Home /News /astrology /

Numerology : फसवणूक, विश्वासघाताची शक्यता; आर्थिक निर्णय घेताना विचारपूर्वकच घ्या

Numerology : फसवणूक, विश्वासघाताची शक्यता; आर्थिक निर्णय घेताना विचारपूर्वकच घ्या

Numerology 16 June 2022 : अंकशास्त्रानुसार आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 16 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही आधीच प्रगल्भ आणि व्यावहारिक आहात. त्यामुळे प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी घेतले जात असल्याचं दिसतं. हीलिंग सेशन्स घेण्यासाठी, सरकारी काँट्रॅक्ट्सवर स्वाक्षरी करण्यासाठी, प्रेझेंटेशनला उपस्थित राहण्यासाठी, इव्हेंट्स स्पॉन्सर करण्यासाठी आणि टुर्नामेंट्स खेळण्यासाठी आजचा दिवस व्यतीत करावा. कायदेविषयक किंवा ऑफिशियल समस्या सोडवण्यासाठी मित्र किंवा नातेवाईकांना तुमच्या मजबूत पार्श्वभूमीच्या माध्यमातून मदत करा. अधिक आकर्षक दिसण्यासाठी चामड्याच्या वस्तू वापरणं टाळा. शुभ रंग : Orange शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 7, 1 दान : आश्रमात पिवळे तांदूळ दान करावेत. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज कागदपत्रांच्या बाबतीत, तसंच तुमच्या गुडविलबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगायला हवी. कोणी तरी त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न करू शकेल. वैयक्तिक समस्यांकडे दुर्लक्ष करून आज तुम्ही करिअरकडे लक्ष द्यायला हवं, जेणेकरून तुमच्या प्रगतीचा वेग वाढेल. तुमच्या स्वप्नातल्या भावना सत्यात उतरवण्यासाठी आजचा दिवस रोमँटिक आहे. बिझनेस कमिटमेंट्स अगदी सहज पूर्ण केल्या जातील. मोठ्या कंपनीसोबत भागीदारी करण्यासाठी योग्य काळ. तुमचे भविष्यातले प्लॅन्स कोणाशी शेअर करणं टाळा. राजकीय नेत्यांनी कागदपत्रांवर सह्या करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. शुभ रंग : Sky Blue & Yellow शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2, 6 दान : मंदिरात किंवा गरिबांना तेल दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुम्ही अध्यात्म आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून तुमची सिक्स्थ सेन्सची ताकद वाढवली पाहिजे. त्यातून तुम्हाला प्रगतीचा मार्ग दिसेल. आज तुमची स्टेजवरची उपस्थिती चार्मिंग म्हणजेच आकर्षक असेल. नाट्य क्षेत्रातल्या कलाकारांनी नव्या कामाची सुरुवात करावी. नवी रिलेशनशिप तयार होण्याची शक्यता आहे. पब्लिक फिगर्स, तसंच वकिलांना नशीब साथ देईल. संगीतकार, डिझायनर्स, विद्यार्थी, न्यूज अँकर्स, राजकीय नेते, अभिनेते, कलाकार, गृहिणी, हॉटेलियर्स, लेखक आदींच्या करिअरमधल्या प्रगतीच्या अनुषंगाने काही खास घोषणा होण्याची शक्यता आहे. शुभ रंग : Red शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 1 दान : मुलांना पिवळी पाकिटं दान करावीत. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज पैसे भरपूर मिळतील; मात्र त्यासाठी तडजोडी कराव्या लागतील. भविष्यात त्याचा उपयोग होईल. त्यामुळे पुढे जा. हिरवे पदार्थ खाणं, तसंच संत्री खाणं शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगलं ठरेल. बांधकाम, मशिनरी, धातू, सॉफ्टवेअर आदी क्षेत्रातल्या व्यक्ती, तसंच ब्रोकर्सनी आज करारावर सह्या करणं टाळावं. आज उत्तम प्रोफेशनल लाइफचा अनुभव घ्याल. तसंच, मुलांचा अभिमान वाटण्याचा उत्तम अनुभव घ्याल. शुभ रंग : Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : गरिबांना लिंबं दान करावीत. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचे बॉस किंवा वरिष्ठ आज तुमच्या शब्दांनी प्रभावित होतील आणि तुमचं कौतुक करतील. तुमच्या कामगिरीसाठी कौतुक आणि बक्षीस मिळवण्याचा आजचा दिवस आहे. आजचा दिवस प्रॉपर्टी किंवा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा आहे. कारण आर्थिक लाभ लवकरच मिळण्याचे संकेत आहेत. क्रीडापटू आणि ट्रॅव्हलर्सना चांगलं यश मिळेल. मीटिंगमध्ये नशिबाची साथ मिळण्यासाठी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्यास उपयुक्त ठरेल. आज तुमच्या आवडीच्या गोष्टी मिळण्याचा योग आहे. त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीला जरूर प्रपोझ करा. ग्लॅमर इंडस्ट्रीतल्या व्यक्तींना करिअरच्या सर्व बाजूंचा आनंद घेता येईल. