजचा दिवस प्रॉपर्टी किंवा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा आहे. कारण आर्थिक लाभ लवकरच मिळण्याचे संकेत आहेत. क्रीडापटू आणि ट्रॅव्हलर्सना चांगलं यश मिळेल. मीटिंगमध्ये नशिबाची साथ मिळण्यासाठी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्यास उपयुक्त ठरेल. आज तुमच्या आवडीच्या गोष्टी मिळण्याचा योग आहे. त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीला जरूर प्रपोझ करा. ग्लॅमर इंडस्ट्रीतल्या व्यक्तींना करिअरच्या सर्व बाजूंचा आनंद घेता येईल.
शुभ रंग : Sea Green
शुभ दिवस : बुधवार
शुभ अंक : 5
दान : गरिबांना पांढरं पीठ दान करा.
#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
अनवाणी पायांनी गवतावर चालून दिवसाची सुरुवात करा. आज तुमच्या मनावर रोमान्स आणि प्रॉमिसेसच्या भावनेचं राज्य असेल; मात्र फसवणुकीपासून सावध राहा. बिझनेस आणि नोकरीत चांगली प्रगती होईल; मात्र आज वैयक्तिक समस्या अधिक गुंतागुंतीच्या असतील. त्यामुळे आज वादांपासून दूर राहा. एकाच वेळी भरपूर जबाबदाऱ्या खांद्यावर घेणं टाळा. कारण तुम्ही एकाच वेळी सर्वांना खुश करू शकत नाही हे लक्षात ठेवा. हॉटेल व्यावसायिक, ट्रॅव्हलर्स, ज्वेलर्स, अभिनेते, जॉकी आणि डॉक्टर्सना आपली कौशल्यं दाखवण्याची संधी मिळेल. कारण आजचा दिवस त्यांच्यासाठी लकी आहे. खेळाडूंनी आपल्या प्रशिक्षकांचं मार्गदर्शन घ्यावं. कारण ते भविष्यात उपयोगी ठरेल.
शुभ रंग : Blue
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6
दान : मंदिरात चांदीचं नाणं दान करा.
#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
वकील, सॉफ्टवेअर इंजिनीअर्स, विद्यार्थी, खेळाडू आणि सीए यांच्यासाठी उत्तम दिवस. तुमचे नेतृत्वगुण आणि विश्लेषण कौशल्य ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्यं आहेत. आज आर्थिक व्यवहार करताना शहाणपण विसरू नका. वाद टाळा. कारण त्यामुळे तुमच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल. तुमच्या प्रामाणिकपणाचं फळ म्हणून तुम्हाला लव्ह रिलेशनशिपमध्ये विश्वास आणि आदर मिळेल. आज ऑडिट गरजेचं आहे. कागदपत्रांवर विश्वास ठेवू नये. कोर्ट, थिएटर, टेक्नॉलॉजी, सरकारी कंत्राट, रिअल इस्टेट, शाळा, इंटेरियर आणि धान्य या व्यवसायांशी संबंधित व्यक्तींसाठी चांगला दिवस. भागीदारीमध्ये नसाल तोपर्यंत तर बिझनेसविषयक संबंध हेल्दी राहतील.
शुभ रंग : Orange & Blue
शुभ दिवस : सोमवार
शुभ अंक : 7
दान : पिवळं कापड दान करा.
#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज पार्टीज आणि मांसाहार टाळा. दैनंदिन असाइनमेंट्समधल्या समस्या सोडवण्यात आज व्यग्र राहाल. अल्पकालीन उद्दिष्टं साध्य होतील; मात्र दीर्घकालीन उद्दिष्टं नव्याने ठरवावी लागतील. आरोग्याची काळजी घेऊन हेल्दी लाइफस्टाइल अंगीकारण्याचा काळ आहे. बिझनेसमधले व्यवहार दुपारी जेवणापूर्वी यशस्वी होतील. फॅमिली फंक्शन्स, प्रेझेंटेशन्स, सरकारी करार किंवा इंटरव्ह्यू आदींना आज आवर्जून उपस्थिती लावली पाहिजे. कुटुंबासोबत आज वेळ व्यतीत करणं अत्यावश्यक आहे. आज लाँग ड्राइव्ह टाळा. आज अध्यात्मसाधनेची ताकद वाढवा आणि प्रेमाची नाती बळकट करा.
शुभ रंग : Sea Blue
शुभ दिवस : शुक्रवार
शुभ अंक : 6
दान : गरिबांना कपडे दान करा.
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
प्राण्यांना खाऊ घाला. लोकप्रियता हा तुमच्या कामाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा कायमच घटक राहिला आहे. त्यामुळे कायम माणसांमध्ये मिसळत राहा, जेणेकरून तुमच्या आकर्षकपणाला चालना मिळेल. माध्यमं, खेळ, बांधकाम, वैद्यकीय, राजकारण आणि ग्लॅमर या क्षेत्रांतल्या व्यक्ती नवी उंची गाठतील. शिक्षण आणि क्रिएटिव्ह आर्ट क्षेत्रातल्या व्यक्तींना पैसे आणि यश मिळण्याचा दिवस. बिझनेस किंवा जॉबसाठी फॅमिली कनेक्शन्सचा उपयोग करण्याकरिता चांगला दिवस. कारण चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसाची सुरुवात करताना लाल रंगाचे कपडे घालावेत.
शुभ रंग : Red
शुभ दिवस : मंगळवार
शुभ अंक : 9, 6
दान : गरिबांना चपला दान करा.
16 सप्टेंबर रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : पी. चिदंबरम, देवी लाल, मीना, प्रसून जोशी, रामलिंग राजू, जॉर्ज अलेक्झांडर मुथूट
First published:

Tags: Numerology

पुढील बातम्या