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : गरिबांना पांढरं पीठ दान करावं. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमच्या मनावर रोमान्स आणि प्रॉमिसेसचं राज्य असेल; मात्र फसवणूक आणि विश्वासघात होणार नाही यापासून सावध राहा. बिझनेस आणि जॉबमध्ये प्रगती चांगली होईल; पण आज वैयक्तिक मुद्दे अधिक गुंतागुंतीचे असतील. त्यामुळे वाद टाळा. तुम्ही एका वेळी सर्वांना खूश ठेवू शकत नाही. त्यामुळे एका वेळी अनेक जबाबदाऱ्या खांद्यावर घेऊ नका. हॉटेलियर्स, ट्रॅव्हलर्स, ज्वेलर्स, अभिनेते, जॉकी, डॉक्टर्स आदी व्यक्ती कौशल्यांचं प्रदर्शन करतील. त्यांच्यासाठी आजचा दिवस नशिबाचा आहे. भविष्याचा विचार करून खेळाडूंनी प्रशिक्षकांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. ते त्यांच्या आयुष्यासाठी अनुकूल ठरेल. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : चांदीचं नाणं दान करावं. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) वकील, सॉफ्टवेअर इंजिनीअर्स, विद्यार्थी, खेळाडू, सीए यांच्यासाठी उत्तम दिवस. तुमचे नेतृत्वगुण आणि विश्लेषण कौशल्य हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे गुण आहेत. आर्थिक निर्णय घेताना आज पूर्ण विचार करूनच घ्या. वाद टाळा. कारण त्यामुळे तुमच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो. तुमच्या प्रामाणिकपणामुळे प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि आदर मिळेल. आज कागदपत्रांवर विश्वास ठेवण्याचा दिवस नाही. कोर्ट्स, नाट्यक्षेत्र, तंत्रज्ञान, सरकारी टेंडर्स, रिअल इस्टेट, शाळा, इंटेरियर्स, धान्यं आदी क्षेत्रांत काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जोपर्यंत पार्टनरशिपमध्ये नसाल, तोपर्यंत बिझनेस रिलेशन्स हेल्दी राहतील. शुभ रंग : Orange & Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : पिवळं कापड दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) दैनंदिन असाइनमेंट्स पूर्ण करण्यात तुम्ही बिझी असाल. कमी कालावधीचं उद्दिष्ट गाठलं जाईल; मात्र दीर्घकालीन उद्दिष्टं नव्याने ठरवावी लागतील. आरोग्याची काळजी घेऊन हेल्दी लाइफस्टाइल अंगीकारण्याचा काळ आहे. बिझनेसमधले व्यवहार दुपारी जेवणापूर्वी यशस्वी होतील. फॅमिली फंक्शन्स, प्रेझेंटेशन्स, सरकारी करार किंवा इंटरव्ह्यू आदींना आज आवर्जून उपस्थिती लावली पाहिजे. कुटुंबासोबत आज वेळ व्यतीत करणं अत्यावश्यक आहे. आज लाँग ड्राइव्ह टाळा. आज अध्यात्मसाधनेची ताकद वाढवा आणि प्रेमाची नाती बळकट करा. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गायी-गुरांना हिरवं धान्य खाऊ घाला. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) लोकप्रियता हा तुमच्या कामाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा कायमच महत्त्वाचा घटक राहिला आहे. त्यामुळे कायम माणसांमध्ये मिसळत राहा, जेणेकरून तुमच्या आकर्षणाला चालना मिळेल. माध्यमं, खेळ, बांधकाम, वैद्यकीय, राजकारण आणि ग्लॅमर या क्षेत्रांतल्या व्यक्ती नवी उंची गाठतील. शिक्षण आणि क्रिएटिव्ह आर्ट क्षेत्रातल्या व्यक्तींना पैसे आणि यश मिळण्याचा दिवस. बिझनेस किंवा जॉबसाठी फॅमिली कनेक्शन्सचा उपयोग करण्याकरिता चांगला दिवस. कारण चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसाची सुरुवात करताना लाल रंगाचे कपडे घालावेत. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9, 6 दान : महिलांना केशरी रंगाचं कापड दान करावं. 16 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : मिथुन चक्रवर्ती, गोविंद पद्मसूर्या, अमाल मलिक, इम्तियाझ अली, शीना बजाज
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या